DHL eCommerce सह शिपिंग
जर तुम्ही कॉन्टिनेन्टल युनायटेड स्टेट्समधील फुलफिलमेंट लोकेशनवरून शिपिंग करत असाल, तर तुम्ही DHL eCommerce कडून शिपिंग लेबल्स खरेदी करू शकता आणि तुमची पॅकेजेस आंतरराष्ट्रीय पत्त्यांवर शिप करू शकता. तुमचे Shopify चे कोणतेही सबस्क्रिप्शन असले तरीही सर्व Shopify मर्चंट्ससाठी DHL eCommerce उपलब्ध आहे. तुमच्याकडून आकारले जाणारे शिपिंग दर DHL eCommerce मधील Shopify च्या खात्यावर आधारित असतात.
तुम्ही Managed Markets सोबत DHL eCommerce वापरत असल्यास, Managed Markets सह शिपिंग पेजचा संदर्भ घ्या.
या पेजवर
DHL eCommerce सह पॅकेजेस शिप करण्यासाठीच्या बाबी
DHL eCommerce वापरून शिप करण्यापूर्वी खालील बाबींचे पुनरावलोकन करा:
- जर तुमच्या स्टोअरमधील उत्पादनांमध्ये DHL eCommerce च्या प्रतिबंधित, मर्यादित आणि धोकादायक वस्तूंच्या सूचीतील कोणत्याही आयटमचा समावेश नसेल, तरच DHL eCommerce उपलब्ध असते. जर तुमच्या स्टोअरमध्ये यापैकी कोणतीही उत्पादने असतील, तर शिपिंग पर्याय म्हणून DHL eCommerce उपलब्ध नाही.
- तुम्ही DHL eCommerce शिपिंग लेबल्स प्रिंट करता तेव्हा, ती युनायटेड स्टेट्स पोस्टल सर्व्हिस (USPS) लेबल्स म्हणून प्रिंट केली जातात, कारण तुम्हाला तुमची शिपमेंट USPS च्या ड्रॉप-ऑफचे ठिकाणावर सोडावी लागते. USPS तुमची शिपमेंट DHL कडे ट्रान्सफर करते. याव्यतिरिक्त, जर USPS आधीपासूनच तुमच्या शिपिंगच्या ठिकाणाहून शिपमेंट्स पिक-अप करत असेल, तर ही पॅकेजेस तुमच्या इतर वितरणांसोबत USPS द्वारे पिक-अप केली जाऊ शकतात.
- DHL eCommerce शिपमेंट्सची ट्रॅकिंग माहिती शेवटच्या ट्रॅकिंग इव्हेंटनंतर 21 दिवसांसाठी उपलब्ध असते. कोणत्याही ॲक्टिव्हिटीशिवाय हा कालावधी संपल्यानंतर, शिपमेंट्सची ट्रॅकिंग माहिती काढून टाकली जाते.
- तपासणीसाठी DHL eCommerce सह शिप केलेली आंतरराष्ट्रीय पॅकेजेस उघडली जाऊ शकतात. तुम्ही DHL eCommerce सह शिप करत असल्यास, तुमच्या उत्पादनांसाठी सहज उघडता येईल आणि पुन्हा सील करता येईल असे पॅकेजिंग वापरण्याचा विचार करा. तुम्ही भेटवस्तू विकत असल्यास, ट्रान्झिटदरम्यान पॅकेजेस उघडली जाऊ शकतात अशी माहिती तुमच्या ग्राहकांना देण्याचा विचार करा.
DHL eCommerce साठी आंतरराष्ट्रीय शिपिंग सेवा
DHL eCommerce दोन सेवा देते, डायरेक्ट (Direct) आणि स्टँडर्ड (Standard). विविध पॅकेजच्या आवश्यकता आणि मूल्य निर्बंधांव्यतिरिक्त, या सेवा कोणत्या देशांत आणि प्रदेशांत पॅकेजेस पाठवली जाऊ शकतात आणि सेवा डिलिव्हर्ड ड्युटी पेड (DDP) शिपमेंट्सना सपोर्ट करते की नाही यानुसार वेगळ्या असतात. या दोन सेवांमधील फरकांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील तक्त्याचा संदर्भ घ्या.
| शिपिंग सेवा | DDP सपोर्ट | येथे शिप करते |
|---|---|---|
| DHL eCommerce Parcel Direct |
DDP ला सपोर्ट करते. DDP शिपिंग लेबल हे दर्शवते की विक्रेत्याने शुल्क, आयात कर आणि ब्रोकरेज फीसाठी पेमेंट समाविष्ट केले आहे. DDP बद्दल अधिक जाणून घ्या. DDP शिपमेंट पाठवण्यासाठी, तुम्हाला चेकआउटच्या वेळी आयात कर आणि शुल्क गोळा करावे लागेल आणि DDP शिपिंग लेबल्स खरेदी करावी लागतील. | ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युरोपियन युनियन, हाँगकाँग, इस्रायल, न्यूझीलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि युनायटेड किंगडमसह 37 सर्वात मोठ्या ई-कॉमर्स मार्केट्समध्ये शिप करते. |
| DHL eCommerce Parcel Standard | DDP ला सपोर्ट करत नाही. DHL eCommerce Parcel Standard वरील शिपमेंट्स DAP (डिलिव्हर्ड ॲट प्लेस) म्हणून पाठवल्या जाणे आवश्यक आहे, जे हे दर्शवते की शुल्क, आयात कर आणि ब्रोकरेज फी भरली गेलेली नाही आणि वितरणाच्या वेळी ग्राहकाकडून गोळा केली जाते. DAP बद्दल अधिक जाणून घ्या. | जगभरातील 220 हून अधिक देशांत आणि प्रदेशांत शिप करते. |
DHL eCommerce साठी पॅकेजच्या आवश्यकता
DHL eCommerce शिपमेंट्सच्या कमाल मोजमापांवर आणि वजनावर निर्बंध घालते. तुमच्या ऑर्डर्स या निर्बंधांच्या मर्यादेबाहेर जाणार नाहीत याची खात्री करण्यासाठी खालील तक्त्याचे पुनरावलोकन करा.
| मोजमाप | DHL eCommerce Parcel Direct | DHL eCommerce Parcel Standard |
|---|---|---|
| लांबी | 42 इंच (कॅनडामध्ये शिपिंग करताना 79 इंच) | 47 इंच |
| रुंदी | DHL eCommerce Parcel Direct साठीचा आकार (लांबी + घेर) वापरून मोजला जातो. आकाराची एकूण मर्यादा 79 इंच आहे (कॅनडामध्ये शिपिंग करताना 118 इंच). | 24 इंच |
| उंची | 24 इंच | |
| वजन | 44 lbs (कॅनडामध्ये शिपिंग करताना 66 lbs) | 44 lbs (कॅनडामध्ये शिपिंग करताना 66 lbs) |
DHL eCommerce प्रतिबंधित आयटम्स
तुम्ही कुठे शिपिंग करत आहात यावर अवलंबून काही आयटम्स आणि वस्तूंवर निर्बंध आहेत. DHL eCommerce च्या प्रतिबंधित, मर्यादित आणि धोकादायक वस्तूंच्या पेज चा संदर्भ घ्या आणि तुम्हाला तुमच्या गंतव्यस्थानाच्या देशाच्या शिपिंग नियमांची माहिती असल्याची खात्री करा.
जर तुमचे स्टोअर DHL eCommerce ने ठरवलेले कोणतेही प्रतिबंधित आयटम्स विकत असेल, तर तुम्ही DHL eCommerce वापरून शिप करू शकत नाही.
मोफत DHL शिपिंग साहित्य
तुम्ही ShopifyMPSupplies@dhl.com वर DHL ला ईमेल करून मोफत शिपिंग साहित्याची ऑर्डर देऊ शकता. ही लिंक तुमच्या पसंतीच्या ईमेल क्लायंटमध्ये एक टेम्पलेट ईमेल उघडते:
DHL eCommerce साठी मूल्य निर्बंध
DHL eCommerce Parcel Direct आणि DHL eCommerce Parcel Standard असलेल्या शिपमेंटसाठी ऑर्डरचे कमाल मूल्य $1,000 USD आहे. काही देश आणि प्रदेश या मर्यादेला अपवाद आहेत.
| गंतव्यस्थान | DHL eCommerce Parcel Direct | DHL eCommerce Parcel Standard |
|---|---|---|
| ऑस्ट्रेलिया | 1,000 AUD | 2,000 AUD |
| कॅनडा | $3,300 CAD | $2,500 CAD |
| चीन | लागू नाही | 1,000 CNY |
| जर्मनी | €1,000 EUR | €1,000 EUR |
| न्यूझीलंड | 1,000 NZD | 1,000 NZD |
| युनायटेड किंगडम | £2,500 GBP | £900 GBP |
दागिने किंवा घड्याळांसारख्या काही उत्पादन श्रेणींमधील प्रत्येक वैयक्तिक आयटमचे मूल्य $5,000 USD पेक्षा जास्त असू शकत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही दागिने विकत असल्यास, तुम्ही तरीही ऑर्डरच्या कमाल मूल्यापर्यंतचे शिपिंग लेबल खरेदी करू शकता, परंतु वैयक्तिक दागिन्यांच्या आयटम्सचे मूल्य $5,000 USD पेक्षा जास्त नसेल, याची तुम्हाला खात्री करणे आवश्यक आहे.
तुमची उत्पादने DHL eCommerce पर्यंत पोहोचवणे
जर तुम्ही DHL eCommerce वापरत असाल, तर तुम्हाला तुमची शिपमेंट एखाद्या USPS च्या ड्रॉप-ऑफच्या ठिकाणी सोडावी लागेल किंवा USPS कडून ती शिपमेंट पिकअप करून घ्यावी लागेल. आवर्ती पिकअपसह, USPS पिकअप सेवांबद्दल अधिक जाणून घ्या. USPS तुमची शिपमेंट DHL कडे ट्रान्सफर करते.
USPS च्या ड्रॉप-ऑफच्या ठिकाणी ड्रॉप ऑफ करण्यास सपोर्ट करणारी DHL eCommerce ही एकमेव सेवा आहे. तुम्ही तुमची पॅकेजेस USPS च्या ठिकाणी वितरित करत असल्यास, तुम्ही तुमची DHL eCommerce पॅकेजेस DHL Express, UPS किंवा FedEx च्या पॅकेजेसमध्ये एकत्र करत नाही आहात, याची खात्री करा.
DHL eCommerce साठी शिपिंग कव्हरेज
जर एखादी शिपमेंट हरवली असेल किंवा तिचे नुकसान झाले असेल, तर Shopify ॲडमिनमध्ये शिपिंगचा क्लेम सबमिट करा.
DHL eCommerce ने त्यांच्या वितरणाच्या केंद्रांपैकी एका ठिकाणी पॅकेज पहिल्यांदा स्कॅन केल्याच्या तारखेपासून 90 दिवसांच्या आत DHL eCommerce क्लेम्स सबमिट केले जाणे आवश्यक आहे. जर एखादे पॅकेज खराब झालेल्या अवस्थेत आले, तर शिपिंग सेवा कोणतीही असो तुम्ही लगेच क्लेम सबमिट करू शकता. DHL eCommerce पॅकेजेस वाहकाकडून स्वीकारली गेल्यानंतर 45 दिवसांनंतरच हरवलेल्या क्लेमसाठी पात्र असतात. जर पॅकेज इटलीला पाठवले असेल तर हा कालावधी 60 दिवसांचा असतो. DHL eCommerce च्या हरवलेल्या क्लेमच्या सूचनांबद्दल अधिक जाणून घ्या.
तुम्ही DHL eCommerce द्वारे शिपिंग लेबल खरेदी करता, तेव्हा इन्शुरन्सचा समावेश असतो. इन्शुरन्स कव्हरेजचा समावेश असलेल्या शिपिंग सेवा उत्पादनाचे एकत्रित मूल्य आणि शिपिंग लेबलच्या खर्चापैकी जास्तीत जास्त $100 USD कव्हर करतात.
तुमच्या क्लेममध्ये खालील माहिती समाविष्ट करा:
- प्राप्तकर्त्याचा फोन नंबर
- पॅकेज हरवल्याची किंवा खराब झाल्याची पुष्टी करणाऱ्या तुमच्या ग्राहकाचे मेसेजेस प्रदर्शित करणारा स्क्रीनशॉट
खराब झालेल्या पॅकेजेससाठी, तुम्हाला खालील माहितीदेखील समाविष्ट करावी लागेल:
- नुकसानीचे वर्णन
- खराब झालेले पॅकेज आणि उत्पादनांचे फोटो