Shopify स्टोअर्सच्या दरम्यान तृतीय-पक्ष डोमेन ट्रान्सफर करण्यासाठी मालकीची पडताळणी करा
जर तुमच्याकडे असे तृतीय-पक्ष डोमेन असेल जे आधीच एका Shopify स्टोअरशी कनेक्ट केलेले असेल आणि तुम्हाला ते वेगळ्या Shopify स्टोअरमध्ये हलवायचे असेल, तर तुम्ही नवीन स्टोअरवर कनेक्ट फ्लो वापरू शकता. डोमेन आधीच दुसऱ्या Shopify स्टोअरशी संलग्न असल्यामुळे, तुम्हाला त्याची मालकी तुमचीच असल्याची पडताळणी करण्यासाठी प्रॉम्प्ट केले जाईल.
तृतीय-पक्ष डोमेन कनेक्ट करताना त्याच्या मालकीची पडताळणी आवश्यक असल्यास, Shopify ॲडमिनमध्ये डोमेनच्या पडताळणीचे पेज उघडते. उदाहरणार्थ, डोमेन आधीच दुसऱ्या Shopify स्टोअरशी कनेक्ट केलेला असल्यास अशी पडताळणी आवश्यक असते. डोमेन तुमच्या स्टोअरशी पूर्णपणे कनेक्ट करण्यासाठी त्याच्या मालकीची पडताळणी करणे आवश्यक आहे.
तुम्ही काही सपोर्टेड डोमेन प्रदात्यांसाठी डोमेनची आपोआप पडताळणी करू शकता किंवा तुम्ही TXT रेकॉर्डसह डोमेन मालकीची मॅन्युअली पडताळणी करू शकता. तुम्हाला तुमच्या डोमेनच्या मालकीची मॅन्युअली पडताळणी करायची असल्यास, तुम्हाला तुमच्या तृतीय-पक्ष डोमेनसाठी डोमेन नेम सिस्टीम (DNS) सेटिंग्जचा ॲक्सेस असणे आवश्यक आहे.
तुम्हाला ज्या स्टोअरशी डोमेन कनेक्ट करायचे आहे त्याच्या Shopify ॲडमिनमध्ये तुम्ही डोमेनच्या मालकीची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू करता. डोमेन आधीपासून ज्या Shopify स्टोअरशी कनेक्ट केलेले आहे त्याचा ॲक्सेस असण्याची तुम्हाला आवश्यकता नाही.
डोमेनची आपोआप पडताळणी करा
तुम्ही तुमचे डोमेन Google Domains, GoDaddy किंवा IONOS कडून खरेदी केले असल्यास, तुम्ही तुमचे डोमेन Shopify शी आपोआप कनेक्ट करू शकता. जेव्हा तुम्ही तुमचे तृतीय-पक्ष डोमेन Shopify शी आपोआप कनेक्ट करता, तेव्हा डोमेन मालकीसाठी डोमेनची पडताळणी केली जाते.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिन मधून, सेटिंग्ज > डोमेन्स वर जा.
विद्यमान कनेक्ट करा वर क्लिक करा.
तुमचे डोमेन एंटर करा, जसे की
example.com, आणि नंतर पुढील वर क्लिक करा.तुमच्या डोमेनच्या पडताळणीचे पेज उघडते. स्वयंचलितपणे कनेक्ट करा वर क्लिक करा.
तुम्हाला तुमच्या तृतीय-पक्ष डोमेन प्रदात्यामध्ये साइन इन करण्यासाठी आणि नंतर तुमच्या डोमेन सेटिंग्जमध्ये TXT रेकॉर्ड जोडण्यासाठी डोमेन प्रदात्याला संमती देण्यासाठी प्रॉम्प्ट केले जाते.
तुमच्या तृतीय-पक्ष डोमेन प्रदात्याकडील प्रॉम्प्ट्सचे अनुसरण करा.
प्रॉम्प्ट्स पूर्ण केल्यानंतर, तुम्ही डोमेन पेजवर परत जाता आणि तुमच्या डोमेनची पडताळणी सुरू होते.
तुमच्या डोमेनची पडताळणी होण्यासाठी 48 तासांपर्यंत वेळ लागू शकतो. डोमेनच्या मालकीची पडताळणी झाल्यानंतर, तुमचे डोमेन डोमेन्स पेजवर कनेक्ट केलेले म्हणून सूचीबद्ध केले जाते.
डोमेनची मॅन्युअली पडताळणी करा
डोमेनच्या मालकीची मॅन्युअली पडताळणी करण्यासाठी, तुम्हाला डोमेनच्या डोमेन नेम सिस्टीम (DNS) सेटिंग्जमध्ये एक युनिक TXT रेकॉर्ड जोडणे आवश्यक आहे.
तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी, तृतीय-पक्ष डोमेन प्रदाता Shopify शी कनेक्ट होण्यासाठी योग्यरीत्या सेट केला आहे आणि तुम्ही लॉग इन करून तुमच्या तृतीय-पक्ष डोमेन प्लॅटफॉर्मवर अॅक्सेस करू शकता याची खात्री करा.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिन मधून, सेटिंग्ज > डोमेन्स वर जा.
विद्यमान कनेक्ट करा वर क्लिक करा.
तुमचे डोमेन एंटर करा, जसे की
example.com, आणि नंतर पुढील वर क्लिक करा.तुमच्या डोमेनचे पेज उघडते. DNS रेकॉर्डचा तक्ता दिसत नसल्यास, त्याचा विस्तार करण्यासाठी मॅन्युअल सेटअप वर क्लिक करा. तक्त्यात
shopify_verificationने नाव सुरू होणारा TXT रेकॉर्ड नसल्यास, डोमेनच्या मालकीची पडताळणी आवश्यक नाही. त्याऐवजी, डोमेन कनेक्ट करण्यासाठी नेहमीच्या पायऱ्या फॉलो करा.यावर अपडेट करा कॉलममधील TXT रेकॉर्डच्या मूल्यावर पॉइंटर न्या आणि नंतर कॉपी आयकनवर क्लिक करा.
नवीन ब्राउझर टॅबमध्ये, तुमच्या तृतीय-पक्ष डोमेन प्रदात्याच्या वेबसाइटवर जा आणि तुमच्या खात्यामध्ये लॉग इन करा.
DNS सेटिंग्ज किंवा डोमेन व्यवस्थापन क्षेत्र शोधा. तुम्हाला तुमच्या DNS सेटिंग्ज शोधण्यासाठी मदत हवी असल्यास, तुमच्या तृतीय-पक्ष डोमेन प्रदात्याशी संपर्क साधा.
shopify_verificationनावाचा नवीन TXT रेकॉर्ड जोडा आणि नंतर Shopify ॲडमिनमधून कॉपी केलेले मूल्य पेस्ट करा. तुम्ही सबडोमेन कनेक्ट करत असल्यास, TXT रेकॉर्डच्या नावातshopify_verificationनंतर अंडरस्कोअर आणि सबडोमेनचे नाव जोडा. उदाहरणार्थ, तुमचा सबडोमेनshop.example.comअसल्यास, तुमच्या TXT रेकॉर्डचे नावshopify_verification_shopअसेल.Shopify ॲडमिन असलेल्या मागील टॅबवर परत जा आणि नंतर मी DNS रेकॉर्ड अपडेट केले आहेत वर क्लिक करा:
- तुमची डोमेन पडताळणी यशस्वी झाल्यास, डोमेन तुमच्या डोमेन्स पेजवर कनेक्ट केलेले म्हणून प्रदर्शित होते.
- डोमेनची पडताळणी यशस्वी न झाल्यास, डोमेन प्रदात्याकडील तुमच्या खात्यात TXT रेकॉर्ड सेव्ह केला असल्याची खात्री करा. मी DNS रेकॉर्ड अपडेट केले आहेत वर क्लिक केल्यानंतर काही मिनिटे तुमचे DNS रेकॉर्ड तपासले जातात. या तपासणीदरम्यान बटण दिसत नाही. तपासणी पूर्ण झाल्यावर किंवा पेज रीलोड केल्यावर, पुन्हा मी DNS रेकॉर्ड अपडेट केले आहेत वर क्लिक करा.
तुमच्या डोमेनची पडताळणी होण्यासाठी 48 तासांपर्यंत वेळ लागू शकतो. डोमेनच्या मालकीची पडताळणी झाल्यानंतर, तुमचे डोमेन डोमेन्स पेजवर कनेक्ट केलेले म्हणून सूचीबद्ध केले जाते.
मूळ स्टोअरवरील डोमेनचे काय होते
डोमेनच्या मालकीची पडताळणी झाल्यावर आणि डोमेन नवीन स्टोअरशी कनेक्ट झाल्यावर, डोमेन आपोआप मूळ स्टोअरमधून काढून टाकले जावे. पडताळणीनंतरही मूळ स्टोअरवर डोमेन दिसत असल्यास, तुम्ही मूळ स्टोअरच्या डोमेन्स पेजवरून ते मॅन्युअली डिस्कनेक्ट करू शकता.