ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस उल्लंघनाचा रिपोर्ट करणे किंवा ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस नोटीसला प्रतिसाद देणे

या पेजवर, तुम्ही Shopify चे ट्रेडमार्क आणि ट्रेड ड्रेस धोरण, ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस उल्लंघनाचा रिपोर्ट कसा करायचा आणि ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस नोटीसला कसा प्रतिसाद द्यायचा याबद्दल माहिती मिळवू शकता. ट्रेडमार्क आणि ट्रेड ड्रेसवरील Shopify चे धोरण आमच्या कॉपीराइट धोरणासारखेच आहे, परंतु यामध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत:

ट्रेडमार्क आणि ट्रेड ड्रेस उल्लंघनाचा रिपोर्ट करणे

कथित ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस उल्लंघनाची नोटीस सबमिट करण्यासाठी Shopify चा ऑनलाइन फॉर्म हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

Shopify ला कारवाई करता यावी यासाठी तुमच्या ट्रेडमार्क आणि/किंवा ट्रेड ड्रेस नोटीसमध्ये खालील माहिती समाविष्ट असणे आवश्यक आहे:

  • तुमचे कायदेशीर नाव आणि संपर्क माहिती.
  • उल्लंघन झाल्याचा दावा केलेल्या ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेसच्या नमुन्यांच्या थेट लिंक्स. तुमच्याकडे थेट लिंक नसल्यास, तुम्ही ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेसचे वर्णन देऊ शकता.
  • तुमच्या ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेसचे उल्लंघन करत असल्याचे तुम्हाला वाटणाऱ्या Shopify वरील विशिष्ट सामग्रीच्या थेट लिंक्स. सामग्री असलेल्या प्रत्येक स्वतंत्र पेजची सूची आवश्यक आहे - सर्वसाधारण शॉपची लिंक स्वीकारली जाणार नाही.
  • विवादातील प्रत्येक ट्रेडमार्कसाठी:
    • ट्रेडमार्कचे वर्णन.
    • तो नोंदणीकृत असलेले देश.
    • ट्रेडमार्क नोंदणी क्रमांक.
    • नोंदणीमध्ये समाविष्ट असलेल्या उत्पादने आणि/किंवा सेवांची श्रेणी.
    • सामग्री तुमच्या ट्रेडमार्कचे उल्लंघन करते किंवा भंग करते असे तुम्हाला का वाटते, याचे वर्णन.
  • विवादातील प्रत्येक ट्रेड ड्रेससाठी:
    • ट्रेड ड्रेसचे वर्णन, ज्यामध्ये सामग्रीच्या विशिष्ट बाबींचा (जसे की आकार, रचना, रंग, पोत इ.) समावेश आहे, ज्यामुळे त्याचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण बनते.
    • ट्रेड ड्रेस गैर-कार्यात्मक (नॉन-फंक्शनल) असल्याचे विधान.
    • Shopify वरील सामग्री तुमच्या ट्रेड ड्रेसचे उल्लंघन कसे करते त्याचे वर्णन, यामध्ये सामग्रीच्या अशा बाबी (जसे की आकार, रचना, रंग, पोत इ.) समाविष्ट असाव्यात ज्या तुमच्या मते ट्रेड ड्रेससारख्याच आहेत आणि ज्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता आहे.
  • याची पुष्टी की:
    • तुमची अशी प्रामाणिक धारणा आहे की ज्या पद्धतीने सामग्री वापरल्याबद्दल तक्रार केली आहे, त्या पद्धतीला ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस मालक, त्यांचा एजंट किंवा कायद्याद्वारे अधिकृत केलेले नाही.
    • नोटीसमधील सर्व माहिती अचूक आहे.
  • खोटी साक्ष देण्याच्या शिक्षेखाली (पेनल्टी ऑफ पर्ज्युरी), तुम्ही ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस मालक आहात किंवा मालकाच्या वतीने कृती करण्यासाठी अधिकृत आहात, असे विधान.
  • तुमची प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी.

ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस नोटीसला प्रतिसाद देणे

मला माझ्या स्टोअरफ्रंटवरील सामग्रीसाठी ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस नोटीस मिळाली आहे. आता काय?

तुमच्या स्टोअरला वैध ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस नोटीस मिळाल्यास, साधारणपणे तुम्हाला तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये एक सूचना मिळेल, ज्यामध्ये नेमक्या कोणत्या सामग्रीचा रिपोर्ट केला गेला आहे आणि ती काढली जाणार आहे का हे कळवले जाईल. त्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतील:

  • सामग्री हटवणे आवश्यक असल्यास आणि तुम्ही नोटीसचे पुनरावलोकन करून तुम्हाला ती सामग्री वापरण्याचा अधिकार नाही हे मान्य केल्यास, Shopify ती सामग्री काढून टाकेल आणि तुम्हाला ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस धारकाची मंजुरी मिळेपर्यंत ती ऑफलाइन राहू शकते.
  • तुम्ही नोटीसचे पुनरावलोकन केल्यास आणि उल्लंघन करत असल्याचा दावा असलेल्या ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेसच्या तुमच्या वापरामुळे ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेसचे उल्लंघन होत नाही असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही प्रतिसाद दाखल करू शकता.

मी ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस प्रतिसाद कसा दाखल करू?

तुम्हाला ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस नोटीस मिळाल्यास, तुम्ही तुमचा प्रतिसाद तुमच्या Shopify ॲडमिनद्वारे आम्हाला पाठवू शकता. तुमचा प्रतिसाद विचारात घेण्यासाठी त्यात खालील सर्व माहिती समाविष्ट असणे आवश्यक आहे:

  • प्रतिसाद सबमिट करणार्‍या व्यक्तीचे कायदेशीर नाव आणि पुरेशी संपर्क माहिती.
  • तुमचा पत्ता ज्या न्यायिक जिल्ह्यात आहे तेथील फेडरल डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या अधिकारक्षेत्राला तुमची संमती असल्याचे विधान किंवा तुमचा पत्ता युनायटेड स्टेट्सच्या बाहेर असल्यास, तुम्ही डेलावेअर जिल्ह्यासाठी फेडरल डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या अधिकारक्षेत्राला संमती देत असल्याचे विधान.
  • तुम्ही ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेसची नोटीस सबमिट करणारा पक्ष किंवा त्यांच्या एजंटकडून कायदेशीर प्रक्रियेची नोटीस स्वीकाराल असे विधान.
  • खोट्या साक्षीच्या शिक्षेच्या अधीन राहून, चूक किंवा चुकीच्या ओळखीमुळे सामग्री हटवली गेली असा तुमचा सद्भावनेने विश्वास असल्याचे विधान.
  • तुमची प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी.

मी प्रतिसाद दाखल केल्यानंतर काय होते?

तुम्ही वैध प्रतिसाद सबमिट केल्यानंतर, Shopify ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेस नोटीस सबमिट करणाऱ्या पक्षाला एक प्रत पाठवेल आणि साधारणपणे तुम्हाला विवादित सामग्री पुन्हा पोस्ट करण्याची परवानगी देईल.