Shopify Bill Pay सेट अप करणे

तुम्ही Shopify Bill Pay इंस्टॉल केल्यानंतर, तुम्ही तुमच्या व्यवसायाची माहिती भरू शकता, तुमच्या पेमेंट पद्धती आणि पेमेंट प्राधान्ये सेट अप करू शकता आणि QuickBooks खाते कनेक्ट करू शकता.

तुमच्या व्यवसायाची माहिती भरणे

तुम्ही पहिल्यांदा Shopify Bill Pay मध्ये लॉग इन करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या व्यवसायाची माहिती भरावी किंवा अपडेट करावी लागू शकते.

तुम्हाला नंतर तुमच्या व्यवसायाची माहिती समायोजित करण्याची आवश्यकता असल्यास, तुम्ही खालील पायऱ्या पूर्ण करू शकता:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > सामान्य वर जा.

  2. कायदेशीर आणि बिलिंग उद्देशांसाठी माहिती अचूक असल्याची खात्री करून, तुमची माहिती अपडेट करा आणि कन्फर्म करा.

बदल तुमच्या Shopify Bill Pay खात्यावर आपोआप प्रतिबिंबित होतात

तुमचे बँक खाते जोडा आणि त्याची पडताळणी करा

Shopify Bill Pay द्वारे पेमेंट्स करण्यासाठी, तुम्हाला Plaid सोबत तुमचे बँक खाते लिंक आणि सत्यापित करणे आवश्यक आहे.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, वित्त > Bill Pay वर जा.

  2. Bill Pay व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

  3. तुमच्या पेमेंट पद्धती विभागामध्ये, पेमेंट पद्धत जोडा वर क्लिक करा.

  4. बँक खाते वर क्लिक करा आणि त्यानंतर त्वरित कनेक्ट करा वर क्लिक करा आणि तुमचे बँक खाते कनेक्ट करण्यासाठी Plaid कनेक्शन प्रॉम्प्ट्स फॉलो करा.

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड जोडा

तुमच्या व्यवसायाशी संबंधित बिले भरण्यासाठी तुम्ही तुमच्या Shopify Bill Pay खात्यामध्ये क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड जोडू शकता. Shopify Bill Pay व्यावसायिक, बिझनेस किंवा कॉर्पोरेट क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड्सना सपोर्ट करते. फक्त Mastercard, Visa, AMEX, Diners Club आणि Discover कार्ड्स स्वीकारले जातात.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, वित्त > Bill Pay वर जा.

  2. Bill Pay व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

  3. तुमच्या पेमेंट पद्धती मध्ये, पेमेंट पद्धत जोडा वर क्लिक करा.

  4. क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वर क्लिक करा.

  5. कार्डचे तपशील एंटर करा आणि त्यानंतर तपशील जोडा वर क्लिक करा.

कार्ड जोडताना तुम्हाला समस्या येत असल्यास, तुम्ही ट्रबलशूटिंगच्या पायऱ्या पाहू शकता.

पेमेंट पद्धत हटवा

तुम्ही एखादी पेमेंट पद्धत यापुढे वापरत नसल्यास, तुम्ही ती हटवू शकता. पेमेंट पद्धतीमधून पेमेंट्स शेड्यूल केलेली असल्यास, तुम्ही ती पद्धत हटवू शकत नाही. प्रथम, पेमेंट पद्धत वापरून शेड्यूल केलेली कोणतीही पेमेंट्स रद्द करा आणि त्यानंतर पेमेंट पद्धत हटवा.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, वित्त > Bill Pay वर जा.

  2. Bill Pay व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

  3. तुमच्या पेमेंट पद्धती विभागामध्ये, ... वर क्लिक करा.

  4. हटवा वर क्लिक करा आणि त्यानंतर हटवा वर क्लिक करा.

QuickBooks Online सोबत इंटिग्रेट करा

तुम्ही तुमचे QuickBooks Online खाते सिंक करू शकता, जेणेकरून बिले तुमच्या Shopify Bill Pay खात्यामध्ये आपोआप जोडली जातील. QuickBooks सोबत सिंक केल्याने कोणत्याही न भरलेल्या बिलांसाठी तुमची विक्रेता सूचीदेखील सिंक होते. न भरलेले बिल असलेल्या आणि Shopify Bill Pay सोबत सिंक केलेल्या प्रत्येक विक्रेत्यासाठी, तुमच्या Shopify Bill Pay खात्यामध्ये विक्रेता प्रोफाइल तयार केले जाते.

तुम्ही तुमच्या Shopify Bill Pay खात्यामध्ये विक्रेत्याच्या माहितीमध्ये बदल केल्यास, हे बदल तुमच्या Quickbooks Online खात्यासोबत सिंक केले जातात.

तुम्ही तुमचे Quickbooks Online खाते कनेक्ट करता, तेव्हा मागील 60 दिवसांची बिले सिंक केली जातात.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, वित्त > Bill Pay वर जा.

  2. बिले इंपोर्ट करा > QuickBooks Online सोबत सिंक करा वर क्लिक करा.

  3. डायलॉग बॉक्समध्ये, तुमच्या QuickBooks Online खात्यामध्ये लॉग इन करा आणि कनेक्शन पूर्ण करा.

तुमचे QuickBooks Online खाते कनेक्ट झाल्यानंतर, दर दोन तासांनी बिले सिंक केली जातात. तुमची खाती सिंक करण्यासाठी तुम्ही Bill Pay व्यवस्थापित करा पेजवरील खाते इंटिग्रेशन्स विभागातील आत्ता सिंक करा वरदेखील क्लिक करू शकता.

Stocky ला Shopify Bill Pay सोबत कनेक्ट करा

जर तुम्ही तुमच्या स्टोअरसाठी इन्व्हेंटरी व्यवस्थापित करण्यासाठी Stocky अ‍ॅप वापरत असाल, तर तुम्ही Stocky ला Shopify Bill Pay शी कनेक्ट करू शकता, जेणेकरून तुमच्या Stocky मधील ओपन खरेदी ऑर्डर्स तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये बिलांमध्ये रूपांतरित करता येतील. यामुळे तुम्हाला तुमची देयके (payables) प्रक्रियेमध्ये खरेदी ऑर्डर्स, इन्व्हॉइस आणि बिले व्यवस्थापित करताना करावे लागणारे मॅन्युअल काम कमी होते. जेव्हा तुम्ही तुमचे QuickBooks Online खाते Bill Pay शी कनेक्ट करता, तेव्हा तुमच्या Stocky खरेदी ऑर्डर्समधून तयार केलेली बिले QuickBooks मध्ये स्वयंचलितपणे सिंक होतात.

पायऱ्या:

  1. Stocky अ‍ॅपमधून, प्राधान्ये > API ॲक्सेस वर जा.
  2. जर तुम्ही यापूर्वी API की जनरेट केली नसेल, तर नवीन API की जनरेट करा वर क्लिक करा.
  3. वर्तमान की कॉपी करा. ही तुमची Stocky API ॲक्सेस की आहे.
  4. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, वित्त > Bill Pay वर जा.
  5. बिले इंपोर्ट करा > Stocky मधून बिले तयार करा वर क्लिक करा.
  6. तुमची Stocky API ॲक्सेस की API ॲक्सेस की फील्डमध्ये पेस्ट करा आणि नंतर सुरू ठेवा वर क्लिक करा. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा Shopify Bill Pay ला Stocky शी कनेक्ट करता, तेव्हाच तुम्हाला तुमची Stocky API ॲक्सेस की पेस्ट करण्याची आवश्यकता असते.
  7. तुम्हाला ज्या खरेदी ऑर्डर्सचे बिलांमध्ये रूपांतर करायचे आहे त्या निवडा आणि नंतर बिले तयार करा वर क्लिक करा.

Stocky द्वारे बिले जोडण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमचा Gmail इनबॉक्स Shopify Bill Pay शी कनेक्ट करा

जर तुम्ही तुमचे बिझनेस ईमेल्स व्यवस्थापित करण्यासाठी Google ईमेल अ‍ॅड्रेस वापरत असाल, तर तुमच्या Gmail इनबॉक्समधून तुमची थकीत इन्व्हॉइस आपोआप Shopify Bill Pay मध्ये इंपोर्ट करण्यासाठी तुम्ही तो Shopify Bill Pay शी कनेक्ट करू शकता. यामुळे विक्रेते आणि पुरवठादारांकडून मिळालेली इन्व्हॉइस व्यवस्थापित करताना वेळ आणि मॅन्युअल काम वाचते, कारण जेव्हा तुम्हाला तुमचे पेमेंट्स शेड्यूल करायचे असतात, तेव्हा पुरवठादारांनी पाठवलेली इन्व्हॉइस माहिती तुम्हाला यापुढे Shopify Bill Pay वर मॅन्युअली टाईप करावी लागत नाही किंवा डाउनलोड करावी लागत नाही.

जेव्हा तुम्ही तुमचे Gmail खाते कनेक्ट करता, तेव्हा Shopify Bill Pay फाईल अटॅचमेंट्ससह विक्रेत्यांनी पाठवलेल्या इन्व्हॉइससाठी तुमचा Gmail इनबॉक्स नियमितपणे स्कॅन करते. Shopify Bill Pay तुमच्या इनबॉक्समधील इतर आयटम्स इंपोर्ट करत नाही किंवा त्यामध्ये ॲक्सेस करत नाही.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, वित्त > Bill Pay वर जा.

  2. बिले इंपोर्ट करा > Gmail मधून इंपोर्ट करा वर क्लिक करा.

  3. तुम्हाला Bill Pay शी कनेक्ट करायचे असलेले Google खाते निवडा आणि साइन इन करा.

  4. परवानगी द्या वर क्लिक करा.

तुमच्या कनेक्ट केलेल्या इनबॉक्समध्ये किती इन्व्हॉइस आहेत यावर अवलंबून, लोड होण्यासाठी 20-30 सेकंद लागू शकतात. तुमच्या Gmail खात्यावरून जोडलेली बिले तुमच्या Bill Pay इनबॉक्समध्ये मूळ म्हणून Gmail सह सूचीबद्ध केली जातात.

ईमेल नोटिफिकेशन्स व्यवस्थापित करणे

Shopify Bill Pay मधील सर्व ईमेल नोटिफिकेशन्स तुमच्या Shopify खाते सेटिंग्जमध्ये आढळणाऱ्या खाते मालकाच्या ईमेल अ‍ॅड्रेसवर जातात.

पुढील इव्हेंट्ससाठी सूचित केले जावे हे तुम्ही निवडू शकता:

  • पेमेंट शेड्यूल केले - जेव्हा एखादे पेमेंट शेड्यूल केले जाते, तेव्हा तुम्हाला ईमेल प्राप्त होतो.
  • शेड्यूल केलेल्या पेमेंटची स्थिती अपडेट केली - जेव्हा शेड्यूल केलेल्या पेमेंटची स्थिती बदलते, तेव्हा तुम्हाला ईमेल प्राप्त होतो.
  • बिल थकीत आहे - तुम्हाला बिल थकीत होण्याच्या पाच कॅलेंडर दिवस आणि एक कॅलेंडर दिवस आधी ईमेल प्राप्त होतो.
  • पेमेंट फीची पावती - तुम्हाला पेमेंटवर प्रक्रिया करण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या कोणत्याही शुल्काची पावती असलेला ईमेल प्राप्त होतो.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, वित्त > Bill Pay वर जा.

  2. Bill Pay व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

  3. ईमेल नोटिफिकेशन्स विभागामध्ये, तुम्हाला प्राप्त करायचे असलेले ईमेल नोटिफिकेशन्स निवडा.

विक्रेते जोडणे

जर तुम्ही अशा विक्रेत्याचे बिल भरले ज्याची तुमच्या Shopify Bill Pay खात्यामध्ये अद्याप विक्रेता प्रोफाईल नाही, तर त्या विक्रेत्यासाठी एक नवीन विक्रेता प्रोफाईल तयार केली जाते. तथापि, बिल भरण्यापूर्वी तुम्ही विक्रेता प्रोफाईल्स तयार करू शकता.