Mailchimp वरून संपर्क सूची मॅन्युअली इम्पोर्ट करणे

हे मार्गदर्शक Mailchimp वरून Shopify मध्ये संपर्क मॅन्युअली कसे इम्पोर्ट करायचे हे स्पष्ट करते.

Mailchimp वरून संपर्क सूची एक्सपोर्ट करा

तुमचे संपर्क Shopify मध्ये इम्पोर्ट करण्यापूर्वी, तुम्हाला ते आधी Mailchimp वरून एक्सपोर्ट करणे आवश्यक आहे.

फाईल क्लिन करा

तुम्ही Mailchimp मधून तुमचे संपर्क एक्सपोर्ट केल्यानंतर, तुमच्या कॉंप्युटरवर एक ZIP फाईल सेव्ह केलेली असते. या ZIP फाईलमध्ये तुमचे Mailchimp प्रेक्षक वापरत असलेल्या प्रत्येक संपर्क स्थितीसाठी स्वतंत्र CSV फाईल असते. प्रत्येक फाईलचे नाव त्याच्या स्थितीसह सुरू होते:

  • subscribed_members: या संपर्कांनी मार्केटिंग ईमेल्सची निवड केली आहे.
  • unsubscribed_members: या संपर्कांनी मार्केटिंग ईमेल्समधून बाहेर पडण्याचा पर्याय निवडला आहे.
  • nonsubscribed_members: हे संपर्क तुमच्या प्रेक्षकांमध्ये आहेत, पण त्यांनी कधीही मार्केटिंग ईमेल्सची निवड केलेली नाही.
  • cleaned_members: ईमेल्स बाऊन्स झाल्यानंतर हे ॲड्रेसेस डिलिव्हर न करण्यायोग्य बनले, त्यामुळे Mailchimp ने त्यांना मेसेज पाठवणे थांबवले. या युजर्सशी यशस्वीरित्या संपर्क साधला जाऊ शकत नसल्यामुळे, तुम्हाला ही फाईल इंपोर्ट करण्याची आवश्यकता नाही.

ZIP फाईल अनझिप करा आणि त्यानंतर तुम्हाला जी प्रत्येक CSV फाईल इम्पोर्ट करायची आहे ती क्लिन करा. मूळ एक्सपोर्ट फाईल्स तशाच ठेवा, कारण प्रत्येक संपर्काने केव्हा सदस्यता घेतली याची ती तुमची नोंद आहे.

तुमच्या Mailchimp मार्केटिंगसह त्यांनी अलीकडे किती वेळा एंगेज केले आहे याद्वारे तुम्ही प्रत्येक संपर्काला टॅगदेखील करू शकता, जसे की very engaged, somewhat engaged, किंवा unengaged. तुमच्या सर्वात जास्त एंगेज्ड ग्राहकांना तुमच्या पहिल्या मोहिमा पाठवण्यासाठी तुम्ही हे टॅग्ज वापरू शकता.

पायऱ्या:

  1. CSV फाईल Google Sheets मध्ये अपलोड करा.
  2. तुमच्या स्प्रेडशीटमध्ये फक्त खालील कॉलम हेडर्स ठेवा आणि इतर हटवा.
    • Email Address
    • First Name
    • Last Name
    • Phone Number
    • Company
    • MEMBER_RATING, जर तुम्ही ग्राहकांना एंगेजमेंटनुसार टॅग करत असाल
  3. खालील कॉलम हेडर्सची नावे बदला आणि मजकुराच्या दोन्ही बाजूंना कोणतीही स्पेस सोडणार नाही याची खात्री करा:
    • Email Address बदलून Email असे करा
    • Phone Number बदलून Phone असे करा
  4. पर्यायी: MEMBER_RATING कॉलम हेडरचे नाव बदलून Tagsअसे करा, आणि प्रत्येक ग्राहकाचे Mailchimp सदस्य रेटिंग त्यांच्या एंगेजमेंटचे वर्णन करणाऱ्या टॅगसह बदला.
  5. नवीन कॉलम हेडर जोडा ज्याचे नाव Accepts Email Marketingअसेल, आणि खालील निकषांनुसार प्रत्येक ग्राहकासाठी या कॉलममध्ये व्हॅल्यूज प्रविष्ट करा:
    • जर फाईलमध्ये तुमचे सदस्यत्व घेतलेले संपर्क असतील, तर सर्व ग्राहकांसाठी yes प्रविष्ट करा. त्या फाईलचे नाव subscribed_members ने सुरू होते.
    • सदस्यत्व रद्द केलेले, सदस्यत्व नसलेले आणि क्लिन केलेले संपर्क यांसह इतर प्रत्येक फाईलसाठी, सर्व ग्राहकांसाठी no प्रविष्ट करा.
  6. नवीन कॉलम हेडर जोडा ज्याचे नाव Accepts SMS Marketing, आणि त्यानंतर yes किंवा no ही मूल्ये प्रत्येक ग्राहकासाठी एंटर करा.
  7. तुमच्या कॉंप्युटरवर CSV फॉरमॅटमध्ये फाईल एक्सपोर्ट करा.

फाईल Shopify मध्ये इम्पोर्ट करा

तुमच्या CSV फाईल्स क्लिन केल्यानंतर, तुम्हाला तुमचे इम्पोर्ट पूर्ण करण्यासाठी यापैकी प्रत्येक फाईल तुमच्या Shopify स्टोअरमध्ये इम्पोर्ट करणे आवश्यक आहे.

एरर्सचे ट्रबलशूट करा

CSV हेडरमध्ये एरर आढळली

तुम्ही तुमची CSV फाईल Shopify मध्ये इम्पोर्ट करताना Error found in CSV header ही एरर आल्यास, याचा अर्थ कॉलम हेडरची नावे जुळत नाहीत. तुमच्या CSV फाईलमधील कॉलम हेडरची नावे आवश्यक नावांसोबत जुळतात की नाही ते तपासा.