Shopify Bill Pay सह पेमेंट आणि डिलिव्हरी पद्धती व्यवस्थापित करणे

Shopify Bill Pay मध्ये, तुम्ही विविध पेमेंट पद्धतींमधून निवड करू शकता आणि तुमचे विक्रेते पेमेंट्स कसे मिळवतात ते ठरवू शकता. या पेजवर, तुम्हाला उपलब्ध असलेल्या प्रत्येक पेमेंट आणि डिलिव्हरी पद्धतीचे तपशील मिळू शकतात, जे तुम्हाला सेटअप नेव्हिगेट करण्यात मदत करतील जेणेकरून तुम्ही तुमची बिले व्यवस्थापित करू शकाल.

उपलब्ध पेमेंट पद्धती

Shopify Bill Pay वापरून तुमची बिले भरण्यासाठी तुम्ही खालील पर्याय वापरू शकता. शुल्क कॉलममध्ये, * फक्त पेमेंट पद्धतीचे शुल्क दर्शवते. तरीही डिलिव्हरी पद्धतीसाठी शुल्क असू शकते. शुल्काच्या तपशीलवार सूचीसाठी, पूर्ण पेमेंट शुल्क विभाग पाहा.

संबंधित शुल्क आणि मर्यादांसह Shopify Bill Pay साठी उपलब्ध असलेल्या पेमेंट पद्धतींचे ओव्हरव्ह्यू.
पद्धतशुल्कमर्यादा
Shopify Balanceविनामूल्य*Shopify Balance च्या दैनिक कार्ड खर्चाच्या अधीन
बँक ट्रान्सफर$0.50 USD*तुमच्या बँकेच्या व्यवहार मर्यादांच्या अधीन
क्रेडिट कार्ड2.9%*तुमच्या बँकेच्या व्यवहार मर्यादांच्या अधीन
डेबिट कार्ड2.9%*तुमच्या बँकेच्या व्यवहार मर्यादांच्या अधीन

स्टेटमेंट्सवर पेमेंट्स कसे प्रदर्शित होतात

Shopify Bill Pay द्वारे केलेली पेमेंट्स तुमच्या बँक किंवा कार्ड स्टेटमेंट्सवर melio या शब्दाद्वारे आणि विक्रेत्याच्या नावाद्वारे ओळखली जातात, जसे की [Vendor Name] melio CCD. नेमके फॉरमॅट तुमच्या बँकेवर अवलंबून असते, त्यामुळे विक्रेत्याचे नाव किंवा melio आयडेंटिफायर नेहमीच समाविष्ट नसू शकतो.

विक्रेता पेमेंट डिलिव्हरी पद्धती

तुम्ही निवडू शकता की तुमच्या विक्रेत्यांना पेमेंट्स कशी मिळतात, जे तुम्ही वापरत असलेल्या पेमेंट पद्धतीनुसार बदलते.

उपलब्ध विक्रेता डिलिव्हरी पद्धती आणि त्यांची वैशिष्ट्ये.
पेमेंट पद्धतडिलिव्हरी पद्धतवेग*डिलिव्हरी शुल्कमर्यादा
ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस (ACH) बँक ट्रान्सफरबँक ट्रान्सफर (ACH)
  • $100,000 USD च्या खाली: 3 व्यावसायिक दिवस
  • $100,000 USD किंवा त्याहून अधिक: 4 व्यावसायिक दिवस
$0.50 USD**फक्त देशांतर्गत US
फास्ट बँक ट्रान्सफर (ACH)तोच व्यावसायिक दिवस1%**
पेपर चेक5-7 कामकाजाचे दिवस$1.50 USD**फक्त देशांतर्गत US
वायर ट्रान्सफर
  • $100,000 USD च्या खाली: 3 व्यावसायिक दिवस
  • $100,000 USD किंवा त्याहून अधिक: 4 व्यावसायिक दिवस
$20 USD**फक्त आंतरराष्ट्रीय
Shopify Balanceबँक ट्रान्सफर (ACH)
  • $100,000 USD च्या खाली: 3 व्यावसायिक दिवस
  • $100,000 USD किंवा त्याहून अधिक: 4 व्यावसायिक दिवस
मोफत**फक्त देशांतर्गत US
फास्ट बँक ट्रान्सफर (ACH)तोच व्यावसायिक दिवस1%**
पेपर चेक5-7 कामकाजाचे दिवस$1.50 USD**फक्त देशांतर्गत US
वायर ट्रान्सफर
  • $100,000 USD च्या खाली: 3 व्यावसायिक दिवस
  • $100,000 USD किंवा त्याहून अधिक: 4 व्यावसायिक दिवस
$20 USD**फक्त आंतरराष्ट्रीय
क्रेडिट कार्डबँक ट्रान्सफर (ACH)
  • बहुतांश क्रेडिट कार्ड: ET नुसार दुपारी 2 च्या आधी शेड्युल केल्यास त्याच कामकाजाच्या दिवशी आणि ET नुसार दुपारी 2 नंतर शेड्युल केल्यास पुढील कामकाजाच्या दिवशी
  • American Express क्रेडिट कार्ड: 2 कामकाजाचे दिवस
मोफत**फक्त देशांतर्गत US
पेपर चेक5-7 कामकाजाचे दिवसमोफत**फक्त देशांतर्गत US
वायर ट्रान्सफर (फक्त Mastercard)
  • $100,000 USD च्या खाली: 3 व्यावसायिक दिवस
  • $100,000 USD किंवा त्याहून अधिक: 4 व्यावसायिक दिवस
$20 USD**
  • फक्त आंतरराष्ट्रीय
  • फक्त Mastercard. इतर कार्ड नेटवर्कसाठी आंतरराष्ट्रीय बिल पेमेंट उपलब्ध नाहीत.
डेबिट कार्डबँक ट्रान्सफर (ACH)ET नुसार दुपारी 2 च्या आधी शेड्युल केल्यास त्याच कामकाजाच्या दिवशी आणि ET नुसार दुपारी 2 नंतर शेड्युल केल्यास पुढील कामकाजाच्या दिवशीमोफत**फक्त देशांतर्गत US
पेपर चेक5-7 कामकाजाचे दिवसमोफत**फक्त देशांतर्गत US

* डिलिव्हरीचा वेग पेमेंट प्रोसेस केल्यापासून सुरू होतो, पेमेंट ज्या दिवशी कापले जाते त्या दिवशीच सुरू होईल असे नाही. ACH बँक ट्रान्सफर आणि पेपर चेक यांसारख्या प्रमाणित डिलिव्हरी पद्धतींसाठी पेमेंटची प्रक्रिया दररोज ET नुसार रात्री 9:00 च्या आधी फक्त एकदाच केली जाते. सेम-डे ACH सारख्या काही डिलिव्हरी पद्धतींसाठी कटऑफची वेळ लवकर असते. निवडलेल्या डिलिव्हरी पद्धतीसाठी कटऑफ वेळेनंतर सबमिट केलेली कोणतीही पेमेंट्स पुढील कामकाजाच्या दिवशी प्रोसेस होऊ लागतात. उदाहरणार्थ, सोमवारच्या दिवशी ET नुसार रात्री 10:30 वाजता केलेले पेमेंट ज्यासाठी एक कामकाजाचा दिवस लागतो, ते मंगळवार सकाळपर्यंत प्रोसेस केले जात नाही आणि मंगळवारपासून पुढील एका कामकाजाच्या दिवसापर्यंत विक्रेत्याच्या खात्यावर पोहोचणार नाही, म्हणजे ते बुधवारपर्यंत पोहोचेल.

** हे फक्त डिलिव्हरी पद्धतीचे शुल्क दर्शवते, तरीही पेमेंट पद्धतीसाठी शुल्क असू शकते. शुल्कांच्या संपूर्ण सूचीसाठी, संपूर्ण पेमेंट शुल्क विभागाचा संदर्भ घ्या.

विक्रेत्याच्या डिलिव्हरी पद्धती जोडण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

संपूर्ण पेमेंट शुल्कांचे विहंगावलोकन

तुम्ही परदेशी चलनात पेमेंट करता, तेव्हा दाखवलेल्या एक्सचेंज दरामध्ये Wise चा मिड-मार्केट दर आणि Bill Pay शुल्क या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. मिड-मार्केट दर हा बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे वापरला जाणारा प्रमाणित विनिमय दर आहे. तुमची परकीय चलनामधील पेमेंट्स सुलभ करण्यासाठी, Bill Pay शुल्काला स्वतंत्र शुल्काच्या रूपात दाखवण्याऐवजी प्रदर्शित केलेल्या एक्सचेंज दरामध्ये समाविष्ट केले जाते.

Bill Pay मधील कन्व्हर्जन दर 30 मिनिटांसाठी निश्चित केलेला असतो. तुम्ही या वेळेत पेमेंट पूर्ण न केल्यास आणि पुन्हा बिल भरण्याचा प्रयत्न केल्यास, तुम्हाला वेगळा दर मिळू शकेल.

प्लॅटफॉर्मचा खर्च म्हणून Shopify आणि आमचे आंतरराष्ट्रीय पेमेंट्सचे पार्टनर परकीय चलनाच्या व्यवहारांवर मार्जिन समाविष्ट करू शकतात. हे मार्जिन घाऊक (मिड-मार्केट) एक्सचेंज दर आणि तुमच्या पेमेंटच्या कन्व्हर्जनसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष दरामधील फरक दर्शवते. बाजारपेठेतील घडामोडींमुळे एक्सचेंज दरांमध्ये वारंवार बदल होऊ शकतो.

Melio द्वारे प्रदान केलेल्या कन्व्हर्जन दरामध्ये कन्व्हर्जन आणि सेवा शुल्क या दोन्हींचा समावेश आहे. प्रत्येक पेमेंटच्या विशिष्ट पॅरामीटर्सनुसार ही शुल्के बदलू शकतात. तुम्ही प्रदर्शित दराची मिड-मार्केट दराशी (चलन खरेदी आणि विक्रीच्या किमतीमधील मध्यबिंदू) तुलना करून एकूण शुल्क निर्धारित करू शकता. परिचालन खर्च आणि संबंधित सेवा कव्हर करण्यासाठी पेमेंट प्रदाते साधारणपणे मिड-मार्केट दरापेक्षा जास्त दर देतात.

पेमेंट पद्धत आणि डिलिव्हरी पद्धतीवर आधारित लागू असलेली सर्व शुल्के समजून घेण्यासाठी खालील टेबलचे पुनरावलोकन करा.

पेमेंट आणि डिलिव्हरीच्या प्रत्येक पद्धतीसाठी संभाव्य पेमेंट शुल्कांची संपूर्ण सूची
पेमेंट पद्धतपेमेंट शुल्कडिलिव्हरी पद्धतडिलिव्हरी शुल्कएकूण शुल्के
बँक ट्रान्सफर (ACH)मोफतबँक ट्रान्सफर (ACH): 3-4 कामकाजाचे दिवस$0.50 USD
  • मर्चंट्ससाठी: $0.50 USD
फास्ट बँक ट्रान्सफर (ACH): कामकाजाचा तोच दिवस1%1%
डेबिट कार्डद्वारे इन्स्टंट पेमेंट (विक्रेत्याने निवडलेले)विक्रेत्याद्वारे 1% भरले
  • मर्चंट्ससाठी: मोफत
  • विक्रेत्यांसाठी: 1%
पेपर चेक: 5-7 कामकाजाचे दिवस$1.50 USD$1.50 USD
आंतरराष्ट्रीय वायर: 3 कामकाजाचे दिवस$20 USD$20 USD
Shopify Balanceमोफतबँक ट्रान्सफर (ACH): 3-4 कामकाजाचे दिवसमोफतमोफत
फास्ट बँक ट्रान्सफर (ACH): कामकाजाचा तोच दिवस1%1%
डेबिट कार्डद्वारे इन्स्टंट पेमेंट (विक्रेत्याने निवडलेले)विक्रेत्याद्वारे 1% भरले
  • मर्चंट्ससाठी: मोफत
  • विक्रेत्यांसाठी: 1%
पेपर चेक: 5-7 कामकाजाचे दिवस$1.50 USD$1.50 USD
आंतरराष्ट्रीय वायर: 3 कामकाजाचे दिवस$20 USD$20 USD
क्रेडिट कार्ड2.9%बँक ट्रान्सफर (ACH): कामकाजाचा पुढील दिवसमोफत2.9%
डेबिट कार्डद्वारे इन्स्टंट पेमेंट (विक्रेत्याने निवडलेले)विक्रेत्याद्वारे 1% भरले
  • मर्चंट्ससाठी: 2.9%
  • विक्रेत्यांसाठी: 1%
पेपर चेक: 5-7 कामकाजाचे दिवसमोफत2.9%
आंतरराष्ट्रीय वायर (फक्त Mastercard): 3 कामकाजाचे दिवस$20 USD2.9% + $20 USD
डेबिट कार्ड2.9%बँक ट्रान्सफर (ACH): कामकाजाचा पुढील दिवसमोफत2.9%
डेबिट कार्डद्वारे इन्स्टंट पेमेंट (विक्रेत्याने निवडलेले)विक्रेत्याद्वारे 1% भरले
  • मर्चंट्ससाठी: 2.9%
  • विक्रेत्यांसाठी: 1%
पेपर चेक: 5-7 कामकाजाचे दिवसमोफत2.9%

आंतरराष्ट्रीय एक्सचेंजचे दर

तुम्ही परदेशी चलनात बिल भरता, तेव्हा प्रदर्शित केलेल्या एक्सचेंज दरामध्ये Wise चा मिड-मार्केट दर आणि Bill Pay शुल्क या दोन्ही गोष्टींचा समावेश असतो. मिड-मार्केट दर हा बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे वापरला जाणारा प्रमाणित एक्सचेंज दर आहे. तुमची परकीय चलनामधील पेमेंट्स सुलभ करण्यासाठी, Bill Pay शुल्काला स्वतंत्र शुल्काच्या रूपात दाखवण्याऐवजी प्रदर्शित केलेल्या एक्सचेंज दरामध्ये समाविष्ट केले जाते.

तुम्ही बिल भरता तेव्हा, प्रदर्शित झालेला कन्व्हर्जन दर 30 मिनिटांसाठी निश्चित केलेला असतो. तुम्ही या वेळेत पेमेंट पूर्ण न केल्यास आणि पुन्हा बिल भरण्याचा प्रयत्न केल्यास, वेगळा दर लागू होऊ शकतो.

तुम्ही भरत असलेल्या प्लॅटफॉर्मचा खर्च म्हणून Shopify आणि आंतरराष्ट्रीय पेमेंट्सचे पार्टनर परकीय चलनाच्या व्यवहारांवर मार्जिन समाविष्ट करू शकतात. हे मार्जिन घाऊक (मिड-मार्केट) एक्सचेंज दर आणि तुमच्या पेमेंटच्या कन्व्हर्जनसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष दरामधील फरक दर्शवते. बाजारपेठेतील घडामोडींमुळे एक्सचेंज दरांमध्ये वारंवार बदल होऊ शकतो.

Melio द्वारे प्रदान केलेल्या कन्व्हर्जन दरामध्ये कन्व्हर्जन आणि सेवा शुल्क या दोन्हींचा समावेश आहे. प्रत्येक पेमेंटच्या विशिष्ट पॅरामीटर्सनुसार ही शुल्के बदलू शकतात. तुम्ही प्रदर्शित दराची मिड-मार्केट दराशी (चलन खरेदी आणि विक्रीच्या किमतीमधील मध्यबिंदू) तुलना करून तुम्हाला आकारले जाणारे शुल्क निर्धारित करू शकता. परिचालन खर्च आणि संबंधित सेवा कव्हर करण्यासाठी पेमेंट प्रदाते साधारणपणे मिड-मार्केट दरापेक्षा जास्त दर देतात.

विक्रेत्यांना तुमची पेमेंट माहिती कशी प्रदर्शित केली जाते

तुम्ही Shopify Bill Pay वापरणे सुरू करता तेव्हा, तुमच्या विक्रेत्यांना कळवा की तुम्ही तुमची पेमेंट प्रक्रिया बदलत आहात. पुढील गोष्टींबद्दल तुम्ही तुमच्या विक्रेत्यांना पूर्वकल्पना देऊ शकावी म्हणून डिलिव्हरी पद्धतींच्या खालील तपशीलांचे पुनरावलोकन करा.

बँक ट्रान्सफर्स

तुमच्या विक्रेत्याच्या बँक स्टेटमेंट्सवर, Shopify Bill Pay पेमेंट्स तुमच्या व्यवसायाचे नाव आणि "melio" ने सूचीबद्ध केली जातात, जसे की "[तुमच्या व्यवसायाचे नाव] melio CCD". तुमच्या व्यवसायाचे नाव नेहमी सूचीबद्ध केलेले नसते, परंतु "melio" नेहमी सूचीबद्ध केलेले असते.

पेपर चेक्स

पेपर चेक्स तुमच्या विक्रेत्याच्या पत्त्यावर पाठवले जातात आणि त्यामध्ये तुमच्या व्यवसायाचे नाव आणि पत्ता असतो. बँक खाते क्रमांक Shopify Bill Pay चे पार्टनर असलेल्या Melio चे असतात, त्यामुळे तुमची स्वतःची बँकिंग माहिती कधीही विक्रेत्यासोबत शेअर केली जात नाही.

पेमेंट अपयशी होण्याची कारणे समजून घेणे

पेमेंट्स अनेक कारणांमुळे, एकतर पेमेंट पद्धत किंवा डिलिव्हरी पद्धतीमुळे अपयशी ठरू शकतात. जेव्हा पेमेंट अपयशी ठरते तेव्हा, समस्येचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी कारण ओळखणे महत्त्वपूर्ण असते.

तुुमचे पेमेंट यशस्वी न झाल्यास, खालील कारणे आणि उपायांचे पुनरावलोकन करा.

पेमेंट यशस्वी का होऊ शकत नाही याच्या कारणांची आणि उपायांची सूची
पेमेंट पद्धतरिटर्न कोडसमस्याउपाय
बँक खाते (ACH)
  • अपुरा निधी — ACH रिटर्न कोड: R01
  • पुरेसा निधी नाही — ACH रिटर्न कोड: R09
बँक खात्यामध्ये अपुरा निधी
  1. पेमेंट रद्द करा.
  2. पुरेसा निधी असलेली पेमेंट पद्धत वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.

तुमच्या Bill Pay पेमेंट पद्धतीमध्ये पुरेसा निधी आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, त्याच्या मागील बँकेशी संपर्क साधा.

तुमचे खाते गोठवले आहे — ACH रिटर्न कोड: R16बँक खाते गोठवले आहेसमस्या सोडवण्यासाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा. तुमच्या बँकेकडील समस्या सोडवण्यापूर्वी तुम्हाला पेमेंट करायचे असल्यास, पेमेंट रद्द करा आणि त्यानंतर वेगळी पेमेंट पद्धत वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.
विनंतीनुसार पेमेंट थांबवले आहे — ACH रिटर्न कोड: R08तुम्ही बँकेला हे पेमेंट थांबवण्याची विनंती केली
  1. पेमेंट रद्द करा.
  2. पेमेंट रीशेड्यूल करा.
अनधिकृत व्यवहार — ACH रिटर्न कोड: R10बँक खात्यासह अनधिकृत ॲक्टिव्हिटीसमस्या सोडवण्यासाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा. तुमच्या बँकेकडील समस्या सोडवण्यापूर्वी तुम्हाला पेमेंट करायचे असल्यास, पेमेंट रद्द करा आणि त्यानंतर वेगळी पेमेंट पद्धत वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.
पेमेंट ब्लॉक केले आहे — ACH रिटर्न कोड: R29Shopify Bill Pay तुमच्या खात्यातून निधी कापू शकत नाहीसमस्या सोडवण्यासाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा. तुमच्या बँकेकडील समस्या सोडवण्यापूर्वी तुम्हाला पेमेंट करायचे असल्यास, पेमेंट रद्द करा आणि त्यानंतर वेगळी पेमेंट पद्धत वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.
या पेमेंटवर प्रक्रिया केली गेली नाहीअनुपालनाच्या समस्येमुळे पेमेंट नाकारले आहे आणि तुमच्या खात्यातून ते वजा केले जाऊ शकत नाहीअधिक तपशीलांसाठी तुमचा ईमेल तपासा किंवा compliance@shopify-billpay.melio.com शी संपर्क साधा.
विक्रेत्याला पेमेंट पद्धत निवडण्यास सांगितले होतेविक्रेत्याने ईमेल विनंतीला प्रतिसाद दिला नाहीविक्रेत्याने तुमचे पेमेंट स्वीकारले नाही किंवा वितरणाचे तपशील दिले नाहीत
  1. पेमेंट रद्द करा.
  2. वितरणाच्या तपशीलांसाठी विक्रेत्याशी संपर्क साधा.
  3. पेमेंट रीशेड्यूल करा.
क्रेडिट कार्डपेमेंटवर प्रक्रिया केली जाऊ शकत नाही — रिटर्न कोड: 12हे बिल भरण्यासाठी वापरलेल्या कार्डमध्ये काहीतरी समस्या आहे
  1. पेमेंट रद्द करा.
  2. तुमच्या कार्डचे तपशील अपडेट करा आणि पेमेंट रीशेड्यूल करा किंवा वेगळी पेमेंट पद्धत वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.
तुमचे कार्ड ब्लॉक केले आहे — रिटर्न कोड: 05कार्ड मर्यादेमुळे किंवा फसवणुकीच्या शक्यतेमुळे कार्ड ब्लॉक केले गेले असू शकतेसमस्या सोडवण्यासाठी तुमच्या बँकेशी संपर्क साधा. तुमच्या बँकेकडील समस्या सोडवण्यापूर्वी तुम्हाला पेमेंट करायचे असल्यास, पेमेंट रद्द करा आणि त्यानंतर वेगळी पेमेंट पद्धत वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.

अपुरा निधी — रिटर्न कोड: 51

पेमेंटवर प्रक्रिया केली जाऊ शकत नाही — रिटर्न कोड: 12

अपुरा निधी — रिटर्न कोड: 183

कार्डला मर्यादा असल्यामुळे या पेमेंटवर प्रक्रिया करता येत नाही
  1. पेमेंट रद्द करा.
  2. पुरेसा निधी असलेली पेमेंट पद्धत वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.

तुमच्या Bill Pay पेमेंट पद्धतीच्या मर्यादेचा पेमेंटवर परिणाम होऊ नये असे तुम्हाला वाटत असल्यास, त्याच्या मागील बँकेशी संपर्क साधा.

या पेमेंटवर प्रक्रिया केली गेली नाहीअनुपालनाच्या समस्येमुळे पेमेंट नाकारले आहे आणि तुमच्या खात्यातून ते वजा केले जाऊ शकत नाहीअधिक तपशीलांसाठी तुमचा ईमेल तपासा किंवा compliance@shopify-billpay.melio.com शी संपर्क साधा.

अयशस्वी वितरणाची कारणे समजून घेणे

वितरण का अयशस्वी होऊ शकते याची कारणे आणि रिझोल्यूशनची सूची
रिटर्न कोडसमस्यानिकालपुढील पायऱ्या
विक्रेत्याचे खाते बंद आहे — ACH रिटर्न कोड: R02विक्रेत्याचे खाते बंद आहे किंवा पेमेंट्स प्राप्त करू शकत नाहीतुमचे पेमेंट रिफंड केले आहे
  1. बिल पुन्हा जोडा.
  2. तुमच्या विक्रेत्याकडील अपडेट केलेले वितरणाचे तपशील वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.
विक्रेत्याचे खाते शोधता आले नाही — ACH रिटर्न कोड: R03विक्रेत्याचा बँक खाते नंबर चुकीचा होता किंवा बँक ट्रान्सफरसाठी अमान्य होतातुमचे पेमेंट रिफंड केले आहे
  1. बिल पुन्हा जोडा.
  2. तुमच्या विक्रेत्याकडील अपडेट केलेले वितरणाचे तपशील वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.
विक्रेत्याचा खाते नंबर अमान्य आहे — ACH रिटर्न कोड: R04विक्रेत्याचा बँक खाते नंबर चुकीचा होतातुमचे पेमेंट रिफंड केले आहे
  1. बिल पुन्हा जोडा.
  2. तुमच्या विक्रेत्याकडील अपडेट केलेले वितरणाचे तपशील वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.
पेमेंट वितरित करता आले नाही — ACH रिटर्न कोड: R05तुमच्या विक्रेत्याच्या बँक खात्याच्या तपशीलांमध्ये काहीतरी समस्या आहेतुमचे पेमेंट रिफंड केले आहे
  1. बिल पुन्हा जोडा.
  2. तुमच्या विक्रेत्याकडील अपडेट केलेले वितरणाचे तपशील वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.
अमान्य ACH राउटिंग नंबर — ACH रिटर्न कोड: R13विक्रेत्याचा राउटिंग नंबर चुकीचा होतातुमचे पेमेंट रिफंड केले आहे
  1. बिल पुन्हा जोडा.
  2. तुमच्या विक्रेत्याकडील अपडेट केलेले वितरणाचे तपशील वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.
विक्रेत्याचे खाते पेमेंट्स प्राप्त करू शकत नाही — ACH रिटर्न कोड: R20विक्रेत्याचे खाते पेमेंट्स प्राप्त करू शकत नाहीतुमचे पेमेंट रिफंड केले आहे
  1. बिल पुन्हा जोडा.
  2. तुमच्या विक्रेत्याकडील अपडेट केलेले वितरणाचे तपशील वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.
विक्रेत्याने पेमेंट नाकारले — ACH रिटर्न कोड: R23विक्रेत्याने किंवा त्यांच्या बँकेने पेमेंट नाकारलेतुमचे पेमेंट रिफंड केले आहे
  1. समस्या सोडवण्यासाठी विक्रेत्याशी संपर्क साधा
  2. बिल पुन्हा जोडा.
  3. तुमच्या विक्रेत्याकडील अपडेट केलेले वितरणाचे तपशील वापरून पेमेंट रीशेड्यूल करा.