B2B विक्री कर्मचाऱ्यांसाठी ऑर्डर्स, डेटा आणि ॲडमिन अ‍ॅक्सेस

जर तुम्ही विक्री कर्मचारी नियुक्त केले असतील, तर तुम्ही कर्मचारी परवानग्या वापरून त्यांना तुमच्या Shopify ॲडमिनचा मर्यादित अ‍ॅक्सेस देऊ शकता. यामुळे तुमच्या विक्री कर्मचाऱ्यांना त्यांना नियुक्त केलेल्या ग्राहकांसाठी ऑर्डर्स देण्याची आणि खात्याची माहिती पाहण्याची अनुमती मिळते. तुमचे विक्री कर्मचारी एकाच ठिकाणी अद्ययावत ऑर्डर, ग्राहक, उत्पादन, किंमत निश्चिती आणि इन्व्हेंटरी डेटा अ‍ॅक्सेस देखील करू शकतात.

तुम्ही तुमच्या विक्री कर्मचाऱ्यांच्या विविध सदस्यांसाठी त्यांची भूमिका आणि त्यांना ज्या माहितीचा अ‍ॅक्सेस असणे आवश्यक आहे त्या आधारावर परवानग्या सानुकूलित करू शकता.

विक्री कर्मचारी सेट करणे

कर्मचारी परवानग्या कोणत्याही प्रकारच्या विक्री कर्मचाऱ्यांना सपोर्ट करतात.

B2B व्यवसायांसाठी विक्री कर्मचाऱ्यांचे दोन सर्वात सामान्य प्रकार विक्री व्यवस्थापक आणि विक्री प्रतिनिधी हे आहेत:

  • विक्री व्यवस्थापक: जे कर्मचारी विशिष्ट कंपनीच्या ठिकाणांसोबत कोणत्या विक्री प्रतिनिधींनी काम करायचे ते नियंत्रित करतात. ते स्टोअर ॲडमिन्स देखील असू शकतात.
  • विक्री प्रतिनिधी: जे कर्मचारी फक्त त्यांना नियुक्त केलेल्या कंपनीच्या ठिकाणांचा आणि रेकॉर्डचा अ‍ॅक्सेस मिळवू शकतात. तुम्ही त्यांना कंपन्या आणि कंपनीची ठिकाणे संपादित करण्याची किंवा तयार करण्याची परवानगी देखील देऊ शकता.

तुम्ही कंपन्यांच्या परवानग्यांसह कोणत्याही परवानग्यांचे संयोजन असलेल्या वापरकर्ता भूमिका तयार आणि नियुक्त करून तुमच्या विक्री कर्मचाऱ्यांच्या परवानग्यांची लेव्हल नियंत्रित करू शकता. तुमच्या Shopify ॲडमिनमधील सेटिंग्ज > वापरकर्ते > भूमिका वर जाऊन तुम्ही या परवानग्या व्यवस्थापित करू शकता. तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या भूमिकांच्या कॅटेगरी तुमच्या प्लॅन आणि बिझनेस सेटअपवर अवलंबून असतात. भूमिकांच्या कॅटेगरी विषयी अधिक जाणून घ्या.

खालील सूचना विक्री व्यवस्थापक आणि विक्री प्रतिनिधींच्या भूमिका तयार करण्यासाठी आहेत. विक्री कर्मचाऱ्यांना काय करता यावे अशी तुमची इच्छा आहे, यावर आधारित तुम्ही परवानग्या जोडू किंवा काढून टाकू शकता. तुमच्या संस्थेमध्ये वापरकर्ते जोडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी, वापरकर्त्यांना आमंत्रित करणे पाहा.

तुम्ही विक्री कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या भूमिकांना ग्राहक, ऑर्डर्स आणि ड्राफ्ट ऑर्डर्सच्या परवानग्या नियुक्त करू शकता, जेणेकरून त्यांना ऑर्डर्स पाहण्याची आणि घेण्याची, तसेच कंपनी किंवा कंपनीच्या ठिकाणाच्या वतीने खरेदी करणाऱ्या व्यक्तींसाठी माहिती व्यवस्थापित करण्याची अनुमती मिळेल.

तुम्ही अ‍ॅनालिटिक्स, मार्केटिंग आणि होम या परवानग्या नियुक्त करणे टाळू शकता कारण त्या पेजेसवर असा विक्री डेटा असतो जो त्यांना नियुक्त केलेल्या कंपनीच्या ठिकाणांसाठी फिल्टर केलेला नसतो, अगदी नियुक्त केलेल्या कंपनीच्या ठिकाणांसाठी परवानग्या मर्यादित करा हे अ‍ॅक्टिव्ह असतानाही.

विक्री व्यवस्थापकाच्या परवानग्या सेट करा

विक्री व्यवस्थापक हे असे कर्मचारी असतात जे कंपनीच्या ठिकाणावर कोणत्या विक्री कर्मचाऱ्यांना नियुक्त करायचे ते व्यवस्थापित करतात. कंपनीच्या ठिकाणामध्ये, विक्री व्यवस्थापक कोणत्याही कंपनीच्या ठिकाणासाठी नियुक्त कर्मचारी विभाग पाहू आणि व्यवस्थापित करू शकतात.

पायऱ्या:

  1. तुमच्या संस्थेमधील कोणत्याही स्टोअरमध्ये लॉग इन करा.
  2. सेटिंग्ज > वापरकर्ते> भूमिका वर जा.
  3. भूमिका जोडा वर क्लिक करा.
  4. भूमिकेसाठी नाव जोडा.
  5. परवानग्या विभागामध्ये, संस्था भूमिका किंवा स्टोअर भूमिका निवडण्यासाठी ड्रॉप-डाउन मेनू वापरा. संस्था भूमिका असलेल्या वापरकर्त्यांना तुमच्या संस्थेतील सर्व स्टोअर्सवर समान परवानग्या असतात. स्टोअर भूमिका असलेल्या वापरकर्त्यांना तुम्ही निवडलेल्या विशिष्ट स्टोअरमध्ये परवानग्या असतात.
  6. ​ परवानग्या विभागामध्ये, कंपन्यावर क्लिक करा आणि त्यानंतर भूमिकेला किमान खालील परवानग्या नियुक्त करा:
    1. कंपन्या पहा.
    2. कंपनीच्या ठिकाणांवर कर्मचारी नियुक्त करा.
    3. विक्री व्यवस्थापकांना फक्त त्यांना नियुक्त केलेल्या कंपनीच्या ठिकाणांपुरते मर्यादित ठेवण्यासाठी परवानग्या नियुक्त केलेल्या कंपनीच्या ठिकाणांपर्यंत मर्यादित करा.
  7. पर्यायी: तुम्ही विक्री व्यवस्थापकाकडे असाव्यात अशा ग्राहक, ऑर्डर्स, ड्राफ्ट ऑर्डर्स यासारख्या अतिरिक्त परवानग्या किंवा अन्य कोणतीही कर्मचारी परवानगी देखील नियुक्त करू शकता.
  8. सेव्ह करा वर क्लिक करा.

विक्री प्रतिनिधी परवानग्या सेट करा

विक्री प्रतिनिधी हे अनेकदा कंपन्या आणि कंपनीच्या ठिकाणांच्या विशिष्ट उपसंचासाठी जबाबदार असतात. तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधील त्यांचे व्ह्यू मर्यादित करू शकता जेणेकरून त्यांना फक्त नियुक्त केलेल्या कंपनीच्या ठिकाणांशी संबंधित माहिती दिसेल.

पायऱ्या:

  1. तुमच्या संस्थेमधील कोणत्याही स्टोअरमध्ये लॉग इन करा.
  2. सेटिंग्ज > वापरकर्ते> भूमिका वर जा.
  3. भूमिका जोडा वर क्लिक करा.
  4. भूमिकेसाठी नाव जोडा.
  5. परवानग्या विभागामध्ये, संस्था भूमिका किंवा स्टोअर भूमिका निवडण्यासाठी ड्रॉप-डाउन मेनू वापरा. संस्था भूमिका असलेल्या वापरकर्त्यांना तुमच्या संस्थेतील सर्व स्टोअर्सवर समान परवानग्या असतात. स्टोअर भूमिका असलेल्या वापरकर्त्यांना तुम्ही निवडलेल्या विशिष्ट स्टोअरमध्ये परवानग्या असतात.
  6. ​ परवानग्या विभागामध्ये, कंपन्या आणि त्यानंतर भूमिकेला किमान खालील परवानग्या नियुक्त करा:
    1. कंपन्या पहा.
    2. कंपनीच्या ठिकाणांवर कर्मचारी नियुक्त करा.
    3. विक्री प्रतिनिधींना फक्त त्यांना नियुक्त केलेल्या कंपनीच्या ठिकाणांपुरते मर्यादित ठेवण्यासाठी परवानग्या नियुक्त केलेल्या कंपनीच्या ठिकाणांपर्यंत मर्यादित करा.
  7. पर्यायी: तुम्ही विक्री प्रतिनिधींकडे असाव्यात अशा ग्राहक, ऑर्डर्स आणि ड्राफ्ट ऑर्डर्स यासारख्या अतिरिक्त परवानग्या किंवा अन्य कोणतीही कर्मचारी परवानगी देखील नियुक्त करू शकता.
  8. सेव्ह करा वर क्लिक करा.

विक्री कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमध्ये वापरकर्त्यांना जोडा

तुम्ही विक्री व्यवस्थापक आणि विक्री प्रतिनिधी भूमिका तयार केल्यानंतर, प्रत्येक भूमिकेची आवश्यकता असलेल्या कर्मचाऱ्यांना जोडा. तुम्ही वापरकर्त्याला जोडता तेव्हा तुम्ही भूमिका नियुक्त करता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये, सेटिंग्ज > वापरकर्ते वर क्लिक करा.

  2. वापरकर्ते जोडा वर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला जे वापरकर्ते जोडायचे आहेत त्यांचे ईमेल पत्ते टाका.

  3. भूमिका आणि गट विभागामध्ये, नियुक्त करा वर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही तयार केलेल्या विक्री व्यवस्थापक किंवा विक्री प्रतिनिधी भूमिकेवर क्लिक करा.

  4. पर्यायी: जर भूमिका स्टोअर भूमिका असेल, तर ज्या विशिष्ट स्टोअर्सवर ही भूमिका आणि तिच्या परवानग्या लागू व्हाव्यात अशी तुमची इच्छा आहे ते स्टोअर्स नियुक्त करा आणि त्यानंतर पूर्ण झाले वर क्लिक करा.

  5. पर्यायी: विक्री प्रतिनिधी भूमिकेसाठी, स्टोअर्स विभागातील प्रत्येक स्टोअरसाठी या पायऱ्यांची पुनरावृत्ती करा ज्यासाठी कर्मचाऱ्याला विक्री प्रतिनिधी परवानग्या असाव्यात अशी तुमची इच्छा आहे.

कंपनीच्या ठिकाणावर विक्री कर्मचाऱ्यांना नियुक्त करा

विक्री व्यवस्थापक, किंवा कंपनीच्या ठिकाणांवर कर्मचारी नियुक्त करा परवानगी असलेले कोणतेही कर्मचारी सदस्य, कंपनीच्या ठिकाणांवर इतर कर्मचारी सदस्यांना नियुक्त करू शकतात.

जेव्हा तुम्ही परवानग्या नियुक्त केलेल्या कंपनीच्या ठिकाणांपर्यंत मर्यादित करा निवडता आणि कंपनीच्या ठिकाणावर एखाद्या कर्मचाऱ्याला नियुक्त करता, तेव्हा विक्री कर्मचाऱ्यांना फक्त पुढील पेजेसवर त्यांना नियुक्त केलेल्या कंपनीच्या ठिकाणांच्या माहितीचा ॲक्सेस असतो:

  • ग्राहक
  • ऑर्डर्स
  • ड्राफ्ट ऑर्डर्स
  • कंपन्या

तुमच्या Shopify ॲडमिनमधील इतर कोणतीही पेजेस कंपनी किंवा कंपनीच्या ठिकाणानुसार माहिती मर्यादित करणार नाहीत. एकाच विक्री कर्मचाऱ्याला कंपनीच्या अनेक ठिकाणांवर नियुक्त केले जाऊ शकते. तुम्ही प्रत्येक कंपनीच्या ठिकाणावर जास्तीत जास्त 10 विक्री कर्मचारी नियुक्त करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या संस्थेमध्ये लॉग इन करा आणि योग्य स्टोअरवर नेव्हिगेट करा.
  2. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ग्राहक > कंपन्या वर जा.
  3. ज्या कंपनीवर तुम्हाला विक्री कर्मचाऱ्याला नियुक्त करायचे आहे त्या कंपनीवर क्लिक करा.
  4. स्थाने विभागामध्ये, ज्या कंपनीच्या ठिकाणावर तुम्हाला विक्री कर्मचारी नियुक्त करायचा आहे त्यावर क्लिक करा.
  5. नियुक्त कर्मचारी विभागामध्ये, संपादित करा आयकनवर क्लिक करा.
  6. कंपनीच्या ठिकाणावर तुम्हाला जो कर्मचारी नियुक्त करायचा आहे तो निवडा. तुम्ही अनेक कर्मचारी निवडू शकता.
  7. सेव्ह करा वर क्लिक करा.

बल्क मध्ये कंपनीच्या सर्व ठिकाणांवर विक्री कर्मचारी नियुक्त करा

तुम्ही बल्कमध्ये कंपनीच्या ठिकाणांवर कर्मचारी नियुक्त करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या संस्थेमध्ये लॉग इन करा आणि योग्य स्टोअरवर नेव्हिगेट करा.
  2. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ग्राहक > कंपन्या वर जा.
  3. ज्या कंपनीवर तुम्हाला एक किंवा अधिक विक्री कर्मचाऱ्यांना नियुक्त करायचे आहे त्या कंपनीवर क्लिक करा.
  4. नियुक्त केलेले कर्मचारी संपादित करा वर क्लिक करा.
  5. कंपनीच्या सर्व ठिकाणांवर तुम्हाला जो कर्मचारी नियुक्त करायचा आहे तो निवडा. तुम्ही अनेक कर्मचारी निवडू शकता.
  6. सेव्ह करा वर क्लिक करा.

विक्री कर्मचाऱ्यांद्वारे ऑर्डर आणि ड्राफ्ट ऑर्डर तयार करणे

तुम्ही कर्मचारी परवानग्या सेट केल्यानंतर, तुमचे विक्री कर्मचारी लॉग इन करू शकतात आणि तुमच्या Shopify ॲडमिनचा ॲक्सेस मिळवू शकतात. ते ड्राफ्ट ऑर्डर्स वापरून फोन, ईमेल आणि प्रत्यक्ष ऑर्डर्स Shopify मध्ये कॅप्चर करू शकतात.

तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये ड्राफ्ट ऑर्डर्स तयार करताना, तुमच्या विक्री कर्मचाऱ्यांना तुमच्या सर्व उत्पादन, किंमत निश्चिती, ग्राहक आणि इन्व्हेंटरी डेटाचा ॲक्सेस असतो. तुम्ही ऑर्डर्सना लागू होणारे कोणतेही व्यावसायिक नियम सेट केले आहेत की नाही हे देखील ते पाहू शकतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही विशिष्ट ग्राहकांना उपलब्ध असलेले शिपिंग पर्याय सानुकूलित करण्यासाठी एखादे अ‍ॅप वापरत असाल, तर हे कस्टमायझेशन ड्राफ्ट ऑर्डर्ससाठी देखील वापरले जाते.

जेव्हा ऑर्डर पूर्ण होते आणि ग्राहकाला पाठवण्यासाठी तयार असते, तेव्हा तुमचे विक्री कर्मचारी ग्राहकाला इन्व्हॉइसची सूचना देण्यासाठी आणि ग्राहकाला चेकआउट करताना त्यांच्या ऑर्डरचे पुनरावलोकन करण्यास व ती देण्यास अनुमती देण्यासाठी इन्व्हॉइस पाठवा वर क्लिक करू शकतात.

B2B ऑर्डर्स कॅप्चर करण्यासाठी ड्राफ्ट ऑर्डर्स वापरण्याबद्दल अधिक जाणून घ्या.