अल्कोहोल उत्पादने
तुम्ही Shopify द्वारे अल्कोहोलची विक्री करता तेव्हा, तुम्हाला तुमच्या व्यवसायाला लागू होणाऱ्या कायदे आणि नियमांचे पालन करावे लागेल. कोणते कायदे आणि नियम लागू होतात ते तुमचे स्टोअर ज्या प्रदेशात आहे आणि तुम्ही ज्या प्रदेशात विक्री करता त्यावर अवलंबून असते. तुमच्या व्यवसायाला लागू होऊ शकणाऱ्या अल्कोहोल-संबंधित कायद्यांबद्दल आणि नियमांबद्दल जाणून घेण्यासाठी या पेजवरील माहिती वापरा.
या पेजवर
- युनायटेड स्टेट्स (US) मध्ये अल्कोहोल विकण्यासाठी कायदे आणि नियम
- कॅनडामध्ये अल्कोहोल विकण्यासाठी कायदे आणि नियम
- युरोपियन युनियन (EU) मध्ये अल्कोहोल विकण्यासाठी कायदे आणि नियम
- युनायटेड किंगडम (UK) मध्ये अल्कोहोल विकण्यासाठी कायदे आणि नियम
- ऑस्ट्रेलियामध्ये अल्कोहोल विकण्यासाठी कायदे आणि नियम
- न्यूझीलंडमध्ये अल्कोहोल विकण्यासाठी कायदे आणि नियम
युनायटेड स्टेट्स (US) मध्ये अल्कोहोल विकण्यासाठी कायदे आणि नियम
तुमचा व्यवसाय युनायटेड स्टेट्समध्ये असल्यास किंवा तुम्ही युनायटेड स्टेट्समधील ग्राहकांना अल्कोहोल उत्पादने विकत असल्यास, तुमची अल्कोहोल उत्पादने ज्या कोणत्याही अधिकारक्षेत्रात जाहिरात केली जातात किंवा विकली जातात तेथील सर्व फेडरल, राज्य आणि स्थानिक कायद्यांचे तुम्ही पालन करणे आवश्यक आहे.
युनायटेड स्टेट्समध्ये राज्य स्तरावर अल्कोहोलचे कडक नियमन केले जाते आणि राज्यानुसार नियम बदलतात. तुम्ही अल्कोहोल उत्पादने विकत असल्यास किंवा शिप करत असल्यास, तुम्ही ज्या राज्यांमध्ये व्यवसाय करता आणि तुमच्या ग्राहकांच्या राज्यांच्या कायद्यांचे पुनरावलोकन केले पाहिजे. अल्कोहोल विकण्यासाठी खालील सामान्य आवश्यकता विचारात घ्या:
- तुमची उत्पादने तयार करण्यासाठी, मार्केटिंग करण्यासाठी, विकण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी वैयक्तिकरित्या सर्व आवश्यक परवाने मिळवा आणि ते कायम ठेवा.
- रेकॉर्ड ठेवण्याच्या आवश्यकतांसह सर्व लागू परवाना आवश्यकतांचे पूर्णपणे पालन करा.
- वयाची पडताळणी करण्याच्या प्रभावी पद्धती वापरा जेणेकरून 21 वर्षांखालील व्यक्ती अल्कोहोल उत्पादने खरेदी करू शकणार नाहीत किंवा प्राप्त करू शकणार नाहीत.
- तुमच्या व्यवसायाच्या आणि ग्राहकांच्या अधिकारक्षेत्रातील लागू कायद्यांचे पूर्ण पालन करून अल्कोहोल उत्पादने शिप आणि वितरित करा. तुम्ही वेगळ्या राज्यामध्ये शिप केल्यास, तुम्हाला त्या राज्याच्या कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
विशेषतः कॅलिफोर्नियामध्ये अल्कोहोल विकण्यासाठी, तुम्ही Prop 65 अल्कोहोल वॉर्निंग उत्पादन प्रकटीकरण प्रदर्शित करू शकता.
युनायटेड स्टेट्समध्ये अल्कोहोल विकण्याविषयीची संसाधने
खालील संसाधनांसह युनायटेड स्टेट्समध्ये अल्कोहोल उत्पादने विकण्याविषयीची विशिष्ट माहिती तुम्हाला ऑनलाइन मिळू शकते:
कॅनडामध्ये अल्कोहोल विकण्यासाठी कायदे आणि नियम
तुमचा व्यवसाय कॅनडामध्ये असल्यास किंवा तुम्ही कॅनडामधील ग्राहकांना अल्कोहोल उत्पादने विकत असल्यास, तुमची अल्कोहोल उत्पादने ज्या कोणत्याही अधिकारक्षेत्रात जाहिरात केली जातात, विकली जातात किंवा वितरीत केली जातात तेथील सर्व लागू फेडरल आणि प्रांतीय कायद्यांचे तुम्ही पालन करणे आवश्यक आहे. काही प्रांतांमध्ये विशिष्ट लेबलिंग आवश्यकता देखील असू शकतात ज्यांचे पालन तुम्ही तुमची अल्कोहोल उत्पादने त्या प्रांतात विकण्यासाठी करणे आवश्यक आहे.
तुम्ही कॅनडामध्ये अल्कोहोल उत्पादने विकत असल्यास, तुम्ही खालील संसाधनांचे पुनरावलोकन केले पाहिजे:
- फूड अँड ड्रग्ज अॅक्ट
- फूड अँड ड्रग रेग्युलेशन्स
- सेफ फूड फॉर कॅनेडियन्स अॅक्ट
- सेफ फूड फॉर कॅनेडियन्स रेग्युलेशन्स.
फेडरल स्तरावर, तुम्ही पॅकेजिंग आणि लेबलिंग आवश्यकतांचे पालन करणे आवश्यक आहे. उत्पादनाला विशिष्ट प्रकारची दारू (लिकर) म्हणून लेबल करण्यासाठी या आवश्यकतांमध्ये रचनात्मक मानके आणि भूगोलाशी संबंधित IP (बौद्धिक मालमत्ता) संरक्षणांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, "चॅम्पेन" (Champagne) केवळ फ्रान्सच्या चॅम्पेन प्रदेशातील स्पार्कलिंग वाइनसाठी वापरले जाते.
प्रत्येक प्रांतीय अधिकारक्षेत्रामध्ये अल्कोहोलसाठी वेगवेगळ्या आवश्यकता आहेत, ज्यामध्ये खालील सामान्यतः उद्धृत केलेल्या आवश्यकतांचा समावेश आहे, परंतु त्यापुरते मर्यादित नाही:
- मद्यपानाच्या कायदेशीर वयाच्या आवश्यकता
- अल्कोहोल वितरणाच्या अधिकारासाठी परवान्याच्या आवश्यकता
- दारूच्या जाहिराती आणि मार्केटिंगसाठी धोरणे
- नोंदणी आणि मार्केटिंग धोरणे
तुम्ही कॅनडामध्ये अल्कोहोल उत्पादने विकत असल्यास किंवा शिप करत असल्यास, खालील सामान्यतः उद्धृत केलेल्या आवश्यकतांचा विचार करा:
- अल्बर्टा, मॅनिटोबा आणि क्यूबेकमध्ये मद्यपानाचे कायदेशीर वय 18 आहे.
- ब्रिटिश कोलंबिया, न्यू ब्रन्सविक, न्यूफाउंडलँड आणि लॅब्राडोर, नॉर्थवेस्ट टेरिटरीज, नोव्हा स्कॉशिया, नुनावुत, ओंटारियो, प्रिन्स एडवर्ड आयलंड, सस्कॅचेवन आणि युकॉनमध्ये मद्यपानाचे कायदेशीर वय 19 आहे.
- उत्पादन किंवा आयात करताना अल्कोहोल उत्पादनांवर उत्पादन शुल्क लागू केले जाते, जे उत्पादक किंवा आयातदाराने भरणे आवश्यक असते.
कॅनडामध्ये अल्कोहोल विकण्याविषयीची संसाधने
खालील संसाधनांसह कॅनडामध्ये अल्कोहोल उत्पादने विकण्याविषयीची अतिरिक्त विशिष्ट माहिती तुम्हाला ऑनलाइन मिळू शकते:
युरोपियन युनियन (EU) मध्ये अल्कोहोल विकण्यासाठी कायदे आणि नियम
तुमचा व्यवसाय युरोपियन युनियनमध्ये असल्यास किंवा तुम्ही युरोपियन युनियनमधील ग्राहकांना अल्कोहोल उत्पादने विकत असल्यास, तुमची अल्कोहोल उत्पादने ज्या कोणत्याही अधिकारक्षेत्रात जाहिरात केली जातात किंवा विकली जातात तेथील सर्व लागू कायद्यांचे तुम्ही पालन करणे आवश्यक आहे. तुम्ही युरोपियन युनियनमध्ये अल्कोहोल उत्पादन विकण्यापूर्वी, तुम्ही खालील कायदे आणि नियमांचे पुनरावलोकन केले पाहिजे:
- रेग्युलेशन (EU) क्र. 1169/2011
- कौन्सिल डिरेक्टिव्ह 92/83/EEC
- ज्या कोणत्याही सदस्य राज्यामध्ये तुम्हाला तुमच्या उत्पादनांचे उत्पादन, मार्केटिंग किंवा विक्री करायची आहे तेथील कायदे.
प्रत्येक EU अधिकारक्षेत्रामध्ये अल्कोहोलसाठी वेगवेगळ्या आवश्यकता आहेत, ज्यामध्ये मर्चंटसाठी खालील सामान्यतः उद्धृत केलेल्या आवश्यकतांचा समावेश आहे, परंतु त्यापुरते मर्यादित नाही:
- तुमच्या उत्पादनांवरील लेबलांवर घटकांची सूची आणि पोषणविषयक घोषणा यांसारख्या सर्व आवश्यक माहितीचा समावेश असल्याची खात्री करा.
- अल्कोहोल आणि अल्कोहोलिक पेयांवर लादलेल्या सर्व संबंधित उत्पादन शुल्कांचे पालन करा.
- वयाची पडताळणी करण्याच्या प्रभावी पद्धती वापरा जेणेकरून संबंधित अधिकारक्षेत्रातील कायदेशीर वयाखालील व्यक्ती अल्कोहोल उत्पादने खरेदी करू शकणार नाहीत किंवा प्राप्त करू शकणार नाहीत.
- तुम्ही तुमच्या अल्कोहोल उत्पादनांची जाहिरात, मार्केटिंग आणि विक्री कशी करता हे तुमच्या आणि तुमच्या ग्राहकांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व लागू कायदेशीर आवश्यकतांचे पालन करते याची खात्री करा.
युरोपियन युनियनमध्ये अल्कोहोल विकण्याविषयीची संसाधने
खालील संसाधनांसह युरोपियन युनियनमध्ये अल्कोहोल उत्पादने विकण्याविषयीची विशिष्ट माहिती तुम्हाला ऑनलाइन मिळू शकते:
युनायटेड किंगडम (UK) मध्ये अल्कोहोल विकण्यासाठी कायदे आणि नियम
जर तुमचा व्यवसाय युनायटेड किंगडममध्ये असेल किंवा तुम्ही युनायटेड किंगडममधील ग्राहकांना अल्कोहोलची उत्पादने विकत असाल, तर ज्या अधिकारक्षेत्रात तुमच्या अल्कोहोल उत्पादनांची जाहिरात केली जाते किंवा विक्री केली जाते, तेथील सर्व लागू होणारे फेडरल, काउंटी आणि स्थानिक कायदे पाळणे तुमच्यासाठी बंधनकारक आहे.
इंग्लंड आणि वेल्समध्ये इन-स्टोअर आणि ऑनलाइन अल्कोहोल विकणाऱ्या किंवा पुरवठा करणाऱ्या व्यवसायांसाठी, संस्थांसाठी आणि व्यक्तींसाठी, तुम्हाला Licensing Act 2003 द्वारे निर्धारित केलेले नियम आणि कायदे पाळणे आवश्यक आहे.
तुम्ही युनायटेड किंगडममध्ये अल्कोहोल उत्पादनांची विक्री, वितरण किंवा शिपिंग करत असल्यास, या सामान्यतः उद्धृत केलेल्या आवश्यकतांचा विचार करा:
- अल्कोहोल विकण्यासाठी लागणारे सर्व आवश्यक परवाने मिळवा आणि ते कायम ठेवा.
- सर्व लागू होणाऱ्या परवाना आवश्यकतांचे पूर्णपणे पालन करा.
- 18 वर्षांखालील व्यक्ती अल्कोहोल उत्पादने खरेदी करू शकणार नाहीत किंवा प्राप्त करू शकणार नाहीत, यासाठी वयाची पडताळणी करण्याच्या प्रभावी पद्धती वापरा. एखाद्या व्यक्तीचे वय सिद्ध करण्यासाठी तुमच्या व्यवसायाला मदत व्हावी म्हणून तुम्ही PAS 1296: 2018 द्वारे निर्धारित केलेल्या मानकांचे पालन करू शकता.
- तुमच्या व्यवसायाच्या आणि तुमच्या ग्राहकांच्या अधिकारक्षेत्रातील लागू होणाऱ्या कायद्यांचे पूर्णपणे पालन करून अल्कोहोल उत्पादने शिप आणि वितरित करा.
- आयात केलेल्या कोणत्याही अल्कोहोलवर आवश्यकता असल्यास duty stamp असल्याची खात्री करा.
युनायटेड किंगडममध्ये अल्कोहोल विकण्याविषयीची संसाधने
तुम्ही खालील संसाधनांसह युनायटेड किंगडममध्ये अल्कोहोल उत्पादने विकण्याविषयी अतिरिक्त माहिती ऑनलाइन मिळवू शकता:
ऑस्ट्रेलियामध्ये अल्कोहोल विकण्याचे कायदे आणि नियम
जर तुमचा व्यवसाय ऑस्ट्रेलियामध्ये असेल किंवा तुम्ही ऑस्ट्रेलियामधील ग्राहकांना अल्कोहोल उत्पादने विकत असाल, तर तुमच्या अल्कोहोल उत्पादनांची ज्या अधिकारक्षेत्रात जाहिरात केली जाते किंवा विक्री केली जाते तेथील सर्व लागू होणारे राज्य किंवा प्रादेशिक कायदे पाळणे तुमच्यासाठी बंधनकारक आहे.
तुम्ही अल्कोहोल उत्पादनांच्या जाहिरातीसाठी असलेल्या अॅड स्टँडर्ड्स मार्गदर्शक तत्त्वांचे आणि ABAC Responsible Alcohol Marketing Code चे पुनरावलोकन केले पाहिजे.
ऑस्ट्रेलियातील प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रदेशामध्ये अल्कोहोलसाठी वेगवेगळ्या आवश्यकता आहेत. खालील सामान्यतः उद्धृत केलेल्या आवश्यकतांचा विचार करा:
- 18 वर्षांखालील व्यक्ती अल्कोहोल उत्पादने खरेदी करू शकणार नाहीत किंवा प्राप्त करू शकणार नाहीत यासाठी वयाची पडताळणी करण्याच्या प्रभावी पद्धती वापरा.
- पॅकेजिंग आणि लेबलिंग आवश्यकतांचे पालन करा.
- तुमच्या व्यवसायाच्या आणि तुमच्या ग्राहकांच्या अधिकारक्षेत्रातील लागू होणाऱ्या कायद्यांचे पूर्णपणे पालन करून अल्कोहोल उत्पादने शिप आणि वितरित करा.
- तुम्ही तुमच्या अल्कोहोल उत्पादनांची जाहिरात, मार्केटिंग आणि विक्री कशी करता, हे तुमच्या आणि तुमच्या ग्राहकांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व कायदेशीर आवश्यकतांचे पालन करत असल्याची खात्री करा.
ऑस्ट्रेलियातील अल्कोहोल कायद्यांबद्दल अधिक जाणून घ्या.
न्यूझीलंडमध्ये अल्कोहोल विकण्याचे कायदे आणि नियम
जर तुमचा व्यवसाय न्यूझीलंडमध्ये असेल किंवा तुम्ही न्यूझीलंडमधील ग्राहकांना अल्कोहोल उत्पादने विकत असाल, तर तुमच्या अल्कोहोल उत्पादनांची ज्या अधिकारक्षेत्रात जाहिरात केली जाते किंवा विक्री केली जाते तेथील सर्व लागू होणारे फेडरल आणि स्थानिक कायदे पाळणे तुमच्यासाठी बंधनकारक आहे.
जर तुम्ही न्यूझीलंडमध्ये अल्कोहोल उत्पादनांची विक्री करत असाल, तर तुम्ही इतर लागू होणाऱ्या कायद्यांसह Sale and Supply of Alcohol Act, 2012 चे पुनरावलोकन केले पाहिजे.
तुम्ही न्यूझीलंडमध्ये अल्कोहोल उत्पादनांची विक्री, वितरण किंवा शिपिंग करत असल्यास, या सामान्यतः उद्धृत केलेल्या आवश्यकतांचा विचार करा:
- 18 वर्षांखालील व्यक्ती अल्कोहोल उत्पादने खरेदी करू शकणार नाहीत किंवा प्राप्त करू शकणार नाहीत यासाठी वयाची पडताळणी करण्याच्या प्रभावी पद्धती वापरा.
- तुमची जाहिरात आणि मार्केटिंग सामग्री अतिरिक्त अल्कोहोल सेवन आणि अल्पवयीन मद्यपानाला प्रोत्साहन देण्यावर मर्यादा घालत असल्याची खात्री करा.
- तुमच्या व्यवसायाच्या आणि तुमच्या ग्राहकांच्या अधिकारक्षेत्रातील लागू होणाऱ्या कायद्यांचे पूर्णपणे पालन करून अल्कोहोल उत्पादने शिप आणि वितरित करा.
न्यूझीलंडमध्ये अल्कोहोल विकण्याविषयीची संसाधने
तुम्ही खालील संसाधनांसह न्यूझीलंडमध्ये अल्कोहोल उत्पादने विकण्याविषयीची विशिष्ट माहिती ऑनलाइन मिळवू शकता: