ईमेल नोटिफिकेशन टेम्पलेट्स सानुकूलित करणे
तुमच्या स्टोअरमध्ये अनेक नोटिफिकेशन टेम्पलेट्स आहेत, ज्यांच्यावर तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनच्या नोटिफिकेशन्स विभागामधून ॲक्सेस मिळवू शकता.
एकाच वेळी सर्व टेम्पलेट्ससाठी लोगो जोडून किंवा रंगसंगती बदलून तुम्ही तुमची ईमेल नोटिफिकेशन्स सानुकूलित करू शकता. तुम्ही ईमेल नोटिफिकेशन्सची सामग्री वैयक्तिकरित्यादेखील संपादित करू शकता.
तुम्ही तुमच्या ईमेल नोटिफिकेशन्सचा मुख्य भाग आणि विषय संपादित करण्यापूर्वी, तुम्हाला तुमच्या प्रेषक ईमेल ॲड्रेसची पुष्टी करणे आवश्यक आहे.
SMS टेम्पलेट्सच्या माहितीसाठी, SMS नोटिफिकेशन्स पहा.
या पेजवर
- तुमच्या ईमेल टेम्पलेट्समध्ये लोगो जोडा
- तुमच्या ईमेल टेम्पलेट्ससाठी रंग निवडा
- तुमच्या ईमेल टेम्पलेट्सची भाषा बदलणे
- ईमेल फुटरमधून Shopify ब्रँडिंग काढून टाका
- विशिष्ट ईमेल टेम्पलेट्स सानुकूलित करा
- नोटिफिकेशन्समध्ये कस्टम मेसेज जोडा
- इनलाईन CSS वापरून ईमेल टेम्पलेट्स स्टाईल करा
- ईमेल टेम्पलेटच्या मागील किंवा डीफॉल्ट आवृत्तीवर पूर्ववत करा
- साध्या मजकुराच्या ईमेल्सचे स्वयंचलित कन्व्हर्जन
तुमच्या ईमेल टेम्पलेट्समध्ये लोगो जोडा
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स वर जा.
ग्राहक नोटिफिकेशन्स वर क्लिक करा.
ईमेल टेम्पलेट सानुकूलित करा वर क्लिक करा.
फाईल निवडा वर क्लिक करून लोगो जोडा, तो शोधा आणि अपलोड करा.
मोबाईल
Shopify ॲप मधून,
वर टॅप करा आणि त्यानंतर
सेटिंग्ज वर टॅप करा.
स्टोअर सेटिंग्ज विभागामध्ये, नोटिफिकेशन्स वर टॅप करा.
ग्राहक नोटिफिकेशन्स वर टॅप करा.
ईमेल टेम्पलेट सानुकूलित करा वर टॅप करा.
फाईल निवडा वर टॅप करून लोगो जोडा, तो शोधा आणि अपलोड करा.
तुमच्या ईमेल टेम्पलेट्ससाठी रंग निवडा
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स वर जा.
ग्राहक नोटिफिकेशन्स वर क्लिक करा.
ईमेल टेम्पलेट सानुकूलित करा वर क्लिक करा.
रंग कोड टाकून किंवा रंग निवडकवर क्लिक करून तुमच्या ईमेल्सचा ॲक्सेंट रंग बदला.
मोबाईल
Shopify ॲप मधून,
वर टॅप करा आणि त्यानंतर
सेटिंग्ज वर टॅप करा.
स्टोअर सेटिंग्ज विभागामध्ये, नोटिफिकेशन्स वर टॅप करा.
ग्राहक नोटिफिकेशन्स वर टॅप करा.
ईमेल टेम्पलेट सानुकूलित करा वर टॅप करा.
रंग कोड टाकून किंवा रंग निवडक निवडून तुमच्या ईमेल्सचा ॲक्सेंट रंग बदला.
तुमच्या ईमेल टेम्पलेट्सची भाषा बदलणे
तुमचे ईमेल टेम्पलेट ज्या डीफॉल्ट भाषेमध्ये दिसतात, ते तुमच्या थीमची भाषा आणि तुम्ही टेम्पलेटमध्ये केलेल्या कोणत्याही संपादनांवर अवलंबून असते:
- तुम्ही तुमच्या ईमेल टेम्पलेटमध्ये कोणतेही बदल केले नसल्यास, जेव्हा तुम्ही तुमच्या थीमची भाषा बदलता, तेव्हा ईमेल टेम्पलेटची भाषादेखील बदलते.
- जर तुम्ही तुमच्या ईमेल टेम्पलेटचे मुख्य भाग (बॉडी) आणि शीर्षक (टायटल) या दोन्हीमध्ये बदल केले असतील, तर तुमच्या थीमची भाषा बदलल्याने ईमेल टेम्पलेटची भाषा बदलत नाही.
- जर तुम्ही तुमच्या ईमेल टेम्पलेटच्या फक्त शीर्षकामध्ये बदल केले असतील, तर तुमच्या थीमची भाषा बदलल्याने ईमेल टेम्पलेटची भाषा बदलत नाही.
- जर तुम्ही तुमच्या ईमेल टेम्पलेटच्या फक्त मुख्य भागामध्ये बदल केले असतील, तर तुमच्या थीमची भाषा बदलल्याने शीर्षक नवीन भाषेत बदलते पण तुमच्या ईमेल टेम्पलेटच्या मुख्य भागाची भाषा बदलत नाही.
ईमेल फुटरमधील Shopify ब्रँडिंग काढा
डीफॉल्ट फुटर टेम्पलेटमध्ये Shopify ब्रँडिंगचा समावेश असतो, जे तुमच्या ग्राहकांना ईमेलच्या फुटरमध्ये Powered by Shopify म्हणून दिसते. तुम्ही ईमेल फुटरमधील Shopify ब्रँडिंग काढू शकता. जर तुमचे स्टोअर Shopify Plus प्लॅनवर असेल, तर तुमच्या ग्राहकांच्या सूचना ईमेल फुटरमध्ये कोणतेही Shopify ब्रँडिंग नसते.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स वर जा.
ग्राहक नोटिफिकेशन्स वर क्लिक करा.
ईमेल टेम्पलेट सानुकूलित करा वर क्लिक करा.
ब्रँडिंग विभागामध्ये, "Powered by Shopify" ब्रँडिंग दाखवा बंद करा.
सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाईल
Shopify ॲप मधून,
वर टॅप करा आणि त्यानंतर
सेटिंग्ज वर टॅप करा.
स्टोअर सेटिंग्ज विभागामध्ये, नोटिफिकेशन्स वर टॅप करा.
ब्रँडिंग विभागामध्ये, "Powered by Shopify" ब्रँडिंग दाखवा बंद करा.
सेव्ह करा वर टॅप करा.
विशिष्ट ईमेल टेम्पलेट सानुकूलित करा
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स वर जा.
तुम्हाला बदलायच्या असलेल्या सूचनेच्या प्रकारावर क्लिक करा.
तुम्हाला बदलायच्या असलेल्या सूचनेच्या नावावर क्लिक करा.
कोड संपादित करा वर क्लिक करा.
ईमेल संदेशाचा ईमेल विषय आणि ईमेल मुख्य भाग (HTML) संपादित करा.
सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाईल
Shopify ॲप मधून,
वर टॅप करा आणि त्यानंतर
सेटिंग्ज वर टॅप करा.
स्टोअर सेटिंग्ज विभागामध्ये, नोटिफिकेशन्स वर टॅप करा.
तुम्हाला बदलायच्या असलेल्या सूचनेच्या प्रकारावर टॅप करा.
</> वर टॅप करा.
ईमेल संदेशाचा ईमेल विषय आणि ईमेल मुख्य भाग (HTML) संपादित करा.
सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.
तुमच्या बदलांची चाचणी घ्या
जेव्हा तुम्ही सूचना टेम्पलेट सानुकूलित करत असता, तेव्हा तुम्ही Shopify ॲडमिनमध्ये बदलांचे पूर्वावलोकन करू शकता किंवा ते तुमच्या ग्राहकांना कसे दिसेल याचे परीक्षण करण्यासाठी ईमेलद्वारे पाठवू शकता.
पायऱ्या:
- तुमच्या सेव्ह न केलेल्या बदलांचे पूर्वावलोकन करण्यासाठी पूर्वावलोकन करा वर क्लिक करा.
- ही सूचना चाचणी ईमेल म्हणून पाठवण्यासाठी, चाचणी ईमेल पाठवा वर क्लिक करा. तुम्ही Shopify ॲडमिनमध्ये लॉग इन करण्यासाठी वापरलेल्या खात्यावर ईमेल पाठवला जातो.
- जर तुम्ही बदलांबद्दल समाधानी असाल, तर पूर्वावलोकन विंडो बंद करा आणि सेव्ह करा वर क्लिक करा.
इन्व्हॉइसमध्ये कर नोंदणी क्रमांक जोडा
काही देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये, तुम्हाला कदाचित ग्राहकांच्या इन्व्हॉइसवर किंवा इतर नोटिसांवर तुमचा कर नोंदणी क्रमांक समाविष्ट करणे आवश्यक असू शकते. ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि भारतामध्ये, जे व्यवसाय वस्तू आणि सेवा कर (GST) आकारतात त्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक समाविष्ट करणे आवश्यक असू शकते. युरोपीयन युनियनमध्ये, तुम्हाला तुमचा मूल्यवर्धित कर, अर्थात व्हॅट (VAT) ओळख क्रमांक समाविष्ट करणे आवश्यक असू शकते.
तुम्हाला क्रमांक समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे का, हे शोधण्यासाठी तुमच्या कर अकाउंटंट किंवा सरकारी प्राधिकरणाशी तपासा.
ईमेल सूचनेवर तुमचा क्रमांक दाखवण्यासाठी, या पायऱ्या फॉलो करा:
- तुम्हाला संपादित करायचे असलेले विशिष्ट ईमेल टेम्पलेट उघडा.
- ईमेल मुख्य भाग (HTML) क्षेत्रामध्ये, तुमचा नोंदणी किंवा ओळख क्रमांक योग्य ठिकाणी प्रविष्ट करा. आउटपुट योग्यरित्या फॉरमॅट केलेले आहे याची खात्री करण्यासाठी HTML चा समावेश करा.
- ऐच्छिक: तुमचे कस्टमायझेशन योग्यरित्या दिसतात हे सत्यापित करण्यासाठी, तुमच्या बदलांचे पूर्वावलोकन करा.
- सेव्ह करा वर क्लिक करा.
खालील उदाहरणामध्ये, स्टोअर मालकाने ऑर्डरची पुष्टी सूचनेमध्ये त्यांच्या स्टोअरच्या लोगोनंतर त्यांचा पत्ता आणि कर क्रमांक जोडला आहे.
<table class="row">
<tr>
<td class="shop-name_cell">
{%- if shop.email_logo_url %}
<img src="{{shop.email_logo_url}}" alt="{{ shop.name }}" width="{{ shop.email_logo_width }}">
<p>150 Elgin St, Ottawa K2P 1L4 GST# 123456789</p>
{%- else %}
<h1 class="shop-name_text">
<a href="{{shop.url}}">{{ shop.name }}</a>
</h1>
{%- endif %}याव्यतिरिक्त, तुम्ही Shopify App Store मधून इन्व्हॉइस अॅप खरेदी आणि डाउनलोड करू शकता. इन्व्हॉइस अॅप तुम्हाला इन्व्हॉइसवर कर क्रमांक समाविष्ट करण्यासाठी सक्षम करते.
ऑर्डरची पुष्टी आणि ऑर्डरचा परतावा टेम्पलेटमध्ये शुल्क लाइन जोडा
जर तुम्ही शुल्क आणि आयात कर गोळा करत असाल, तर तुमच्या सूचना ईमेलमध्ये शुल्क लाइन आहे का याची पडताळणी करा, जेणेकरून तुमच्या ग्राहकांकडे ती फी भरल्याची नोंद राहील.
जर तुम्ही ऑर्डरची पुष्टी आणि ऑर्डरचा परतावा ईमेल टेम्पलेटसाठी डीफॉल्ट टेम्पलेट वापरत असाल, तर शुल्क लाइन आयटमचा समावेश करण्यासाठी तुमचे ईमेल स्वयंचलितपणे अपडेट केले जातात. तुम्हाला कोणतेही बदल करण्याची आवश्यकता नाही.
जर तुम्ही तुमचे ऑर्डरची पुष्टी आणि ऑर्डरचा परतावा ईमेल टेम्पलेट सानुकूलित केले असतील, तर शुल्क लाइन जोडण्यासाठी तुम्ही तुमच्या ईमेल टेम्पलेटमध्ये खालील कोड जोडू शकता.
{% if current_total_duties %}
<tr class="subtotal-line">
<td class="subtotal-line__title">
<p>
<span>Duties</span>
</p>
</td>
<td class="subtotal-line__value">
<strong>{{ current_total_duties | money }}</strong>
</td>
</tr>
{% endif %}ऑर्डर इन्व्हॉइसमध्ये पेमेंट अटी जोडा
पेमेंट अटी ज्या तारखेला ऑर्डरसाठी पेमेंट देय आहे ती तारीख निर्दिष्ट करतात.
जर तुम्ही तुमचे ऑर्डर इन्व्हॉइस ईमेल टेम्पलेट सानुकूलित केले असेल, तर पूर्ततेवर देय असलेल्या तारखेसह पेमेंट देय तारखा जोडण्यासाठी तुम्ही तुमच्या ईमेल टेम्पलेटमध्ये खालील कोड जोडू शकता.
{% assign due_date = payment_terms.next_payment.due_at | default: nil %}
{% if payment_terms.type == 'receipt' and due_date == nil %}
{% assign due_date = 'now' %}
{% endif %}
{% if payment_terms.type == 'fulfillment' and payment_terms.next_payment.due_at == nil % }
<h2> Payment of {{ order.total_outstanding | money }} is due on fulfillment </h2>
{% else %}
<h2>Payment of {{ order.total_outstanding | money }} is due {{ due_date | date: format: 'date' }}</h2>
{% endif %}तुमच्या ईमेल टेम्पलेटवर पेमेंट अटींचे नाव दाखवण्यासाठी, या पायऱ्या फॉलो करा:
1. खालील विभाग अस्तित्वात असल्यास तो शोधा:
{% if shipping_address or billing_address or shipping_method %}2. तो खालील मजकुराने बदला:
{% if shipping_address or billing_address or shipping_method or payment_terms %}3. ईमेल मुख्य भाग (HTML) क्षेत्रामध्ये, तुमच्या पेमेंट अटींचे नाव योग्य ठिकाणी प्रविष्ट करा.
{% if payment_terms %}
<td class="customer-info__item">
<h4>Payment</h4>
<p> Terms: {{ payment_terms.name }} </p>
</td>
{% endif %}4. सेव्ह करा वर क्लिक करा.
खालील उदाहरणामध्ये, स्टोअर मालकाने ग्राहक माहिती विभागामध्ये shipping_method नंतर त्यांच्या पेमेंट अटी जोडल्या आहेत.

सूचनांमध्ये सानुकूल संदेश जोडा
तुम्ही यांसारख्या अनेक सूचनांमध्ये सानुकूल संदेश जोडू शकता:
- सोडून दिलेले चेकआउट
- ग्राहकांशी संपर्क साधा
- ग्राहक सक्रियकरण
- ड्राफ्ट ऑर्डर इन्व्हॉइस
पायऱ्या:
- मजकूर फील्डमध्ये सानुकूल संदेश प्रविष्ट करा.
- Preview वर क्लिक करा.
- मेसेज योग्यरित्या दिसत आहे याची पडताळणी करा आणि त्यानंतर Send test email वर क्लिक करा.
इनलाइन CSS वापरून ईमेल टेम्पलेट स्टाईल करा
डीफॉल्ट स्टाईलशीट, जे: <link rel="stylesheet" type="text/css" href="/assets/notifications/styles.css"> हे आहे, ओव्हरराइड करून तुमचे ईमेल टेम्पलेट स्टाईल करण्यासाठी तुम्ही इनलाइन CSS वापरू शकता. टेम्पलेट एडिटर स्वयंचलितपणे टेम्पलेटमधील कोणत्याही स्टाईल टॅग्ज इनलाइन करतो. हे मीडिया क्वेरीज जतन करते जेणेकरून प्रतिसाद देणारे ईमेल तयार करणे सोपे होईल. बाह्य स्टाईलशीट्स आणि थीम ॲसेटसोबत अपलोड केलेली स्टाईलशीट्स इनलाइन केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे CSS स्टायलिंग तुमच्या टेम्पलेटच्या <head> मधील <style> टॅगमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली जाते.
ईमेल टेम्पलेटच्या मागील किंवा डीफॉल्ट आवृत्तीवर रिव्हर्ट करा
तुम्ही ईमेल नोटिफिकेशन टेम्पलेटच्या तुमच्या मागील आवृत्तीवर किंवा डीफॉल्ट आवृत्तीवर रिव्हर्ट करू शकता.
तुम्ही मागील किंवा डीफॉल्ट आवृत्तीवर रिव्हर्ट करता तेव्हा, तुम्ही फक्त टेम्पलेटची सामग्री बदलता. तुम्ही तुमच्या ईमेल नोटिफिकेशन्सच्या लोगो किंवा रंग मध्ये केलेले कोणतेही कस्टमायझेशन बदलले जात नाहीत.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > नोटिफिकेशन्स वर जा.
संबंधित नोटिफिकेशन्स श्रेणीवर क्लिक करा.
तुम्हाला जे नोटिफिकेशन टेम्पलेट पाहायचे आहे त्यावर क्लिक करा.
Revert to वर क्लिक करा.
ड्रॉप-डाउन मेनूमधून Previous किंवा Default निवडा.
सेव्ह करा वर क्लिक करा.
साध्या मजकूर ईमेलचे स्वयंचलित रूपांतर
ज्या ईमेल क्लायंट्सना ही आवृत्ती दाखवणे आवश्यक आहे, जसे की Apple Watch साठी Mail, त्यांच्यासाठी तुमचे HTML ईमेल टेम्पलेट्स साध्या मजकुरात रूपांतरित केले जातात.