Rollo लेबल प्रिंटर
शिपिंग लेबल्स प्रिंट करण्यासाठी तुम्ही Rollo लेबल प्रिंटर वापरू शकता. Rollo लेबल प्रिंटर तुमच्या काँप्युटरला USB ने कनेक्ट होतो आणि याला प्रिंट करण्यासाठी टोनर किंवा शाईची आवश्यकता नसते.
तुम्हाला तुमचा Rollo लेबल प्रिंटर इंस्टॉल करण्यासाठी, सेटअप करण्यासाठी किंवा ट्रबलशूटिंग करण्यासाठी मदत हवी असल्यास, Rollo सपोर्टशी संपर्क साधा.
तुमचा Rollo लेबल प्रिंटर सेटअप करा
तुमचा Rollo लेबल प्रिंटर सेटअप करण्यासाठी या पायऱ्या फॉलो करा.
पायऱ्या:
- प्रिंटरचा स्विच On वर सेट केलेला असल्यास, प्रिंटरच्या मागील बाजूस असलेला स्विच दाबून तो बंद करा.
- तुमच्या Rollo लेबल प्रिंटरला पॉवर केबल कनेक्ट करा.
- पॉवर केबलचे दुसरे टोक तुमच्या पॉवर अॅडॉप्टरला कनेक्ट करा आणि अॅडॉप्टर पॉवर आउटलेटशी कनेक्ट करा.
- USB केबल तुमच्या प्रिंटरला आणि तिचे दुसरे टोक तुमच्या काँप्युटरला कनेक्ट करा.
- लेबलांची बाजू वरच्या दिशेला राहील अशाप्रकारे प्रिंटरमध्ये लेबल्स घाला.
- टॅब ॲडजस्ट करा जेणेकरून ते लेबलांना त्यांच्या जागी धरून ठेवतील.
- पॉवर स्विच On करा.
- बीपचा आवाज ऐकू येईपर्यंत लेबल प्रिंटरच्या वरच्या बाजूस असलेले जांभळे बटण दाबून ठेवा, त्यानंतर ते सोडा. तुमचा प्रिंटर आपोआप लेबलचा प्रकार आणि आकार शोधेल.
तुमचा Rollo लेबल प्रिंटर इन्स्टॉल करा
तुम्हाला तुमच्या कॉंप्युटरवर Rollo लेबल प्रिंटर ड्राइव्हर इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
Mac
पायऱ्या:
- तुमच्या कॉंप्युटरसाठी योग्य ड्राइव्हर डाउनलोड करण्यासाठी Rollo च्या वेबसाइटला भेट द्या.
- तुमच्या कॉंप्युटरवर इन्स्टॉलेशन पॅकेज शोधा आणि उघडा.
- डायलॉगमध्ये,
.pkgफाईलवर डबल-क्लिक करा. - इन्स्टॉलरमधील सूचना फॉलो करा आणि नंतर Close वर क्लिक करा.
- तुम्ही प्रिंटर सुरू केल्यानंतर, तुमचा कॉंप्युटर तो आपोआप शोधेल.
Windows
पायऱ्या:
- तुमच्या कॉंप्युटरसाठी योग्य ड्राइव्हर डाउनलोड करण्यासाठी Rollo च्या वेबसाइटला भेट द्या.
- तुमच्या कॉंप्युटरवर इन्स्टॉलेशन पॅकेज शोधा आणि उघडा.
- इन्स्टॉलरमधील सूचना फॉलो करा.
- Windows मध्ये, Control panel > Devices and Printers वर जा.
- Rollo Printer वर राईट-क्लिक करा.
- डायलॉगमध्ये, Advanced वर क्लिक करा.
- Paper Size ड्रॉप-डाउन मेनूमधून, तुमचा लेबलचा आकार निवडा.
- तुमच्या सेटिंग्ज सेव्ह करण्यासाठी OK वर क्लिक करा.