Shopify Flow सह उच्च-जोखमीच्या ऑर्डर्स मॅनेज करणे

Shopify Flow हे एक विनामूल्य ई-कॉमर्स ऑटोमेशन प्लॅटफॉर्म आहे जे तुम्हाला तुमच्या Shopify स्टोअरमध्ये आणि तुमच्या अ‍ॅप्सवर टास्क आणि प्रक्रिया स्वयंचलित करण्यास सक्षम करते. तुम्ही तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमधील काही टास्क स्वयंचलित करण्यासाठी Shopify Flow वापरू शकता, जसे की तुमचे उच्च-जोखमीच्या ऑर्डर्सचे व्यवस्थापन.

जर तुम्हाला तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमध्ये Shopify Flow इंस्टॉल करण्याबद्दल बॅनर प्राप्त झाला, तर तुम्ही Flow इंस्टॉल करा वर क्लिक करू शकता आणि कमी-जोखमीच्या आणि मध्यम-जोखमीच्या ऑर्डर्सवर आपोआप पेमेंट कॅप्चर करणारा वर्कफ्लो त्वरित अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. तसे नसल्यास, तुम्ही Shopify App Store वरून Shopify Flow इंस्टॉल करू शकता आणि नंतर एकतर पूर्व-निर्मित टेम्पलेट वापरू शकता किंवा तुमचा स्वतःचा वर्कफ्लो तयार करू शकता.

उच्च-जोखमीच्या ऑर्डर्स मॅनेज करण्यासाठी Shopify Flow वापरण्यापूर्वी

जेव्हा तुम्ही उच्च-जोखमीच्या ऑर्डर्स मॅनेज करण्यासाठी वर्कफ्लो बनवता किंवा संपादित करता, तेव्हा खात्री करा की तुम्ही ऑर्डर तयार केली ट्रिगरच्या ऐवजी ऑर्डरच्या जोखमीचे विश्लेषण केले ट्रिगर वापरता. याचे कारण असे की ऑर्डर तयार झाल्यानंतर फसवणूक विश्लेषणावर प्रक्रिया करण्यासाठी थोडा वेळ लागतो. ऑर्डरच्या जोखमीचे विश्लेषण केले पासून सुरू होणारे वर्कफ्लोज ऑर्डर तयार झाल्यानंतर लगेच रन होत नाहीत आणि त्याऐवजी ऑर्डरवर फसवणूक विश्लेषण पूर्ण झाल्यावर ट्रिगर केले जातात.

पेमेंट कॅप्चर करायचे की नाही हे निर्धारित करणारा वर्कफ्लो अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर, तुमच्या सेटिंग्जमध्ये क्रेडिट कार्ड ऑथोरायझेशन आणि कॅप्चर हे मॅन्युअली कॅप्चर करा वर सेट केल्याची खात्री करा. पेमेंट कॅप्चर करणे मॅनेज करणारे वर्कफ्लोज आपोआप कॅप्चर अ‍ॅक्टिव्हेट केलेले असल्यास कार्य करत नाहीत.

Shopify Flow वर्कफ्लोज सेट करणे

तुम्ही Shopify मध्ये केली जाणारी सामान्य कामे Shopify Flow मध्ये ट्रिगर्स, अटी आणि कृती असणारे वर्कफ्लो तयार करून स्वयंचलित करू शकता. उच्च-जोखमीच्या ऑर्डर्स व्यवस्थापित करण्यासाठी Shopify Flow वापरण्याकरिता, तुम्ही सामान्यतः वापरले जाणारे वर्कफ्लोज सेट करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही ऑर्डर उच्च-जोखमीची नसल्यास पेमेंट कॅप्चर करू शकता, किंवा उच्च-जोखमीच्या ऑर्डर्स रद्द करून त्या पुन्हा स्टॉक करू शकता. हे वर्कफ्लोज Shopify च्या फसवणूक विश्लेषण मधील माहितीच्या आधारे ऑपरेट करतात.

फसवणुकीची उच्च जोखीम नसलेली ऑर्डर कॅप्चर करा

हा वर्कफ्लो जोखीम आणि मध्यम-जोखमीच्या ऑर्डर्ससाठी पेमेंट कॅप्चर करतो आणि उच्च-जोखमीच्या ऑर्डर्ससाठी पेमेंट कॅप्चर करणे टाळतो. तुम्ही टेम्पलेट स्वयंचलितरीत्या इंस्टॉल करू शकता किंवा तुम्ही पुढील पायऱ्या फॉलो करून Shopify ॲडमिनमध्ये टेम्पलेट मॅन्युअली इंस्टॉल करून ते सानुकूलित करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अ‍ॅप्स > Flow वर जा.

  2. वर्कफ्लो तयार करा वर क्लिक करा.

  3. टेम्पलेट्स ब्राउझ करा वर क्लिक करा.

  4. जोखीम निवडा आणि त्यानंतर ऑर्डर फसवणुकीच्या उच्च जोखमीची नसल्यास पेमेंट कॅप्चर करा निवडा.

  5. इंस्टॉल करा वर क्लिक करा.

  6. पर्यायी: पूर्तता न केलेल्या ऑर्डर्स ट्रॅक करायच्या असल्यास, पुढीलप्रमाणे करा:

    1. तपासा बॉक्समध्ये, अन्यथा च्या बाजूला असलेल्या + इंडिकेटरवर क्लिक करा.
    2. कृती वर क्लिक करा.
    3. कृती निवडा. उदाहरणार्थ, टॅग जोडण्यासाठी तुम्ही ऑर्डर टॅग जोडा ही कृती वापरू शकता, किंवा पेमेंट कॅप्चर केले नसल्याचे सूचित करण्यासाठी तुम्हाला किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवण्याकरिता अंतर्गत ईमेल पाठवा ही कृती वापरू शकता.
  7. यांपैकी एक करा:

    • वर्कफ्लो सेव्ह करण्यासाठी आणि तो वापरण्यास सुरुवात करण्यासाठी, वर्कफ्लो सुरू करा वर क्लिक करा.
    • वर्कफ्लो सक्रिय न करता सेव्ह करण्यासाठी, बाहेर पडा वर क्लिक करा.

उच्च-जोखमीच्या ऑर्डर्स रद्द करा आणि पुन्हा स्टॉक करा

हा वर्कफ्लो उच्च-जोखमीच्या ऑर्डर्स रद्द करतो आणि ऑर्डर्समधील आयटम्स पुन्हा स्टॉक करतो. तसेच तो ऑर्डरला टॅग जोडतो, ऑर्डर देणाऱ्या ग्राहकाला टॅग जोडतो आणि उच्च जोखमीमुळे ऑर्डर रद्द झाल्याचे सूचित करणारा ईमेल पाठवतो. तुम्ही टेम्पलेट स्वयंचलितरीत्या इंस्टॉल करू शकता किंवा पुढील पायऱ्या फॉलो करून Shopify ॲडमिनमध्ये टेम्पलेट मॅन्युअली इंस्टॉल करून ते सानुकूलित करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अ‍ॅप्स > Flow वर जा.

  2. वर्कफ्लो तयार करा वर क्लिक करा.

  3. टेम्पलेट्स ब्राउझ करा वर क्लिक करा.

  4. जोखीम निवडा आणि त्यानंतर उच्च जोखमीच्या ऑर्डर्स रद्द करा आणि पुन्हा स्टॉक करा निवडा.

  5. पर्यायी: वर्कफ्लोने घेतलेल्या कृती संपादित करण्यासाठी, तुम्हाला बदलायची असलेल्या कृतीवर क्लिक करा. उदाहरणार्थ, ईमेलचे गंतव्यस्थान बदलण्यासाठी, अंतर्गत ईमेल पाठवा बॉक्सवर क्लिक करा आणि त्यानंतर your.email@example.com ला तुम्हाला वापरायच्या असलेल्या ईमेल ॲड्रेसमध्ये बदला.

  6. यांपैकी एक करा:

    • वर्कफ्लो सेव्ह करण्यासाठी आणि तो वापरण्यास सुरुवात करण्यासाठी, वर्कफ्लो सुरू करा वर क्लिक करा.
    • वर्कफ्लो सक्रिय न करता सेव्ह करण्यासाठी, बाहेर पडा वर क्लिक करा.

वारंवार आयटम्स रिटर्न करणाऱ्या ग्राहकांच्या ऑर्डर्स रद्द करा

गेल्या सहा महिन्यांत पाच किंवा त्याहून अधिक वेळा उत्पादने रिटर्न केलेल्या ग्राहकांच्या ऑर्डर्स रद्द करा. तुम्ही टेम्पलेट स्वयंचलितरीत्या इंस्टॉल करू शकता किंवा तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये टेम्पलेट मॅन्युअली इंस्टॉल करून ते सानुकूलित करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अ‍ॅप्स > Flow वर जा.

  2. वर्कफ्लो तयार करा वर क्लिक करा.

  3. टेम्पलेट्स ब्राउझ करा वर क्लिक करा.

  4. जोखीम निवडा आणि त्यानंतर वारंवार आयटम्स रिटर्न करणाऱ्या ग्राहकांच्या ऑर्डर्स रद्द करा निवडा.

  5. पर्यायी: वर्कफ्लोने घेतलेल्या कृती संपादित करण्यासाठी, तुम्हाला बदलायची असलेल्या कृतीवर क्लिक करा. उदाहरणार्थ, ईमेलचे गंतव्यस्थान बदलण्यासाठी, अंतर्गत ईमेल पाठवा बॉक्सवर क्लिक करा आणि त्यानंतर your.email@example.com ला तुम्हाला वापरायच्या असलेल्या ईमेल ॲड्रेसमध्ये बदला.

  6. यांपैकी एक करा:

    • वर्कफ्लो सेव्ह करण्यासाठी आणि तो वापरण्यास सुरुवात करण्यासाठी, वर्कफ्लो सुरू करा वर क्लिक करा.
    • वर्कफ्लो सक्रिय न करता सेव्ह करण्यासाठी, बाहेर पडा वर क्लिक करा.

माहीत असलेल्या चुकीच्या ईमेल ॲड्रेसवरील ऑर्डर्स रद्द करा आणि टॅग करा

मागील फसवणुकीच्या ऑर्डर्ससाठी वापरलेला ईमेल ॲड्रेस वापरणाऱ्या ऑर्डर्स आपोआप रद्द करा. फसव्या ग्राहकांसाठी हे टाळणे सोपे असू शकते, परंतु यामुळे स्वयंचलित फसवणूक रोखण्यात मदत होऊ शकते. तुम्ही टेम्पलेट स्वयंचलितरीत्या इंस्टॉल करू शकता किंवा तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये टेम्पलेट मॅन्युअली इंस्टॉल करून सानुकूलित करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, अ‍ॅप्स > Flow वर जा.

  2. वर्कफ्लो तयार करा वर क्लिक करा.

  3. टेम्पलेट्स ब्राउझ करा वर क्लिक करा.

  4. जोखीम निवडा आणि त्यानंतर माहीत असलेल्या चुकीच्या ईमेल ॲड्रेसवरील ऑर्डर्स रद्द करा आणि टॅग करा निवडा.