Shopify-व्यवस्थापित डोमेन्सचे नूतनीकरण करणे

तुमच्याकडे Shopify-व्यवस्थापित डोमेन असल्यास, तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये तुमच्या डोमेन सबस्क्रिप्शनचे स्वयंचलितरित्या नूतनीकरण करू शकता. तुमच्या डोमेनचे स्वयंचलितरित्या नूतनीकरण केल्याने तुमची मालकी संपुष्टात येत नाही याची खात्री होते. तुम्हाला तुमच्या myshopify.com URL चे नूतनीकरण करण्याची आवश्यकता नाही.

तुम्ही Shopify द्वारे डोमेन खरेदी करता तेव्हा किंवा तुमच्या Shopify ॲडमिनमधून कोणत्याही वेळी स्वयंचलित नूतनीकरण सक्रिय करायचे की नाही हे निवडू शकता. तुमचे डोमेन स्वयंचलितरित्या नूतनीकरण करण्यासाठी सेट केलेले नसल्यास, ते संपुष्टात येण्यापासून रोखण्यासाठी तुम्हाला स्वयंचलित नूतनीकरण सक्रिय करावे लागेल किंवा नोंदणी कालावधी संपण्यापूर्वी तुमच्या डोमेनचे मॅन्युअली नूतनीकरण करावे लागेल.

तुम्ही समाप्ती तारखेच्या 30 दिवस आधीपासून तुमच्या Shopify ॲडमिनवरून मॅन्युअली तुमच्या डोमेनचे नूतनीकरणदेखील करू शकता.

तुम्हाला Shopify-व्यवस्थापित डोमेन रद्द करायचे असल्यास, तुम्ही स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करू शकता जेणेकरून ते नोंदणी कालावधीच्या शेवटी संपुष्टात येईल. तुम्हाला डोमेनची मुदत संपण्यापूर्वी ते तुमच्या स्टोअरकडे निर्देशित करण्यापासून थांबवायचे असल्यास, तुम्ही त्याचे DNS सेटिंग्ज अपडेट करून डोमेन पार्क करू शकता.

डीफॉल्टनुसार, Shopify स्टोअर मालकाचा ईमेल अ‍ॅड्रेस आणि माहिती डोमेन्स खरेदी आणि नूतनीकरण करण्यासाठी वापरली जाते. तुम्हाला तुमच्या डोमेन सबस्क्रिप्शनबद्दल नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस अद्ययावत असल्याची खात्री करा.

स्वयंचलित नूतनीकरण सक्रिय करा

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > डोमेन्स वर जा.

  2. तुम्हाला कॉन्फिगर करायच्या असलेल्या डोमेनवर क्लिक करा.

  3. नूतनीकरण विभागात, दरवर्षी या डोमेनचे स्वयं-नूतनीकरण करा निवडा.

सूचीबद्ध केलेल्या तारखेला तुमच्या डोमेन नूतनीकरणाचे शुल्क स्वयंचलितरित्या आकारले जाते. तुमचे डोमेन सबस्क्रिप्शन यशस्वी झाल्याची खात्री करण्यासाठी, नूतनीकरणाची तारीख नोंदणी कालावधी संपण्याच्या 14 दिवस आधीची असते. डोमेन नूतनीकरणाचे शुल्क तुमच्या Shopify प्लॅनच्या सदस्यत्व शुल्कापेक्षा वेगळे आकारले जाते.

स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करा

तुम्हाला तुमचे डोमेन सबस्क्रिप्शन स्वयंचलितरित्या नूतनीकरण करायचे नसल्यास किंवा तुम्हाला तुमचे Shopify-व्यवस्थापित डोमेन रद्द करायचे असल्यास, तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > डोमेन्स वर जा.

  2. तुम्हाला कॉन्फिगर करायच्या असलेल्या डोमेनवर क्लिक करा.

  3. स्वयं-नूतनीकरण विभागात, दरवर्षी या डोमेनचे स्वयं-नूतनीकरण करा ची निवड रद्द करा.

तुम्ही स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय केल्यानंतर, तुमचे डोमेन नोंदणी कालावधीच्या शेवटी संपुष्टात येते. तुम्हाला तुमचे डोमेन संपुष्टात येऊ द्यायचे नसल्यास, तुम्हाला समाप्ती तारखेपूर्वी स्वयंचलित नूतनीकरण सक्रिय करणे आवश्यक आहे.

.de आणि .at डोमेन्ससाठी स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करा

जर्मन आणि ऑस्ट्रियन नियमांमुळे, तुमच्या Shopify ॲडमिनमधून .de आणि .at डोमेन नूतनीकरण निष्क्रिय केले जाऊ शकत नाही. तुम्ही Shopify द्वारे .de किंवा .at डोमेन खरेदी केल्यास, Shopify सपोर्टद्वारे संबंधित अनुपालन फॉर्मवर प्रक्रिया केली जाईपर्यंत तुमचे डोमेन स्वयंचलितरित्या नूतनीकरण होत राहील.

निष्क्रियकरण प्रक्रियेत कोणताही विलंब टाळण्यासाठी फॉर्म पूर्णपणे भरलेला असणे आवश्यक आहे आणि तुमच्या डोमेनच्या संपर्क माहितीशी तंतोतंत जुळला पाहिजे. तुमची डोमेन संपर्क माहिती संपादित करा च्या पायऱ्या फॉलो करून तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये तुमची डोमेन संपर्क माहिती शोधू शकता. तुम्ही तुमचे Shopify सबस्क्रिप्शन आधीच रद्द केले असल्यास, तुमच्या डोमेनच्या सध्याच्या संपर्क माहितीची पुष्टी करण्यासाठी Shopify सपोर्टशी संपर्क साधा.

स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय केल्यानंतर, सध्याचा नोंदणी कालावधी संपेपर्यंत तुमची डोमेनची मालकी चालू राहते. तुम्ही तुमचा विचार बदलल्यास आणि तुम्हाला स्वयंचलित नूतनीकरण पुन्हा सक्रिय करायचे असल्यास, किंवा डोमेनमध्ये कोणतेही इतर बदल करायचे असल्यास, तुम्ही त्या वेळेदरम्यान ते करू शकता.

तुमच्या .de डोमेनसाठी स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करा

.de डोमेनसाठी स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करण्यासाठी, तुम्हाला एक Domain Termination/Deletion फॉर्म पूर्ण करणे आवश्यक आहे. खालील टेबल तुम्हाला दाखवते की फॉर्ममध्ये तुम्ही पूर्ण करत असलेल्या फील्ड्सशी संबंधित संपर्क माहिती Shopify ॲडमिनमध्ये कशी प्रदर्शित केली जाते.

कसे Current Registrant/Holder फील्ड्स हे Domain Termination/Deletion फॉर्ममध्ये Shopify ॲडमिनमधील संपर्क माहिती फील्ड्सशी संबंधित असतात.
Current Registrant/Holder फील्ड हे Domain Termination/Deletion फॉर्मवरShopify ॲडमिनमधील संपर्क माहिती फील्ड
Company nameस्टोअरचे नाव
First name, last nameपहिले नाव आडनाव
Street addressरस्ता आणि घर क्रमांक
City, zip codeशहर, पोस्टल कोड
Countryदेश/प्रदेश

पायऱ्या:

  1. हा Domain Termination/Deletion फॉर्म उघडा.
  2. या Domain Names for Deletion सेक्शनमध्ये, तुम्हाला ज्या .de रूट डोमेन(स) चे स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करायचे आहे, ते एंटर करा. केवळ समान संपर्क माहिती असणारे डोमेन्स एंटर करा. तुम्हाला वेगवेगळ्या संपर्क माहितीसह एकाधिक .de डोमेन्ससाठी स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करायचे असल्यास, तुम्हाला प्रत्येक डोमेनसाठी स्वतंत्र फॉर्म पूर्ण करावा लागेल.
  3. या Current Registrant/Holder सेक्शनमध्ये, डोमेन(स) ची सद्य संपर्क माहिती एंटर करा.
  4. या Confirmation सेक्शनमध्ये, करार वाचा आणि तुमचे स्वाक्षरीचे तपशील एंटर करा.
    • या City, Date फील्डमध्ये, तुम्ही सध्या ज्या शहरात आहात त्या शहराचे नाव एंटर करा आणि त्यानंतर तुम्ही फॉर्मवर ज्या दिवशी स्वाक्षरी करत आहात, तो दिवस, महिना आणि वर्ष एंटर करा. शहर आणि तारीख , ने विभक्त करा.
    • या Name of Signatory फील्डमध्ये, फॉर्मवर स्वाक्षरी करणारी व्यक्ती म्हणून तुमचे नाव एंटर करा.
    • या Signature and company stamp फील्डमध्ये, तुमची हस्ताक्षरातील स्वाक्षरी जोडा. डोमेनची मालकी स्टॅम्प असलेल्या कंपनीकडे नोंदणीकृत असल्यास, त्या फील्डवर स्टॅम्पदेखील मारा.
  5. तुमचा पूर्ण झालेला फॉर्म बदल न करता येणाऱ्या .pdf किंवा .jpg फॉरमॅटमध्ये सेव्ह करा.
  6. डोमेनचे स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करण्याची तुमची विनंती करण्यासाठी Shopify सपोर्टशी संपर्क साधा आणि तुमच्या पूर्ण केलेल्या फॉर्मची प्रत शेअर करा. तो फॉर्म डोमेनच्या सद्य मालकीशी जुळत असल्याची, त्यावर योग्य प्रकारे स्वाक्षरी केली असल्याची, तो स्वीकारलेल्या फाईल फॉरमॅटमध्ये असल्याची आणि संपादित करता येत नसल्याची खात्री करण्यासाठी, Shopify सपोर्ट फॉर्मचे पुनरावलोकन करेल.
    • फॉर्म आवश्यकतेनुसार नसल्यास, तुमची विनंती पुन्हा सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला योग्य त्या सुधारणा करण्यास सांगितले जाईल.
    • फॉर्म आवश्यकतेनुसार असल्यास, Shopify सपोर्ट तुमच्या विनंतीवर प्रक्रिया सुरू करेल आणि स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय केले जाईल, तेव्हा तुम्हाला सूचित करण्यासाठी फॉलो अप घेईल.

तुमच्या .at डोमेनसाठी स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करा

.at डोमेनचे स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करण्यासाठी, तुम्हाला हे पूर्ण करावे लागेल: Cancellation फॉर्म पूर्ण करणे आवश्यक आहे. खालील टेबल तुम्हाला दाखवते की फॉर्ममध्ये तुम्ही पूर्ण करत असलेल्या फील्ड्सशी संबंधित संपर्क माहिती Shopify ॲडमिनमध्ये कशी प्रदर्शित केली जाते.

कसे domain holder फील्ड्स हे Cancellation फॉर्ममध्ये Shopify ॲडमिनमधील संपर्क माहिती फील्ड्सशी संबंधित असतात.
Domain holder फील्ड हे Cancellation फॉर्मवरShopify ॲडमिनमधील संपर्क माहिती फील्ड
Nameपहिले नाव आडनाव/स्टोअरचे नाव
Streetरस्ता आणि घर क्रमांक
Post Codeपोस्टल कोड
Cityशहर
Stateदेश/प्रदेश
Tel. Noफोन
Fax Noफॅक्स नंबर
E-Mailईमेल

पायऱ्या:

  1. हा Cancellation फॉर्म उघडा.
  2. फॉर्मच्या शीर्षस्थानी असलेल्या सेक्शनमध्ये, तुम्हाला ज्या .at रूट डोमेन चे स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करायचे आहे, ते एंटर करा. तुम्हाला एकाधिक डोमेन्ससाठी स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करायचे असल्यास, तुम्हाला प्रत्येक डोमेनसाठी स्वतंत्र फॉर्म पूर्ण करणे आवश्यक आहे.
  3. या domain holder सेक्शनमध्ये, डोमेनसाठी सद्य संपर्क माहिती एंटर करा.
    • तुमच्या डोमेनच्या संपर्क माहितीमध्ये स्टोअरचे नाव असल्यास, यापुढील बॉक्समध्ये खूण करा: organization. फक्त यापुढील बॉक्समध्ये खूण करा: private person जर तुम्ही यापूर्वी Shopify सपोर्टच्या मदतीने डोमेनचा होल्डर प्रकार बदलला असेल.
    • डोमेनची मालकी स्टॅम्प असलेल्या कंपनीकडे नोंदणीकृत असल्यास, यावर स्टॅम्प मारा: Company chop बॉक्स.
  4. या domain holder सेक्शनच्या खाली, यापुढील बॉक्समध्ये खूण करा: at the end of the current service period.
  5. स्वाक्षरी सेक्शनमध्ये, करार वाचा आणि तुमच्या स्वाक्षरीचे तपशील एंटर करा.
    • या Name of the signing person (block capitals) फील्डमध्ये, कॅपिटल अक्षरांमध्ये तुमचे नाव एंटर करा.
    • या City, date फील्डमध्ये, तुम्ही सध्या ज्या शहरात आहात त्या शहराचे नाव एंटर करा आणि त्यानंतर तुम्ही फॉर्मवर ज्या दिवशी स्वाक्षरी करत आहात, तो दिवस, महिना आणि वर्ष एंटर करा. शहर आणि तारीख , ने विभक्त करा.
    • या Signature of the Domain Holder or a person authorized to sign for the company फील्डमध्ये, तुमची हस्ताक्षरातील स्वाक्षरी जोडा.
  6. तुमचा पूर्ण झालेला फॉर्म बदल न करता येणाऱ्या .pdf किंवा .jpg फॉरमॅटमध्ये सेव्ह करा.
  7. डोमेनचे स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करण्याची तुमची विनंती करण्यासाठी Shopify सपोर्टशी संपर्क साधा आणि तुमच्या पूर्ण केलेल्या फॉर्मची प्रत शेअर करा. तो फॉर्म डोमेनच्या सद्य मालकीशी जुळत असल्याची, त्यावर योग्य प्रकारे स्वाक्षरी केली असल्याची, तो स्वीकारलेल्या फाईल फॉरमॅटमध्ये असल्याची आणि संपादित करता येत नसल्याची खात्री करण्यासाठी, Shopify सपोर्ट फॉर्मचे पुनरावलोकन करेल.
    • फॉर्म आवश्यकतेनुसार नसल्यास, तुमची विनंती पुन्हा सबमिट करण्यापूर्वी तुम्हाला योग्य त्या सुधारणा करण्यास सांगितले जाईल.
    • फॉर्म आवश्यकतेनुसार असल्यास, Shopify सपोर्ट तुमच्या विनंतीवर प्रक्रिया सुरू करेल आणि स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय केले जाईल, तेव्हा तुम्हाला सूचित करण्यासाठी फॉलो अप घेईल.

.de आणि .at डोमेन्ससाठी त्वरित रद्दीकरणाच्या विनंत्या

.de आणि .at डोमेन्सची मालकी त्वरित हटवण्याच्या विनंत्यांवर प्रक्रिया करण्याविषयीच्या OpenSRS च्या धोरणांनुसार, डोमेनने डोमेन व्यवस्थापन नियंत्रित करणाऱ्या धोरणांचे किंवा स्थानिक कायद्याचे उल्लंघन केलेले असणे आवश्यक आहे. तुमचे डोमेन सध्या ॲक्टिव्ह असल्यास आणि चांगल्या स्थितीत असल्यास, स्वयंचलित नूतनीकरण निष्क्रिय करण्याऐवजी डोमेन मालकी त्वरित रद्द करण्याची विनंती Shopify सपोर्टद्वारे नाकारली जाईल.

तुम्हाला .de आणि .at डोमेन Shopify च्या धोरणांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास, तुम्ही आमच्या अनुपालन सूचनांमध्ये उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी पुढील पायऱ्या शोधू शकता. डोमेन तृतीय-पक्षाच्या धोरणांचे उल्लंघन करत असल्यास, योग्य गैरवर्तन संपर्क शोधण्यासाठी तुम्ही IANA च्या WHOIS सेवेचा वापर करू शकता.

कालबाह्य झालेल्या डोमेनचे नूतनीकरण करा

तुमचे डोमेन सबस्क्रिप्शन समाप्त झाल्यास आणि तुम्हाला तुमचे डोमेन वापरणे सुरू ठेवायचे असल्यास, त्याचे नूतनीकरण करण्यासाठी बहुतांश डोमेन्ससाठी तुमच्याकडे 40 दिवसांचा सवलतीचा कालावधी आहे.

तुम्ही सवलतीच्या कालावधीदरम्यान कालबाह्य झालेल्या डोमेनचे नूतनीकरण न केल्यास, तुम्हाला अद्याप रिडेम्प्शन कालावधीमध्ये त्याचे नूतनीकरण करणे शक्य असू शकेल. रिडेम्प्शन कालावधी सवलतीच्या कालावधीनंतर 30 दिवसांपर्यंत असतो. रिडेम्प्शन कालावधीमध्ये डोमेनचे नूतनीकरण करण्याशी संबंधित अतिरिक्त खर्च असतो.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > डोमेन्स वर जा.

  2. तुम्हाला ज्या डोमेनचे नूतनीकरण करायचे आहे, त्यावर क्लिक करा.

  3. डोमेन सवलतीच्या किंवा रिडेम्प्शनच्या कालावधीमध्ये नूतनीकरण करण्यासाठी पात्र असल्यास, डोमेनच्या पुढे आता नूतनीकरण करा बटण प्रदर्शित होते. आता नूतनीकरण करा बटण प्रदर्शित न झाल्यास, तुम्ही त्या डोमेनचे नूतनीकरण करू शकत नाही.

तुमचे डोमेन रिडेम्प्शन कालावधीच्या शेवटपर्यंत नूतनीकरण न केल्यास, ते रजिस्ट्रीमधून हटवले जाते. तुमचे डोमेन Shopify द्वारे किंवा तृतीय-पक्ष डोमेन प्रदात्याकडून पुन्हा खरेदी करण्यासाठी उपलब्ध असू शकते, परंतु डोमेन खरेदीसाठी उपलब्ध असेलच याची कोणतीही खात्री नाही. तुम्हाला डोमेन ठेवायचे असल्यास, तुमच्या डोमेनच्या समाप्ती तारखांचे पुनरावलोकन करा आणि तुम्ही त्या समाप्ती तारखांच्या आधी तुमच्या डोमेन्सचे नूतनीकरण करत असल्याची खात्री करा. तुम्ही स्वयंचलित नूतनीकरण ॲक्टिव्हेटही करू शकता.

कालबाह्य होणाऱ्या डोमेनचे मॅन्युअली नूतनीकरण करा

तुमच्या डोमेन सबस्क्रिप्शनचे स्वयंचलितरीत्या नूतनीकरण व्हावे असे तुम्हाला वाटत नसेल पण ते समाप्तही होऊ द्यायचे नसेल, तर तुम्ही समाप्ती तारखेच्या 30 दिवस आधीपासून तुमच्या Shopify ॲडमिनवरून त्याचे मॅन्युअली नूतनीकरण करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > डोमेन्स वर जा.

  2. तुम्हाला ज्या डोमेनचे नूतनीकरण करायचे आहे, त्यावर क्लिक करा.

  3. नूतनीकरण सेक्शनमध्ये, आता नूतनीकरण करा वर क्लिक करा.

डोमेन नूतनीकरणाच्या समस्यांचे ट्रबलशूटिंग

तुम्हाला डोमेन नूतनीकरणाविषयी समस्या येत असल्यास, सामान्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी पुढील ट्रबलशूटिंग पायऱ्यांचा वापर करा.

पायरी 1: सामान्य ट्रबलशूटिंग

विशिष्ट एरर्स हाताळण्यापूर्वी पुढील सामान्य ट्रबलशूटिंग पायऱ्या वापरून पहा:

  • तुमचे डोमेन हे तृतीय-पक्ष डोमेन नसून ते Shopify द्वारे व्यवस्थापित केले जात असल्याची पडताळणी करा.
  • तुमच्या डोमेनच्या समाप्तीच्या तारखेच्या किमान 14 दिवस अगोदर स्वयं-नूतनीकरण ॲक्टिव्हेट केल्याची पडताळणी करा.
  • तुमची पेमेंट पद्धत वैध असल्याची, कालबाह्य झालेली नसल्याची आणि त्यात पुरेसा निधी असल्याची पडताळणी करा.
  • कोणत्याही अयशस्वी झालेल्या पेमेंटच्या प्रयत्नांसाठी सेटिंग्ज > बिलिंग मध्ये तुमच्या अलीकडील इन्व्हॉइसचे पुनरावलोकन करा.
  • तुमचा बिलिंग पत्ता तुमच्या पेमेंट पद्धतीच्या माहितीशी जुळत असल्याची पडताळणी करा.
  • तुमचे Shopify खाते नूतनीकरण कालावधीदरम्यान ॲक्टिव्ह असल्याची पडताळणी करा कारण निष्क्रिय खात्यांवरील डोमेन्सचे स्वयं-नूतनीकरण होत नाही.

पायरी 2: डोमेन नूतनीकरणाची समस्या निवडा

तुम्हाला एखादी विशिष्ट एरर येत असल्यास, योग्य ट्रबलशूटिंग सेक्शन निवडा:

बिलिंग पेमेंट पद्धतीच्या समस्या ट्रबलशूट करा

पेमेंटच्या समस्यांमुळे तुमचे डोमेन नूतनीकरण अयशस्वी झाल्यास, तुमच्या बिलिंग पेमेंट पद्धतीमध्ये किंवा त्यासंबंधित नोंदवलेल्या पत्त्यामध्ये समस्या असू शकते.

पायऱ्या:

  1. तुमची पेमेंट पद्धत अद्याप वैध असल्याची आणि मुदत संपलेली नसल्याची पडताळणी करा.
  2. तुमचा बिलिंग पत्ता तुमच्या पेमेंट पद्धतीशी जुळत असल्याची पडताळणी करा.
  3. उपलब्ध असल्यास, वेगळी पेमेंट पद्धत वापरून पहा.
  4. पेमेंट ब्लॉक केले जात नाही याची पुष्टी करण्यासाठी, तुमच्या बँकेशी किंवा PayPal सारख्या तुमच्या पेमेंट पद्धतीमागील सेवेशी संपर्क साधा.
  5. आवश्यकता असल्यास तुमची पेमेंट माहिती अपडेट करा आणि त्यानंतर मॅन्युअली डोमेन नूतनीकरण करण्याचा प्रयत्न करा.
पेमेंट ऑथेंटिकेशन विलंबाचे ट्रबलशूटिंग

नूतनीकरण शुल्कावर प्रक्रिया करण्यापूर्वी तुमच्या क्रेडिट कार्डसाठी अतिरिक्त ऑथेंटिकेशन आवश्यक असल्यास, नूतनीकरणास विलंब होऊ शकतो.

काही क्रेडिट कार्डना नूतनीकरण शुल्कावर प्रक्रिया करण्यापूर्वी अतिरिक्त प्रमाणीकरण आवश्यक असते. प्रमाणीकरण पूर्ण होण्यासाठी 24-48 तासांपर्यंतचा वेळ द्या. प्रमाणीकरण अयशस्वी होत राहिल्यास, तुमच्या बँकेशी संपर्क साधा.

स्वयं-नूतनीकरणाच्या अपयशाचे ट्रबलशूटिंग

स्वयं-नूतनीकरण ॲक्टिव्हेट केलेले असूनही तुमच्या डोमेनचे स्वयं-नूतनीकरण न झाल्यास, तुमच्या स्वयं-नूतनीकरण सेटिंग्ज किंवा खाते स्थितीमध्ये समस्या असू शकतात.

पायऱ्या:

  1. सेटिंग्ज > डोमेन्स मध्ये डोमेनसाठी स्वयं-नूतनीकरण सध्या ॲक्टिव्ह केले असल्याची पडताळणी करा.
  2. नूतनीकरण कालावधीपूर्वी स्वयं-नूतनीकरण ॲक्टिव्हेट केल्याची पडताळणी करा.
  3. नूतनीकरण कालावधीदरम्यान तुमचे Shopify खाते ॲक्टिव्ह असल्याची आणि सस्पेंड किंवा पॉज केलेले नसल्याची पडताळणी करा.
  4. डोमेन कालबाह्य झाल्यानंतर स्वयं-नूतनीकरण निष्क्रिय करून पुन्हा सक्रिय केले असल्यास, यातून डोमेनचे पूर्वलक्षी प्रभावाने नूतनीकरण होणार नाही.
गोंधळात टाकणाऱ्या रजिस्ट्री नोटिफिकेशन इमेल्सचे ट्रबलशूटिंग करा

जर तुम्हाला डोमेन रजिस्ट्रीकडून “स्वयं-नूतनीकरण बंद आहे,” असे सांगणारे ईमेल प्राप्त झाले असतील, तर हे गोंधळात टाकणारे असू शकते परंतु ते समस्या असल्याचे दर्शवत नाही.

तुम्हाला डोमेन रजिस्ट्रीकडून “स्वयं-नूतनीकरण बंद आहे,” असे सांगणारे ईमेल प्राप्त होऊ शकतात. हे सामान्य वर्तन आहे आणि याचा अर्थ असा नाही की तुमचे Shopify स्वयं-नूतनीकरण अक्षम केले आहे. हे ईमेल थेट रजिस्ट्रीकडून पाठवले जातात आणि ते तुमचे Shopify डोमेन सेटिंग्ज दर्शवत नाहीत. तुमच्या डोमेनवर स्वयं-नूतनीकरण सुरू असावे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही स्वयंचलित नूतनीकरण सेटिंग्जचे पुनरावलोकन करून त्याची पडताळणी करू शकता.

पायरी 3: डोमेन नूतनीकरणाबद्दल सपोर्टशी संपर्क साधा

जर तुम्ही ट्रबलशूटिंगच्या पायऱ्या पूर्ण केल्या आणि तरीही तुमचे डोमेन नूतनीकरण अयशस्वी होत असेल, तर Shopify सपोर्टशी संपर्क साधा. स्वयं-नूतनीकरण सुरू व्हायला हवे होते परंतु तसे झाले नाही असे तुम्हाला वाटत असल्यास, सपोर्टशी संपर्क साधताना स्वयं-नूतनीकरण कधी सक्रिय केले गेले याबद्दलचे तपशील आणि तुमच्या पेमेंट पद्धतीची स्थिती प्रदान करा.