ग्राहक खाती सेट आणि व्यवस्थापित करणे
ग्राहकांना पासवर्ड-मुक्त साइन-इनचा अॅक्सेस देण्यासाठी तुम्ही ग्राहक खाती सेट करू शकता. तुमच्या Shopify प्लॅननुसार, ग्राहक खाती B2B घाऊक आणि सेव्ह केलेल्या पेमेंट पद्धती सह देखील एकत्रित केली जातात.
या पेजवर
ग्राहक खाती साइन-इन लिंक्स व्यवस्थापित करा
ग्राहक खात्यांसाठी साइन-इन लिंक्स दाखवल्याने तुमचे ग्राहक खालील कार्ये करण्यासाठी तुमच्या पेजवरील त्यांच्या खात्यामध्ये साइन इन करू शकतात:
- त्यांचे ग्राहक प्रोफाइल आणि सेटिंग्ज संपादित करणे.
- त्यांनी तुमच्या स्टोअरवर दिलेल्या सर्व ऑर्डर्स पाहणे.
- त्यांचे ऑर्डर स्थिती पेज संपूर्ण तपशीलांसह पाहणे.
- तुम्ही ब्लॉक्स वापरून ग्राहक खात्यांमध्ये जोडलेली कोणतीही इतर वैशिष्ट्ये किंवा पेजेस अॅक्सेस करणे.
तुमच्या ऑनलाइन स्टोअरमधील साइन-इन लिंकचे स्वरूप तुमच्या थीमवर अवलंबून असते. हे सहसा तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या हेडरमध्ये व्यक्तीचा आयकन, ग्राहकाच्या नावाचे पहिले अक्षर किंवा “साइन इन करा” किंवा “खाते” अशा मजकूर लेबलच्या रूपात दिसते.
ग्राहकांनी तुमच्या स्टोअरवर ग्राहक खाती अॅक्सेस करावीत असे तुम्हाला यापुढे वाटत नसेल, तर तुम्ही साइन-इन लिंक्स लपवू शकता. तुम्ही साइन-इन लिंक्स लपवल्यानंतर, ग्राहक साइन इन करू शकणार नाहीत आणि तुमचा ग्राहक खाती मेनू तुमच्या स्टोअरवर यापुढे दिसणार नाही.
पायऱ्या:
तुमच्या Shopify अॅडमिनमधून, सेटिंग्ज > ग्राहक खाती वर जा.
साइन-इन लिंक्स विभागामध्ये, खालीलपैकी एक करा:
- तुमच्या स्टोअरवर साइन-इन लिंक्स प्रदर्शित करण्यासाठी, साइन-इन लिंक्स दाखवा चालू करा.
- तुमच्या स्टोअरवरील साइन-इन लिंक्स लपवण्यासाठी, साइन-इन लिंक्स दाखवा बंद करा.
सेव्ह करा वर क्लिक करा.
ग्राहक खात्यांसाठी अॅप्स आणि ब्रँडिंग कॉन्फिगर करणे
ब्रँड सेटिंग्ज कॉन्फिगर करण्यासाठी आणि अॅप्ससह अधिक वैशिष्ट्ये जोडण्यासाठी चेकआउट आणि खाती संपादक वापरा. तुम्ही मार्केटनुसार अनुभव सानुकूलित देखील करू शकता. प्रकाशित करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या कॉन्फिगरेशनवर मसुद्यामध्ये काम करू शकता. खालील संसाधनांचा संदर्भ घ्या:
ग्राहक खात्यांसाठी अतिरिक्त सेटिंग्ज अॅक्टिव्हेट करणे
अधिक सेटिंग्ज व्यवस्थापित करण्यासाठी तुमच्या Shopify अॅडमिनमधून, सेटिंग्ज > ग्राहक खाती वर जा:
- सेल्फ-सर्व्ह रिटर्न आणि कॅन्सलेशन्स: ग्राहकांना त्यांच्या खात्यामध्ये रिटर्न आणि कॅन्सलेशन्सची विनंती करण्याची अनुमती द्या.
- स्टोअर क्रेडिट: ग्राहकांना त्यांच्या खात्यात स्टोअर क्रेडिट पाहण्याची आणि ते चेकआउटच्या वेळी खर्च करण्याची अनुमती द्या.
- URL: ग्राहक खात्यांसाठी
account.yourstore.comसारखे सबडोमेन सेट करा. - सोशल साइन-इन: ग्राहकांसाठी Google आणि Facebook ने साइन इन करण्याचे पर्याय जोडा.
- Shop ने साइन इन करा: ग्राहकांसाठी Shop ने साइन इन करण्याचा पर्याय व्यवस्थापित करा.
- ओळख प्रदाता: डीफॉल्ट साइन-इन पेज बदलण्यासाठी तुमचा स्वतःचा ओळख प्रदाता कनेक्ट करा.
सेव्ह केलेल्या पेमेंट पद्धती अॅक्टिव्हेट करा
सेव्ह केलेल्या पेमेंट पद्धतींमुळे, तुमचे ग्राहक तुमच्या स्टोअरवरील त्यांच्या खात्यामध्ये त्यांची क्रेडिट कार्ड माहिती सेव्ह करू शकतात. यामुळे त्यांचे भविष्यातील चेकआउट्स जलद आणि सोपे होतात, आणि पुन्हा खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळते. ग्राहक त्यांच्या खात्यामध्ये अधिक पेमेंट पद्धती जोडू शकतात, पेमेंट पद्धतीचे तपशील संपादित करू शकतात किंवा पेमेंट पद्धती हटवू शकतात.
सेव्ह केलेल्या पेमेंट पद्धती Shop Pay शी सुसंगत आहेत. तुम्ही एकाच वेळी दोन्ही वैशिष्ट्ये चालू ठेवू शकता. चेकआउटच्या वेळी, तुमचे ग्राहक त्यांची पसंतीची पद्धत निवडू शकतात.
तुमच्या स्टोअरमध्ये खरेदीचा पर्याय म्हणून सबस्क्रिप्शन्स किंवा प्री-ऑर्डर्स ऑफर केले जात असल्यास, ग्राहकाच्या सबस्क्रिप्शन किंवा प्री-ऑर्डरशी संबंधित पेमेंट पद्धत आपोआप त्यांच्या खात्यामध्ये प्रदर्शित होते. आवश्यकता असल्यास ग्राहक त्यांची पेमेंट पद्धत अपडेट करू शकतात किंवा बदलू शकतात.
सेव्ह केलेल्या पेमेंट पद्धती बाय डीफॉल्ट बंद असतात. तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधून सेव्ह केलेल्या पेमेंट पद्धती अॅक्टिव्हेट करू शकता.
पायऱ्या:
तुमच्या Shopify अॅडमिनमधून, सेटिंग्ज > ग्राहक खाती वर जा.
ग्राहक खाती विभागामध्ये, सेव्ह केलेल्या पेमेंट पद्धती सेटिंग चालू करा.
B2B ग्राहक खाती
ग्राहक खाती Shopify B2B सोबत आपोआप काम करतात. जेव्हा एखादा B2B ग्राहक साईन इन करतो, तेव्हा ते त्यांच्या परवानग्यांच्या आधारावर त्यांच्या कंपनीसाठी ऑर्डर्स देऊ शकतात, कंपनीच्या अनेक ठिकाणांवरील ऑर्डर्स पाहू शकतात, थकीत शिल्लक भरू शकतात, आणि त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या कंपनीची तसेच ठिकाणाची माहिती पाहू शकतात.
B2B ग्राहक कसे जोडायचे ते जाणून घ्या.
ग्राहक खाते डिअॅक्टिव्हेट करणे
ग्राहक खात्यांसह, तुम्ही एखादे वैयक्तिक खाते डिअॅक्टिव्हेट करू शकत नाही. तुम्ही ग्राहक प्रोफाइल हटवू शकता, पण जर तुमच्या ग्राहकाने त्या ईमेलने पुन्हा साईन इन केले, तर ग्राहक प्रोफाइल पुन्हा तयार केली जाते.