कॉपीराइट उल्लंघनाची तक्रार करणे किंवा कॉपीराइट सूचनेला प्रतिसाद देणे

या पेजवर, तुम्हाला Shopify च्या कॉपीराइट धोरणाबद्दल, कॉपीराइट उल्लंघनाची तक्रार कशी करावी आणि कॉपीराइट सूचनेला प्रतिसाद कसा द्यावा याबद्दल माहिती मिळू शकते.

Shopify डिजिटल मिलेनियम कॉपीराइट अ‍ॅक्ट (DMCA) चे अनुपालन करते आणि दावा केलेल्या कॉपीराइट उल्लंघनासाठी कायद्याच्या सूचना आणि प्रति-सूचनेच्या प्रक्रियेसह DMCA प्रक्रियांंचा वापर करून कॉपीराइट उल्लंघनाच्या दाव्यांना प्रतिसाद देते:

  • एखाद्या स्टोअरवरील सामग्रीसंबंधी कथित कॉपीराइट उल्लंघनाची संपूर्ण आणि वैध सूचना प्राप्त झाल्याचा Shopify ला रास्त विश्वास वाटल्यास, ते सर्वसाधारणपणे त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून तक्रार केलेली सामग्री काढून टाकेल आणि प्रभावित मर्चंटला त्यांच्या Shopify ॲडमिनद्वारे सूचित करेल.
  • सामग्री चुकून काढली गेली असे त्यांना का वाटते हे स्पष्ट करणारी प्रति-सूचना पाठवण्याची संधी Shopify मर्चंटला देईल. प्रति-सूचना वैध असल्यास, मर्चंटला सर्वसाधारणपणे 10 ते 14 कामकाजाच्या दिवसांत सामग्री पुन्हा पोस्ट करण्याची अनुमती दिली जाईल.
  • काही प्रकरणांमध्ये, Shopify तक्रार केलेली सामग्री काढून टाकण्यास नकार देऊ शकते किंवा ती काढली गेली असल्यास, मर्चंटला सामग्री त्वरित पुन्हा पोस्ट करण्याची अनुमती देऊ शकते.
  • योग्य परिस्थितींमध्ये वारंवार होणाऱ्या उल्लंघनासाठी स्टोअर्स समाप्त करण्याचे Shopify चे धोरण आहे, जसे की जेथे स्टोअरने प्रतिवाद न केलेल्या कथित उल्लंघनाच्या अनेक सूचना प्राप्त झाल्या आहेत. वारंवार होणाऱ्या उल्लंघनासाठी जेव्हा एखादे स्टोअर समाप्त केले जाते, तेव्हा त्याच वारंवार उल्लंघन करणाऱ्याच्या मालकीची किंवा त्याच्याकडून चालवली जाणारी सर्व दुकानेदेखील समाप्त केली जाऊ शकतात.
  • इरादापूर्वक किंवा अत्यंत गंभीर उल्लंघनाच्या एकाच उदाहरणासाठीदेखील स्टोअर अक्षम करण्याचा विवेकाधिकार Shopify कडे आहे.
  • दावा केलेल्या उल्लंघनाच्या खोट्या किंवा वाईट हेतूच्या सूचना किंवा प्रति-सूचना सबमिट करणे कायद्यानुसार दंडनीय आहे. Shopify स्वतःसह अशा सूचनांमुळे नुकसान झालेले लोक नुकसानभरपाई आणि वकिलांच्या फीसाठी दावा दाखल करू शकतात.

Shopify चा ऑनलाइन फॉर्म हा कथित कॉपीराइट उल्लंघनाची सूचना सबमिट करण्याचा सर्वात कार्यक्षम मार्ग आहे. Shopify ला कारवाई करता यावी यासाठी सर्व सूचनांमध्ये खालील माहिती समाविष्ट असणे आवश्यक आहे:

  • तुमचे कायदेशीर नाव आणि संपर्क माहिती.
  • उल्लंघन केल्याचा दावा केलेल्या मूळ कॉपीराइट केलेल्या कामाच्या थेट लिंक्स. तुमच्याकडे थेट लिंक नसल्यास, तुम्ही तुमच्या कामाचे वर्णन देऊ शकता.
  • Shopify वरील विशिष्ट सामग्रीच्या थेट लिंक्स ज्यामुळे तुमच्या कॉपीराइटचे उल्लंघन होते असे तुम्हाला वाटते. सामग्री असलेल्या प्रत्येक वैयक्तिक पेजची सूची आवश्यक आहे. सर्वसाधारण शॉप लिंक स्वीकारली जाणार नाही.
  • ज्यामुळे तुमच्या कॉपीराइटचे उल्लंघन होते असे तुम्हाला वाटते अशा सामग्रीचे आणि ती लिंकमध्ये कुठे दिसते याचे वर्णन, जसे की कोणत्या इमेज, व्हिडिओ, gifs आणि मजकूर.
  • याची पुष्टी की:
    • तक्रार केलेल्या पद्धतीनुसार सामग्रीचा वापर कॉपीराइट मालक, त्यांचा एजंट किंवा कायद्याद्वारे अधिकृत केलेला नाही असा तुमचा सद्भावनेने विश्वास आहे.
    • सूचनेतील सर्व माहिती अचूक आहे.
  • खोटी साक्ष देण्याच्या शिक्षेअंतर्गत, तुम्ही कॉपीराइटचे मालक आहात किंवा मालकाच्या वतीने कृती करण्यास अधिकृत आहात असे विधान.
  • तुमची प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक सही.

तुम्ही ऑनलाइन फॉर्म वापरू शकत नसल्यास, तुम्ही आवश्यक माहितीसह Shopify च्या नियुक्त एजंटला येथे सूचना पाठवू शकता:

Shopify Trust & Safety
Shopify Inc.
151 O'Connor Street
Ground floor
Ottawa, Ontario
K2P 2L8
Canada
ईमेल: legal@shopify.com

मला माझ्या स्टोअरफ्रंटवरील सामग्रीसाठी कॉपीराइट नोटीस मिळाली आहे. आता काय?

तुमच्या स्टोअरवरील सामग्रीच्या संदर्भात कथित कॉपीराइट उल्लंघनाची संपूर्ण आणि वैध नोटीस असल्याची Shopify ला वाजवी खात्री वाटल्यास, तुम्हाला तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये एक सूचना मिळेल, ज्यामध्ये नेमक्या कोणत्या सामग्रीचा रिपोर्ट केला गेला आहे आणि ती केव्हा काढली जाईल हे कळवले जाईल. त्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतील:

  • तुम्ही नोटीसचे पुनरावलोकन केल्यास आणि तुम्हाला ती सामग्री वापरण्याचा अधिकार नाही हे मान्य केल्यास, पुढील कोणत्याही कृतीची आवश्यकता नाही. Shopify ती सामग्री काढून टाकेल आणि तुम्हाला कॉपीराइट धारकाची मंजुरी मिळेपर्यंत ती ऑफलाइन राहील.
  • तुम्ही नोटीसचे पुनरावलोकन केल्यास आणि ती सामग्री चुकीने किंवा चुकीच्या ओळखीमुळे काढून टाकली गेली आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही DMCA काउंटर नोटीस दाखल करू शकता.

मी DMCA काउंटर नोटीस कशी दाखल करू?

तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधील फॉर्मद्वारे आम्हाला काउंटर नोटीस पाठवू शकता. तुमच्या काउंटर नोटीसचा विचार करण्यासाठी त्यामध्ये खालील सर्व माहिती समाविष्ट असणे आवश्यक आहे:

  • काउंटर नोटीस सबमिट करणाऱ्या व्यक्तीचे कायदेशीर नाव आणि पुरेशी संपर्क माहिती.
  • काढून टाकलेल्या सामग्रीची ओळख आणि ती काढून टाकण्यापूर्वी सामग्रीचे मूळ ठिकाण.
  • तुमचा पत्ता ज्या न्यायालयीन जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यासाठी फेडरल डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या अधिकारक्षेत्राला तुमची संमती असल्याचे विधान किंवा, तुमचा पत्ता युनायटेड स्टेट्सच्या बाहेर असल्यास, तुमची डेलावेअर जिल्ह्यासाठी फेडरल डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या अधिकारक्षेत्राला संमती असल्याचे विधान.
  • कॉपीराइट नोटीस सबमिट करणारा पक्ष किंवा त्यांच्या एजंटकडून तुम्ही कायदेशीर प्रक्रिया (सर्व्हिस ऑफ प्रोसेस) स्वीकाराल असे विधान.
  • खोटी साक्ष देण्याच्या शिक्षेखाली (पेनल्टी ऑफ पर्ज्युरी), तुमची अशी प्रामाणिक धारणा आहे की सामग्री चुकीने किंवा चुकीच्या ओळखीमुळे काढून टाकली गेली होती, असे विधान.
  • तुमची प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक सही.

तुम्ही ऑनलाइन फॉर्म वापरू शकत नसल्यास, आवश्यक माहिती असलेली काउंटर नोटीस तुम्ही Shopify च्या नियुक्त एजंटला खालील पत्त्यावर पाठवू शकता:

Shopify Trust & Safety
Shopify Inc.
151 O'Connor Street
Ground floor
Ottawa, Ontario
K2P 2L8
Canada
ईमेल: legal@shopify.com

मी DMCA काउंटर नोटीस दाखल केल्यानंतर काय होते?

जेव्हा तुम्ही वैध काउंटर नोटीस सबमिट करता, तेव्हा आम्ही तुमच्या Shopify खाते रेकॉर्डमधून तक्रार काढून टाकू आणि कॉपीराइट नोटीस सबमिट केलेल्या पक्षाला तुमच्या काउंटर नोटीसची एक प्रत पाठवू. त्यांनी तुमच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केल्यास आणि त्या कारवाईची नोटीस आम्हाला 10-14 कामकाजाच्या दिवसांत पाठवल्यास, सामग्री काढून टाकलेलीच राहू शकते. त्या कालावधीत आम्हाला कायदेशीर कारवाईची नोटीस न मिळाल्यास, आम्ही तुम्हाला कळवू आणि विवादित सामग्री पुन्हा पोस्ट केली जाऊ शकते.