Evri सह शिपिंग
जर तुम्ही युनायटेड किंगडममधील फुलफिलमेंट लोकेशनवरून शिपिंग करत असाल, तर तुम्ही Evri कडून शिपिंग लेबल्स खरेदी करू शकता. तुम्ही ड्रॉप-ऑफच्या ठिकाणी पॅकेजेस ड्रॉप करू शकता आणि त्यांना देशांतर्गत शिप करू शकता.
तुमच्याकडून आकारले जाणारे शिपिंग दर Evri सोबतच्या Shopify च्या खात्यावर आधारित असतात.
या पेजवर
Evri सह पॅकेजेस शिपिंग करण्यासाठीच्या बाबी
Evri सह शिपिंग करताना खालील बाबींचे पुनरावलोकन करा:
- Evri सह शिपिंग हे केवळ युनायटेड किंगडममध्ये देशांतर्गत शिप करते आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांना सपोर्ट करत नाही.
- चॅनेल आयलंड्स, PO बॉक्सेस किंवा ब्रिटिश फोर्सेस पोस्ट ऑफिसच्या ठिकाणांवरील शिपमेंट्सना Evri सपोर्ट करत नाही.
- Evri मध्ये पिकअप्स उपलब्ध नाहीत. तुम्हाला तुमची पॅकेजेस एखाद्या Evri पार्सल ड्रॉप ऑफच्या ठिकाणी ड्रॉप करावी लागतील.
- Evri शिपिंग लेबल्स खरेदी करण्यासाठी, तुमचे फुलफिलमेंट लोकेशन युनायटेड किंगडममध्ये असणे आवश्यक आहे.
- तुमचे शिपमेंट्स Evri च्या पॅकेजिंग मानकांची पूर्तता करतात याची खात्री करण्यासाठी पार्सल कसे रॅप करावे यावरील Evri च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पुनरावलोकन करा
- तुम्ही शिप करत असलेली उत्पादने Evri च्या प्रतिबंधित आयटम्सच्या आवश्यकतांची पूर्तता करत असल्याची खात्री करा.
- Evri इंटिग्रेशन फक्त लेबल्सच्या खरेदीला सपोर्ट करते. चेकआउटसाठी कोणतेही कॅरियरने कॅल्क्युलेट केलेले दर उपलब्ध नाहीत.
तुमची उत्पादने Evri ला पोहोचवणे
तुम्ही तुमची उत्पादने myEvri ParcelShop च्या ठिकाणी ड्रॉप करू शकता. तुमचे सर्वात जवळचे ParcelShop चे ठिकाण शोधा.
सध्या, Shopify मध्ये Evri सह पिकअपला सपोर्ट केले जात नाही.
Evri सह देशांतर्गत शिपिंग
| शिपिंग सेवा | डिलिव्हरीची टाइमलाइन | वर्णन |
|---|---|---|
| Evri Parcel Shop ड्रॉप ऑफ | 2 कामकाजाचे दिवस | युनायटेड किंगडममधील तुमच्या ग्राहकाच्या पत्त्यावर स्टँडर्ड शिपिंग |
| Evri Parcel Shop ड्रॉप ऑफ नेक्स्ट डे | 1-2 कामकाजाचे दिवस | युनायटेड किंगडममधील तुमच्या ग्राहकाच्या पत्त्यावर एक्सप्रेस शिपिंग |
Evri च्या देशांतर्गत शिपमेंट्ससाठी पॅकेजच्या आवश्यकता
देशांतर्गत शिपमेंट्ससाठी Evri ने अनुमती दिलेली कमाल मूल्ये खालीलप्रमाणे आहेत:
- कमाल वजन 15 kg (33 lb) आहे
- कमाल लांबी आणि घेर 245 cm (96.5 inches) आहे
पॅकेजच्या आवश्यकतांबद्दल अधिक माहितीसाठी, Evri च्या वेबसाइटचा संदर्भ घ्या.
Evri पिकअप पॉइंट्स
Evri सह पिकअप पॉइंटवर डिलिव्हर करण्यासाठी, तुम्ही प्रथम पिकअप पॉइंटवर शिपिंग सेट करणे आवश्यक आहे.
तुम्ही पिकअप पॉइंटवर डिलिव्हर करू शकणारी ठिकाणे निवडल्यानंतर आणि तुमचे दर संपादित केल्यानंतर, तुमचे ग्राहक त्यांची डिलिव्हरी पद्धत म्हणून पिकअप पॉइंटवर शिप करा निवडू शकतात आणि त्यानंतर त्यांना त्यांची ऑर्डर ज्या पिकअप पॉइंटवर डिलिव्हर करायची आहे तो पिकअप पॉइंट निवडू शकतात.
पॅकेजेस Evri ParcelShop च्या ठिकाणांवरून पिकअप केली जाऊ शकतात. पिकअप पॉइंटवर शिपमेंट डिलिव्हर झाल्यानंतर, त्यांच्या ग्राहकाला त्यांचा शिपमेंट पिकअपसाठी तयार असल्याचा SMS किंवा ईमेल मिळतो. तुमच्या ग्राहकाने ठराविक कालावधीत पिकअप पॉइंटवरून त्यांचे शिपमेंट कलेक्ट न केल्यास, Evri आपोआप शिपमेंट सेंडरला परत करते.
दोन Evri शिपिंग सेवा पिकअप पॉइंटवर डिलिव्हर करतात:
| शिपिंग सेवा | वर्णन |
|---|---|
| Evri Shop to Shop | तुमच्या ग्राहकाने कलेक्ट करण्यासाठी Evri ParcelShop पर्यंत स्टँडर्ड शिपिंग |
| Evri Shop to Shop नेक्स्ट डे | तुमच्या ग्राहकाने कलेक्ट करण्यासाठी Evri ParcelShop पर्यंत एक्सप्रेस शिपिंग |
Evri च्या पिकअप पॉइंट्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील टेबलचे पुनरावलोकन करा:
| पिकअप पॉइंट | वर्णन |
|---|---|
| ParcelShop | Evri ParcelShop नेटवर्कचा भाग असलेली कोपऱ्यावरील दुकाने, फ्युएल स्टेशन्स आणि स्वतंत्र व्यवसाय. पॅकेजेस 10 दिवसांच्या आत पिकअप करणे आवश्यक आहे. |
Evri च्या शिपमेंट्ससाठी शिपिंग क्लेम्स सबमिट करणे
तुम्ही Shopify द्वारे Evri वापरत असल्यास आणि तुमचे Evri शिपमेंट हरवल्यास किंवा खराब झाल्यास, तुम्ही Shopify सपोर्टकडे शिपिंग क्लेम सबमिट करू शकता.
Evri शिपमेंट्ससाठी समाविष्ट असलेले इन्शुरन्स कव्हरेज
Evri हरवलेल्या आणि खराब झालेल्या पॅकेजेससाठी £25 GBP पर्यंत कव्हरेज ऑफर करते. लेबलच्या खर्चाची परतफेड केली जात नाही.
हरवलेल्या किंवा खराब झालेल्या Evri शिपमेंट्ससाठी शिपिंग क्लेम सबमिट करा
तुम्ही हरवलेल्या आणि खराब झालेल्या Evri शिपमेंट्ससाठी क्लेम सबमिट करू शकता. शिपिंग लेबल तयार केल्याच्या तारखेपासून 23 दिवसांच्या आत क्लेम्स करणे आवश्यक आहे. शिपमेंटला वितरित (delivered) म्हणून मार्क केले असल्यासच डॅमेज क्लेम्स पात्र असतात, शिपमेंट टाकून दिले/नष्ट केले असल्यास ट्रान्झिट डॅमेजसाठी कोणतेही कव्हरेज मिळत नाही. उशिरा आलेल्या शिपमेंट्ससाठी किंवा गहाळ आयटम्स असलेल्या शिपमेंट्ससाठीच्या क्लेम्सना सपोर्ट केले जात नाही. Evri ने एखाद्या शिपमेंटला Return to Sender म्हणून स्कॅन केले असल्यास, असे शिपमेंट यापुढे क्लेमसाठी पात्र राहत नाही.
Evri कडे शिपिंग क्लेम उघडण्यासाठी, Shopify ॲडमिनमध्ये शिपिंग क्लेम सबमिट करा.
तुमच्या क्लेममध्ये खालील माहिती समाविष्ट करा:
- डिलिव्हरीच्या पत्त्याचा पोस्टकोड
- शिपमेंटमधील आयटम्सचे मूल्य
- आयटम्ससाठीची उत्पादन श्रेणी, जसे की “Clothing and accessories - Footwear”
- प्रत्येक उत्पादनाचे वर्णन, जसे की “तपकिरी रंगाचे, 5 आकाराचे बूट”
- क्लेमचा तपशील, जसे की एखादा आयटम हरवला होता किंवा खराब झाला होता
खराब झालेल्या शिपमेंट्ससाठी, तुम्हाला खालील माहितीदेखील समाविष्ट करणे आवश्यक आहे:
- नुकसान दर्शवणारे किमान दोन फोटो:
- खराब झालेल्या उत्पादनाचा एक फोटो
- शिपिंग पॅकेजच्या स्थितीचा एक फोटो
ज्या हरवलेल्या शिपमेंट्सचे ट्रॅकिंग वितरित (delivered) झाल्याचे दर्शवते, त्यांच्यासाठी तुम्ही ग्राहकाकडून स्वाक्षरी केलेली डिनायल ऑफ रिसीट (DOR) देखील समाविष्ट करणे आवश्यक आहे.
तुमच्या Evri शिपमेंटसाठी डिनायल ऑफ रिसीट मिळवा
एखादे शिपमेंट वितरित झाल्याचे मार्क केले असल्यास, पण ग्राहकाने ते न मिळाल्याची तक्रार केल्यास, क्लेम सबमिट करण्यापूर्वी तुम्ही ग्राहकाकडून स्वाक्षरी केलेली डिनायल ऑफ रिसीट (DOR) मिळवणे आवश्यक आहे.
पायऱ्या:
- Evri चा डिनायल ऑफ रिसीट फॉर्म डाउनलोड करा आणि तुमच्या ग्राहकाला पाठवा.
- तुमच्या ग्राहकाला फॉर्म प्रिंट करण्यास आणि स्वाक्षरीसह तो पूर्णपणे हाताने भरण्यास सांगा. टाइप केलेले किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
- तुमच्या ग्राहकाला पूर्ण केलेला फॉर्म तुम्हाला स्पष्ट फोटोच्या स्वरूपात परत पाठवण्यास सांगा. केवळ पूर्ण भरलेले फॉर्म्स स्वीकारले जातात.
- स्वाक्षरी केलेली DOR मिळाल्यानंतर, तुम्ही ती तुमच्या क्लेम सबमिशनमध्ये समाविष्ट करू शकता.
Evri शिपमेंट्ससाठी सपोर्ट मिळवणे
तुमचे शिपमेंट Evri ला दिल्यानंतर, शिपमेंट रिरूट करण्याचा प्रयत्न करणे किंवा ॲडजस्टमेंटबद्दल विवाद करणे यांसारख्या मदतीसाठी, तुम्ही Shopify सपोर्टशी संपर्क साधू शकता.
तुमचे Evri शिपमेंट रिरूट करणे
Evri ने स्वीकारलेले शिपमेंट परत करणे किंवा वेगळ्या डिलिव्हरीच्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक असल्यास, तुम्ही शिपमेंट रिरूट करण्याची विनंती करू शकता. रिरूट करण्याच्या विनंत्यांच्या प्रक्रियेला लागणारा वेळ आणि शिपमेंटमध्ये गुंतलेल्या विविध पक्षांमुळे, शिपमेंट्स रिरूट करणे नेहमीच शक्य नसते.
शिपमेंटला पुन्हा लेबल लावण्याची आवश्यकता असल्याशिवाय शिपमेंट थांबवण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. एखादे शिपमेंट तुम्हाला परत करणे आवश्यक असल्यास, अतिरिक्त डिलिव्हर न केल्याचे शुल्क लागू होते.
जेव्हा तुम्ही Shopify सपोर्टशी संपर्क साधता, तेव्हा तुमच्याकडे खालील माहिती असल्याची खात्री करा:
- ट्रॅकिंग नंबर (ज्याला Evri बारकोड असेही म्हणतात)
- वितरणाचा नवीन पत्ता
Evri शिपमेंटसाठीच्या अॅडजस्टमेंटवर आक्षेप नोंदवणे
तुमच्याकडून चुकीच्या पद्धतीने अॅडजस्टमेंट आकारली गेल्यास, जसे की शिपमेंटचे चुकीचे वजन किंवा जास्त आकाराचे पॅकेज याबद्दलची अॅडजस्टमेंट, तर तुम्ही अॅडजस्टमेंटवर आक्षेप नोंदवू शकता.
जेव्हा तुम्ही Shopify सपोर्टशी संपर्क साधता, तेव्हा तुमच्याकडे खालील माहिती असल्याची खात्री करा:
- ट्रॅकिंग नंबर (ज्याला Evri बारकोड असेही म्हणतात)
- आक्षेप घेण्याचे कारण
- शिपमेंटचे मोजमाप आणि वजन दर्शवणारा इमेजेससारखा कोणताही आधारभूत पुरावा
फोटो प्रत्यक्ष पॅकेजचे असणे आवश्यक आहे, एकतर मूळ किंवा पुन्हा तयार केलेले. AI वापरून तयार केलेल्या इमेज आणि इतर सिम्युलेटेड इमेज पुरावा म्हणून स्वीकारल्या जात नाहीत.