डोमेन्सशी संबंधित परिभाषा

डोमेन किंवा डोमेन नाव हा असा वेब पत्ता किंवा URL आहे, जो लोक इंटरनेटवर तुमच्या वेबसाइटला भेट देण्यासाठी वापरतात. डोमेन नावे तुमच्या वेब ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये प्रदर्शित होतात, जसे की Chrome, Firefox, Microsoft Edge किंवा Safari.

डोमेन्सबद्दलची काही परिभाषा समजून घेण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, खालील सूचीमध्ये सामान्य संज्ञांच्या व्याख्या आहेत.

A रेकॉर्ड

A रेकॉर्ड हे एक DNS सेटिंग आहे, जे डोमेन नावाशी एखादा विशिष्ट IPv4 अ‍ॅड्रेस संबंधित आहे की नाही हे तपासते. या प्रकरणात, तुमचे A रेकॉर्ड Shopify च्या IPv4 अ‍ॅड्रेसला पॉइंट करणे तुम्हाला अपेक्षित असते.

तुम्ही तृतीय-पक्ष डोमेन वापरत असल्यास, डीफॉल्ट Shopify IPv4 अ‍ॅड्रेस 23.227.38.65 असतो. विद्यमान डोमेन कनेक्ट करण्यासाठी, तुम्हाला तुमचे A रेकॉर्ड Shopify च्या IPv4 अ‍ॅड्रेसवर सेट करावे लागेल.

इतर संज्ञा: अ‍ॅड्रेस रेकॉर्ड, होस्ट रेकॉर्ड

AAAA रेकॉर्ड

AAAA रेकॉर्ड (quad-A) हे एक DNS सेटिंग आहे, जे डोमेन नावाशी एखादा विशिष्ट IPv6 अ‍ॅड्रेस संबंधित आहे की नाही हे तपासते. या प्रकरणात, तुमचे AAAA रेकॉर्ड Shopify च्या IPv6 अ‍ॅड्रेसला पॉइंट करणे तुम्हाला अपेक्षित असते.

तुम्ही तृतीय-पक्ष डोमेन वापरत असल्यास, Shopify चा संकुचित (condensed) IPv6 अ‍ॅड्रेस 2620:0127:f00f:5:: आहे. विद्यमान डोमेन कनेक्ट करण्यासाठी, तुम्हाला तुमचे AAAA रेकॉर्ड Shopify च्या IPv6 अ‍ॅड्रेसवर सेट करावे लागेल.

काही तृतीय-पक्ष डोमेन प्रदाता संक्षिप्त IPv6 अ‍ॅड्रेस स्वीकारत नाहीत. तुमच्या तृतीय-पक्ष डोमेन प्रदात्याने Shopify चा संक्षिप्त IPv6 अ‍ॅड्रेस 2620:0127:f00f:5:: नाकारल्यास, तुम्हाला विस्तारित आवृत्ती वापरावी लागेल. Shopify चा विस्तारित IPv6 अ‍ॅड्रेस 2620:0127:f00f:0005:0000:0000:0000:0000 आहे.

CAA रेकॉर्ड

डोमेनसाठी प्रमाणपत्र जारी करण्याची परवानगी कोणत्या प्रमाणपत्र अधिकाऱ्यांना आहे हे निर्दिष्ट करण्यासाठी CAA (प्रमाणपत्र अधिकारी अधिकृतता) रेकॉर्ड वापरले जाते. प्रमाणपत्र अधिकारी (CA) ही एक विश्वासार्ह संस्था आहे जी इंटरनेटवरील डिजिटल अस्तित्वाची ओळख पडताळणारी इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे जारी करते.

CNAME रेकॉर्ड

कॅनोनिकल नाव (CNAME) रेकॉर्ड हे एक DNS सेटिंग आहे जे तुमचे सबडोमेन दुसऱ्या डोमेन नावाकडे निर्देशित करते.

इतर संज्ञा: CNAME रिसोर्स रेकॉर्ड, अलिआस

DKIM रेकॉर्ड

डिजिटल स्वाक्षरीसह ईमेल साइन करण्यासाठी Shopify DKIM (Domain Keys Identified Mail) ईमेल प्रमाणीकरण तंत्रज्ञान वापरते. यामुळे प्राप्तकर्त्याला तपासता येते की ईमेल संदेश त्या डोमेनच्या मालकाने पाठवला आहे आणि अधिकृत केला आहे. तुम्ही तृतीय-पक्ष डोमेन वापरत असल्यास, तुमचे डोमेन प्रमाणित करण्यासाठी CNAME रेकॉर्ड जोडल्याने DKIM आपोआप कॉन्फिगर होते आणि सूचना ईमेल स्पॅम म्हणून फ्लॅग होण्यापासून रोखण्यास मदत होऊ शकते. तुमचा प्रेषक ईमेल store+123@shopifyemail.com वर पुन्हा लिहिला जाण्यापासून पूर्णपणे रोखण्यासाठी, तुम्हाला वैध DMARC रेकॉर्ड ची देखील आवश्यकता आहे.

जर तुम्ही तुमचे डोमेन Shopify द्वारे खरेदी केले असेल, तर DKIM, SPF आणि DMARC हे सर्व आपोआप कॉन्फिगर होतात. DKIM आणि SPF तुमच्या DNS सेटिंग्जमध्ये CNAME रेकॉर्ड म्हणून दिसतात आणि DMARC हे TXT रेकॉर्ड म्हणून दिसते. हे रेकॉर्ड हटवू नका, कारण ते काढून टाकल्यास तुमचा प्रेषक ईमेल store+123@shopifyemail.com म्हणून पुन्हा लिहिला जाईल.

DMARC रेकॉर्ड

Domain-based Message Authentication, Reporting, and Conformance (DMARC) हे एक ईमेल प्रमाणीकरण रेकॉर्ड आहे जे त्यांना प्राप्त झालेला संदेश त्या डोमेनवरून येण्याची अनुमती आहे की नाही हे ठरवण्यात ईमेल प्रदात्यांना मदत करते. तुमच्या DMARC आवश्यकता पूर्ण करत असल्याचे सिद्ध करण्यासाठी ईमेलला प्रमाणीकरण तपासणी पार करावी लागते. ईमेल DMARC आवश्यकता पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास, ईमेल प्रदाता DMARC सूचनांचे पालन करतो:

  • p=none: DMARC रेकॉर्ड नसल्याप्रमाणे कोणतीही कारवाई करू नका.
  • p=quarantine: प्राप्तकर्त्याच्या स्पॅम फोल्डरमध्ये ईमेल टाका.
  • p=reject: ईमेल अजिबात स्वीकारू नका आणि ईमेल ब्लॉक करा.

तुमचा प्रेषक ईमेल store+123@shopifyemail.com म्हणून पुन्हा लिहिला जाण्यापासून रोखण्यासाठी DKIM आणि SPF प्रमाणीकरणासाठी CNAME रेकॉर्ड सोबत DMARC रेकॉर्ड आवश्यक आहे. तुमचा ब्रँडेड ईमेल अ‍ॅड्रेस योग्यरित्या दिसण्यासाठी तुम्हाला तुमच्या DNS सेटिंग्जमध्ये दोन्ही रेकॉर्ड जोडावे लागतील. DMARC रेकॉर्ड कसे जोडायचे ते जाणून घ्या.

तुमच्या डोमेनमध्ये फक्त एकच DMARC रेकॉर्ड असणे आवश्यक आहे. एकापेक्षा जास्त DMARC रेकॉर्डमुळे तुमच्या डोमेनमधील DMARC तपासण्या अयशस्वी होतील.

DNS

डोमेन नेम सिस्टीम्स (DNS) हा डोमेन नावांचा डेटाबेस आहे. प्रत्येक डोमेनची स्वतःची DNS नोंद असते. डोमेन नेम सिस्टीम्स डोमेन नावे व्यवस्थित करतात आणि शब्दांमधून नंबरमध्ये त्यांचे भाषांतर करतात जेणेकरून तुम्ही IP अ‍ॅड्रेस लक्षात न ठेवता वेबसाइटला भेट देऊ शकता. उदाहरणार्थ, shopify.com चा IP अ‍ॅड्रेस 23.227.38.65 आहे. सामान्यत:, ही प्रक्रिया पार्श्वभूमीवर वेगाने चालते. तुम्ही तुमच्या Shopify स्टोअरला तृतीय-पक्ष डोमेन कनेक्ट करता, तेव्हा तुम्हाला तुमचे DNS सेटिंग्ज बदलण्याची आवश्यकता असू शकते.

तुम्ही तुमच्या myshopify.com डोमेन नावासाठी तुमचे DNS सेटिंग्ज बदलू शकत नाही. तुम्हाला तृतीय-पक्ष सेवेशी कनेक्ट करण्यासाठी किंवा सबडोमेन सेट करण्यासाठी तुमच्या डोमेनमध्ये रेकॉर्ड जोडायचे असल्यास, तुम्हाला कस्टम डोमेन जोडणे आवश्यक आहे.

इतर संज्ञा: DNS रेकॉर्ड, DNS सेटिंग्ज, रिसोर्स रेकॉर्ड, DNS फाईल झोन

डोमेन अधिकृतता कोड

डोमेन अधिकृतता कोड हा एक कोड आहे जो सिद्ध करतो की तुमच्याकडे डोमेनची मालकी आहे आणि तुम्ही ते नवीन डोमेन प्रदात्याकडे ट्रान्सफर करण्यास मान्यता देता. तुम्हाला तुमच्या सध्याच्या डोमेन प्रदात्याकडून हा कोड मिळतो आणि त्यानंतर ट्रान्सफर पूर्ण करण्यासाठी तुम्ही तो तुमच्या नवीन डोमेन प्रदात्याला देता. बहुतेक डोमेन एक्स्टेंशन अधिकृतता कोड वापरतात, परंतु काही कंट्री-कोड एक्स्टेंशन वेगळी पद्धत वापरतात, जसे की .uk डोमेन द्वारे वापरण्यात येणारा इंटरनेट प्रदाता सुरक्षा (IPS) टॅग.

इतर संज्ञा: ऑथ कोड, ट्रान्सफर अधिकृतता कोड, Extensible Provisioning Protocol (EPP) कोड

डोमेन नाव

डोमेन नाव हा असा अ‍ॅड्रेस आहे जो लोक इंटरनेटवरील तुमच्या वेबसाइटला भेट देण्यासाठी वापरतात. डोमेन नावे तुमच्या वेब ब्राउझरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये दिसतात आणि विशिष्ट IP अ‍ॅड्रेसशी लिंक केलेली असतात.

इतर संज्ञा: डोमेन

डोमेन प्रदाता

डोमेन प्रदाता ही एक कंपनी असते जी तुमच्यासाठी तुमच्या डोमेन नावाची नोंदणी करते. साधारणपणे, तुम्ही सबस्क्रिप्शन तत्त्वावर डोमेन खरेदी करता आणि तुमचे डोमेन नाव वापरत राहण्यासाठी तुम्ही तुमच्या डोमेन प्रदात्याला नियमित फी भरता. जेव्हा तुम्ही Shopify द्वारे डोमेन खरेदी करता, तेव्हा Shopify तुमचा डोमेन प्रदाता असतो. तुमच्या डोमेनचे रजिस्ट्रेशन व्यवस्थापित करण्यासाठी Shopify चे काही डोमेन व्यवस्थापन पार्टनर देखील आहेत, जसे की OpenSRS.

इतर संज्ञा: डोमेन पुनर्विक्रेता, डोमेन रजिस्ट्रार, डोमेन रजिस्ट्री, डोमेन होस्ट

ईमेल होस्टिंग

ईमेल होस्टिंग ही एक सेवा आहे जी तुम्हाला कस्टम ईमेल अ‍ॅड्रेस सेट करण्यास आणि त्यानंतर ईमेल संदेश पाठवण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी त्याचा वापर करण्यास सक्षम करते. ईमेल होस्टिंग Shopify वर प्रदान केले जात नाही, परंतु तुम्ही तुमच्या कस्टम डोमेनला तृतीय-पक्ष ईमेल होस्टिंग सेवा कनेक्ट करू शकता.

ईमेल फॉरवर्डिंग

ईमेल फॉरवर्डिंग ही एक सेवा आहे जी तुम्हाला एका ईमेल अ‍ॅड्रेसवर पाठवलेला ईमेल संदेश दुसऱ्या ईमेल अ‍ॅड्रेसकडे निर्देशित करण्यास सक्षम करते. तुमच्याकडे Shopify द्वारे व्यवस्थापित डोमेन असल्यास, तुम्ही अमर्यादित कस्टम डोमेन ईमेल अ‍ॅड्रेस सेट करू शकता जे तृतीय-पक्षाद्वारे होस्ट केलेल्या ईमेल खात्यावर फॉरवर्ड केले जातात. उदाहरणार्थ, तुमच्याकडे example.com हे डोमेन नाव असल्यास, तुम्ही तुमच्या ग्राहकांना संपर्क करण्यासाठी info@example.com हा कस्टम डोमेन ईमेल अ‍ॅड्रेस तयार करू शकता आणि तुमच्या वैयक्तिक खात्यावर फॉरवर्डिंग ईमेल अ‍ॅड्रेस सेट करू शकता. जेव्हा ग्राहक info@example.com वर ईमेल संदेश पाठवतात, तेव्हा तो ईमेल संदेश तुमच्या विद्यमान वैयक्तिक खात्यावर फॉरवर्ड केला जातो.

HTTP स्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी (HSTS)

HTTP स्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी (HSTS) ही एक वेब सुरक्षा यंत्रणा आहे जी हे सुनिश्चित करते की ब्राउझर फक्त एका सुरक्षित HTTPS कनेक्शनद्वारे तुमच्या ऑनलाइन स्टोअरला कनेक्ट होतात. सुरक्षित कनेक्शनचा वापर केल्याने विशिष्ट प्रकारचे नेटवर्क हल्ले टळतात आणि तुमची तसेच तुमच्या ग्राहकांच्या माहितीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात मदत होते. जोपर्यंत तुमचे डोमेन तुमच्या Shopify स्टोअरशी कनेक्ट केलेले असते, तोपर्यंत तुमच्या डोमेनवर HSTS नेहमी सक्रिय असते.

डोमेनवर ठराविक कालावधीसाठी HSTS धोरण सेट केले जाऊ शकते. Shopify चा डिफॉल्ट कालावधी 90 दिवसांचा आहे. तुम्ही एखादे डोमेन काढून टाकल्यास किंवा Shopify पूर्णपणे सोडल्यास, हे धोरण तुमच्या डोमेनवर अतिरिक्त 90 दिवसांसाठी प्रभावी राहते.

ICANN

द इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइन्ड नेम्स अँड नंबर्स (ICANN) ही डोमेन नेम सिस्टीम्स आणि इतर इंटरनेट प्रोटोकॉल नियंत्रित आणि व्यवस्थापित करणारी एक संस्था आहे.

IANA

द इंटरनेट असाइन्ड नंबर्स ऑथॉरिटी (IANA) हे ICANN चे ऑपरेशनल ॲफिलिएट आहे.

आंतरराष्ट्रीय डोमेन

एखाद्या देशासाठी किंवा प्रदेशासाठी विशिष्ट असलेल्या URL ला आंतरराष्ट्रीय डोमेन म्हणतात. आंतरराष्ट्रीय डोमेन वापरून तुम्ही तुमचे ऑनलाइन स्टोअर विशिष्ट देशांतील किंवा प्रदेशांतील भाषा आणि चलनांमध्ये दाखवू शकता. Basic किंवा त्यापेक्षा उच्च स्तराच्या प्लॅनवर आंतरराष्ट्रीय डोमेन उपलब्ध आहेत.

इतर संज्ञा: प्रादेशिक डोमेन, प्रादेशिक सबडोमेन

आंतरराष्ट्रीय लक्ष्यीकरण

आंतरराष्ट्रीय लक्ष्यीकरण तुम्हाला विशिष्ट देश किंवा प्रदेशातील स्थानिक ग्राहकांना तुमच्या स्टोअरची योग्य आवृत्ती प्रदर्शित करण्याची अनुमती देते. उदाहरणार्थ, तुम्ही फक्त युनायटेड स्टेट्समधील ग्राहकांनाच उत्पादने विकत असल्यास, तुम्ही तुमच्या स्टोअरचा लक्ष्य देश युनायटेड स्टेट्स असा सेट करू शकता. तुम्ही Google Search Console मध्ये तुमच्या स्टोअरच्या प्रत्येक डोमेन किंवा सबडोमेनसाठी लक्ष्य देश किंवा प्रदेश सेट करू शकता.

इतर संज्ञा: जिओ-टार्गेटिंग

IP अ‍ॅड्रेस

IP अ‍ॅड्रेस ही आकड्यांची एक युनिक स्ट्रिंग असते, जी इंटरनेटवरील संगणक किंवा उपकरणाचे ठिकाण निर्दिष्ट करते आणि त्याला इतर संगणक किंवा उपकरणांपासून वेगळे करते. एका संगणकाला इंटरनेटवर इतर उपकरणांशी संवाद साधण्यासाठी IP अ‍ॅड्रेसची आवश्यकता असते.

तुम्ही तृतीय-पक्ष डोमेन वापरत असल्यास, Shopify चा IP अ‍ॅड्रेस 23.227.38.65 आहे. सध्याचे डोमेन कनेक्ट करण्यासाठी, तुम्हाला तुमचा A रेकॉर्ड Shopify च्या IP अ‍ॅड्रेसवर सेट करणे आवश्यक आहे.

तुम्ही Shopify द्वारे डोमेन खरेदी केल्यास, किंवा तुमचे डोमेन Shopify वर ट्रान्सफर केल्यास, तुमच्या डोमेनसाठी खालीलपैकी कोणताही IP अ‍ॅड्रेस असू शकतो:

  • 23.227.38.32
  • 23.227.38.36
  • 23.227.38.65 ते 23.227.38.74

तुमचे Shopify डोमेन कधीही या IP अ‍ॅड्रेसेसच्या दरम्यान स्विच करू शकते. DNS सेटिंग्ज पेजवरील A रेकॉर्ड विभागामध्ये कडे पॉइंट करते (Points to) मूल्य पाहून तुम्ही तुमचा सध्याचा Shopify IP अ‍ॅड्रेस पाहू शकता.

इतर संज्ञा: इंटरनेट प्रोटोकॉल अ‍ॅड्रेस

IPS टॅग

इंटरनेट प्रोव्हायडर सिक्युरिटी (IPS) टॅग हा एक कोड असतो जो .co.uk डोमेन सारख्या .uk डोमेनचे व्यवस्थापन करणाऱ्या डोमेन प्रदात्याची ओळख पटवतो. डोमेन अधिकृतता कोड वापरण्याऐवजी, जेव्हा वर्तमान प्रदाता डोमेनचा IPS टॅग नवीन प्रदात्याच्या टॅगमध्ये बदलतो तेव्हा .uk डोमेन एका नवीन डोमेन प्रदात्याकडे हलवले जाते.

MX रेकॉर्ड

MX रेकॉर्ड हे एक DNS सेटिंग असते जे डोमेन नावाला मेल सर्व्हरकडे निर्देशित करते आणि तुमच्या कस्टम डोमेनवरून ईमेलवर प्रक्रिया करण्यासाठी वापरले जाते. तुमचा मुख्य ईमेल सर्व्हर डाउन असताना ईमेल संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतील याची खात्री करायची असल्यास, तुम्ही एकापेक्षा अधिक MX रेकॉर्ड सेट करू शकता आणि बॅकअप ईमेल अ‍ॅड्रेसेस जोडू शकता.

इतर संज्ञा: मेल एक्सचेंज रेकॉर्ड, मेल एक्सचेंजर रेकॉर्ड, मेल सर्व्हर रेकॉर्ड

प्राथमिक डोमेन

Shopify मध्ये, तुमचे प्राथमिक डोमेन हे डोमेन नाव असते जे ग्राहक तुमचे ऑनलाइन स्टोअर ब्राउझ करतात तेव्हा अ‍ॅड्रेस बारमध्ये प्रदर्शित होते. तुम्ही तुमचे रूट डोमेन किंवा सबडोमेन तुमचे प्राथमिक डोमेन म्हणून वापरू शकता, परंतु तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी फक्त एकच प्राथमिक डोमेन असू शकते.

तुम्ही Shopify साठी साइन अप करता, तेव्हा तुम्हाला आधीपासून तयार केलेले myshopify.com डोमेन दिले जाते. तथापि, ग्राहक तुमच्या ऑनलाइन स्टोअरला भेट देण्यासाठी वापरत असलेले प्राथमिक डोमेन तुम्ही बदलू शकता. तुम्हाला तुमच्या स्टोअरफ्रंटसाठी वापरता येईल असे मोफत ब्रँडेड डोमेन हवे असल्यास तुम्ही नवीन .myshopify.com डोमेन नाव निवडू शकता. तुम्ही तुमचे myshopify.com डोमेन फक्त दोन वेळा बदलू शकता. साइन अप करताना तुम्ही स्टोअरचे नाव एंटर केले असल्यास, तुम्ही myshopify.com डोमेन पहिल्यांदा बदलले असे मानले जाते आणि त्यानंतर तुम्ही ते आणखी एकदा बदलू शकता. तुम्ही Shopify द्वारे किंवा कोणत्याही तृतीय-पक्ष डोमेन रजिस्ट्रारकडून कस्टम डोमेनदेखील खरेदी करू शकता आणि ते Shopify शी कनेक्ट करू शकता. तुम्ही Shopify मध्ये कस्टम डोमेन जोडल्यानंतर, तुम्ही तुमचे कस्टम डोमेन प्राथमिक डोमेन म्हणून सेट करू शकता.

रूट डोमेन

रूट डोमेन हे असे डोमेन नाव आहे जे तुम्ही तुमच्या डोमेन प्रदात्याकडून खरेदी करता. रूट डोमेनला टॉप-लेव्हल डोमेन (TLD) एक्स्टेंशन असते जसे की .com, .org किंवा .net, परंतु यामध्ये www. सारखा प्रीफिक्स नसतो. रूट डोमेनचे उदाहरण म्हणजे shopify.com आहे.

इतर संज्ञा: बेस डोमेन, टॉप-लेव्हल डोमेन आणि सेकंड-लेव्हल डोमेन, अपेक्स डोमेन

SPF रेकॉर्ड

Shopify ईमेल ऑथेंटिकेशनचा भाग म्हणून SPF (सेंडर पॉलिसी फ्रेमवर्क) वापरते. तुम्ही तुमचे डोमेन ऑथेंटिकेट करण्यासाठी CNAME रेकॉर्ड्स जोडता, तेव्हा SPF आपोआप कॉनफिगर केले जाते. या उद्देशासाठी तुम्हाला वेगळा SPF TXT रेकॉर्ड जोडण्याची आवश्यकता नाही. तुमच्या प्रेषक ईमेलला store+123@shopifyemail.com म्हणून पुन्हा लिहून काढण्यापासून पूर्णपणे थांबवण्यासाठी, तुम्हाला CNAME रेकॉर्ड्स व्यतिरिक्त तुमच्या DNS सेटिंग्जमध्ये एक वैध DMARC रेकॉर्ड देखील जोडण्याची आवश्यकता आहे.

तुम्ही Shopify द्वारे डोमेन खरेदी केले असल्यास, तुमच्या DNS सेटिंग्जमध्ये CNAME रेकॉर्ड्स म्हणून SPF आपोआप कॉनफिगर केले जाते. हे रेकॉर्ड्स हटवू नका. तुम्ही तुमच्या Shopify-द्वारे व्यवस्थापित केलेल्या डोमेनवर ईमेल फॉरवर्डिंग वापरत असल्यास, फॉरवर्ड केलेले ईमेल्स योग्यरीत्या डिलिव्हर केले जातात याची खात्री करण्यासाठी तुम्हाला एक स्वतंत्र SPF रेकॉर्ड जोडणे देखील आवश्यक आहे.

SSL प्रमाणपत्र

TLS प्रमाणपत्र पहा.

सबडिरेक्टरी

सबडिरेक्टरी हा तुमच्या मुख्य वेबसाइटचा एक भाग असतो. सबडिरेक्टरी ही डोमेन नावाच्या शेवटी असलेल्या / द्वारे परिभाषित केली जाते. उदाहरणार्थ, shopify.com/pricing या URL मध्ये, /pricing ही सबडिरेक्टरी आहे. सबडिरेक्टरी ही सबडोमेनपेक्षा वेगळी असते, कारण ती प्रामुख्याने तुमची वेबसाइट ऑर्गनाइझ करण्यासाठी वापरली जाते, तर सबडोमेन तुम्हाला एका पूर्णपणे वेगळ्या वेबसाइटवर घेऊन जाऊ शकते. तुमच्या ऑनलाइन स्टोअरवरील सबडिरेक्टरीजची उदाहरणे /collections, /products आणि /pages आहेत.

तुम्ही सबडिरेक्टरीची नावे एडिट करू शकत नाही. तुम्ही कोणते डोमेन वापरत आहात याने काहीही फरक पडत नाही, सबडिरेक्टरीची नावे तीच राहतात.

सबडोमेन

तुमच्या रूट डोमेनच्या सुरुवातीला जोडल्या जाणाऱ्या भागाला सबडोमेन म्हणतात. उदाहरणार्थ, help.shopify.com या URL मध्ये shopify.com हे रूट डोमेन आहे आणि help. हे सबडोमेन आहे. वेबसाइट सुव्यवस्थित ठेवण्यासाठी आणि व्हिजिटरना हवी असलेली माहिती सहज सापडण्यासाठी तुम्ही सबडोमेन वापरू शकता. तुम्ही Basic किंवा त्यापेक्षा उच्च स्तराचा प्लॅन वापरत असाल आणि अनेक देशांतील किंवा प्रदेशांतील ग्राहकांना विक्री करायची असेल, तर आंतरराष्ट्रीय डोमेन वापरू शकता. त्याद्वारे तुमचा लक्ष्य बाजार असलेल्या प्रत्येक देशासाठी किंवा प्रदेशासाठी प्रादेशिक सबडोमेन सेट करता येते.

टाइम टू लिव्ह (Time to Live)

तुमच्या डोमेनचे टाइम टू लिव्ह (TTL) मूल्य हे तुमचे DNS रेकॉर्ड्स किती वेळा अपडेट केले जातात हे ठरवते. सर्व डोमेन DNS रेकॉर्ड्समध्ये TTL मूल्य असते. उदाहरणार्थ, जर एखाद्या रेकॉर्डचा TTL 86400 सेकंद असेल, तर तो लागू होण्यासाठी 24 तासांपर्यंतचा वेळ लागतो. रेकॉर्डचा TTL बदलल्यास, नंतरच्या कोणत्याही बदलाला होण्यासाठी लागणाऱ्या वेळेवर परिणाम होतो.

टॉप-लेव्हल आणि सेकंड-लेव्हल डोमेन्स

टॉप-लेव्हल डोमेन (TLD) आणि सेकंड-लेव्हल डोमेन हे रूट डोमेनचे घटक आहेत जे डोमेन स्ट्रक्चरला पदानुक्रम (hierarchy) देतात. उदाहरणार्थ, shopify.com या रूट डोमेनमध्ये, .com हे टॉप-लेव्हल डोमेन आहे आणि shopify हे सेकंड-लेव्हल डोमेन आहे.

TLS प्रमाणपत्र

TLS (ट्रान्सपोर्ट लेयर सिक्युरिटी) प्रमाणपत्र हा एक सुरक्षा प्रोटोकॉल आहे जो सर्व्हर आणि ब्राउझर दरम्यान सुरक्षित कनेक्शन तयार करतो, जे तुमचे स्वतःचे कनेक्शन आणि तुमच्या ग्राहकांच्या कनेक्शनसह Shopify वरील सर्व कनेक्शन सुरक्षित ठेवते. तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये, तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरची सामग्री कूटबद्ध (encrypt) करण्यासाठी तुमच्या Shopify स्टोअरमध्ये सुरक्षित कनेक्शन्स सक्रिय करू शकता आणि HTTP ऐवजी HTTPS वापरून ती सुरक्षितपणे प्रकाशित करू शकता. तुमचे TLS प्रमाणपत्र सक्रिय झाल्यावर, ॲड्रेस बारमध्ये तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या URL च्या बाजूला एक पॅडलॉक आयकन प्रदर्शित होईल.

इतर संज्ञा: ट्रान्सपोर्ट लेयर सिक्युरिटी, सिक्युअर सॉकेट्स लेयर, SSL

TXT रेकॉर्ड

TXT रेकॉर्ड हे DNS सेटिंग आहे. TXT रेकॉर्डमध्ये मजकूर माहिती असते जी तुमच्या डोमेन बाहेरील सेवांद्वारे वापरली जाऊ शकते. उदाहरणार्थ, डोमेन तुमच्या मालकीचे आहे याची पडताळणी करण्यासाठी तृतीय-पक्ष सेवेने तुम्हाला दिलेला TXT रेकॉर्ड तुम्ही जोडू शकता.

इतर संज्ञा: टेक्स्ट रेकॉर्ड

WHOIS गोपनीयता

डोमेन नावाच्या मालकाविषयी माहिती शोधण्यासाठी तुम्ही WHOIS या सेवेचा वापर करू शकता.

WHOIS गोपनीयता ही अशी सेवा आहे जी तुमची डोमेन माहिती WHOIS लुकअपपासून लपवते आणि तुमच्या संपर्क माहितीच्या जागी contactprivacy.com संपर्क तपशील लावते. WHOIS गोपनीयतेमुळे तुमची वैयक्तिक संपर्क माहिती सार्वजनिक होण्यापासून लपलेली राहू शकते. अतिरिक्त शुल्क भरून तुम्ही तुमच्या डोमेन प्रदात्याकडून WHOIS गोपनीयता खरेदी करू शकता. तुम्ही तुमचे डोमेन Shopify द्वारे खरेदी करता तेव्हा त्यात WHOIS गोपनीयतेचा समावेश केलेला असतो.