Shopify Inbox मधील AI-व्युत्पन्न केलेले सुचवलेले रिप्लाय
AI-व्युत्पन्न केलेले सुचवलेले रिप्लाय तुमच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या चौकशीचे प्रतिसाद अधिक जलदपणे तयार करण्यात मदत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरतात. सुचवलेले रिप्लाय हे कर्मचाऱ्यांसाठी एक लेखन साधन (composing aid) आहेत आणि तुमचा इनबॉक्स एजंट पाठवत असलेल्या स्वयंचलित प्रतिसादांवर त्यांचे नियंत्रण नसते.
स्वयंचलितपणे व्युत्पन्न केलेले सुचवलेले रिप्लाय फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध आहेत.
या पेजवर
सुचवलेले रिप्लाय वापरण्यासाठी आवश्यक गोष्टी
सुचवलेले रिप्लाय आपोआप जनरेट करण्यासाठी तुमच्या स्टोअरने खालील आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे:
- तुमचे ऑनलाइन स्टोअर आणि Shopify ॲडमिन इंग्रजीमध्ये आहेत.
- तुमच्या स्टोअरमध्ये Shopify Inbox इंस्टॉल केलेले आहे, ज्यामध्ये किमान एक Inbox संभाषणाचा समावेश आहे.
- तुमच्या स्टोअरमध्ये 2,00,000 किंवा त्यापेक्षा कमी उत्पादने आहेत.
सुचवलेले रिप्लाय जनरेट करणे
तुमच्या स्टोअरच्या माहितीवर आधारित सुचवलेला रिप्लाय जनरेट केला जातो. संभाषण खालील निकष पूर्ण करत असल्यास, Inbox संभाषण च्या कंपोझर बारमध्ये सुचवलेला रिप्लाय भरला जातो:
- संभाषणामध्ये ग्राहकाचा किमान एक मेसेज आहे.
- तुम्ही ग्राहकाच्या मेसेजला अद्याप रिप्लाय दिलेला नाही.
- तुमच्या Shopify स्टोअरमध्ये ग्राहकांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुरेशी माहिती समाविष्ट आहे.
सुचवलेले रिप्लाय जनरेट होत नाहीत
खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव संभाषणादरम्यान सुचवलेला रिप्लाय जनरेट होणार नाही:
- तुमच्या स्टोअरच्या माहितीवर प्रक्रिया केली जात आहे आणि ती अद्याप सुचवलेल्या रिप्लायसाठी उपलब्ध नाही.
- ग्राहक ज्या विषयाबद्दल विचारत आहे त्याविषयी तुमच्या स्टोअरवर पुरेशी माहिती नाही.
- ग्राहक ज्या माहितीबद्दल विचारत आहे त्यामध्ये AI ला अॅक्सेस नाही. उदाहरणार्थ, सुचवलेल्या रिप्लायसाठी तुमच्या सेवेच्या अटी आणि गोपनीयता धोरणावर प्रक्रिया केली जात नाही.
तुमच्या सुचवलेल्या रिप्लायचा दर्जा कसा सुधारायचा ते जाणून घ्या.
सुचवलेले रिप्लाय व्यवस्थापित करा
तुमचे स्टोअर आवश्यकता पूर्ण करत असताना सुचवलेले रिप्लाय डीफॉल्टनुसार ॲक्टिव्हेट केले जातात. तुम्ही तुमच्या Shopify Inbox सेटिंग्जमधून आपोआप जनरेट झालेले सुचवलेले रिप्लाय सुरू किंवा बंद करू शकता.
पायऱ्या:
- Shopify Inbox मध्ये, सेटिंग्ज आयकनवर क्लिक करा आणि त्यानंतर मेसेज प्राधान्ये वर क्लिक करा.
- आपोआप रिप्लाय जनरेट करा विभागामध्ये, सुरू करा किंवा बंद करा निवडा.
- सेव्ह करा वर क्लिक करा.
तुमचे सुचवलेले रिप्लाय सुधारणे
तुमच्या स्टोअरमध्ये ग्राहकांनी सामान्यपणे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आवश्यक माहिती समाविष्ट असताना AI ने जनरेट केलेले सुचवलेले रिप्लाय अधिक अचूक आणि वारंवार असतात. तुमच्या स्टोअरच्या खालील विभागांमध्ये अचूक सामग्री जोडून तुम्ही तुमच्या सुचवलेल्या रिप्लायचा दर्जा सुधारू शकता:
- उत्पादने: तुमचे उत्पादन लिस्टिंग अचूक आणि पूर्ण असल्याची खात्री करा.
- स्टोअर धोरणे: तुमच्या स्टोअरमध्ये स्पष्ट आणि अचूक परतावा आणि शिपिंग धोरणे जोडा.
- शिपिंग: तुम्ही ज्या सर्व ठिकाणांवर शिपिंग करता, त्या ठिकाणांसाठी शिपिंग आणि वितरण सेट करा.
- पेमेंट्स: तुमच्या सर्व स्वीकारलेल्या पेमेंट पद्धती योग्यरितीने कॉन्फिगर केलेल्या असल्याची खात्री करा.
- पृष्ठे: ग्राहकांना तुमच्या व्यवसायाबद्दल जाणून घेणे आवश्यक असणारी कोणतीही अतिरिक्त माहिती समाविष्ट करण्यासाठी तुमची स्टोअर पृष्ठे अपडेट करा.