ग्राहक प्रोफाइल्स शोधणे
तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये ग्राहकांचे नाव, मेलिंग ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस किंवा फोन नंबर वापरून त्यांना शोधू शकता. तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असलेली माहिती क्रमाने दाखवण्यासाठी तुम्ही कॉलम्सची क्रमवारी लावून, लपवून आणि पुन्हा क्रमाने लावून तुमची ग्राहक सूची सानुकूलितदेखील करू शकता.
ग्राहक प्रोफाइल शोधा
जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट ग्राहकाचे प्रोफाइल पाहण्यासाठी किंवा संपादित करण्यासाठी त्यांना शोधायचे असेल, तर तुम्ही ग्राहकाचे नाव, मेलिंग ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबरच्या आधारे ग्राहक सूची शोधण्यासाठी ग्राहक शोधा फील्ड वापरू शकता.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ग्राहक वर जा.
ग्राहक शोधा फील्डमध्ये, खालीलपैकी एक ग्राहक तपशील एंटर करा:
- नाव
- मेलिंग ॲड्रेस
- ईमेल ॲड्रेस
- फोन नंबर
शोध परिणामांच्या सूचीमधून, तुम्हाला ज्यांचे प्रोफाइल पाहायचे आहे त्या ग्राहकावर क्लिक करा.
ग्राहक कॉलम्सची क्रमवारी लावा, लपवा आणि पुन्हा क्रमाने लावा
तुम्ही ग्राहक यादीची क्रमवारी बदलू शकता. तसेच कोणते कॉलम कोणत्या क्रमाने दाखवायचे ते निवडू शकता.
ग्राहक यादीची क्रमवारी लावा
तुम्ही यानुसार क्रमवारी लावा मेनूमधून क्रमवारीचा पर्याय किंवा दिशा निवडताच ग्राहक यादीची क्रमवारी लावली जाते. यासाठी सेव्ह करा वर क्लिक करावे लागत नाही. डेस्कटॉपवरील Shopify ॲडमिनमध्ये ग्राहक यादीची क्रमवारी बदलल्यास ती सेव्ह होत नाही. पुढच्या वेळी यादी उघडल्यावर ती पुन्हा डीफॉल्ट क्रमवारीत दिसते. तुम्ही Shopify मोबाइल अॅप वापरून वेगळी क्रमवारी सेव्ह करू शकता. तुमच्या व्ह्यूमधील यादीतील आयटमची क्रमवारी लावण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ग्राहक वर जा.
आयकनवर क्लिक करा.
यानुसार क्रमवारी लावा मेनूवर क्लिक करा आणि नंतर क्रमवारीचा पर्याय आणि दिशा निवडा.
ग्राहक यादीतील कॉलम दाखवा, लपवा आणि त्यांचा क्रम बदला
ग्राहक यादीची मांडणी सुधारण्यासाठी तुम्ही कॉलम दाखवू शकता, लपवू शकता आणि त्यांचा क्रम बदलू शकता. ग्राहकाचे नाव आणि टीप हे कॉलम वगळता इतर कोणताही कॉलम तुम्ही लपवू शकता आणि त्याचा क्रम बदलू शकता. हे कॉलम तक्त्यात नेहमी सुरुवातीला दिसतात.
एखादा कॉलम दाखवल्यानंतर, लपवल्यानंतर किंवा त्याचा क्रम बदलल्यानंतर नवीन कॉलम लेआउट कायम ठेवण्यासाठी तुम्ही सेव्ह करा वर क्लिक करू शकता. सेव्ह केलेला कॉलम लेआउट ग्राहक यादी उघडणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू होतो आणि त्यांपैकी कोणताही कर्मचारी तो बदलू शकतो.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ग्राहक वर जा.
आयकनवर क्लिक करा.
कॉलम विभागात खालीलपैकी कोणतीही कृती करा:
- कॉलम वर किंवा खाली पुनर्क्रमित करण्यासाठी
वर क्लिक करा. कॉलम वर हलवल्याने तो टेबलमध्ये अधिक डावीकडे ठेवला जातो आणि कॉलम खाली हलवल्याने तो अधिक उजवीकडे ठेवला जातो.
- टेबलमधील कॉलम लपवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी
किंवा
वर क्लिक करा.
- कॉलम वर किंवा खाली पुनर्क्रमित करण्यासाठी
सेव्ह करा वर क्लिक करा.