युनायटेड स्टेट्स आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर धोकादायक वस्तूंचे शिपिंग
जेव्हा तुम्ही धोकादायक वस्तू, ज्याला घातक सामग्री किंवा हॅझमॅट (hazmat) देखील म्हटले जाते, त्या शिप करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या व्यवसायावर लागू होऊ शकणाऱ्या कायदे आणि नियमांचे पालन करावे लागते. कायदे आणि नियम ज्या प्रदेशात तुम्ही तुमच्या वस्तूंची वाहतूक करता त्यावर अवलंबून असतात.
ज्या कोणत्याही अधिकारक्षेत्रात तुमच्या उत्पादनांची वाहतूक केली जाते तेथील सर्व आंतरराष्ट्रीय, फेडरल, राज्य आणि स्थानिक कायद्यांचे पालन करणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुमच्या व्यवसायाला लागू होणारे कायदे आणि नियम तुम्हाला माहिती असले पाहिजेत.
या पेजवर
उत्पादन पात्रता
काही घरगुती उत्पादने शिप केल्यावर घातक सामग्री म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकतात, ज्यामध्ये खालील उदाहरणांचा समावेश आहे:
- ज्वालाग्राही द्रव, जसे की नेल पॉलिश, पेंट थिनर्स आणि अल्कोहोलवर आधारित हँड सॅनिटायझर्स
- एरोसोल्स (Aerosols), जसे की स्प्रे पेंट्स, हेअर स्प्रे आणि कीटक प्रतिबंधक
- बॅटरी
- स्फोटके, जसे की फटाके किंवा दारूगोळा
- संकुचित वायू, जसे की प्री-फिल्ड प्रोपेन टँक्स, ब्युटेन कॅनिस्टर्स आणि ऑक्सिजन सिलिंडर्स
युनायटेड स्टेट्समध्ये, हॅझर्डस मटेरिअल्स रेग्युलेशन्समध्ये (घातक सामग्री नियम) घातक सामग्री कशा परिभाषित केल्या जातात आणि त्या कशा हाताळल्या पाहिजेत, तयार केल्या पाहिजेत, पॅकेज केल्या पाहिजेत आणि शिप केल्या पाहिजेत याबद्दल माहिती आहे.
जर तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर घातक सामग्रीचे शिपिंग करत असाल, तर अधिक माहितीसाठी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO च्या) हवाई मार्गाने धोकादायक वस्तूंच्या सुरक्षित वाहतुकीसाठी तांत्रिक सूचनांचे पुनरावलोकन करा.
Shopify सेवा वापरून प्रतिबंधित किंवा निषिद्ध आयटम्सचे शिपिंग करणे
तुम्ही DHL द्वारे शिपिंग करण्याबद्दल किंवा Shopify Fulfillment Network (SFN) अॅप वापरून उत्पादने शिपिंग करण्याबद्दलची विशिष्ट माहिती खालील संसाधनांमध्ये शोधू शकता:
युनायटेड स्टेट्स आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर धोकादायक वस्तूंचे शिपिंग
धोकादायक वस्तू म्हणजे असा कोणताही पदार्थ किंवा सामग्री जी वाहतूक केल्यावर आरोग्य, सुरक्षितता आणि मालमत्तेसाठी अवाजवी धोका निर्माण करू शकते.
धोकादायक वस्तूंमध्ये खालील उदाहरणांचा समावेश होतो:
- घरामागील बागेत वापरली जाणारी उत्पादने जसे की गॅसोलीनवर चालणारे लॉनमॉवर्स किंवा कीटक नियंत्रण उत्पादने.
- बाथरूम उत्पादने जसे की परफ्यूम, नेल पॉलिश, डिओडोरंट स्प्रे किंवा माउथवॉश.
- गॅरेज उत्पादने जसे की टायर क्लिनर, ब्युटेन कॅनिस्टर्स किंवा स्प्रे पेंट.
- स्वयंपाकघरातील उत्पादने जसे की ओव्हन क्लिनर, कुकिंग स्प्रे, व्हॅनिला अर्क किंवा ड्राय आईस.
- ऑफिसमधील उत्पादने जसे की लिथियम बॅटरीसह लॅपटॉप्स, प्रिंटर काडतुसे आणि टोनर्स किंवा चार्जर्स.
जर या उत्पादनांची योग्यरित्या वर्गवारी, चिन्हांकन, लेबलिंग, दस्तऐवजीकरण, पॅकेजिंग आणि हाताळणी न करता वाहतूक केली, तर ते वाहतुकीदरम्यान धोकादायक बनू शकतात. कंपन, स्टॅटिक वीज, तापमान किंवा दाबातील बदलांमुळे धोकादायक वस्तू गळू शकतात, विषारी धुके निर्माण करू शकतात, आग लागण्याची किंवा स्फोट होण्याची शक्यता असते.
तुमची उत्पादने धोकादायक वस्तू म्हणून ओळखली गेल्यास, तुम्हाला धोकादायक वस्तूंचे पॅकेजिंग किंवा वाहतुकीत गुंतलेल्या तुमच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असू शकते.
तुम्ही खालील उदाहरणांसह ऑनलाइन विशिष्ट प्रशिक्षण माहिती मिळवू शकता:
युनायटेड स्टेट्स आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शिप करण्यासाठी धोकादायक वस्तू तयार करणे
- तुम्हाला जे उत्पादन शिप करायचे आहे त्याच्याशी संबंधित वाहतुकीच्या धोक्यांविषयी माहितीसाठी ट्रान्सपोर्टेशन इन्फॉर्मेशन विभाग तपासण्याकरिता तुम्ही उत्पादकाकडून सेफ्टी डेटा शीट (SDS) मिळवू शकता.
- तुम्हाला जे उत्पादन शिप करायचे आहे ते रस्ते, हवा, रेल्वे किंवा समुद्र मार्गे वाहतुकीसाठी प्रतिबंधित आहे की निषिद्ध आहे याबद्दल माहिती तपासण्यासाठी तुम्ही SDS वापरू शकता.
तुम्ही उत्पादन पॅकेज करता तेव्हा, खालील बाबींचे पुनरावलोकन करा:
- उत्पादकाने दिलेल्या कोणत्याही पॅकेजिंग सूचनांचे पालन करा.
- तुम्ही शिप करत असलेल्या धोकादायक सामग्रीचा प्रकार, वर्ग आणि प्रमाण यावर अवलंबून योग्य पॅकेजिंग निवडा.
- उत्पादकाच्या बंद करण्याच्या सूचनांचे पालन करून तुम्ही पॅकेज योग्यरीत्या बंद करत असल्याची खात्री करा.
- संभाव्य धोके ओळखण्यासाठी पॅकेजवर योग्य खुणा आणि लेबले समाविष्ट करा.
- वाहकाला तुम्ही काय शिप करत आहात हे कळावे यासाठी शिपिंग पेपर्स पूर्ण करा.
संसाधने
युनायटेड स्टेट्ससाठी, तुम्हाला हॅझार्डस मटेरिअल्स रेग्युलेशन्सद्वारे (धोकादायक सामग्रीचे नियम) आवश्यक असणाऱ्या खुणा आणि लेबलांविषयीची विशिष्ट माहिती खालील संसाधनांसह ऑनलाइन मिळू शकते:
तुम्ही खालील संसाधनांसह धोकादायक वस्तूंविषयीची माहिती ऑनलाइन शोधू शकता:
- ICAO चे डेंजरस गुड्स
- फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनचे (FAA) सेफकार्गो फॉर शिपर्स अॅण्ड स्टार्टअप्स
- युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशनचे चेक द बॉक्स
तुम्ही विशिष्ट वाहकासोबत धोकादायक वस्तूंच्या शिपिंगविषयीची माहितीदेखील खालील संसाधनांसह शोधू शकता: