Zebra लेबल प्रिंटर ZD421

तुमच्या Windows किंवा Mac कॉंप्युटरवर Zebra लेबल प्रिंटर ZD421 कसा सेट अप करायचा ते जाणून घ्या. Zebra लेबल प्रिंटर ZD421 मधील सामान्य ट्रबलशूटिंग समस्या कशा सोडवायच्या हे जाणून घेण्यासाठीही तुम्ही हे मार्गदर्शक वापरू शकता.

Zebra लेबल प्रिंटर ZD421 ला तुमच्या iOS किंवा Android टॅब्लेटवरून लेबल्स प्रिंट करता येत नाहीत.

तुमच्या Zebra लेबल प्रिंटर ZD421 साठी लेबल आवश्यकता

तुमच्या लेबल प्रिंटरने लेबल्स प्रिंट करण्यासाठी, तुमच्या गरजा पूर्ण करणारे Zebra ब्रँड लेबल्स शोधण्याकरिता तुम्ही Zebra Supplies Selector | ZipZebra Supplies Solutions वेबसाइटवर जाऊ शकता.

तुमचा Zebra लेबल प्रिंटर ZD421 सेट अप करा

तुम्ही Zebra लेबल प्रिंटर ZD421 तुमच्या Windows किंवा Mac कॉंप्युटरशी USB केबल, Bluetooth किंवा Wi-Fi द्वारे कनेक्ट करू शकता. तुमचा कनेक्शन प्रकार निवडा आणि त्यानंतर तुमच्या कॉंप्युटरची ऑपरेटिंग सिस्टीम निवडा.

मीडिया सेटिंग्ज तुम्ही वापरत असलेल्या मीडियाच्या प्रकाराशी जुळल्या पाहिजेत. Zebra च्या Identify Type of Media सपोर्ट पेजवर मीडिया प्रकार कसे ओळखावे याबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता.

USB
Mac

Zebra लेबल प्रिंटर ZD421 ला Mac कॉंप्युटर्ससाठी मर्यादित सपोर्ट आहे. Zebra कडून Mac वरील Zebra प्रिंटर्ससाठी Common Unix Printing System (CUPS) ड्रायव्हरची शिफारस केली जाते. CUPS ड्रायव्हर macOS वर आधीपासून इन्स्टॉल केलेला असतो, त्यामुळे तुम्हाला या प्रिंटरसाठी ड्रायव्हर डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही.

पायऱ्या:

  1. USB पोर्ट झाकणारे स्टिकर काढा आणि त्यानंतर तुमच्या Mac वरील USB पोर्टशी प्रिंटर कनेक्ट करा.
  2. CUPS ड्रायव्हरसह तुमच्या Mac मध्ये प्रिंटर जोडा. हे कसे करायचे ते जाणून घेण्यासाठी, macOS वर प्रिंटर जोडण्याविषयीच्या Zebra च्या मार्गदर्शकाचा संदर्भ घ्या.
  3. मीडिया लोड करा (मीडिया म्हणजे सामान्यतः लेबल्स असा होतो, परंतु यात टॅग स्टॉक, पावतीचा कागद आणि तुम्ही प्रिंट करू शकता अशा इतर गोष्टींचा देखील समावेश असतो):
    1. प्रिंटर उघडा आणि मीडिया रोल होल्डर्समध्ये ठेवा.
    2. मीडियाचे टोक प्रिंटरच्या पुढच्या भागातून बाहेर ओढा.
    3. मीडिया गाईड्सच्या खाली मीडिया दाबा.
    4. प्रिंटर बंद करा आणि पॉझ मोडमधून बाहेर पडण्यासाठी FEED बटण एकदा दाबा.
  4. कॉन्फिगरेशन अहवाल प्रिंट करून तुमच्या प्रिंटरची चाचणी घ्या.

प्रिंटर सेटिंग्ज तुमच्या प्रिंट जॉबसाठी वापरत असलेल्या सामग्रीशी आणि तुमच्या प्रिंटरवरील पर्यायांशी जुळले पाहिजेत. Zebra Setup Utilities हे macOS साठी उपलब्ध नाही, त्यामुळे आवश्यकतेनुसार CUPS ड्रायव्हरमध्ये प्रिंटर सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करा. कसे ते जाणून घेण्यासाठी, CUPS ड्रायव्हरच्या मदतीने प्रिंटर कॉन्फिगर करण्याविषयीच्या Zebra च्या मार्गदर्शकाचा संदर्भ घ्या. तुम्ही लेबल्स डिझाइन करण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी वापरत असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये स्वतःचे लेबल सेटिंग्ज असल्यास, जसे की लेबलचा आकार किंवा डार्कनेस, तर प्रिंटर त्या सॉफ्टवेअरमधील सेटिंग्ज वापरतो.

Windows

पायऱ्या:

  1. Zebra Printer Setup वेबसाइटवरून प्रिंटर ड्रायव्हर डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.
  2. Zebra Setup Utilities (ZSU) प्रिंटर कॉन्फिगरेशन युटिलिटी डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.
  3. USB पोर्ट झाकणारे स्टिकर काढा आणि त्यानंतर तुमच्या कॉंप्युटरवरील USB पोर्टशी प्रिंटर कनेक्ट करा.
  4. मीडिया लोड करा (मीडिया म्हणजे सामान्यतः लेबल्स असा होतो, परंतु यात टॅग स्टॉक, पावतीचा कागद आणि तुम्ही प्रिंट करू शकता अशा इतर गोष्टींचा देखील समावेश असतो):
    1. प्रिंटर उघडा आणि मीडिया रोल होल्डर्समध्ये ठेवा.
    2. मीडियाचे टोक प्रिंटरच्या पुढच्या भागातून बाहेर ओढा.
    3. मीडिया गाईड्सच्या खाली मीडिया दाबा.
    4. प्रिंटर बंद करा आणि पॉझ मोडमधून बाहेर पडण्यासाठी FEED बटण एकदा दाबा.
  5. कॉन्फिगरेशन अहवाल प्रिंट करून तुमच्या प्रिंटरची चाचणी घ्या.

प्रिंटर सेटिंग्ज तुम्ही तुमच्या प्रिंट जॉबसाठी वापरत असलेल्या पुरवठ्याशी आणि तुमच्या प्रिंटरवरील पर्यायांशी जुळले पाहिजेत. आवश्यकतेनुसार Zebra Setup Utilities सॉफ्टवेअर वापरून प्रिंटर सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करा.

Bluetooth

तुम्ही Bluetooth वरून Windows कॉंप्युटरसोबत प्रिंटर पेअर करू शकता. हा प्रिंटर macOS वर Bluetooth सोबत सुसंगत नाही.

पायऱ्या:

  1. प्रिंटर सुरू असल्याची खात्री करा.
  2. प्रिंटरवरील डेटा लाईट फ्लॅश होईपर्यंत FEED बटण दाबून ठेवा. प्रिंटर आता डिस्कव्हरेबल मोडमध्ये आहे आणि Bluetooth उपकरणासोबत पेअर करण्यासाठी तयार आहे.
  3. तुमच्या Windows कॉंप्युटरवर, तुमच्या Bluetooth सेटिंग्जमध्ये जा आणि त्यानंतर प्रिंटर निवडा.

तुम्ही Zebra Setup Utilities सह देखील Bluetooth कनेक्शन सेट अप करू शकता. कसे ते जाणून घेण्यासाठी, Zebra Setup Utilities सह Bluetooth कॉन्फिगर करण्याविषयीच्या Zebra च्या मार्गदर्शकाचा संदर्भ घ्या.

Wi-Fi
Mac

Zebra लेबल प्रिंटर ZD421 ला Mac कॉंप्युटर्ससाठी मर्यादित सपोर्ट आहे. Zebra कडून Mac वरील Zebra प्रिंटर्ससाठी Common Unix Printing System (CUPS) ड्रायव्हरची शिफारस केली जाते. CUPS ड्रायव्हर macOS वर आधीपासून इन्स्टॉल केलेला असतो, त्यामुळे तुम्हाला या प्रिंटरसाठी ड्रायव्हर डाउनलोड आणि इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही.

पायऱ्या:

  1. तुमच्या Mac मध्ये प्रिंटर त्याच्या IP अ‍ॅड्रेससह जोडा. हे कसे करायचे ते जाणून घेण्यासाठी, macOS वर नेटवर्क प्रिंटर इन्स्टॉल करण्याविषयीच्या Zebra च्या मार्गदर्शकाचा संदर्भ घ्या. तुम्हाला नेटवर्क कॉन्फिगरेशन रिपोर्टवर IP अ‍ॅड्रेस मिळू शकतो. तुम्ही CUPS ड्रायव्हरच्या मदतीने प्रिंटर इन्स्टॉल देखील करू शकता. कसे ते जाणून घेण्यासाठी, CUPS ड्रायव्हरच्या मदतीने नेटवर्क प्रिंटर इन्स्टॉल करण्याविषयीच्या Zebra च्या मार्गदर्शकाचा संदर्भ घ्या.
  2. मीडिया लोड करा (मीडिया म्हणजे सामान्यतः लेबल्स असा होतो, परंतु यात टॅग स्टॉक, पावतीचा कागद आणि तुम्ही प्रिंट करू शकता अशा इतर गोष्टींचा देखील समावेश असतो):
    1. प्रिंटर उघडा आणि मीडिया रोल होल्डर्समध्ये ठेवा.
    2. मीडियाचे टोक प्रिंटरच्या पुढच्या भागातून बाहेर ओढा.
    3. मीडिया गाईड्सच्या खाली मीडिया दाबा.
    4. प्रिंटर बंद करा आणि पॉझ मोडमधून बाहेर पडण्यासाठी FEED बटण एकदा दाबा.
  3. कॉन्फिगरेशन अहवाल प्रिंट करून तुमच्या प्रिंटरची चाचणी घ्या.

प्रिंटर सेटिंग्ज तुमच्या प्रिंट जॉबसाठी वापरत असलेल्या सामग्रीशी आणि तुमच्या प्रिंटरवरील पर्यायांशी जुळले पाहिजेत. Zebra Setup Utilities हे macOS साठी उपलब्ध नाही, त्यामुळे आवश्यकतेनुसार CUPS ड्रायव्हरमध्ये प्रिंटर सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करा. कसे ते जाणून घेण्यासाठी, CUPS ड्रायव्हरच्या मदतीने प्रिंटर कॉन्फिगर करण्याविषयीच्या Zebra च्या मार्गदर्शकाचा संदर्भ घ्या. तुम्ही लेबल्स डिझाइन करण्यासाठी किंवा प्रिंट करण्यासाठी वापरत असलेल्या सॉफ्टवेअरमध्ये स्वतःचे लेबल सेटिंग्ज असल्यास, जसे की लेबलचा आकार किंवा डार्कनेस, तर प्रिंटर त्या सॉफ्टवेअरमधील सेटिंग्ज वापरतो.

Windows

पायऱ्या:

  1. Zebra Printer Setup वेबसाइटवरून प्रिंटर ड्रायव्हर डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.
  2. Zebra Setup Utilities (ZSU) प्रिंटर कॉन्फिगरेशन युटिलिटी डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.
  3. तुमचा प्रिंटर कनेक्ट करा:
    1. Zebra Setup Utilities डाउनलोड करा आणि उघडा.
    2. Configure Printer Connectivity निवडा.
    3. तुमचे नेटवर्क तपशील भरा आणि त्यानंतर Band व WLAN Country निवडा.
    4. ESSID भरा आणि त्यानंतर Security mode निवडा.
    5. WLAN पासवर्ड भरा. पासवर्डमध्ये अक्षरे आणि अंक असतील आणि तो हेक्साडेसिमल स्वरूपामध्ये नसेल, तर String निवडा.
    6. Finish निवडा आणि तुमचा प्रिंटर बंद करून पुन्हा चालू करा.
  4. मीडिया लोड करा (मीडिया म्हणजे सामान्यतः लेबल्स असा होतो, परंतु यात टॅग स्टॉक, पावतीचा कागद आणि तुम्ही प्रिंट करू शकता अशा इतर गोष्टींचा देखील समावेश असतो):
    1. प्रिंटर उघडा आणि मीडिया रोल होल्डर्समध्ये ठेवा.
    2. मीडियाचे टोक प्रिंटरच्या पुढच्या भागातून बाहेर ओढा.
    3. मीडिया गाईड्सच्या खाली मीडिया दाबा.
    4. प्रिंटर बंद करा आणि पॉझ मोडमधून बाहेर पडण्यासाठी FEED बटण एकदा दाबा.
  5. कॉन्फिगरेशन अहवाल प्रिंट करून तुमच्या प्रिंटरची चाचणी घ्या.

प्रिंटर सेटिंग्ज तुम्ही तुमच्या प्रिंट जॉबसाठी वापरत असलेल्या पुरवठ्याशी आणि तुमच्या प्रिंटरवरील पर्यायांशी जुळले पाहिजेत. आवश्यकतेनुसार Zebra Setup Utilities सॉफ्टवेअर वापरून प्रिंटर सेटिंग्ज अ‍ॅडजस्ट करा.

तुम्ही मीडियाचा आकार किंवा प्रकार बदलल्यास, तुम्हाला मीडिया सेन्सर्स कॅलिब्रेट करण्याची आवश्यकता आहे.

प्रिंटर सेटअपबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, Zebra ZD421 क्विक सेटअप मार्गदर्शक पहा.

Zebra लेबल प्रिंटर ZD421 साठी मीडिया सेन्सर्स कॅलिब्रेट करा

तुम्ही वापरत असलेल्या मीडियाचा प्रकार बदलल्यास किंवा तुम्हाला लेबल प्रिंटिंगच्या समस्या आल्यास, तुम्हाला तुमच्या प्रिंटरसाठी मीडिया सेन्सर्स कॅलिब्रेट करावे लागतील.

पायऱ्या:

  1. प्रिंटर उघडा.
  2. मीडिया सेन्सर तुमच्या मीडियासाठी योग्य ठिकाणी असल्याची पडताळणी करा आणि त्यानंतर प्रिंटर बंद करा.
  3. स्टेटस इंडिकेटर लाईट दोनदा ब्लिंक होऊन बंद होईपर्यंत FEED बटण दाबून ठेवा आणि त्यानंतर Feed बटण सोडून द्या.

प्रिंटर अनेक लेबल्स फीड करतो आणि मोजतो. कॅलिब्रेशन पूर्ण झाल्यावर, स्टेटस इंडिकेटर स्थिर हिरवा लाईट दर्शवतो.

लेबल प्रिंटिंगच्या समस्या कायम राहिल्यास, लेबलच्या आकाराचे सेटिंग्ज तुमच्या प्रत्यक्ष लेबल डायमेंशनशी जुळत असल्याची पडताळणी करा आणि दिलेल्या क्लीनिंग किटचा वापर करून प्रिंट हेड स्वच्छ करा.

Zebra लेबल प्रिंटर ZD421 साठी कॉन्फिगरेशन रिपोर्ट प्रिंट करा

तुमचा प्रिंटर काम करतो की नाही याची चाचणी करण्यासाठी तुम्हाला कॉन्फिगरेशन अहवाल प्रिंट करण्याची आवश्यकता असू शकते.

पायऱ्या:

  1. प्रिंटरमध्ये मीडिया योग्यरित्या लोड झाला असल्याची आणि प्रिंटरचे वरचे कव्हर बंद असल्याची खात्री करा.
  2. प्रिंटर चालू करा.
  3. जेव्हा प्रिंटर रेडी स्टेटमध्ये असतो (STATUS इंडिकेटर स्थिर हिरवा असतो), तेव्हा STATUS इंडिकेटर एकदा ब्लिंक होऊन बंद होईपर्यंत FEED. बटण अंदाजे 2 सेकंद दाबून ठेवा आणि त्यानंतर FEED बटण सोडून द्या.

प्रिंटर आणि नेटवर्क कॉन्फिगरेशन अहवाल प्रिंट होतात. जेव्हा प्रिंटर थांबतो, तेव्हा STATUS इंडिकेटर स्थिर हिरवा होतो.

नेटवर्क कॉन्फिगरेशन रिपोर्ट तुमच्या प्रिंटरचा IP अ‍ॅड्रेस दाखवतो.

तुमचा Zebra लेबल प्रिंटर ZD421 फॅक्टरी रीसेट करा

तुमच्या Zebra लेबल प्रिंटर ZD421 चे ट्रबलशूटिंग काम करत नसल्यास, तुम्ही प्रिंटर त्याच्या फॅक्टरी सेटिंग्जवर रिस्टोअर करू शकता:

पायऱ्या:

  1. प्रिंटर बंद करा.
  2. PAUSE आणि FEED बटण एकाच वेळी दाबून ठेवा.
  3. PAUSE आणि FEED बटण दाबून ठेवताना, प्रिंटर चालू करा.
  4. केवळ स्टेटस इंडिकेटर प्रकाशित होईपर्यंत दाबून ठेवणे सुरू ठेवा.

प्रिंटर त्याच्या फॅक्टरी सेटिंग्जवर रीसेट होतो.

Zebra लेबल प्रिंटर ZD421 ट्रबलशूट करा

तुम्हाला तुमच्या Zebra लेबल प्रिंटर ZD421 मध्ये समस्या येत असल्यास, तुम्ही अनुभवत असलेली समस्या निवडा आणि त्यानंतर ट्रबलशूटिंगच्या पायऱ्या फॉलो करा.

बॅटरी पॅक काम करत नसल्यास ट्रबलशूट करा

तुमच्या प्रिंटरमध्ये बॅटरी पॅकचा पर्याय असल्यास आणि बॅटरी पॅक ओळखला जात नसल्यास, खालील पायऱ्यांसह ट्रबलशूट करा.

पायरी 1: प्रिंटरची सद्य फर्मवेअर आवृत्ती ओळखा

  1. प्रिंटर चालू करा.
  2. दोन सेकंदांसाठी FEED आणि CANCEL दाबा. “Printer and Network Configuration Reports” प्रिंट होतात आणि त्यानंतर प्रिंटर READY स्थितीला परत येतो.
  3. “Printer and Network Configuration Report” वरील Firmware Version लिहिलेली ओळ शोधा.

पायरी 2: प्रिंटरची फर्मवेअर आवृत्ती अपग्रेड करा

  1. ZD421 सिरीज प्रिंटर सपोर्ट डाउनलोड पेजवर तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमसाठी फर्मवेअर निवडा.
  2. तुमच्या हार्ड ड्राईव्हवर फर्मवेअर फाईल डाउनलोड करा आणि त्यानंतर डाउनलोड केलेली फाईल उघडून ओळखीच्या ठिकाणी सेव्ह करा.
  3. कॉन्फिगरेशन पुन्हा प्रिंट करून फर्मवेअर अपडेट्सची खात्री करा: दोन सेकंदांसाठी FEED आणि CANCEL दाबा.
  4. बॅटरी पॅक कनेक्ट करा आणि त्यानंतर ते काम करत आहे की नाही हे पाहण्यासाठी FEED बटण दाबा.

समस्या कायम राहिल्यास, Zebra Support शी संपर्क साधा.

लेबल प्रिंटिंगच्या समस्या ट्रबलशूट करा

तुम्हाला चुकीच्या ठिकाणी थांबणे किंवा प्रिंटिंग लेबल्सच्या मध्ये कोरे लेबल फीड करणे यांसारख्या लेबल प्रिंटिंगच्या एरर्स येत असल्यास, तुम्हाला मीडिया सेन्सर्स कॅलिब्रेट करण्याची आवश्यकता असेल.

मीडिया सेटिंग्ज तुम्ही वापरत असलेल्या मीडियाच्या प्रकाराशी जुळल्या पाहिजेत. Zebra च्या Identify Type of Media सपोर्ट पेजवर मीडिया प्रकार कसे ओळखावे याबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता.

समस्या कायम राहिल्यास, Zebra Support शी संपर्क साधा.

प्रिंटिंग किंवा फीडिंग करताना मीडिया अडकत असल्यास ट्रबलशूट करा

प्रिंटिंग किंवा फीडिंग करताना तुमच्या प्रिंटरचा मीडिया अडकत असल्यास, तुमचे प्रिंटहेड ओव्हरहीट (अतिगरम) होत असावे. तुम्ही खालील पायऱ्यांसह ट्रबलशूट करू शकता:

  • प्रिंट स्पीड किंवा डार्कनेस कमी करा.

  • योग्य व्हेंटिलेशन असल्याची आणि व्हेंट्स ब्लॉक झालेले नसल्याची खात्री करा.

  • प्रिंटहेड स्वच्छ करा.

  • तुम्ही मोठे जॉब्स प्रिंट करत असल्यास, बॅचेसमध्ये प्रिंट करण्याचा प्रयत्न करा.

निष्क्रियतेच्या कालावधीनंतर प्रिंटर डिस्कनेक्ट होत असल्यास ट्रबलशूट करा

काही काळ निष्क्रिय राहिल्यानंतर तुमचा प्रिंटर डिस्कनेक्ट झाल्यास, तुमचा प्रिंटर बंद करा आणि तो त्याच्या पॉवर सोर्सवरून अनप्लग करा. समस्या कायम राहिल्यास, तुम्हाला ZebraNet Print Server च्या Connection Time Out सेटिंगमध्ये डीफॉल्ट टाईमआउट मूल्य बदलण्याची आवश्यकता असू शकते. डीफॉल्ट टाईमआउट मूल्य 300 सेकंद (5 मिनिटे) असते, याचा अर्थ संवादाशिवाय 5 मिनिटे झाल्यावर, प्रिंटर कनेक्शन ड्रॉप करतो.

पायऱ्या:

  1. तुमच्या वेब ब्राउझरमध्ये तुमच्या प्रिंटरचा IP अ‍ॅड्रेस टाका.
  2. तुमच्या प्रिंटरमध्ये फर्मवेअर x.10 किंवा त्यापेक्षा उच्च आवृत्ती असल्यास, Printer Home Page विभागामध्ये, Print Server Settings निवडा. x.10 पेक्षा कमी असलेल्या फर्मवेअरसाठी, पायरी 3 वर जा.
  3. Status and Configuration विभागामध्ये, Print Server निवडा.
  4. लॉग इन क्रेडेंशियल्स टाका:
    • युझरनेम: admin
    • पासवर्ड: 1234
  5. TCP/IP Configuration निवडा आणि त्यानंतर Connection Timeout Checking विभागावर खाली स्क्रोल करा.
  6. डीफॉल्ट मूल्य Yes असते ज्याचा टाइमआउट 300 सेकंद असतो. तुम्ही खालील बदल करू शकता:
    • तुमच्या अ‍ॅपच्या गरजा पूर्ण करण्यासाठी टाइमआउट मूल्य बदला.
    • टाइमआउट तपासणी निष्क्रिय करण्यासाठी मूल्य No वर सेट करा (शिफारस केलेली नाही).
  7. Submit Changes वर क्लिक करा, त्यानंतर The unit must be reset for new values to take effect निवडा.
  8. जेव्हा तुम्हाला उपकरण रीसेट करण्यास सांगितले जाईल, तेव्हा Yes निवडा.