कॅनडामध्ये UPS सह शिपिंग

जर तुम्ही कॅनडामधील एखाद्या ठिकाणाहून शिपिंग करत असाल, तर तुम्ही UPS कडून शिपिंग लेबल्स खरेदी करू शकता. तुम्ही तुमची पॅकेजेस कॅनडामध्ये देशांतर्गत, युनायटेड स्टेट्सला आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर शिप करू शकता.

तुमच्याकडून आकारले जाणारे शिपिंग दर Shopify च्या UPS मधील खात्यावर आधारित असतात.

UPS सह पॅकेजेस शिपिंग करण्यासाठी विचारात घेण्यासारख्या बाबी

UPS सह शिपिंग करताना खालील बाबींचे पुनरावलोकन करा:

  • UPS शिपिंगचे मूळ स्थान किंवा गंतव्यस्थान म्हणून PO बॉक्स पत्त्यांना सपोर्ट करत नाही.
  • तुम्ही तुमची पॅकेजेस कॅनडामध्ये, युनायटेड स्टेट्सला आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर शिप करू शकता. उपलब्ध असलेल्या सेवा गंतव्यस्थानानुसार बदलतात.
  • कॅनडामध्ये Shopify द्वारे UPS सह पॅकेज पिकअप्स उपलब्ध नाहीत.
  • UPS शिपिंग लेबल्स खरेदी करण्यासाठी, तुमच्याकडे कॅनडामध्ये आधारित फुलफिलमेंट लोकेशन असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही तंबाखू, मद्यपी पेये, धोकादायक वस्तू किंवा लिथियम बॅटरी यांसारखी नियंत्रित उत्पादने शिप करू शकत नाही.
  • UPS शिपिंग लेबल खरेदी करताना, तुम्ही फार्मास्युटिकल्स शिप करत आहात की नाही याची पुष्टी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही फार्मास्युटिकल्स शिप करत असाल, तर तुम्ही फार्मास्युटिकल्सची विक्री आणि शिपिंग करण्यासाठी स्थानिक आणि गंतव्यस्थानाच्या कायद्यांचे पालन करत आहात हे तुम्हाला मान्य करावे लागेल.
  • UPS कॅनडा एकत्रीकरण केवळ लेबल खरेदीला सपोर्ट करते. चेकआउटसाठी कोणतेही कॅरियरने कॅल्क्युलेट केलेले दर उपलब्ध नाहीत.

तुमची उत्पादने UPS पर्यंत पोहोचवणे

तुम्ही तुमची उत्पादने UPS ड्रॉप-ऑफच्या ठिकाणी सोडू शकता.

रिटर्न पत्ते

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा Shopify द्वारे UPS लेबल खरेदी करता, तेव्हा तुम्हाला रिटर्न पत्ता एंटर करण्यास सांगितले जाते. जर एखादे UPS शिपमेंट रिटर्न करण्याची आवश्यकता असेल किंवा प्राप्तकर्त्याने ते नाकारले असेल, तर UPS लेबलवरील रिटर्न पत्त्यावर न देता, सेटअप दरम्यान तुम्ही एंटर केलेल्या रिटर्न पत्त्यावर शिपमेंट वितरित करते.

तुम्हाला तुमचा रिटर्न पत्ता बदलण्याची आवश्यकता असल्यास, तुमच्या नवीन रिटर्न पत्त्यासह Shopify सपोर्टशी संपर्क साधा.

UPS सह देशांतर्गत शिपिंग

UPS चे वितरण संपूर्ण कॅनडामध्ये सोमवार ते शुक्रवार केले जाते. UPS Standard चे वितरण शनिवारी काही महानगरीय क्षेत्रांमध्ये उपलब्ध असते. तुम्ही UPS वेबसाइटचा संदर्भ घेऊन तुमच्या ग्राहकाचा पत्ता यापैकी एका क्षेत्रात आहे की नाही हे तपासू शकता.

तुम्ही खालील UPS शिपिंग सेवा वापरून पॅकेजेस देशांतर्गत शिप करू शकता:

UPS च्या देशांतर्गत शिपिंग सेवा प्रकारांचे वर्णन
शिपिंग सेवावितरणाची टाइमलाइनवर्णन
UPS Standard1-5 व्यावसायिक दिवसकॅनडामध्ये लहान पॅकेजेस शिप करण्याचा एक किफायतशीर मार्ग
UPS Expedited2 व्यावसायिक दिवसकॅनडामध्ये ज्या ऑर्डर्ससाठी रातोरात सेवेची आवश्यकता नाही, त्या लवकर शिप करा
UPS Expressपुढील व्यावसायिक दिवसपुढील व्यावसायिक दिवशी पोहोचणाऱ्या ऑर्डर्स शिप करा
UPS Express Earlyपुढील व्यावसायिक दिवशी सकाळीसकाळी पोहोचण्यासाठी ऑर्डर्स रातोरात शिप करा
UPS Express Saverपुढील व्यावसायिक दिवशी दुपारीबहुतेक महानगरीय क्षेत्रांमध्ये पुढील व्यावसायिक दिवशी दुपारी पोहोचण्यासाठी ऑर्डर्स शिप करा

UPS च्या देशांतर्गत शिपिंग दरांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, UPS च्या देशांतर्गत शिपिंग वेबसाइटचा संदर्भ घ्या.

UPS च्या देशांतर्गत शिपमेंट्ससाठी पॅकेजच्या आवश्यकता

खालीलप्रमाणे कमाल मूल्ये आहेत जी UPS देशांतर्गत शिपमेंट्ससाठी अनुमती देते:

  • कमाल वजन 150 lb (68 kg) आहे
  • एकत्रित कमाल लांबी आणि घेर 165 इंच (419 cm) आहे
  • कमाल लांबी 108 इंच (274 cm) आहे

पॅकेजच्या आवश्यकतांबद्दल अधिक माहितीसाठी, UPS वेबसाइटचा संदर्भ घ्या.

कॅनडातील UPS रिटर्न लेबल

तुम्ही कॅनडातील एखाद्या ठिकाणाहून शिपिंग करत असाल, तर थेट Shopify ॲडमिनमधून UPS रिटर्न लेबल तयार करून खरेदी करू शकता. रिटर्न लेबल कसे तयार करायचे आणि पाठवायचे हे जाणून घेण्यासाठी रिटर्न लेबल खरेदी करणे पहा.

कॅनडातील UPS रिटर्न लेलबाबत पुढील बाबी लक्षात घ्या:

  • फक्त कॅनडातील देशांतर्गत रिटर्नची सुविधा उपलब्ध आहे. अमेरिकेतून किंवा इतर देशांतून होणाऱ्या रिटर्नसाठी तुम्ही UPS रिटर्न लेबल खरेदी करू शकत नाही.
  • UPS शिपिंग लेबलप्रमाणेच त्याच देशांतर्गत शिपिंग सेवांसाठी रिटर्न लेबल उपलब्ध आहेत: UPS Standard, UPS Expedited, UPS Express, UPS Express Early आणि UPS Express Saver.
  • रिटर्न लेबलसाठी Shopify चे सवलतीचे UPS दर लागू होतात.
  • रिटर्न लेबलमध्ये UPS शिपिंग लेबलप्रमाणेच $100 CAD पर्यंतचे विमा संरक्षण समाविष्ट असते.
  • रिटर्न शिपमेंट हरवल्यास किंवा तिचे नुकसान झाल्यास, नुकसानभरपाईचा दावा सबमिट करण्यासाठी Shopify सपोर्टशी संपर्क साधा. रिटर्न लेबलच्या दाव्यांना UPS शिपिंग लेबलच्या दाव्यांप्रमाणेच नियम लागू होतात. वितरण झाल्यापासून 60 दिवसांच्या आत किंवा पॅकेजचे वितरण झाले नसेल तर नियोजित वितरणाच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत UPS कडे दावे पोहोचले पाहिजेत. समस्या लक्षात येताच Shopify सपोर्टशी संपर्क साधा, कारण तुमचा दावा UPS कडे पाठवण्यासाठी Shopify सपोर्टला वेळ लागतो.
  • UPS रिटर्न लेबलसाठी स्कॅन केल्यावर शुल्क आकारण्याची बिलिंग पद्धत वापरली जाते. त्यामुळे वाहकाने पॅकेज स्कॅन केले तरच तुमच्याकडून शुल्क आकारले जाते. रिटर्न लेबलचे शुल्क तुमच्या Shopify खात्यावर आकारले जाते.
  • UPS रिटर्न लेबलांची मुदत खरेदीनंतर 6 महिन्यांनी संपते आणि न वापरलेल्या लेबलांसाठी तुमच्याकडून शुल्क आकारले जात नाही. रिटर्न लेबलच्या URL ची मुदत 30 दिवसांनी संपते, त्यामुळे लेबल 30 दिवसांच्या आत वापरणार नसाल तर ते प्रिंट करा किंवा सेव्ह करा.

कॅनडामध्ये UPS सह आंतरराष्ट्रीय शिपिंग

तुम्ही कॅनडामधून युनायटेड स्टेट्सला आणि इतर आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांवर पॅकेजेस शिप करू शकता. खालील UPS शिपिंग सेवा उपलब्ध आहेत आणि तुम्हाला कोणत्या सेवा दिसतात हे तुमच्या ग्राहकाच्या गंतव्यस्थानावर अवलंबून असते:

कॅनडाबाहेरील गंतव्यस्थानांसाठी UPS शिपिंग सेवा प्रकारांचे वर्णन
शिपिंग सेवागंतव्यस्थाने
UPS Worldwide Expressयुनायटेड स्टेट्स आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थाने
UPS Worldwide Express Saverयुनायटेड स्टेट्स आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थाने
UPS Worldwide Expeditedयुनायटेड स्टेट्स आणि आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थाने
UPS Express Air Early AMयुनायटेड स्टेट्स
UPS Standard U.S.युनायटेड स्टेट्स
UPS 3 Day Selectयुनायटेड स्टेट्स

जेव्हा तुम्ही कॅनडाबाहेर शिप करता, तेव्हा तुमच्या ग्राहकांना शुल्क, कर आणि ब्रोकरेज फी लागू होऊ शकतात.

UPS शिपमेंट्ससाठी शिपिंग क्लेम्स सबमिट करणे

जर तुम्ही कॅनडामध्ये शिपिंग लेबल्ससह UPS वापरत असाल आणि तुमचे UPS शिपमेंट गहाळ झाले असेल किंवा त्याचे नुकसान झाले असेल, तर तुम्ही Shopify सपोर्टकडे शिपिंग क्लेम सबमिट करू शकता.

UPS शिपमेंट्ससाठी समाविष्ट असलेले विमा कव्हर

जेव्हा तुम्ही UPS कडून शिपिंग लेबल खरेदी करता तेव्हा विम्याचा समावेश असतो. ज्या शिपिंग सेवांमध्ये विमा कव्हरचा समावेश असतो, त्या कमाल $100 CAD पर्यंत कव्हर देतात.

गहाळ झालेल्या किंवा नुकसान झालेल्या UPS शिपमेंट्ससाठी शिपिंग क्लेम सबमिट करणे

जर एखादे शिपमेंट गहाळ झाले असेल किंवा त्याचे नुकसान झाले असेल, तर Shopify ॲडमिनमध्ये शिपिंग क्लेम सबमिट करा.

पॅकेज गहाळ झाल्याचे किंवा त्याचे नुकसान झाल्याचे लक्षात येताच तुम्ही तुमचा क्लेम सबमिट केला पाहिजे. UPS ला पॅकेजच्या वितरणानंतर 60 दिवसांच्या आत किंवा, पॅकेज गहाळ झाल्यास, शेड्यूल केलेल्या वितरणाच्या तारखेनंतर 60 दिवसांच्या आत क्लेमची सूचना मिळणे आवश्यक आहे. दायित्वाचा कालावधी संपण्यापूर्वी तुमच्या क्लेमवर प्रक्रिया करण्यासाठी आणि तो UPS कडे पाठवण्यासाठी Shopify सपोर्टला देखील वेळेची आवश्यकता असते.

तुमच्या दाव्यामध्ये खालील माहितीचा समावेश करा:

  • समस्येचे वर्णन
  • प्राप्तकर्त्याचा फोन नंबर

खराब झालेल्या पॅकेजेससाठी, तुम्हाला खालील माहितीचा देखील समावेश करणे आवश्यक आहे:

  • नुकसानीचे वर्णन
  • सध्या पॅकेज आणि त्यातील सामग्री कोणाकडे आहे
  • UPS द्वारे तपासणीसाठी शिपमेंट उपलब्ध आहे का
  • शिपमेंटसाठी कोणत्या प्रकारचे बाह्य आणि अंतर्गत पॅकेजिंग आणि सामग्री वापरली गेली
  • पॅकेज कसे सील केले गेले होते
  • सामग्रीचे मूल्य दर्शवणारे इन्व्हॉइस किंवा ऑर्डरची पुष्टी पेजचा स्क्रीनशॉट

नुकसानीच्या दाव्याचे पुनरावलोकन करण्यासाठी UPS ला खालील तीन फोटोंची देखील आवश्यकता असते:

  • नुकसानीचे स्वरूप दाखवणारी पॅकेजची बाहेरची बाजू किंवा बाहेरून नुकसान न झाल्यास पॅकेजचा वरचा आणि दोन्ही बाजूंचा भाग
  • पॅकेजमधील सर्व सामग्रीसह आयटम कसा पॅक केला होता, हे दाखवणारे खराब झालेले आयटम आणि पॅकेजिंग सामग्री
  • पॅकेजवरील शिपिंग लेबलचा क्लोज-अप, ज्यावर ट्रॅकिंग नंबर वाचता येईल

जर शिपमेंट तुमच्या ग्राहकाकडे असेल, तर त्यांना मूळ बॉक्स आणि पॅकेजिंग आणि तपासणीसाठी मिळालेली कोणतीही खराब झालेली सामग्री ठेवण्यास सांगा. नुकसानीच्या दावा प्रक्रियेचा भाग म्हणून UPS सामग्री आणि मूळ पॅकेजिंगच्या नुकसानीच्या तपासणीची विनंती करू शकते.

उशिरा आलेल्या UPS पॅकेजेससाठी शिपिंग दावा सबमिट करणे

हमी दिलेल्या वितरणाला सपोर्ट करणाऱ्या सेवेसह पाठवलेली शिपमेंट उशिरा आल्यास, तुम्ही Shopify ॲडमिनमध्ये शिपिंग दावा सबमिट करू शकता.

नियोजित वितरणाच्या तारखेपासून 15 कॅलेंडर दिवसांच्या आत तुम्ही लेबल खर्चाच्या परताव्यासाठी तुमचा दावा करणे आवश्यक आहे. वितरणाची तारीख ही ups.com ट्रॅकिंग तपशीलांमध्ये किंवा तुमच्या वितरणाच्या पुराव्यामध्ये सूचीबद्ध केलेली तारीख असते, यापैकी जी नंतरची असेल ती ग्राह्य धरली जाते. UPS वितरणे सोमवार ते शुक्रवार या कालावधीत केली जातात.

तुमच्या दाव्यामध्ये खालील माहितीचा समावेश करा:

  • UPS ला पॅकेज प्राप्त झाल्याची तारीख आणि पॅकेज ज्या तारखेपर्यंत वितरित केले जावे ती नवीनतम तारीख
  • प्राप्तकर्त्याचा फोन नंबर

UPS शिपमेंटसाठी सपोर्ट मिळवणे

तुमचे UPS शिपमेंट थांबवण्यासाठी किंवा पॅकेजचा मार्ग बदलण्यासाठी मदत मिळवण्यासाठी, Shopify सपोर्टशी संपर्क साधा.

UPS शिपमेंटसाठी सपोर्टची विनंती करणे

जर तुम्ही शिपिंग लेबल्ससह UPS वापरत असाल आणि तुम्हाला मदतीची आवश्यकता असेल, तर कोणाशी संपर्क साधायचा हे जाणून घेण्यासाठी खालील टेबलचा संदर्भ घ्या.

तुमच्या गरजांवर आधारित तुम्हाला UPS आणि शिपिंग लेबल्सबद्दल मदतीची आवश्यकता असते तेव्हा कोणाशी संपर्क साधावा
परिस्थितीसंपर्क
लेबल खरेदी करण्यापूर्वी मदत मिळवा.Shopify सपोर्ट
लेबल खरेदी केल्यानंतर मदत मिळवा, जसे की पॅकेज थांबवणे किंवा त्याचा मार्ग बदलणे.Shopify सपोर्ट
दावा सबमिट करा.Shopify ॲडमिनद्वारे UPS कडे शिपिंग दावा सबमिट करा
शिपिंग ॲडजस्टमेंटबद्दल विवाद करा.Shopify सपोर्ट