तुमच्या Shopify स्टोअरमध्ये सुरक्षित कनेक्शन्स सक्षम करणे
तुमच्या Shopify स्टोअरमध्ये सुरक्षित कनेक्शन्स सक्षम केल्याने तुमचे ग्राहक एंटर करत असलेला डेटा खाजगी आणि सुरक्षित राहील याची खात्री होते. हे TLS (ट्रान्सपोर्ट लेयर सिक्युरिटी) प्रमाणपत्र वापरून साध्य केले जाते, ज्याला कधीकधी SSL (Secure Sockets Layer) प्रमाणपत्र असेही म्हटले जाते, जे तुमचे स्टोअर आणि बाह्य सामग्री यांच्यातील संवादाला कूटबद्ध (एनक्रिप्ट) करते आणि HTTP ऐवजी सुरक्षितपणे HTTPS वापरून सामग्री प्रकाशित करते.
उदाहरणार्थ, जर तुमच्या स्टोअरची URL ही http://www.example.com असेल, तर TLS प्रमाणपत्र जारी केल्यावर URL बदलून https://www.example.com अशी होते. जर तुमचे ग्राहक मूळ URL वापरत असतील, तर त्यांना स्वयंचलितरित्या कूटबद्ध (एनक्रिप्ट) केलेल्या ऑनलाइन स्टोअरवर पुनर्निर्देशित केले जाते.
तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी TLS प्रमाणपत्रांचे खालील फायदे आहेत:
- ते ग्राहकांचा डेटा कूटबद्ध (एनक्रिप्ट) करून सुरक्षेचा स्तर वाढवतात.
- ते तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या URL च्या शेजारी एक पॅडलॉक आयकन प्रदर्शित करून तुमच्या ग्राहकांचा विश्वास वाढवण्यास मदत करतात.

या पेजवर
TLS प्रमाणपत्र मिळवणे
Shopify मध्ये जोडलेल्या सर्व डोमेन्ससाठी TLS प्रमाणपत्रे मोफत दिली जातात. खालील परिस्थितींमध्ये TLS प्रमाणपत्र आपोआप जारी केले जाते:
.myshopify.comडोमेनवर होस्ट केलेल्या कोणत्याही अॅसेट्ससाठी.- जेव्हा तुम्ही Shopify द्वारे कस्टम डोमेन खरेदी करता किंवा एखादे डोमेन Shopify वर ट्रान्सफर करता.
- जेव्हा तुम्ही तुमचे A रेकॉर्ड आणि CNAME रेकॉर्ड Shopify ला पॉईंट करण्यासाठी बदलून तुमचे तृतीय-पक्ष डोमेन Shopify शी कनेक्ट करता. या प्रकरणात, TLS प्रमाणपत्र जारी होण्यासाठी 48 तासांपर्यंत वेळ लागू शकतो. त्या कालावधीत, तुमच्या Shopify ॲडमिन डोमेन सेटिंग्जमध्ये 'TLS किंवा SSL प्रलंबित' प्रदर्शित होऊ शकते. 48 तासांनंतर, तुमचे TLS अयशस्वी झाल्यास, तुमच्या Shopify ॲडमिन डोमेन सेटिंग्जमध्ये 'TLS किंवा SSL अनुपलब्ध' असा मेसेज प्रदर्शित होऊ शकतो. 48 तासांनंतर तुमच्या स्टोअरफ्रंटवर
तुमचे कनेक्शन असुरक्षित आहेअसा काही एरर मेसेज असल्यास, ट्रबलशूटिंगच्या पायऱ्या वापरून पहा. या पायऱ्यांमुळे TLS समस्यांचे निराकरण न झाल्यास, Shopify सपोर्टशी संपर्क साधा.
डोमेन्स पेजवरील डोमेनची स्थिती कनेक्ट केले आहे असल्याची पडताळणी करून तुम्ही तुमचे TLS प्रमाणपत्र जारी केले गेले असल्याची खात्री करू शकता. याव्यतिरिक्त, जेव्हा तुम्ही तुमचे स्टोअरफ्रंट पाहता, तेव्हा ॲड्रेस बारमध्ये तुमच्या ऑनलाइन स्टोअरच्या URL च्या शेजारी पॅडलॉक आयकन प्रदर्शित होतो.
तुमचे अॅसेट्स सुरक्षित असल्याची पडताळणी करणे
तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये इमेजेस, व्हिडिओ, वेबफॉन्ट किंवा Shopify व्यतिरिक्त इतर कुठेही होस्ट केलेले अॅसेट्स समाविष्ट असल्यास, ते HTTPS द्वारे वितरित केले जावेत. तुमच्या Shopify ऑनलाइन स्टोअरमधील कोणतेही पेज, ज्यामध्ये HTTPS द्वारे वितरित न केलेला अॅसेट समाविष्ट असेल, ते असुरक्षित मानले जाते.
तुमचे अॅसेट्स सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे तुमच्या ऑनलाइन स्टोअरचे सर्व अॅसेट्स Shopify वर होस्ट करणे.
तुम्हाला तुमचे अॅसेट्स Shopify च्या बाहेर होस्ट करायचे असल्यास, तुम्ही खालील गोष्टी करत असल्याची खात्री करा:
- HTTPS द्वारे प्रकाशित करणाऱ्या सर्व्हरवर तुमचे अॅसेट्स होस्ट करा. तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये फाईल्स अपलोड करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
- HTTPS द्वारे प्रकाशित करणाऱ्या सेवेवर तुमची व्हिडिओ सामग्री होस्ट करा.
- तुम्ही वेबफॉन्ट्स वापरता तेव्हा, ते त्यांच्या स्रोताकडून HTTPS द्वारे प्रकाशित केले आहेत याची पडताळणी करा.
सर्टिफिकेशन अथॉरिटी ऑथरायझेशन (CAA) रेकॉर्ड्स
सर्टिफिकेशन अथॉरिटी ऑथरायझेशन (CAA) रेकॉर्डचा वापर डोमेनसाठी प्रमाणपत्रे जारी करण्याची परवानगी कोणत्या सर्टिफिकेट ऑथॉरिटीजला आहे हे निर्दिष्ट करण्यासाठी केला जातो. सर्टिफिकेट ऑथॉरिटी (CA) ही एक विश्वासार्ह संस्था असते जी इंटरनेटवर डिजिटल संस्थेची ओळख पडताळणारी इलेक्ट्रॉनिक कागदपत्रे जारी करते.
तुम्हाला तुमच्या स्टोअरसाठी CAA रेकॉर्ड्सची आवश्यकता नाही. तरीही, जर तुम्हाला CAA रेकॉर्ड्स वापरणे आवश्यक असेल, तर तुम्ही तुमचे डोमेन Shopify शी कनेक्ट करता, त्याच वेळी प्रत्येक CAA रेकॉर्डमध्ये खालील सर्टिफिकेट ऑथॉरिटीज (CA) जोडल्या जाणे आवश्यक आहे:
तुमच्या तृतीय-पक्ष डोमेनसाठी सुरक्षा त्रुटींचे ट्रबलशूटिंग
तुमचे डोमेन कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला TLS किंवा SSL त्रुटी आल्यास, जसे की “SSL प्रलंबित”, “SSL अनुपलब्ध” किंवा “तुमचे कनेक्शन असुरक्षित आहे” असा मेसेज आल्यास, DNS पडताळणी, CAA रेकॉर्ड आवश्यकता आणि DNSSEC बाबींसहित स्टेप-बाय-स्टेप निराकरण मार्गदर्शनासाठी डोमेन्ससह समस्या ट्रबलशूट करा पहा.