Dymo LabelWriter 4XL प्रिंटर

तुम्ही शिपिंग लेबल्स प्रिंट करण्यासाठी Dymo LabelWriter 4XL प्रिंटर वापरू शकता. Dymo LabelWriter 4XL प्रिंटर USB द्वारे तुमच्या Windows किंवा Mac कॉम्प्युटरला कनेक्ट होतो.

तुम्हाला तुमचा Dymo प्रिंटर इंस्टॉल करण्यासाठी, सेट करण्यासाठी किंवा त्याचे ट्रबलशूटिंग करण्यासाठी मदत हवी असल्यास, Dymo च्या सपोर्टशी संपर्क साधा.

तुमचे बारकोड लेबल्स सानुकूलित आणि प्रिंट करण्यासाठी, तुम्ही Dymo Label सॉफ्टवेअर वापरू शकता.

Dymo LabelWriter 4XL लेबल प्रिंटर वापरण्यासाठी आवश्यक गोष्टी

Dymo LabelWriter 4XL प्रिंटर वापरण्यासाठी तुम्ही खालील सिस्टम आवश्यकता पूर्ण करत असल्याची खात्री करा:

  • Windows XP 32-बिट
  • Windows Vista
  • Windows 7
  • Mac OS v10.4 किंवा त्यापुढील

Dymo LabelWriter 4XL लेबल प्रिंटरसाठी ड्रायव्हर्स डाउनलोड करा

तुम्ही Dymo प्रिंटर वापरण्यापूर्वी, तुम्हाला नवीनतम ड्रायव्हर्स डाउनलोड आणि इंस्टॉल करावे लागतील.

पायऱ्या:

Mac
  1. तुमच्या वेब ब्राउझरमध्ये, Dymo च्या वेबसाइटवर जा.
  2. Support > Downloads: Software, Drivers & User Guides वर क्लिक करा.
  3. नवीनतम Mac आवृत्तीच्या अंतर्गत, Download वर क्लिक करा.
  4. डाउनलोड पूर्ण झाल्यानंतर, Dymo चे लेबल सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यासाठी .dmg फाईल उघडा.
  5. इंस्टॉलरमधील सूचनांचे अनुसरण करा.
  6. समाविष्ट केलेली USB केबल वापरून तुमचा प्रिंटर तुमच्या कॉंप्युटरला प्लग करा आणि नंतर त्याचे पॉवर अ‍ॅडॉप्टर कनेक्ट करा. तुम्ही प्रिंटर सुरू केल्यानंतर, तुमचा कॉंप्युटर तो आपोआप ओळखतो.
Windows
  1. समाविष्ट केलेली USB केबल वापरून तुमचा प्रिंटर तुमच्या कॉंप्युटरला प्लग करा आणि नंतर त्याचे पॉवर अ‍ॅडॉप्टर कनेक्ट करा. तुम्ही प्रिंटर सुरू केल्यानंतर, तुमचा कॉंप्युटर तो आपोआप ओळखतो आणि आवश्यक उपकरण ड्रायव्हर्स डाउनलोड करतो.
  2. पर्यायी: तुमचा प्रिंटर इंस्टॉल केलेला आहे याची खात्री करा:
    1. तुमच्या कॉंप्युटरचे कंट्रोल पॅनेल उघडा.
    2. हार्डवेअर आणि साउंड वर क्लिक करा.
    3. उपकरणे वर क्लिक करा.
    4. प्रिंटर्स आणि स्कॅनर्स विभागामध्ये, प्रिंटरच्या सूचीत Dymo LabelWriter 4XL दिसत असल्याची खात्री करा.

Dymo LabelWriter 4XL लेबल प्रिंटरमध्ये लेबल्स लोड करा

Dymo LabelWriter 4XL लेबल प्रिंटरमध्ये लेबल्स लोड करण्यासाठी या पायऱ्या फॉलो करा.

पायऱ्या:

  1. प्रिंटर सुरू करा आणि नंतर शिपमेंट दरम्यान प्रिंटरचे संरक्षण करणाऱ्या लेबल्सना बाहेर काढण्यासाठी लेबल रिव्हर्स फीड बटण दाबा.
  2. वरचे कव्हर उघडा आणि लेबल कप्प्यातील कोणतेही पॅकिंग मटेरियल काढून टाका.
  3. कव्हरच्या आतमधून लेबल स्पूल काढा आणि नंतर स्पिंडलवरून स्पूल गाईड वेगळे करा.
  4. स्पूल स्पिंडल धरा आणि नंतर लेबल रोल स्पिंडलवर ठेवा जेणेकरून लेबल्स खालून फीड होतील आणि लेबल रोलची डावी किनार स्पूलच्या बाजूला घट्ट बसेल.
  5. स्पूल गाईड स्पूलच्या उजव्या बाजूला सरकवा आणि नंतर गाईड लेबल रोलच्या बाजूला घट्ट दाबा. लेबल रोल कोणतीही फट न राहता लेबल स्पूलच्या दोन्ही बाजूंना घट्ट बसला पाहिजे.
  6. रोलच्या खालून लेबल्स बाहेर येतील अशा प्रकारे प्रिंटर कव्हरमधील स्लॉटमध्ये लेबल स्पूल घाला.
  7. लेबलची डावी किनार लेबल एक्झिट स्लॉटच्या डाव्या किनारीसह अलाइन करा आणि नंतर लेबल स्लॉटमध्ये घाला. प्रिंटर आपोआप लेबल्स पुढे सरकवतो आणि पहिल्या लेबलच्या सुरुवातीला थांबतो.
  8. लेबल गाईड लेबलच्या उजव्या किनारीसह अलाइन होईपर्यंत लेबल गाईड डावीकडे सरकवा आणि नंतर वरचे कव्हर बंद करा.

Dymo LabelWriter 4XL लेबल प्रिंटर साफ करा

तुमचा प्रिंटर व्यवस्थित काम करत राहावा यासाठी, तुम्हाला प्रिंटरचा बाहेरील आणि आतील भाग अधूनमधून साफ करणे आवश्यक आहे.

पायऱ्या:

  1. पॉवर कॉर्ड डिस्कनेक्ट करा.
  2. प्रिंटरचा बाहेरील भाग पुसण्यासाठी लिंट-फ्री कापड वापरा.
  3. खालीलपैकी एका क्लिनिंग सोल्युशनने घाण आणि डाग काढा:
    • आयसोप्रोपाइल अल्कोहोल
    • पातळ केलेले डिशवॉशिंग डिटर्जंट
    • पातळ केलेले ग्लास क्लिनर
  4. प्रिंटरचे वरचे कव्हर उघडा आणि नंतर प्रिंटरच्या आतमधील कागदाची धूळ आणि इतर कण काढण्यासाठी लहान, मऊ ब्रश किंवा कॉटन स्वॅब वापरा.
  5. लेबल्सचा रोल काढा आणि नंतर रोलच्या खालील भाग साफ करा.
  6. पॉवर कॉर्ड पुन्हा कनेक्ट करा.
  7. पर्यायी: तुमच्याकडे LabelWriter क्लिनिंग कार्ड असल्यास, क्लिनिंग कार्डच्या पॅकेजिंगवर छापलेल्या सूचनांचे अनुसरण करा. क्लिनिंग कार्ड्स खरेदी करण्यासाठी, Dymo वेबसाइटवर जा.
  8. लेबल्सचा रोल पुन्हा लोड करा आणि नंतर वरचे कव्हर बंद करा.

Dymo LabelWriter 4XL लेबल प्रिंटरसाठी स्टेटस लाईट्स

स्टेटस लाईट प्रिंटरची वर्तमान स्थिती दृश्यमानपणे दर्शवते.

Dymo LabelWriter 4XL लेबल प्रिंटरसाठी स्टेटस लाईटच्या अर्थांचे वर्णन.
स्टेटस लाईटवर्णन
स्थिर निळापॉवर सुरू आहे आणि प्रिंटर तयार आहे.
मंद निळाप्रिंटर पॉवर सेव्हिंग मोडमध्ये आहे.
लुकलुकणारा निळालेबल्स योग्यरित्या लोड केलेली नाहीत किंवा लेबल रोल रिकामा आहे.

Dymo LabelWriter 4XL लेबल प्रिंटरचे ट्रबलशूटिंग करा

Dymo LabelWriter 4XL लेबल प्रिंटरची समस्या निवडा आणि नंतर ट्रबलशूटिंग पायऱ्या फॉलो करा.

प्रिंट गुणवत्तेच्या समस्या ट्रबलशूट करा

खराब प्रिंट गुणवत्ता साधारणपणे खालीलपैकी एका समस्येमुळे उद्भवते:

  • लेबल्सचा जुना रोल.
  • Dymo व्यतिरिक्त इतर उत्पादकाने बनवलेली लेबल्स.
  • अशी लेबल्स ज्यांचे थर्मल कोटिंग खराब झालेले आहे.
  • अस्वच्छ प्रिंट हेड.

तुम्ही Dymo-ब्रँडेड लेबल्स वापरत असल्याची खात्री करा. तृतीय-पक्ष लेबल्स टाळा कारण त्यांच्या थर्मल कोटिंगची संवेदनशीलता Dymo-ब्रँडेड लेबल्सपेक्षा वेगळी असू शकते. याव्यतिरिक्त, इतर उत्पादकांच्या लेबल्समधील छिद्रे बर्‍याचदा Dymo LabelWriter प्रिंटर्सद्वारे ओळखली जात नाहीत.

प्रिंटची गुणवत्ता अंधूक असल्यास, प्रिंट केलेल्या अक्षरांमध्ये लहान पांढरे ठिपके दिसल्यास किंवा फिकट आणि गडद पॅचेस असल्यास, तुमचा लेबल्सचा रोल सदोष असू शकतो. नवीन बॉक्समधील दुसरा रोल वापरून पहा. जर दुसरा रोल योग्यरित्या प्रिंट करत असेल, तर समस्या पहिल्या लेबल्सच्या रोलमध्ये आहे.

तुम्हाला प्रिंट हेड स्वच्छ करण्याचीही आवश्यकता असू शकते.

तुम्हाला तुटलेली अक्षरे किंवा इतर प्रिंट गुणवत्तेच्या समस्या येत राहिल्यास, प्रिंटर सेल्फ-टेस्ट करा. सेल्फ-टेस्ट प्रिंट हेड आणि प्रिंटिंग यंत्रणेचे सर्व घटक काम करत आहेत याची पडताळणी करते.

पायऱ्या:

  1. प्रिंटरमध्ये लेबल्सचा रोल असताना, प्रिंटरच्या समोरील FORM-FEED बटण पाच ते दहा सेकंदांसाठी दाबा आणि धरून ठेवा. प्रिंटर प्रिंटरच्या रुंदीनुसार उभ्या रेषा प्रिंट करणे सुरू करतो. चाचणी पॅटर्न दर 3/4 इंच (19 mm) अंतरावर आपोआप बदलतो.
  2. सेल्फ-टेस्ट सुरू झाल्यावर, FORM-FEED बटण सोडा. 3 सेल्फ-टेस्ट थांबवण्यासाठी, FORM-FEED बटण दाबा आणि सोडा.

जर प्रिंटरची समस्या सुटली नाही, तर Dymo च्या सपोर्टशी संपर्क साधा.

लेबल जॅम्स ट्रबलशूट करा

प्रिंटरमध्ये लेबल्स जॅम झाल्यास, तुम्ही खालील पायऱ्या वापरून ती काढू शकता.

पायऱ्या:

  1. प्रिंटरमधून आधीच बाहेर आलेली कोणतीही लेबल्स फाडून टाका.
  2. लेबल रिलीज लीव्हर पुढे दाबा आणि त्यानंतर लेबल फीड स्लॉटमधून अडकलेले लेबल बाहेर खेचा.

जर प्रिंटरची समस्या सुटली नाही, तर Dymo च्या सपोर्टशी संपर्क साधा.

योग्य प्रकारे फीड न होणाऱ्या लेबल्ससाठी ट्रबलशूट करा

तुमची लेबल्स योग्य प्रकारे फीड होत नसल्यास, पुढील सेटअप आवश्यकता तपासा:

  • तुमची लेबल्स योग्यरीत्या लोड केली आहेत आणि लेबलची डावी कड ही लेबल फीड स्लॉटच्या डाव्या कडेला जुळत आहे.
  • तुम्ही Dymo ब्रँडची लेबल्स वापरत आहात. इतर उत्पादकांनी बनवलेल्या लेबल्समधील छिद्रे Dymo प्रिंटरद्वारे बऱ्याचदा डिटेक्ट होत नाहीत. छिद्रे डिटेक्ट न झाल्यास, लेबल्स योग्य प्रकारे फीड होत नाहीत.

जर प्रिंटरची समस्या सुटली नाही, तर Dymo च्या सपोर्टशी संपर्क साधा.

प्रिंट न करणाऱ्या किंवा प्रिंटिंग न थांबवणाऱ्या प्रिंटरसाठी ट्रबलशूट करा

जर तुमचा प्रिंटर प्रिंट करत नसेल किंवा वापरत असताना प्रिंट करणे थांबवत असेल, तर पुढील पायऱ्या वापरून ट्रबलशूट करा:

  • प्रिंटरला पॉवर मिळत असल्याची आणि पॉवर केबल डिस्कनेक्ट झाली नसल्याची खात्री करा.
  • प्रिंटरच्या पुढील बाजूचा स्टेटस लाईट चालू नसल्यास, पॉवर केबल प्लग इन केली आहे आणि तुमची पॉवर स्ट्रिप काम करत आहे याची खात्री करण्यासाठी तपासा.
  • वॉल आउटलेट आणि पॉवर स्ट्रिपमध्ये दुसरे काहीतरी प्लग करून आउटलेट किंवा पॉवर स्ट्रिपमध्ये समस्या नसल्याची खात्री करा.
  • प्रिंटर चालू असताना फॉर्म फीड बटण दाबून, प्रिंटर लेबल्स योग्य प्रकारे फीड करत असल्याची खात्री करा.
  • जर लेबल्स अडकली असतील, तर स्टेटस लाईट ब्लिंक होतो. या पेजवरील लेबल जॅम ट्रबलशूट करा या विभागाचा संदर्भ घ्या.
  • तुमची USB केबल तुमच्या प्रिंटरच्या मागील बाजूने किंवा तुमच्या कॉंप्युटरवरून सैल झाली नसल्याची खात्री करा.
  • तुमचा LabelWriter प्रिंटर ड्रायव्हर योग्य प्रकारे इंस्टॉल केला असल्याची खात्री करा.

जर प्रिंटरची समस्या सुटली नाही, तर Dymo च्या सपोर्टशी संपर्क साधा.