सेल्फ-सर्व्ह रिटर्न आणि रद्दीकरण

तुमच्याशी संपर्क न साधता ग्राहकांना थेट त्यांच्या ऑर्डर स्थिती पेजवरून रिटर्न आणि रद्द करण्याच्या विनंत्या सबमिट करू देऊ शकता. सेल्फ-सर्व्ह रिटर्न आणि रद्दीकरणामुळे विनंत्यांवर प्रक्रिया करण्यासाठी लागणारा तुमचा वेळ कमी होतो आणि ग्राहकांना स्वतःच ऑर्डर व्यवस्थापित करण्याचा सोयीचा मार्ग मिळतो. ग्राहक त्याच ऑर्डर स्थिती पेजवरून पूर्तता केलेले आयटम रिटर्न करण्याची विनंती करू शकतात. यामध्ये अजून वाटेत असलेले आयटमही येतात. तसेच, अद्याप शिप न केलेले आयटम रद्द करण्याची विनंती करू शकतात.

ग्राहकाने विनंती सबमिट केल्यावर तुम्हाला सूचना मिळते आणि तुम्ही Shopify ॲडमिनमध्ये विनंती तपासू शकता. तुमच्या धोरणांनुसार विनंती मंजूर किंवा नाकारू शकता. रिटर्न मंजूर करताना तुम्ही अदलाबदलीसाठी आयटम जोडू शकता, शिपिंगच्या सूचना देऊ शकता आणि ग्राहकाला रिटर्न लेबले पाठवू शकता. रद्द करण्याची विनंती निकाली काढण्यासाठी तुम्ही नेहमीच्या परतावा प्रक्रियेद्वारे विनंतीतील आयटम काढून टाकता किंवा विनंती नाकारता.

सेल्फ-सर्व्ह रिटर्न आणि रद्दीकरण हे रिटर्न आणि रद्दीकरणाच्या नियमांनुसार काम करतात. यामुळे कोणते आयटम पात्र आहेत, ग्राहक किती कालावधीत विनंती करू शकतात आणि रिटर्न शिपिंग मोफत आहे की त्याचा खर्च ग्राहकाला द्यावा लागेल, हे तुम्ही ठरवू शकता. रिटर्नची कारणे आणि उत्पादनाची स्थिती यांसारखी माहिती मिळवण्यासाठी तुम्ही विनंतीचा फॉर्म सानुकूलित करू शकता.

या विभागात