पॅकिंग स्लिप व्हेरिएबलचा संदर्भ

तुमच्या पॅकिंग स्लिप्स Shopify ने तयार केलेली टेम्पलेट लँग्वेज Liquid वापरून रेंडर केल्या जातात.

तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनच्या शिपिंग आणि वितरण पेजवरील दस्तऐवज सेक्शनमधील पॅकिंग स्लिप टेम्पलेट वर क्लिक करून तुमच्या पॅकिंग स्लिप टेम्पलेट्समध्ये बदल करू शकता. जर दस्तऐवज सेक्शनमध्ये त्याऐवजी तुमचे दस्तऐवज टेम्पलेट्स सूचीबद्ध असतील, तर तुमच्या पॅकिंग स्लिप टेम्पलेटवर क्लिक करा. अधिक माहितीसाठी, ऑर्डर दस्तऐवज टेम्पलेट्स तयार करणे आणि संपादित करणे पहा.

स्टोअर व्हेरिएबल्स

तुमच्या पॅकिंग स्लिपमध्ये तुमच्या स्टोअरबद्दलचा तपशील जोडण्यासाठी या टेबलमधील व्हेरिएबल्स वापरा. तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनच्या General सेटिंग्ज पेजवर तुमची स्टोअर माहिती शोधू आणि संपादित करू शकता.

तुम्ही पॅकिंग स्लिप्स टेम्पलेट्समध्ये वापरू शकत असलेल्या Liquid स्टोअर व्हेरिएबल्सचे वर्णन
व्हेरिएबलवर्णन
shop.name
तुमच्या स्टोअरचे नाव.
shop.email
तुमच्या स्टोअरचा ईमेल पत्ता.
shop.domain
तुमच्या स्टोअरचे डोमेन.

स्टोअर पत्ता व्हेरिएबल्स

तुमच्या पॅकिंग स्लिपमध्ये तुमच्या स्टोअरचा पत्ता जोडण्यासाठी या टेबलमधील व्हेरिएबल्स वापरा. तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनच्या शिपिंग आणि वितरण पेजवरील शिपिंगचे मूळ स्थान विभागामध्ये तुमच्या पत्त्याचे तपशील शोधू आणि संपादित करू शकता.

तुम्ही पॅकिंग स्लिप्स टेम्पलेट्समध्ये वापरू शकत असलेल्या Liquid स्टोअर पत्ता व्हेरिएबल्सचे वर्णन
व्हेरिएबलवर्णन
shop_address.address1
तुमच्या स्टोअरचा पत्ता.
shop_address.address2
तुमच्या स्टोअरचे अपार्टमेंट किंवा सुइट.
shop_address.company
तुमच्या कंपनीचे नाव.
shop_address.city
तुमच्या स्टोअरचे शहर
shop_address.province_code
तुमच्या स्टोअरचा राज्य किंवा प्रांत कोड. उदाहरणार्थ, ओंटारियोचा प्रांत कोड ON आहे.
shop_address.province
तुमचे स्टोअरचे राज्य किंवा प्रांत
shop_address.zip
तुमच्या स्टोअरचा झिप कोड किंवा पोस्टल कोड.
shop_address.country_code
तुमच्या स्टोअरचा देश कोड. उदाहरणार्थ, कॅनडाचा देश कोड CA आहे.
shop_address.country
तुमच्या स्टोअरचा देश.
shop_address.summary
तुमच्या स्टोअरचा संपूर्ण पत्ता.

ऑर्डर व्हेरिएबल्स

तुमच्या पॅकिंग स्लिपमध्ये ऑर्डरचा तपशील जोडण्यासाठी या टेबलमधील व्हेरिएबल्स वापरा. तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनच्या ऑर्डर्स पेजवर ऑर्डर्सची सूची पाहू शकता.

तुम्ही पॅकिंग स्लिप्स टेम्पलेट्समध्ये वापरू शकत असलेल्या Liquid ऑर्डर व्हेरिएबल्सचे वर्णन
व्हेरिएबलवर्णन
order.order_number
कोणत्याही प्रीफिक्स किंवा सफिक्सविना ऑर्डर क्रमांक. उदाहरणार्थ, 1004.
order.name
तुमच्या Shopify ॲडमिनच्या General सेटिंग्ज पेजवर सेट केलेल्या कोणत्याही प्रीफिक्स किंवा सफिक्ससह ऑर्डर क्रमांक. उदाहरणार्थ, #1004.
order.note
ऑर्डरशी संबंधित नोंद, एखादी असल्यास.
order.created_at
ऑर्डर तयार केल्याची तारीख आणि वेळ. उदाहरणार्थ, 2009-05-30T17:43:51+02:00. फॉरमॅट बदलण्यासाठी तारीख फिल्टर वापरा.

ग्राहक व्हेरिएबल्स

तुमच्या पॅकिंग स्लिपमध्ये तुमच्या ग्राहकाची माहिती जोडण्यासाठी या टेबलमधील व्हेरिएबल्स वापरा. तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनच्या ग्राहक पेजवर ऑर्डर्सची सूची पाहू शकता.

तुम्ही पॅकिंग स्लिप्स टेम्पलेट्समध्ये वापरू शकत असलेल्या Liquid ग्राहक व्हेरिएबल्सचे वर्णन
व्हेरिएबलवर्णन
customer.first_name
ग्राहकाचे पहिले नाव.
customer.last_name
ग्राहकाचे आडनाव.
customer.name
ग्राहकाचे पूर्ण नाव.
customer.email
ग्राहकाचा ईमेल.

ग्राहकांचे शिपिंग आणि बिलिंग पत्ता व्हेरिएबल्स

तुमच्या पॅकिंग स्लिपमध्ये तुमच्या ग्राहकाचा शिपिंग किंवा बिलिंग पत्ता जोडण्यासाठी या टेबलमधील व्हेरिएबल्स वापरा. तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनच्या ग्राहक पेजवर ऑर्डर्सची सूची पाहू शकता.

तुम्ही पॅकिंग स्लिप्स टेम्पलेट्समध्ये वापरू शकत असलेल्या Liquid ग्राहक पत्ता व्हेरिएबल्सचे वर्णन
व्हेरिएबलवर्णन

shipping_address.address1

billing_address.address1

ग्राहकाचा पत्ता.

shipping_address.address2

billing_address.address2

ग्राहकाचे अपार्टमेंट किंवा सुइट.

shipping_address.first_name

billing_address.first_name

ग्राहकाचे पहिले नाव.

shipping_address.last_name

billing_address.last_name

ग्राहकाचे आडनाव.

shipping_address.name

billing_address.name

ग्राहकाचे पूर्ण नाव.

shipping_address.phone

billing_address.phone

ग्राहकाचा फोन नंबर.

shipping_address.company

billing_address.company

शिपिंग पत्त्यासाठी ग्राहकाच्या कंपनीचे नाव.

shipping_address.city

billing_address.city

ग्राहकाचे शहर.

shipping_address.province_code

billing_address.province_code

ग्राहकाचा राज्य किंवा प्रांत कोड. उदाहरणार्थ, ओंटारियोचा प्रांत कोड ON आहे.

shipping_address.province

billing_address.province

ग्राहकाचे राज्य किंवा प्रांत.

shipping_address.zip

billing_address.zip

ग्राहकाचा झिप कोड किंवा पोस्टल कोड.

shipping_address.country_code

billing_address.country_code

तुमच्या ग्राहकाचा देश कोड. उदाहरणार्थ, कॅनडाचा देश कोड CA आहे.

shipping_address.country

billing_address.country

ग्राहकाचा देश.

shipping_address.summary

billing_address.summary

तुमच्या ग्राहकाचा संपूर्ण पत्ता.

शिपमेंट व्हेरिएबल्समधील लाइन आयटम्स

तुमच्या पॅकिंग स्लिपमध्ये उत्पादन तपशील जोडण्यासाठी या टेबलमधील व्हेरिएबल्स वापरा. ऑर्डरमधील उत्पादने पाहण्यासाठी, तुमच्या Shopify ॲडमिनच्या ऑर्डर्स पेजवर जा आणि ऑर्डर क्रमांकावर क्लिक करा.

तुम्ही पॅकिंग स्लिप्स टेम्पलेट्समध्ये वापरू शकत असलेल्या शिपमेंट व्हेरिएबल्समधील Liquid लाइन आयटम्सचे वर्णन
व्हेरिएबलवर्णन
line_items_in_shipment

एका शिपमेंटमध्ये एकत्रित असलेल्या लाइन आयटम्सची सूची. वैयक्तिक लाइन आयटम्स लूपच्या आत line_item म्हणून असू शकतात:

{% for line_item in line_items_in_shipment %} {{ line_item.image }} {{ line_item.title }} ... {% endfor %}

line_item चे सर्व उपलब्ध गुणधर्म खाली सूचीबद्ध केले आहेत:

line_item.image - उत्पादनाची इमेज, एखादी असल्यास.

line_item.title - उत्पादनाचे नाव. उत्पादनाचे अनेक व्हेरिएंट्स असल्यास, व्हेरिएंटच्या नावाचादेखील समावेश केला जातो.

line_item.variant_title - उत्पादन व्हेरिएंटचे नाव.

line_item.vendor - उत्पादन विक्रेता.

line_item.sku - उत्पादनाचा SKU.

line_item.quantity - त्या उत्पादनाचे एकूण प्रमाण.

line_item.shipping_quantity - शिपमेंटमध्ये पूर्तता केली जात असलेल्या त्या उत्पादनाचे प्रमाण.

line_item.properties - उत्पादनाचे गुणधर्म.

line_item.groups - बंडल्स किंवा अ‍ॅड-ऑन्स सारख्या उत्पादनाचा समावेश असलेल्या लाइन आयटम गटांची सूची. प्रत्येक गटामध्ये खालील गुणधर्म असतात:

  • group.title - गटाचे डिस्प्ले शीर्षक.
  • group.deliverable? - जर लाइन आयटम मूळ उत्पादनाचे अ‍ॅड-ऑन असेल तर true मिळवून देतो, किंवा लाइन आयटम बंडलचा भाग असल्यास false मिळवून देतो.
includes_all_line_items_in_order

बुलियन

जर हे true असेल, तर ऑर्डरमधील सर्व आयटम्स शिपमेंटमध्ये समाविष्ट केले जातात.

जर हे false असेल, तर ऑर्डरमधील सर्व आयटम्स शिपमेंटमध्ये समाविष्ट केले जात नाहीत.

प्रतिमा

प्रतिमांना केवळ https://cdn.myshopify.com/ डोमेनवरून अनुमती दिली जाते. इतर सर्व प्रतिमा फिल्टर केल्या जातात. तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनच्या फाइल्स पेजवर अपलोड केलेली कोणतीही प्रतिमा समाविष्ट करू शकता.

तुमच्या पॅकिंग स्लिपमध्ये उत्पादन प्रतिमा किंवा थंबनेल्स जोडण्यासाठी, line_item.image व्हेरिएबल वापरा.

पॅकिंग स्लिप व्हेरिएबलची उदाहरणे

खालील उदाहरणे दर्शवतात की तुम्ही काही पॅकिंग स्लिप व्हेरिएबल्स कसे वापरू शकता.

now

वर्तमान वेळ आणि तारीख दर्शवण्यासाठी तुम्ही खालील फॉरमॅट वापरू शकता:

{{ "now" | date: "%Y-%m-%d %H:%M" }}

आउटपुट असे आहे:

2018-09-10 14:23

line_items_in_shipment

line_items_in_shipment व्हेरिएबल शिपमेंटमध्ये समाविष्ट असलेल्या लाइन आयटम्सचा अ‍ॅरे प्रदर्शित करते.

उदाहरणार्थ:

{% for line_item in line_items_in_shipment %}
  {{ line_item.title }}
  {{ line_item.variant_title }}
  ...
{% endfor %}

प्रत्येक line_item एंट्रीमध्ये मिळणारे फील्ड्स खालीलप्रमाणे आहेत:

line_item.image
line_item.title
line_item.variant_title
line_item.sku
line_item.vendor
line_item.quantity
line_item.shipping_quantity
line_item.properties
line_item.groups

line_item.groups

जर तुमचे स्टोअर बंडल्स किंवा अ‍ॅड-ऑन्स वापरत असेल, तर तुम्ही प्रत्येक लाइन आयटमसाठी गट माहिती प्रदर्शित करू शकता:

{% for group in line_item.groups %}
  {% if group.deliverable? %}
    Add-on for: {{ group.title }}
  {% else %}
    Part of: {{ group.title }}
  {% endif %}
{% endfor %}

line_item.image

खालील फॉरमॅट वापरून तुम्ही तुमच्या लाइन आयटम्ससाठी प्रतिमा प्रदर्शित करू शकता:

{% if line_item.image != blank %}
  {{ line_item.image | img_url: '58x58' | img_tag }}
{% endif %}

खालील फॉरमॅट वापरून तुम्ही तुमच्या लाइन आयटम्ससाठी प्रमाण आणि शिपिंग प्रमाण प्रदर्शित करू शकता:

{{ line_item.shipping_quantity }} of {{ line_item.quantity }}

उदाहरणार्थ, हे खालीलप्रमाणे प्रदर्शित होऊ शकते:

2 of 5

includes_all_line_items_in_order

जर तुम्ही ऑर्डरमधील काही आयटम्स शिप करत असाल, तर मेसेज प्रदर्शित करण्यासाठी तुम्ही हे व्हेरिएबल वापरू शकता. उदाहरणार्थ:

{% unless includes_all_line_items_in_order %}
  There are other items from your order not included in this shipment.
{% endunless %}