कॅनडामध्ये हेम्प आणि हेम्पपासून बनवलेली उत्पादने विकण्यासाठीच्या आवश्यकता

कॅनडामध्ये Shopify वर कॅनबिस उत्पादने विकण्यासाठी, तुम्ही या पेजवर वर्णन केलेल्या आवश्यकतांचे पालन करत असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला नेहमी तुमच्या स्टोअरच्या ठिकाणच्या आणि तुम्ही जिथे उत्पादने शिप करता त्या ठिकाणांच्या कायद्यांचे पालन करणे आवश्यक असते.

कॅनबिस उत्पादनाच्या अनुपालन विधाने

मी याची पुष्टी करतो की:

  1. मी खाते मालक किंवा व्यवसाय मालक आहे आणि माझ्या व्यवसायाला या विधानांशी बांधील ठेवण्याचा मला अधिकार आहे. माझा व्यवसाय जोपर्यंत कॅनबिस उत्पादनांची विक्री करतो किंवा विक्रीसाठी ऑफर देतो, तोपर्यंत या नियमांचे पालन करेल.
  2. माझ्या Shopify ॲडमिनमध्ये नमूद केलेला पत्ता, मी जिथून माझा व्यवसाय चालवतो त्या माझ्या व्यवसायाच्या प्रांत किंवा प्रदेशाशी जुळतो.
  3. माझा व्यवसाय अशा प्रांत किंवा प्रदेशातून चालतो जिथे कॅनबिस उत्पादनांची ऑनलाइन विक्री कायदेशीर आहे.
  4. प्रांतीय किंवा फेडरल सरकारद्वारे कॅनबिस विकण्यासाठी माझ्या व्यवसायाला परवाना दिलेला आहे आणि मी माझ्या परवान्यातील कोणत्याही अटी किंवा निर्बंधांचे पालन करत आहे.
  5. मला क्लास ॲक्शन डिमांड लेटर किंवा माझ्या व्यवसायाविरुद्ध हेल्थ कॅनडाच्या अंमलबजावणी कारवाईबद्दल माहिती मिळाल्यास, मी या नोटिशीची प्रत legal@shopify.com वर ई-मेल करून दहा दिवसांच्या आत Shopify ला सूचित करेन.
  6. Shopify ने कोणत्याही वेळी विनंती केल्यास, माझे Shopify स्टोअर, व्यवसाय आणि कॅनबिस उत्पादने येथे नमूद केलेले कायदे, नियम किंवा कोणत्याही आवश्यकतांचे पालन करत आहेत याची पुष्टी देणारी कागदपत्रे मी पुरवेन.

कॅनबिस उत्पादनांसाठी अनुपालन आवश्यकता

मी पुष्टी देतो की, माझ्या Shopify स्टोअरवर लिस्ट केलेल्या किंवा विकल्या गेलेल्या कॅनबिस उत्पादनांसाठी:

  1. फेडरल आणि प्रांतीय कायद्याच्या आवश्यकतेनुसार ती उत्पादने मिळवली, प्रक्रिया केली, तपासली, लेबल लावली आणि मार्केटिंग केली गेली आहेत.
  2. मी ती उत्पादने केवळ अशा देशांमध्ये विकतो जिथे ती कायदेशीर आहेत.
  3. मी करत असलेल्या दाव्यांना हेल्थ कॅनडाने मंजुरी दिली असल्याशिवाय, मी त्या उत्पादनांचे कोणत्याही वैद्यकीय, आजाराशी संबंधित किंवा उपचारात्मक फायद्यासाठी मार्केटिंग करणार नाही.
  4. मी जिथे व्यवसाय करतो तिथे हेल्थ कॅनडासारख्या कोणत्याही नियामक प्राधिकरणाकडून त्या उत्पादनांवर कधीही रीकॉल (परत बोलावणे) किंवा सुरक्षा अलर्ट लागू केलेला नाही.
  5. जर ती उत्पादने कधीही मागे घेतली गेली (रीकॉल केली), तर मी त्यांना माझ्या Shopify स्टोअरमधून त्वरित काढून टाकेन आणि त्या उत्पादनांसाठी ऑर्डरची पूर्तता करणे, प्रक्रिया करणे किंवा प्राप्त करणे थांबवेन.
  6. मी केवळ कॅनेडियन डॉलर्समध्ये (CAD) ऑर्डर स्वीकारेन.

मला समजते की जर मी येथील पुष्टीकरण आणि आश्वासनांचे पालन करण्यात अयशस्वी झालो किंवा पुढील कारवाई आवश्यक असल्याचे Shopify ने स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार ठरवले, तर Shopify माझ्या खात्यावर कारवाई करू शकते, ज्यामध्ये खात्याच्या समाप्तीपर्यंतच्या कारवाईचा समावेश असू शकतो.