पॅकेजेस सेट करणे

शिपिंग लेबल्स खरेदी करताना सोप्या निवडीसाठी तुम्ही तुमच्या Shopify अ‍ॅडमिनच्या शिपिंग आणि वितरण सेटिंग्जमध्ये पॅकेजेस जोडू शकता आणि उत्पादने व व्हेरिएंट्सना पॅकेज नियुक्त करू शकता. वजनावर आधारित किंवा वाहकाने-कॅल्क्युलेट केलेले दर वापरताना चेकआउटवर शिपिंग दरांची गणना करण्यासाठी वापरले जाणारे स्टोअर डिफॉल्ट पॅकेज देखील तुम्ही निवडू शकता. पॅकेजेस सेट केल्याने तुम्हाला चेकआउटवर अचूक शिपिंग दर मिळवण्यात आणि लेबल्स खरेदी करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात मदत होऊ शकते.

तुम्ही शिपिंग लेबल खरेदी करता आणि एखादे सुचवलेले पॅकेज उपलब्ध नसते, तेव्हा तुमच्यासाठी तुमचे स्टोअर डिफॉल्ट पॅकेज आपोआप निवडले जाते.

कस्टम पॅकेज जोडा

तुम्ही कस्टम डायमेंशन्स आणि वजनासह कस्टम पॅकेज जोडू शकता.

पायऱ्या:

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमधून, सेटिंग्ज > शिपिंग आणि वितरण वर जा.

  2. पॅकेजेस विभागामध्ये, पॅकेज जोडा वर क्लिक करा.

  3. पॅकेजचे नाव फील्डमध्ये, तुमच्या पॅकेजला नाव द्या.

  4. पॅकेज प्रकार विभागामध्ये, तुमचा पॅकेज प्रकार निवडा.

  5. तुमच्या पॅकेजची डायमेंशन्स आणि वजन जोडा.

  6. पर्यायी: तुम्हाला स्टोअर डिफॉल्ट पॅकेज बदलून हे पॅकेज करायचे असल्यास, डिफॉल्ट पॅकेज म्हणून वापरा निवडा.

  7. पॅकेज जोडा वर क्लिक करा.

मोबाईल
  1. Shopify अ‍ॅप मधून, मेनू वर टॅप करा आणि त्यानंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.

  2. स्टोअर सेटिंग्ज विभागामध्ये, शिपिंग आणि वितरण वर टॅप करा.

  3. पॅकेजेस विभागामध्ये, पॅकेज जोडा वर टॅप करा.

  4. पॅकेज प्रकाराबद्दल आवश्यक माहिती टाका:

    1. पॅकेजचे नाव फील्डमध्ये, तुमच्या पॅकेजला नाव द्या.
    2. पॅकेज प्रकार विभागामध्ये, तुमचा पॅकेज प्रकार निवडा.
    3. तुमच्या पॅकेजची डायमेंशन्स आणि वजन जोडा.
  5. पर्यायी: तुम्हाला स्टोअर डिफॉल्ट पॅकेज बदलून हे पॅकेज करायचे असल्यास, डिफॉल्ट पॅकेज म्हणून वापरा निवडा.

  6. पॅकेज जोडा वर टॅप करा.

स्टोअर डिफॉल्ट पॅकेज

वजनावर आधारित किंवा वाहकाने-कॅल्क्युलेट केलेले शिपिंग दर वापरताना चेकआउट दरम्यान तुमच्या ग्राहकांकडून आकारण्यात येणारा शिपिंग दर निश्चित करण्यासाठी स्टोअर डिफॉल्ट पॅकेजचा वापर केला जातो. पॅकेज नियुक्त नसलेल्या उत्पादनांसाठी आणि व्हेरिएंट्ससाठी स्टोअर डिफॉल्ट पॅकेज वापरले जाते. तुमच्या शिपिंग आणि वितरण सेटिंग्जमध्ये, स्टोअर डिफॉल्ट पॅकेज स्टोअर डिफॉल्ट लेबलद्वारे दर्शवले जाते.

तुमच्याकडे वजनावर आधारित दर असल्यास, कोणता वजनावर आधारित दर आकारायचा हे ठरवण्यासाठी या पॅकेजचे वजन पाठवल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या वजनात जोडले जाते.

तुमच्या शिपिंग वाहकाने जाहिरात केलेली शिपिंग बॉक्सची डायमेंशन्स कदाचित पॅकेजिंगच्या आतील भागाचा संदर्भ घेऊ शकतात. पॅकेजेस तयार करताना तुम्हाला तुमच्या शिपिंग बॉक्सेसच्या बाहेरील डायमेंशन्स मोजण्याची आणि वापरण्याची आवश्यकता असते कारण शिपिंग खर्चाची गणना करण्यासाठी बाहेरील डायमेंशन्स वापरली जातात.

उदाहरणादाखल, समजा तुमच्याकडे 0.1825 किलोचे डिफॉल्ट पॅकेजचे वजन आहे आणि तुमच्याकडे खालील वजनावर आधारित शिपिंग दर आहेत:

  • 0 ते 4.99 किलो = $3.00 USD शिपिंग दर
  • 5 ते 9.99 किलो = $5.00 USD शिपिंग दर
  • 10 ते 19.99 किलो = $10.00 USD शिपिंग दर

समजा एखादा ग्राहक एकूण 4.9 किलो वजनाची उत्पादने खरेदी करतो. जेव्हा ग्राहक तुमच्या चेकआउटवर पोहोचतो, तेव्हा उत्पादनांच्या वजनामध्ये 0.1825 किलो हे डिफॉल्ट पॅकेजचे वजन जोडले जाते. उत्पादने आणि डिफॉल्ट पॅकेजचे एकत्रित वजन 5.0825 किलो असल्यामुळे, ग्राहकाला $3.00 USD ऐवजी $5.00 USD शिपिंग दराने शुल्क आकारले जाईल.

तुमचे स्टोअर डिफॉल्ट पॅकेज बदला

तुमच्याकडे फक्त एकच स्टोअर डिफॉल्ट पॅकेज असू शकते जे चेकआउटवर शिपिंग दरांची गणना करण्यासाठी वापरले जाते. पॅकेज नियुक्त नसलेल्या उत्पादनांसाठी आणि व्हेरिएंट्ससाठी स्टोअर डिफॉल्ट पॅकेज वापरले जाते. तुमच्या स्टोअरमध्ये फक्त एकच पॅकेज असल्यास, त्याचा वापर शिपिंग दरांची गणना करण्यासाठी केला जातो. जेव्हा तुम्ही नवीन पॅकेज जोडता, तेव्हा तुम्ही तुमचे स्टोअर डिफॉल्ट पॅकेज बदलू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमधून, सेटिंग्ज > शिपिंग आणि वितरण वर जा.

  2. शिपिंग विभागामध्ये, पॅकेजेस वर क्लिक करा आणि नंतर उजवा बाण आयकनवर क्लिक करा.

  3. तुम्हाला जे पॅकेज तुमचे डिफॉल्ट पॅकेज म्हणून सेट करायचे आहे त्यासाठी, Horizontal menu वर क्लिक करा आणि त्यानंतर डिफॉल्ट म्हणून सेट करा वर क्लिक करा.

उत्पादन व्हेरिएंटला पॅकेज असाइन करा

तुम्ही तुमच्या उत्पादनांना आणि उत्पादन व्हेरिएंटना पॅकेज असाइन करू शकता. यामुळे तुम्हाला चेकआउटच्या वेळी शिपिंग दराची अचूकता सुधारण्यात आणि अतिरिक्त शिपिंग खर्च टाळण्यास मदत होऊ शकते.

तुम्ही उत्पादन व्हेरिएंटसाठी जे पॅकेज निवडता, ते या विशिष्ट उत्पादन व्हेरिएंटसाठी तुमच्या स्टोअरच्या डिफॉल्ट पॅकेजला ओव्हरराइड करते. हे ओव्हरराइड केवळ सिंगल आयटम ऑर्डर्ससाठी काम करते. तुमच्या ऑर्डरमध्ये एकापेक्षा जास्त आयटम असल्यास, चेकआउटच्या वेळी दर कॅल्क्युलेट करण्यासाठी तुमचे स्टोअर डिफॉल्ट पॅकेज वापरले जाते.

तुम्ही एखादे अस्तित्वात असलेले पॅकेज असाइन करू शकता किंवा नवीन पॅकेज तयार करू शकता. तुम्ही तुमची अस्तित्वात असलेली पॅकेजेस मॅनेजदेखील करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, उत्पादने वर जा.

  2. तुम्हाला ज्या उत्पादनासाठी पॅकेज असाइन करायचे आहे त्यावर क्लिक करा.

  3. पर्यायी: तुमच्या उत्पादनामध्ये व्हेरिएंट असल्यास, व्हेरिएंट विभागामध्ये तुम्हाला ज्या व्हेरिएंटसाठी पॅकेज असाइन करायचे आहे त्यावर क्लिक करा.

  4. शिपिंग विभागामध्ये, फिजिकल उत्पादन सेटिंग ॲक्टिव्हेट केलेले असल्याची खात्री करा.

  5. एकटे शिप केले जाते तेव्हाचे पॅकेज ड्रॉप-डाउन मेनूमधून, तुमच्या उत्पादनासाठी एक पॅकेज निवडा.

  6. पर्यायी: नवीन पॅकेज तयार करण्यासाठी, एकटे शिप केले जाते तेव्हाचे पॅकेज ड्रॉप-डाउन मेनूमधून, नवीन पॅकेज जोडा वर क्लिक करा.

  7. सेव्ह करा वर क्लिक करा.

उत्पादनामध्ये पॅक केलेल्या उत्पादनाचा आकार जोडणे

चेकआउटच्या वेळी अधिक अचूक वाहकाद्वारे मोजले गेलेले शिपिंग दर मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या उत्पादनांमध्ये पॅक केलेल्या उत्पादनाचा आकार जोडू शकता. पॅक केलेल्या उत्पादनाचा आकार म्हणजे पॅक केल्यानंतरची उत्पादनाची बाहेरील लांबी, रुंदी आणि उंची असते. तुमच्या उत्पादनांना पॅक केलेल्या उत्पादनाचा आकार असतो, तेव्हा प्रत्येक शिपमेंटमधील आयटम्स हे तुमच्या सेव्ह केलेल्या बॉक्सपैकी सर्वात लहान बॉक्समध्ये पॅक केले जातात ज्यामध्ये ते बसू शकतील. त्यानंतर वाहक तुम्हाला लेबलसाठी जे शुल्क आकारतो त्याच्या जवळपास असणारा शिपिंग दर ग्राहक भरतात. जर एखाद्या ऑर्डरचे शिपमेंट एकापेक्षा जास्त ठिकाणांवरून होत असेल, तर प्रत्येक ठिकाणचे आयटम्स वेगवेगळ्या बॉक्समध्ये पॅक केले जातात.

उत्पादनामध्ये पॅक केलेल्या उत्पादनाचा आकार जोडण्यासाठी विचारात घेण्यासारख्या गोष्टी

तुम्ही तुमच्या उत्पादनांमध्ये पॅक केलेल्या उत्पादनाचा आकार जोडण्यापूर्वी खालील गोष्टी विचारात घ्या:

  • फक्त बॉक्स पॅकेज प्रकार असलेली पॅकेजेस या पद्धतीने निवडली जातात. लिफाफा, सॉफ्ट पॅक, फ्लॅट दर आणि वाहक पॅकेजेस निवडली जात नाहीत.
  • तुमचे स्टोअर डिफॉल्ट पॅकेज खालील प्रकरणांमध्ये शिपमेंटसाठी याऐवजी वापरले जाते:
    • शिपमेंटमधील कोणत्याही उत्पादनासाठी पॅक केलेल्या उत्पादनाचा आकार गहाळ आहे.
    • तुमचे डिफॉल्ट पॅकेज बॉक्स नाही.
    • तुमच्या कोणत्याही बॉक्समध्ये आयटम्स बसत नाहीत.
    • तुमच्याकडे मोठ्या संख्येने सेव्ह केलेले बॉक्सेस आहेत.
    • ऑर्डरमध्ये मोठ्या संख्येने असे आयटम्स आहेत ज्यांना शिपिंगची आवश्यकता आहे. तुमच्याकडे जेवढे जास्त सेव्ह केलेले बॉक्सेस असतील, तेवढे कमी आयटम्स असे होण्यापूर्वी ऑर्डरमध्ये समाविष्ट केले जाऊ शकतात.
  • तुम्ही एखाद्या उत्पादन व्हेरिएंटला नियुक्त केलेले पॅकेज तरीही सिंगल-आयटम ऑर्डरसाठी प्राधान्य घेते.
  • निश्चित उत्पादन बंडल्स चा स्वतःचा पॅक केलेल्या उत्पादनाचा आकार नसतो. त्याऐवजी, बंडलमधील वैयक्तिक उत्पादने त्यांच्या स्वतःच्या पॅक केलेल्या उत्पादनाच्या आकारानुसार पॅक केली जातात.

उत्पादनामध्ये पॅक केलेल्या उत्पादनाचा आकार जोडा

तुम्ही लांबी, रुंदी आणि उंची भरणे आवश्यक आहे किंवा तीन्ही रिकामे सोडणे आवश्यक आहे. तुम्ही त्यापैकी फक्त एक किंवा दोनच भरल्यास, पॅक केलेल्या उत्पादनाचा आकार सेव्ह केला जात नाही.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, उत्पादने वर जा.

  2. ज्या उत्पादनासाठी तुम्हाला पॅक केलेल्या उत्पादनाचा आकार जोडायचा आहे त्या उत्पादनावर क्लिक करा.

  3. पर्यायी: तुमच्या उत्पादनाला व्हेरिएंट्स असल्यास, व्हेरिएंट्स विभागामध्ये ज्या व्हेरिएंटसाठी तुम्हाला पॅक केलेल्या उत्पादनाचा आकार जोडायचा आहे त्यावर क्लिक करा.

  4. शिपिंग विभागामध्ये, फिजिकल उत्पादन सेटिंग ॲक्टिव्हेट केलेले असल्याची खात्री करा.

  5. पॅक केलेल्या उत्पादनाचा आकार फील्ड्समध्ये, पॅक केलेल्या उत्पादनाची लांबी, रुंदी आणि उंची एंटर करा आणि त्यानंतर मापनाचे युनिट निवडा.

  6. सेव्ह करा वर क्लिक करा.

वाहक पॅकेज जोडा

तुम्ही USPS किंवा UPS मधून वाहक पॅकेज जोडू शकता. वाहक पॅकेजेसचे डायमेंशन्स पूर्व-निर्धारित केलेले असतात. वाहक पॅकेजेस बद्दल अधिक जाणून घ्या.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमधून, सेटिंग्ज > शिपिंग आणि वितरण वर जा.

  2. शिपिंग विभागामध्ये, पॅकेजेस वर क्लिक करा आणि नंतर Add package पॅकेज जोडा वर क्लिक करा.

  3. वाहक पॅकेज वर क्लिक करा.

  4. USPS पॅकेज किंवा UPS पॅकेज निवडा.

  5. पॅकेज प्रकार निवडा.

  6. पर्यायी: स्टोअर डिफॉल्ट पॅकेज या पॅकेजमध्ये बदलण्यासाठी, डिफॉल्ट पॅकेज म्हणून वापरा निवडा.

  7. पॅकेज जोडा वर क्लिक करा.

सुचवलेली पॅकेजेस

तुम्ही जेव्हा शिपिंग लेबल्स खरेदी करता, तेव्हा सुचवलेले पॅकेज आपोआप निवडले जाऊ शकते. हे सुचवलेले पॅकेज तुम्ही पूर्वी तत्सम ऑर्डर्ससाठी निवडलेल्या पॅकेजवर आधारित असते. तुम्ही अधिक शिपिंग लेबल्स खरेदी केल्यानंतर अधिक ऑर्डर्ससाठी सुचवलेले पॅकेज उपलब्ध होते.

पॅकेज एडिट करा

  1. तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमधून, सेटिंग्ज > शिपिंग आणि वितरण वर जा.

  2. शिपिंग विभागामध्ये, पॅकेजेस वर क्लिक करा आणि नंतर उजवा बाण आयकनवर क्लिक करा.

  3. तुम्हाला जे पॅकेज संपादित करायचे आहे त्यासाठी, Horizontal menu वर क्लिक करा आणि त्यानंतर संपादित करा वर क्लिक करा.

  4. तुमच्या पॅकेजचा प्रकार, आकार किंवा वजनामध्ये कोणतेही बदल करा.

  5. सेव्ह करा वर क्लिक करा.

पॅकेज हटवा

तुम्हाला तुमच्या शिपिंग सेटिंग्जमध्ये पॅकेजची यापुढे आवश्यकता नसल्यास, तुम्ही ते हटवू शकता. तुम्ही तुमचे स्टोअर डिफॉल्ट पॅकेज हटवू शकत नाही.

तुमचे स्टोअर डिफॉल्ट पॅकेज हटवण्यासाठी, तुम्हाला प्रथम दुसरे पॅकेज तुमचे स्टोअर डिफॉल्ट पॅकेज म्हणून सेट करणे आवश्यक आहे.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमधून, सेटिंग्ज > शिपिंग आणि वितरण वर जा.

  2. शिपिंग विभागामध्ये, पॅकेजेस वर क्लिक करा आणि नंतर उजवा बाण आयकनवर क्लिक करा.

  3. तुम्हाला जे पॅकेज हटवायचे आहे त्यासाठी, Horizontal menu वर क्लिक करा आणि त्यानंतर हटवा वर क्लिक करा.

  4. पॅकेज हटवा वर क्लिक करा.