Dymo LabelWriter 550 सिरीजचे लेबल प्रिंटर
शिपिंग लेबल्स प्रिंट करण्यासाठी तुम्ही Dymo LabelWriter 550 सिरीजच्या लेबल प्रिंटरचा वापर करू शकता.
टीप: या प्रिंटरचा वापर बारकोड लेबल्ससाठीदेखील केला जाऊ शकतो- अधिक माहितीसाठी बारकोड प्रिंटर वर जा
Dymo LabelWriter 550 सिरीजचे लेबल प्रिंटर USB किंवा Wi-Fi द्वारे तुमच्या Windows किंवा Mac कॉंप्युटरशी कनेक्ट होतात. Dymo LabelWriter 550 सिरीजच्या लेबल प्रिंटरच्या सामान्य समस्या ट्रबलशूट करण्यासाठीदेखील तुम्ही या मार्गदर्शकाचा वापर करू शकता.
तुमचा Dymo LabelWriter 550 सिरीजचा लेबल प्रिंटर इंस्टॉल करण्यासाठी, सेट करण्यासाठी किंवा ट्रबलशूट करण्यासाठी तुम्हाला मदतीची आवश्यकता असल्यास, Dymo च्या सपोर्टशी संपर्क साधा.
तुमची बारकोड लेबल्स सानुकूलित करण्यासाठी आणि प्रिंट करण्यासाठी, तुम्ही Dymo Label सॉफ्टवेअर वापरू शकता.
या पेजवर
- Dymo LabelWriter 550 सिरीजचा लेबल प्रिंटर वापरण्यासाठीच्या आवश्यकता
- Dymo लेबल सॉफ्टवेअर डाउनलोड करा
- तुमचा Dymo LabelWriter 550 सिरीजचा लेबल प्रिंटर पॉवरशी कनेक्ट करा
- Dymo LabelWriter 550 सिरीजचा लेबल प्रिंटर तुमच्या कॉंप्युटरशी कनेक्ट करा
- Dymo LabelWriter 550 सिरीजच्या लेबल प्रिंटरमध्ये लेबल्स लोड करा
- Dymo LabelWriter 550 सिरीजचे लेबल प्रिंटर स्वच्छ करा
- Dymo LabelWriter 550 सिरीजच्या लेबल प्रिंटरसाठीचे पॉवर स्टेटस लाईट्स
- Dymo LabelWriter 550 सिरीजचा लेबल प्रिंटर ट्रबलशूट करा
Dymo LabelWriter 550 सिरीजचा लेबल प्रिंटर वापरण्यासाठीच्या आवश्यकता
Dymo LabelWriter 550 सिरीजचे लेबल प्रिंटर वापरण्यासाठी तुम्हाला खालील सिस्टीम आवश्यकता पूर्ण करणे गरजेचे आहे:
- Windows 8.1 किंवा त्यापुढील
- macOS v10.14 Mojave किंवा त्यापुढील
Dymo लेबल सॉफ्टवेअर डाउनलोड करा
Dymo वेबसाइट वरून Dymo Label सॉफ्टवेअरची नवीनतम आवृत्ती डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
तुमचा Dymo LabelWriter 550 सिरीजचा लेबल प्रिंटर पॉवरशी कनेक्ट करा
तुमच्या Dymo LabelWriter 550 सिरीजच्या लेबल प्रिंटरसोबत दिलेला पॉवर अॅडॉप्टरच वापरत असल्याची खात्री करा. तुमचा प्रिंटर पॉवरशी कनेक्ट करण्यासाठी या पायऱ्या फॉलो करा.
पायऱ्या:
- पॉवर कॉर्डला पॉवर ॲडॉप्टरमध्ये प्लग करा आणि त्यानंतर पॉवर ॲडॉप्टरला प्रिंटरच्या मागील बाजूस असलेल्या पॉवर कनेक्टरमध्ये प्लग करा.
- पॉवर कॉर्डचे दुसरे टोक पॉवर आउटलेटमध्ये प्लग करा.
- प्रिंटरच्या बाजूला असलेले POWER बटण दाबा.
Dymo LabelWriter 550 सिरीजचा लेबल प्रिंटर तुमच्या कॉंप्युटरशी कनेक्ट करा
तुम्ही USB केबलच्या मदतीने Dymo LabelWriter 550 सिरीजचा लेबल प्रिंटर थेट तुमच्या कॉंप्युटरशी कनेक्ट करू शकता. जर तुमच्याकडे Dymo LabelWriter 5XL प्रिंटर असेल, तर तुम्ही इथरनेट केबलच्या मदतीने त्याला लोकल एरिया नेटवर्क (LAN) शीदेखील कनेक्ट करू शकता. Dymo LabelWriter 550 प्रिंटर LAN शी कनेक्ट होऊ शकत नाही.
तुम्ही USB केबलने कनेक्ट करत असल्यास, तुम्ही केवळ 1997364 पार्ट नंबर असलेली पुरवलेली DYMO USB केबल वापरणे आवश्यक आहे. तुमच्याकडे केबल नसल्यास, Dymo सपोर्टशी संपर्क साधा.
पायऱ्या:
USB केबलने कनेक्ट करा
- प्रिंटरच्या मागील बाजूस असलेल्या USB पोर्टमध्ये USB केबल प्लग करा.
- केबलचे दुसरे टोक तुमच्या कॉंप्युटरवरील उपलब्ध USB पोर्टमध्ये प्लग करा.
- प्रिंटरची पॉवर चालू करा. प्रिंटरच्या पुढील बाजूचा USB स्टेटस लाईट चालू होईल.
- Dymo Connect for Desktop हे सॉफ्टवेअर सुरू करा.
macOS: इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर प्रिंटर सूचीमध्ये प्रिंटर नसल्यास, तो कसा जोडावा याविषयीच्या macOS सूचनांचा संदर्भ घ्या.
LAN शी कनेक्ट करा
- प्रिंटरच्या मागील बाजूस असलेल्या LAN पोर्टमध्ये LAN केबल प्लग करा.
- केबलचे दुसरे टोक तुमच्या नेटवर्कवरील ॲक्टिव्ह LAN पोर्टमध्ये प्लग करा.
- प्रिंटरची पॉवर चालू करा. प्रिंटरच्या पुढील बाजूचा LAN स्टेटस लाईट चालू होईल.
- नेटवर्कवर या प्रिंटरवरून लेबल्स प्रिंट करणाऱ्या सर्व कॉंप्युटरवर Dymo Connect for Desktop डाउनलोड आणि इंस्टॉल करा.
- Dymo Connect for Desktop मध्ये, फाईल मेनूमधून Add Network Printer निवडा आणि प्रिंटर जोडण्यासाठी सूचना फॉलो करा.
जर प्रिंटर तुमच्या कॉंप्युटरशी USB आणि LAN पोर्ट्स या दोन्ही द्वारे कनेक्ट असेल, तर Dymo Connect for Desktop मध्ये प्रिंटर दोनदा दिसतो.
Dymo LabelWriter 550 सिरीजच्या लेबल प्रिंटरमध्ये लेबल्स लोड करा
Dymo LabelWriter 550 सिरीजच्या लेबल प्रिंटरमध्ये लेबल्स लोड करण्यासाठी या पायऱ्या फॉलो करा.
पायऱ्या:
- प्रिंटर चालू करा आणि त्यानंतर शिपमेंटदरम्यान प्रिंटरचे संरक्षण करणारी लेबल्स बाहेर काढण्यासाठी लेबल रिव्हर्स फीड बटण दाबा.
- वरचे कव्हर उघडा आणि लेबलच्या कप्प्यातील कोणतेही पॅकिंगचे साहित्य काढून टाका.
- कव्हरच्या आतील बाजूने लेबल स्पूल काढा आणि नंतर स्पिंडलमधून स्पूल गाइड वेगळे करा.
- स्पूल स्पिंडल धरा आणि नंतर स्पिंडलवर लेबल रोल अशा प्रकारे ठेवा जेणेकरून लेबल्स खालून फीड होतील आणि लेबल रोलची डावी किनार स्पूलच्या बाजूला घट्ट बसेल.
- स्पूलची गाइड स्पूलच्या उजव्या बाजूला सरकवा आणि नंतर गाइड लेबल रोलच्या बाजूला घट्ट दाबा. लेबल रोल कोणत्याही अंतराविना, लेबल स्पूलच्या दोन्ही बाजूंनी चपखल बसला पाहिजे.
- लेबल्स रोलच्या खालून बाहेर येत असतील अशा प्रकारे लेबल स्पूल प्रिंटर कव्हरमधील स्लॉटमध्ये घाला.
- लेबलची डावी किनार लेबल एक्झिट स्लॉटच्या डाव्या किनारीसह अलाइन करा आणि त्यानंतर स्लॉटमध्ये लेबल घाला. प्रिंटर आपोआप लेबल्स पुढे सरकवतो आणि पहिल्या लेबलच्या सुरुवातीला थांबतो.
- लेबल गाइड लेबलच्या उजव्या किनारीसह अलाइन होईपर्यंत लेबल गाइड डावीकडे सरकवा आणि त्यानंतर वरचे कव्हर बंद करा.
Dymo LabelWriter 550 सिरीजचे लेबल प्रिंटर्स स्वच्छ करा
तुमचा प्रिंटर योग्यरीत्या काम करत राहावा यासाठी, तुम्हाला प्रिंटरचा बाह्य आणि आतील भाग अधूनमधून स्वच्छ करणे आवश्यक आहे.
पायऱ्या:
- पॉवर कॉर्ड डिस्कनेक्ट करा.
- प्रिंटरचा बाह्य भाग पुसण्यासाठी लिंट-फ्री कपड्याचा वापर करा.
- पुढीलपैकी एका क्लिनिंग सोल्यूशनचा वापर करून घाण आणि डाग काढून टाका:
- आयसोप्रोपिल अल्कोहोल
- सौम्य केलेले डिशवॉशिंग डिटर्जंट
- सौम्य केलेले ग्लास क्लिनर
- प्रिंटरचे वरचे कव्हर उघडा आणि नंतर प्रिंटरच्या आतील भागामधून कागदाची धूळ आणि इतर बारीक कण काढून टाकण्यासाठी छोटा, मऊ ब्रश किंवा कॉटन स्वॅब वापरा.
- लेबल्सचा रोल काढा आणि नंतर रोलच्या खालचा भाग स्वच्छ करा.
- पॉवर कॉर्ड पुन्हा कनेक्ट करा.
- वैकल्पिक: तुमच्याकडे LabelWriter क्लिनिंग कार्ड असल्यास, क्लिनिंग कार्डच्या पॅकेजिंगवर दिलेल्या सूचनांचे पालन करा. क्लिनिंग कार्ड्स खरेदी करण्यासाठी, Dymo वेबसाइट वर जा.
- लेबल्सचा रोल पुन्हा लोड करा आणि त्यानंतर वरचे कव्हर बंद करा.
Dymo LabelWriter 550 सिरीजच्या लेबल प्रिंटर्ससाठी पॉवर स्टेटस लाइट्स
पॉवर स्टेटस लाइट प्रिंटरची सद्य पॉवर स्थिती दृश्यरूपाने दाखवते.
| स्टेटस लाइट | वर्णन |
|---|---|
| बंद | पॉवर बंद आहे. |
| सतत चालू | पॉवर सुरू आहे आणि प्रिंटर तयार आहे. |
| ग्लोइंग | प्रिंटर पॉवर सेव्हिंग मोडमध्ये आहे. |
| जलद ब्लिंकिंग | एक एरर आली, जसे की लेबल्स गहाळ आहेत किंवा दुसरी कोणतीही एरर स्थिती. |
Dymo LabelWriter 550 सिरीजचे लेबल प्रिंटर ट्रबलशूट करा
Dymo LabelWriter 550 सिरीज लेबल प्रिंटरची समस्या निवडा आणि त्यानंतर ट्रबलशूटिंगच्या पायऱ्या फॉलो करा.
तुमच्या वायरलेस नेटवर्क सूचीमध्ये प्रिंटर न दिसण्याबद्दल ट्रबलशूट करा
जर तुमचा Dymo LabelWriter 550 सिरीजचा लेबल प्रिंटर तुमच्या वायरलेस नेटवर्क सूचीमध्ये दिसत नसेल, तर प्रिंटर कनेक्ट करण्यापूर्वी Dymo Connect for Desktop हे सॉफ्टवेअर इंस्टॉल केले असल्याची खात्री करा.
LAN कनेक्शन्ससाठी, LabelWriter प्रिंटरवर प्रिंट करणाऱ्या प्रत्येक काँप्युटरवर Dymo Connect for Desktop इंस्टॉल केलेले असणे आवश्यक आहे. इथरनेट आणि वायरलेस नेटवर्क दोन्ही वापरणाऱ्या ठिकाणांसाठी, राऊटर वायर्ड आणि वायरलेस नेटवर्क्समधील ट्रॅफिक फॉरवर्ड करण्यासाठी सेट केले असल्याची खात्री करा.
प्रिंटरची समस्या सुटली नसेल, तर Dymo च्या सपोर्टशी संपर्क साधा.
प्रिंट क्वालिटीच्या समस्या ट्रबलशूट करा
खराब प्रिंट क्वालिटी सहसा पुढीलपैकी एका समस्येमुळे येते:
- लेबल्सचा जुना रोल.
- Dymo व्यतिरिक्त इतर उत्पादकाने बनवलेली लेबल्स.
- ज्या लेबल्सच्या थर्मल कोटिंगचे नुकसान झाले आहे.
- घाण झालेले प्रिंट हेड.
तुम्ही Dymo-ब्रँडची लेबल्स वापरत असल्याची खात्री करा. तृतीय-पक्ष लेबल्स वापरू नका कारण इतर लेबल्सवरील थर्मल कोटिंगची संवेदनशीलता Dymo-ब्रँडच्या लेबल्सपेक्षा वेगळी असते. तसेच, इतर उत्पादकांनी बनवलेल्या लेबल्समधील छिद्रे वारंवार LabelWriter प्रिंटर्सद्वारे ओळखता येत नाहीत.
जर प्रिंट क्वालिटी पुसट झाली, प्रिंट केलेल्या अक्षरांमध्ये पांढरे छोटे ठिपके विखुरलेले दिसले किंवा प्रिंटिंगचे फिके आणि गडद डाग दिसले, तर तुमचा लेबल्सचा रोल दोषपूर्ण असू शकतो. ताज्या बॉक्समधून वेगळा रोल वापरून पहा. जर दुसरा रोल योग्यरीत्या प्रिंट करत असेल, तर समस्या लेबल्सच्या पहिल्या रोलमध्ये आहे.
दुसरी शक्यता अशी आहे की, तुम्हाला प्रिंट हेड स्वच्छ करण्याची गरज आहे.
तुम्हाला तुटलेल्या अक्षरांच्या किंवा प्रिंट क्वालिटीच्या इतर समस्या येत राहिल्यास, प्रिंटरची सेल्फ-टेस्ट करा. सेल्फ-टेस्ट प्रिंट हेड आणि प्रिंटिंग यंत्रणेचे सर्व भाग काम करत असल्याची पडताळणी करते.
पायऱ्या:
- प्रिंटरमध्ये लेबल्सचा रोल असताना, प्रिंटरच्या समोरील FORM-FEED बटण पाच ते दहा सेकंदांसाठी दाबून ठेवा. प्रिंटर रुंदीच्या बाजूने उभ्या रेषा प्रिंट करण्यास सुरुवात करतो. चाचणीचा पॅटर्न दर 3/4 इंच (19 मिमी) नंतर आपोआप बदलतो.
- सेल्फ-टेस्ट सुरू झाल्यावर, FORM-FEED बटण सोडून द्या. 3 सेल्फ-टेस्ट थांबवण्यासाठी, FORM-FEED बटण दाबा आणि सोडून द्या.
प्रिंटरची समस्या सुटली नसेल, तर Dymo च्या सपोर्टशी संपर्क साधा.
लेबल जॅम्स ट्रबलशूट करा
जर लेबल्स प्रिंटरमध्ये अडकली असतील, तर तुम्ही पुढील पायऱ्या वापरून ती काढू शकता.
पायऱ्या:
- प्रिंटरमधून आधीच पुढे गेलेली कोणतीही लेबल्स फाडून टाका.
- लेबल रिलीझ लीव्हर पुढे दाबा आणि नंतर अडकलेले लेबल लेबल फीड स्लॉटमधून बाहेर खेचा.
प्रिंटरची समस्या सुटली नसेल, तर Dymo च्या सपोर्टशी संपर्क साधा.
लेबल्स योग्यरीत्या फीड न होण्याबद्दल ट्रबलशूट करा
तुमची लेबल्स योग्यरीत्या फीड होत नसल्यास, पुढील सेटअप आवश्यकता तपासा:
- तुमची लेबल्स योग्यरीत्या लोड केली आहेत आणि लेबलची डावी किनार लेबल फीड स्लॉटच्या डाव्या किनारीसह अलाइन होते.
- तुम्ही Dymo-ब्रँडची लेबल्स वापरत आहात. इतर उत्पादकांनी बनवलेल्या लेबल्समधील छिद्रे वारंवार Dymo प्रिंटर्सद्वारे ओळखता येत नाहीत. जेव्हा छिद्रे ओळखली जात नाहीत, तेव्हा लेबल्स योग्यरीत्या फीड होणार नाहीत.
प्रिंटरची समस्या सुटली नसेल, तर Dymo च्या सपोर्टशी संपर्क साधा.
प्रिंटरने प्रिंट न करणे किंवा प्रिंट करणे न थांबवणे याबद्दल ट्रबलशूट करा
तुमचा प्रिंटर प्रिंट करत नसल्यास किंवा वापरात असताना प्रिंट करणे थांबवत असल्यास, पुढील पायऱ्यांसह ट्रबलशूट करा:
- प्रिंटरला पॉवर मिळत असल्याची आणि पॉवर केबल डिस्कनेक्ट झालेली नसल्याची खात्री करा.
- प्रिंटरच्या समोरील स्टेटस लाइट चालू नसल्यास, पॉवर केबल प्लग केलेली आहे आणि तुमची पॉवर स्ट्रीप काम करत आहे याची खात्री करण्यासाठी तपासा.
- वॉल आउटलेट आणि पॉवर स्ट्रीपमध्ये दुसरे काहीतरी प्लग करून समस्या आउटलेट किंवा पॉवर स्ट्रीपमध्ये नाही ना याची खात्री करा.
- प्रिंटर सुरू असताना फॉर्म फीड बटण दाबून प्रिंटर लेबल्स योग्यरित्या फीड करत असल्याची खात्री करा.
- जर लेबल्स अडकली असतील, तर स्टेटस लाईट ब्लिंक होते. या पेजवरील लेबल जॅमसाठी ट्रबलशूट करा सेक्शनचा संदर्भ घ्या.
- तुमची USB केबल तुमच्या प्रिंटरच्या मागून किंवा काँप्युटरमधून सैल झालेली नाही ना, याची खात्री करा.
- तुमचा LabelWriter प्रिंटर ड्रायव्हर योग्यरित्या इन्स्टॉल झाला असल्याची खात्री करा.
प्रिंटरची समस्या सुटली नसेल, तर Dymo च्या सपोर्टशी संपर्क साधा.