Order Printer टेम्पलेट्स सानुकूलित करणे

तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये Order Printer अ‍ॅपसाठी 15 पर्यंत टेम्पलेट्स तयार आणि सानुकूलित करू शकता. बाय डीफॉल्ट, Order Printer अ‍ॅपमध्ये दोन टेम्पलेट्स समाविष्ट असतात:

• इन्व्हॉइस - एक बेसिक इन्व्हॉइस जे तुम्ही ग्राहकाला पाठवू शकता
• पॅकिंग स्लिप - तुमच्या दुकानाचा पत्ता आणि तुमच्या ग्राहकाचा शिपिंग पत्ता यांचा प्रिंटआउट

नवीन Order Printer टेम्पलेट तयार करा

नवीन Order Printer टेम्पलेट तयार करण्यासाठी तुम्हाला HTML, CSS आणि Liquid ची माहिती असणे आवश्यक आहे. Shopify Theme Support Shopify Design Policy च्या कार्यकक्षेतील मोफत Shopify थीम्समधील किरकोळ बदलांसाठी मदत करू शकेल. तुम्हाला अधिक गुंतागुंतीचे बदल हवे असल्यास किंवा तुम्ही Shopify ने न बनवलेली थीम वापरत असल्यास, Shopify पार्टनरला नियुक्त करण्याचा विचार करा.

पायऱ्या:

1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अ‍ॅप्स > Order Printer (legacy) वर जा.

2. टेम्पलेट्स व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

3. टेम्पलेट जोडा वर क्लिक करा.

4. नाव फील्डमध्ये तुमच्या नवीन टेम्पलेटसाठी नाव एंटर करा.

5. तुमचे टेम्पलेट तयार करण्यासाठी कोड फील्डमध्ये HTML, CSS किंवा Liquid कोड जोडा.

6. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, सेव्ह करा वर क्लिक करा.

Order Printer टेम्पलेट संपादित करा

तुमचे Order Printer टेम्पलेट्स संपादित करण्यासाठी तुम्हाला HTML, CSS आणि Liquid ची माहिती असणे आवश्यक आहे. Shopify Theme Support तुमच्यासाठी टेम्पलेट्स विस्तृतपणे संपादित करू शकत नाही, परंतु Shopify Design Policy च्या कार्यकक्षेतील मोफत Shopify थीम्समधील किरकोळ बदलांसाठी मदत करू शकेल. अधिक गुंतागुंतीच्या बदलांसाठी, Shopify पार्टनरला नियुक्त करण्याचा विचार करा.

पायऱ्या:

1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अ‍ॅप्स > Order Printer (legacy) वर जा.

2. टेम्पलेट्स व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

3. तुम्हाला जे टेम्पलेट संपादित करायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करा.

4. कोड फील्डमध्ये HTML, CSS किंवा Liquid कोड जोडून किंवा संपादित करून टेम्पलेटमध्ये तुमचे बदल करा. टेम्पलेट कस्टमायझेशनच्या उदाहरणांचे पूर्वावलोकन करण्यासाठी, टेम्पलेट कस्टमायझेशनची उदाहरणे पहा.

5. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, सेव्ह करा वर क्लिक करा.

टेम्पलेट कस्टमायझेशनची उदाहरणे

खालील उदाहरणे Order Printer टेम्पलेट्स सानुकूलित करण्याचे काही सामान्य मार्ग स्पष्ट करतात:

डेस्कटॉप
1. तुमच्या Shopify ॲडमिन मधून, आशय > फाइल्स वर जा.

2. फाइल्स अपलोड करा वर क्लिक करा आणि तुमच्या काँप्युटरवरील इमेज फाईल निवडा.

3. फाइल्स पेजवर, अपलोड केलेली फाईल शोधा आणि URL कॉपी करा वर क्लिक करा.

4. तुमच्या Shopify ॲडमिन मधून, सेटिंग्ज > अ‍ॅप्स वर क्लिक करा.

5. अ‍ॅप उघडण्यासाठी Order Printer वर क्लिक करा.

6. टेम्पलेट्स व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

7. तुम्हाला जे टेम्पलेट संपादित करायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करा.

8. तुमचा लोगो जिथे दिसायला हवा तिथे तुमच्या टेम्पलेटमध्ये पुढील कोड स्निपेट एंटर करा: .

9. your-image-URL च्या जागी तुम्ही कॉपी केलेली इमेज URL टाका. तुम्हाला तुमचा लोगो कोठे दाखवायचा आहे यावर अवलंबून, तुम्हाला तुमच्या इमेजच्या आधी किंवा नंतर लाइन ब्रेक जोडण्यासाठी
टॅग जोडावा लागू शकतो.

मोबाईल
1. Shopify अ‍ॅप मधून, Menu आयकनवर टॅप करा.

2. आशय मेनूमध्ये, arrow down आयकनवर टॅप करा आणि त्यानंतर फाइल्स वर टॅप करा.

3. फाइल्स अपलोड करा वर टॅप करा आणि तुमच्या काँप्युटरवरील इमेज फाईल निवडा.

4. फाइल्स पेजवर, अपलोड केलेली फाईल शोधा आणि URL कॉपी करा वर टॅप करा.

5. तुमच्या Shopify ॲडमिन मधून, सेटिंग्ज > अ‍ॅप्स वर टॅप करा.

6. अ‍ॅप उघडण्यासाठी Order Printer वर टॅप करा.

7. टेम्पलेट्स व्यवस्थापित करा वर टॅप करा.

8. तुम्हाला जे टेम्पलेट संपादित करायचे आहे त्याच्या नावावर टॅप करा.

9. तुमचा लोगो जिथे दिसायला हवा तिथे तुमच्या टेम्पलेटमध्ये पुढील कोड स्निपेट एंटर करा: .

10. your-image-URL च्या जागी तुम्ही कॉपी केलेली इमेज URL टाका. तुम्हाला तुमचा लोगो कोठे दिसावा असे वाटते यावर अवलंबून, तुम्हाला तुमच्या इमेजच्या आधी किंवा नंतर लाइन ब्रेक जोडण्यासाठी
टॅग जोडावा लागू शकतो.

हे HTML मध्ये याप्रमाणे दिसायला हवे:

Example HTML code

उदाहरण: टेबलची रुंदी 100% करा

तुमच्या टेबल्सना बॉर्डर्स देण्यासाठी आणि 100% रुंदीपर्यंत वाढवण्यासाठी, तुमच्या टेबलमध्ये table-tabular क्लास जोडा:

उदाहरण: उत्पादन थंबनेल्स दाखवा

उत्पादन थंबनेल्स समाविष्ट करण्यासाठी, तुमच्या टेम्पलेटमध्ये हा कोड टाका:

{{ line_item.product.featured_image | product_img_url: 'thumb' | img_tag }}

ऑर्डरचे तपशील जोडा

तुम्ही तुमच्या टेम्पलेट्समध्ये ऑर्डरचे तपशील जोडू शकता, जसे की खरेदी केलेल्या आयटम्सचे नाव, प्रमाण आणि खर्च. तुमच्या टेम्पलेटमध्ये ऑर्डरचे तपशील जोडण्यासाठी:

1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अ‍ॅप्स > Order Printer (legacy) वर जा.

2. टेम्पलेट्स व्यवस्थापित करा वर क्लिक करा.

3. तुम्हाला जे टेम्पलेट संपादित करायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करा.

4. ऑर्डरचे तपशील जोडण्यासाठी लिक्विड व्हेरिएबल्स आणि फॉरमॅटिंग जोडण्यासाठी HTML वापरा. उदाहरणार्थ, {{ line_item.price | money }} आयटमची किंमत प्रिंट करते.

5. तुमचे काम पूर्ण झाल्यावर, सेव्ह करा वर क्लिक करा.

उदाहरणार्थ, पाठवल्या जाणाऱ्या आयटम्सची सूची समाविष्ट करण्यासाठी Nyla ला तिचे पॅकिंग स्लिप टेम्पलेट संपादित करायचे आहे. ती Order Printer अ‍ॅपमधील तिच्या Packing slip टेम्पलेटच्या तळाशी पुढील कोड जोडते:

Quantity

Item

{% if tax_lines.size > 0 %}

Taxes

{% endif %}

Price

{% for line_item in line_items %}

{{ line_item.quantity }} x

{{ line_item.title }}

{% if line_item.tax_lines %}

{% for tax_line in line_item.tax_lines %}
{{ tax_line.price | money }} {{ tax_line.title }}

{% endfor %}

{% endif %}

{{ line_item.price | money }}

{% endfor %}

परिणामी, Nyla च्या पॅकिंग स्लिप्समध्ये आता खरेदी केलेल्या आयटम्सची सूची देणारे टेबल समाविष्ट आहे.