B2B मध्ये प्रमाणाचे नियम आणि प्रमाणानुसार किंमत सेट करणे

B2B ऑर्डर्ससाठी विशिष्ट प्रमाणाच्या आवश्यकता किंवा किंमत कपात सेट करण्यासाठी तुम्ही प्रमाणाचे नियम आणि प्रमाणानुसार किंमत वापरू शकता:

  • उत्पादन ठराविक पटीत विकण्यासाठी किंवा एका वेळी उत्पादनाच्या खरेदीची किमान किंवा कमाल मर्यादा सेट करण्यासाठी प्रमाणाचे नियम वापरा
  • मोठ्या प्रमाणात उत्पादने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना किंमत कपात ऑफर करण्यासाठी प्रमाणानुसार किंमत वापरा.

प्रमाणानुसार किंमत आणि प्रमाणाचे नियम एकत्र किंवा स्वतंत्रपणे वापरले जाऊ शकतात.

प्रमाणाचे नियम समजून घेणे

तुम्ही तुमच्या उत्पादनांसाठी वाढीव प्रमाणाचे नियम किंवा किमान अथवा कमाल प्रमाणाचे नियम सेट करू शकता.

वाढीव प्रमाणाचे नियम

तुम्हाला एखादे उत्पादन ठराविक पटीत विकायचे असल्यास, तुम्ही वाढीव प्रमाणाचे नियम वापरू शकता. उदाहरणार्थ, जर तुमची उत्पादने 10 च्या पटीत बॉक्स केलेली असतील, तर तुम्ही तुमचा वाढीव प्रमाणाचा नियम 10 वर सेट करू शकता जेणेकरून ग्राहकांना एका वेळी 10, 20, 30 या प्रमाणातच उत्पादने खरेदी करावी लागतील.

उत्पादन ज्या प्रमाणात खरेदी केले जाऊ शकते ते डीफॉल्ट प्रमाण 1 आहे. वाढीव प्रमाणाचे नियम हे 1 किंवा त्यापेक्षा जास्त धन पूर्णांक असावेत. तुम्ही वेगवेगळ्या उत्पादनांसाठी वेगवेगळे वाढीव प्रमाणाचे नियम सेट करू शकता.

प्रमाण वाढवण्याचे नियम उत्पादन व्हेरिएंटना लागू होतात. उदाहरणार्थ, तुम्ही निळ्या आणि करड्या रंगाच्या व्हेरिएंटमध्ये टोपी विकत असाल, तर ग्राहकांनी करड्या व्हेरिएंटच्या टोप्या 10 च्या पटीत आणि निळ्या व्हेरिएंटच्या टोप्याही 10 च्या पटीत खरेदी कराव्यात, अशी अट घालू शकता. ग्राहकांना 5 करड्या टोप्या आणि 5 निळ्या टोप्या एकत्र करून 10 च्या पटीत टोप्या खरेदी करण्याची अट पूर्ण करता येत नाही.

किमान किंवा कमाल प्रमाणाचे नियम

किमान प्रमाणाचे नियम तुम्हाला एका वेळी खरेदी करता येऊ शकणाऱ्या आयटमची कमीत कमी संख्या निर्धारित करू देतात. कमाल प्रमाणाचे नियम तुम्हाला एका वेळी खरेदी करता येऊ शकणाऱ्या उत्पादनाची जास्तीत जास्त संख्या निर्धारित करू देतात. तुम्ही किमान प्रमाणाचा नियम किंवा कमाल प्रमाणाचा नियम, अथवा दोन्ही सेट करू शकता.

किमान आणि कमाल प्रमाणाचे नियम उत्पादन व्हेरिएंटना लागू होतात. उदाहरणार्थ, तुम्ही निळ्या आणि करड्या रंगाच्या व्हेरिएंटमध्ये टोपी विकत असाल, तर ग्राहकांनी निळ्या व्हेरिएंटच्या किमान 10 आणि करड्या व्हेरिएंटच्या किमान 10 टोप्या खरेदी कराव्यात, अशी अट घालू शकता. ग्राहकांना 5 करड्या टोप्या आणि 5 निळ्या टोप्या एकत्र करून किमान 10 टोप्यांची अट पूर्ण करता येत नाही.

तुम्ही एखाद्या उत्पादनासाठी किमान ऑर्डरचे प्रमाण सेट केल्यास, तुमच्या थीममध्ये उत्पादन पेजवर ते किमान प्रमाण दिसेल याची खात्री करा, जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या कार्टमध्ये किती आयटम्स जोडायचे आहेत हे समजेल.

कॅटलॉग्स वापरून उत्पादनांसाठी प्रमाणाचे नियम सेट करा

तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधील कॅटलॉग्स विभागामध्ये किंवा CSV इंपोर्ट करून प्रमाणाचे नियम सेट करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, मार्केट्स > कॅटलॉग्स वर जा.

  2. तुम्हाला जो कॅटलॉग संपादित करायचा आहे त्यावर क्लिक करा.

  3. उत्पादने आणि किंमत निश्चिती विभागामध्ये, व्यवस्थापित करा > उत्पादने आणि किंमत निश्चिती व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

  4. एखाद्या उत्पादनासाठी किंवा विशिष्ट उत्पादन व्हेरिएंटसाठी प्रमाणाचे नियम सेट करण्याची निवड करा:

    1. उत्पादनाच्या सर्व व्हेरिएंट्ससाठी प्रमाणाचे नियम सेट करण्यासाठी, तुम्हाला जे उत्पादन संपादित करायचे आहे त्यावर माउस फिरवा.
    2. विशिष्ट उत्पादन व्हेरिएंटसाठी प्रमाणाचे नियम सेट करण्यासाठी, उत्पादनाच्या नावाखाली असलेल्या व्हेरिएंट्सच्या लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला जे उत्पादन व्हेरिएंट संपादित करायचे आहे त्यावर माउस फिरवा.
  5. प्रमाणाचे नियम कॉलममध्ये, + जोडा वर क्लिक करा.

  6. प्रमाणाचे नियम आणि प्रमाणानुसार किंमत संपादित करा डायलॉगमध्ये, खालील गोष्टी करा:

    1. वाढ फील्डमध्ये, उत्पादनासाठी वाढीव प्रमाण एंटर करा.
    2. किमान फील्डमध्ये, ग्राहकाने खरेदी करणे आवश्यक असलेले उत्पादनाचे किमान प्रमाण एंटर करा.
    3. कमाल फील्डमध्ये, एका ऑर्डरमध्ये ग्राहक व्हेरिएंटचे जास्तीत जास्त किती प्रमाण खरेदी करू शकतो हे मर्यादित करण्यासाठी उत्पादनाचे कमाल प्रमाण एंटर करा.
    4. तुमच्या प्रमाणाचे नियम तपासा आणि त्यानंतर पूर्ण झाले वर क्लिक करा.
  7. सेव्ह करा वर क्लिक करा.

प्रमाणानुसार किंमत समजून घेणे

जेव्हा ग्राहक एकाच ऑर्डरमध्ये उत्पादनाची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात, तेव्हा प्रमाणानुसार किंमत वापरून तुम्ही त्यांना अतिरिक्त किंमत कपात ऑफर करू शकता. तुम्ही प्रत्येक उत्पादनासाठी कमाल 10 किंमत कपाती जोडू शकता ज्या प्रत्येक व्हेरिएंटला लागू केल्या जातात.

किंमत कपातीचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांनी प्रत्येक व्हेरिएंटचे आवश्यक प्रमाण खरेदी करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, टोपी निळ्या आणि करड्या रंगाच्या व्हेरिएंटमध्ये विकली जात असल्यास, प्रमाणानुसार किमतीचा लाभ मिळवण्यासाठी ग्राहकाने किमान 20 निळ्या टोप्या ऑर्डर करणे आवश्यक आहे. प्रमाणानुसार किमतीचे पुढील उदाहरण पाहा.

प्रमाणानुसार किमतीचे उदाहरण
सेटिंगप्रमाणयुनिट किंमत
किमान1$20 USD
किंमत कपात 120$18.50 USD
किंमत कपात 250$17.75 USD
किंमत कपात 3100$16 USD

कॅटलॉग्स वापरून उत्पादनांसाठी प्रमाणानुसार किंमत सेट करा

तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनच्या कॅटलॉग्स विभागामध्ये, किंवा CSV इंपोर्ट करून प्रमाणानुसार किंमत सेट करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, मार्केट्स > कॅटलॉग्स वर जा.

  2. तुम्हाला जो कॅटलॉग संपादित करायचा आहे त्यावर क्लिक करा.

  3. उत्पादने आणि किंमत निश्चिती विभागामध्ये, व्यवस्थापित करा > उत्पादने आणि किंमत निश्चिती व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

  4. उत्पादनासाठी किंवा विशिष्ट उत्पादन व्हेरिएंटसाठी प्रमाणानुसार किंमत सेट करण्याची निवड करा:

    1. एखाद्या उत्पादनाच्या सर्व व्हेरिएंट्ससाठी प्रमाणानुसार किंमत सेट करण्यासाठी, तुम्हाला जे उत्पादन संपादित करायचे आहे त्यावर माउस फिरवा.
    2. विशिष्ट उत्पादन व्हेरिएंटसाठी प्रमाणानुसार किंमत सेट करण्यासाठी, उत्पादनाच्या नावाखाली असलेल्या व्हेरिएंट्सच्या लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला जे उत्पादन व्हेरिएंट संपादित करायचे आहे त्यावर माउस फिरवा.
  5. प्रमाणानुसार किंमत कॉलममध्ये, + जोडा वर क्लिक करा.

  6. प्रमाणाचे नियम आणि प्रमाणानुसार किंमत संपादित करा डायलॉगमध्ये, खालील गोष्टी करा:

    1. प्रमाणानुसार किंमत विभागामध्ये, + प्रमाणावरील किंमत कपात जोडा वर क्लिक करा.
    2. प्रमाण विभागामध्ये, पहिल्या किंमत कपातीसाठी किंमत एंटर करा. किंमत कपातीचे प्रमाण हे किमान ऑर्डर प्रमाणापेक्षा जास्त असले पाहिजे, तसेच तुम्ही तुमच्या प्रमाणाच्या नियमांमध्ये सेट केलेल्या वाढीच्या पटीत असले पाहिजे.
    3. पर्यायी: एकाच उत्पादनासाठी एकाधिक किंमत कपात जोडण्यासाठी, कपात जोडा वर क्लिक करा आणि त्यानंतर अतिरिक्त किंमत कपातींसाठी किंमत एंटर करा.
    4. तुमच्या प्रमाणानुसार किमतीचे पुनरावलोकन करा आणि त्यानंतर पूर्ण झाले वर क्लिक करा.
  7. सेव्ह करा वर क्लिक करा.