Managed Markets वरील प्रतिबंधित आणि मर्यादित आयटम्स
त्या देशात कोणत्या प्रकारच्या वस्तू पाठवल्या जाऊ शकतात यासाठी प्रत्येक देशाचे स्वतःचे निर्बंध आहेत. शिपिंग वाहके आणि पेमेंट प्रोसेसर्सचे देखील स्वतःचे निर्बंध आहेत.
तुम्ही गंतव्यस्थान असलेल्या देशामध्ये प्रतिबंधित असलेले उत्पादन विकल्यास, Managed Markets त्या देशातील ग्राहकांसाठी कॅटलॉगमधून उत्पादन लपवते. तुमच्या Shopify ॲडमिनमधील प्रतिबंधित उत्पादनांचे पुनरावलोकन करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
खालील देशांच्या ऑर्डर्स दर्शवलेल्या कमाल मूल्यापर्यंत मर्यादित आहेत:
- अर्जेंटिना: $1,000 USD
- ब्राझील: $2,999 USD
- चीन: ¥10,000 CNY
- इंडोनेशिया: $1,500 USD
- मेक्सिको: $1,000 USD
जर तुमचा कॅटलॉग प्रामुख्याने सपोर्ट नसलेले आयटम्स विकत असेल, तर तुम्ही Managed Markets वापरण्यास अपात्र असू शकता. तुम्ही Managed Markets वापरण्यापूर्वी, खालीलपैकी कोणती उत्पादने आणि उत्पादन श्रेणी मर्यादित आहेत त्याचे पुनरावलोकन करा. तुम्ही प्रतिबंधित आयटम्स असलेली शिपमेंट पाठवल्यास, तुमचे पॅकेज वितरण करण्यायोग्य नाही असे मानले जाऊ शकते.
या पेजवर
प्रतिबंधित आयटम श्रेणी
प्रतिबंधित आयटमबद्दल अधिक माहितीसाठी खालील तक्त्याचा संदर्भ घ्या.
अल्कोहोलयुक्त पेये आणि उत्पादने
अल्कोहोलयुक्त पेये, स्पिरिट्स, व्हिनेगर आणि पिण्याचे पाणी, एरेटेड लिक्विड्स आणि सोडा यांसारखी अल्कोहोलविरहित पेय उत्पादने प्रतिबंधित आहेत. ही उत्पादने परवाना देणे, वयाची पडताळणी करणे, कर आकारणी, लेबलिंग आणि आयात नियंत्रणे यांसारख्या नियामक आवश्यकतांच्या अधीन आहेत. तसेच त्यांच्यासाठी Managed Markets सपोर्ट करत नसलेल्या विशेष अनुपालन प्रक्रियांची आवश्यकता असू शकते.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- वाईन
- स्पिरिट्स
- हार्ड लिकर
- वाईन बनवण्याचे किट्स
- बॉटलिंग आयटम
प्राणी आणि पाळीव प्राण्यांसाठी लागणाऱ्या वस्तू
काही ठराविक प्राणी आणि पाळीव प्राण्यांसाठी लागणाऱ्या वस्तू प्रतिबंधित आहेत.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- प्राणी (जिवंत किंवा मृत)
- पाळीव प्राण्यांचे अन्न आणि ट्रीट्स
- पाळीव प्राण्यांची जीवनसत्त्वे आणि सप्लिमेंट्स
कलाकृती
कोणत्याही कॉपीराइट किंवा ट्रेडमार्कचे उल्लंघन करणारी कलाकृती Managed Markets वर प्रतिबंधित आहे. डिजिटल कलाकृती आणि $2,000 USD पेक्षा जास्त मूल्याची कला देखील प्रतिबंधित आहे.
ऑटोमोटिव्ह आणि पॉवरस्पोर्ट्स
ऑटोमोटिव्ह आणि पॉवरस्पोर्ट्स उत्पादनांना धोकादायक वस्तू मानले जाते आणि त्यासाठी Managed Markets कडून पूर्व-मंजुरी आवश्यक असते.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- ॲम्प्लिफायर
- पार्किंग कॅमेरे
- कार्पेट आणि अपहोल्स्ट्री
- इंजिनचे भाग
- रिम्स आणि चाके
- टायर ॲक्सेसरीज
- कार वॉश ॲक्सेसरीज
- अलार्म आणि लॉक
- वॉटरक्राफ्टचे भाग आणि निगा
बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक्स
सर्व बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल आयटम ज्यामध्ये बॅटरी असते किंवा जोडलेली असते, किंवा जे थेट विद्युत प्रवाहात प्लग केले जातात, ते प्रतिबंधित आहेत.
या श्रेणीतील इलेक्ट्रिकल आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- व्हिडिओ गेम कन्सोल
- DVD आणि Blu-ray प्लेअर
- प्रोजेक्टर स्क्रीन्स आणि माउंट्स
- कॉम्प्युटर मॉनिटर्स
- टेलिव्हिजन
- GPS नॅव्हिगेशन सिस्टीम्स आणि ॲक्सेसरीज
- कीबोर्ड, माऊस आणि ट्रॅकबॉल
- कॉम्प्युटर आणि लॅपटॉप
- एक्स्टेंशन कॉर्ड्स
- सौर ऊर्जा किट्स
- इलेक्ट्रिकल मोटर्स
सौंदर्य आणि सौंदर्यप्रसाधने
काही सौंदर्यप्रसाधने आणि सौंदर्य आयटम अनुपालनाच्या कारणांमुळे किंवा धोकादायक सामग्रीमुळे प्रतिबंधित आहेत.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- परफ्यूम
- कोलोन
- eau de toilette
- अल्कोहोल असलेले सुगंधित स्प्रे
- नेल पॉलिश
- ब्लीच असलेली केसांची उत्पादने
- एरोसोल्स
- हँड सॅनिटायझर
- लॅश अॅडेसिव्ह
- घरगुती टॉपिकल आयटम्स
- वाइप्स
काही ब्युटी, सौंदर्यप्रसाधने आणि केसांच्या उत्पादनांवर विशिष्ट प्रदेशांमध्ये निर्बंध आहेत. विशिष्ट प्रदेशांमध्ये (जसे की मेक्सिको, स्पेन, इटली आणि ग्रीस) निर्बंध असू शकतील अशा आयटम्सच्या काही उदाहरणांमध्ये खालील आयटम्सचा समावेश असू शकतो, परंतु ते यापुरतेच मर्यादित नाही:
- साबण
- शॅम्पू
- लोशन्स आणि क्रीम्स
- मॉइश्चरायझर
व्यावसायिक आणि औद्योगिक
काही व्यावसायिक आणि औद्योगिक उत्पादनांवर निर्बंध आहेत.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- ट्रेड शो काउंटर्स/डिस्प्ले
- ऑटोमेशन कंट्रोल घटक
- ट्रॅफिक कोन्स आणि बॅरल्स
- दंतचिकित्सेची साधने
- फूड सर्व्हिस आयटम्स
- अवजड मशिनरी
- व्हेंडिंग मशीन्स
- फलक
- प्रयोगशाळेची उपकरणे
- पिअर्सिंग आणि टॅटू काढण्याचे साहित्य
- प्लंबिंगचे साहित्य
सीबीडी उत्पादने
कोणत्याही स्वरूपात कॅनबिडिओल (सीबीडी) असलेल्या उत्पादनांवर निर्बंध आहेत. सीबीडी हे कॅनबिस वनस्पतींमध्ये आढळणाऱ्या अनेक कॅनबिनॉइड्सपैकी एक आहे.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- खाद्यपदार्थ, कॅप्सूल्स किंवा लॉझेन्जेस
- ई-लिक्विड्स
- स्प्रे
- सीबीडी, THC किंवा इतर कॅनबिनॉइड्स असलेली तेले
धर्मादाय आणि नफा न कमवणाऱ्या संस्था
धर्मादाय आणि नफा न कमवणाऱ्या संस्थांना देणगी देण्यावर निर्बंध आहेत.
ग्राहकांची सुरक्षितता
Managed Markets वरील सर्व प्रदेशांमध्ये अत्यंत नियंत्रित वस्तू आणि व्यावसायिक सुरक्षिततेच्या उपकरणांवर निर्बंध आहेत.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- कार सीट्स
- मुलांच्या खुर्च्या
- हेल्मेट्स
- स्ट्रॉलर्स
- बांधकाम करताना घालण्याच्या हार्ड हॅट्स आणि हार्नेसेस
डिजिटल उत्पादने किंवा वस्तू
Managed Markets वर डिजिटल उत्पादनांची विक्री करणे शक्य आहे, परंतु तुम्ही खालील विशिष्ट आवश्यकता आणि बाबींचे पुनरावलोकन करू शकता:
- ऑर्डरच्या आवश्यकता: Managed Markets वर पात्र होण्यासाठी, ऑर्डरमध्ये डिजिटल उत्पादन आणि प्रत्यक्ष उत्पादन या दोन्ही गोष्टी असणे आवश्यक आहे. तुमच्या ऑर्डरमध्ये फक्त डिजिटल उत्पादने असल्यास, तुम्ही आपोआप त्या ऑर्डरसाठी मर्चंट ऑफ रेकॉर्ड बनता.
- ड्राफ्ट ऑर्डर्स: ड्राफ्ट ऑर्डर्समध्ये डिजिटल उत्पादनांचा समावेश केला जाऊ शकत नाही. डिजिटल आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही उत्पादनांचा समावेश असलेली ऑर्डर तयार करण्यासाठी, तुम्हाला चेकआउट प्रक्रियेदरम्यान पेमेंट मिळवण्यासाठी इन्व्हॉइस पाठवणे आवश्यक आहे.
Managed Markets वर विकल्या जाऊ शकणार्या डिजिटल उत्पादनांच्या काही उदाहरणांमध्ये खालील उत्पादनांचा समावेश असू शकतो, परंतु ती केवळ यांपुरतीच मर्यादित नाहीत:
- डिजिटल गिफ्ट कार्ड्स (तुमच्या स्वतःच्या स्टोअरसाठी)
- ऑनलाइन कोर्सेस
- पॉडकास्ट्स
- साऊंड इफेक्ट्स आणि संगीत
ड्रग्ज आणि ड्रग्जशी संबंधित साहित्य
Managed Markets वर ड्रग्ज आणि ड्रग्जशी संबंधित आयटम्सवर निर्बंध आहेत.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- ड्रग्जचा संदर्भ असलेला पोशाख
- ड्रग्जची लागवड किंवा वापराबद्दलची पुस्तके
- ड्रग्जची लागवड किंवा वापरासाठीची उपकरणे
- नियंत्रित पदार्थ असणारी उत्पादने
स्फोटके, शस्त्रे आणि संबंधित आयटम्स
Managed Markets वर स्फोटके, शस्त्रे आणि संबंधित आयटम्सवर निर्बंध आहेत.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- बंदुका आणि बंदुकांचे भाग (एअरसॉफ्ट बंदुकांसह)
- चाकू (चाकूंसाठीच्या देश-स्तरीय निर्बंधांचे पुनरावलोकन करा)
- टॅक्टिकल (युद्धनीतीविषयक) प्रकारात येणारे आयटम्स
- शस्त्रास्त्रांच्या अॅक्सेसरीज आणि साहित्य (दारूगोळा, केसेस, म्यान, क्लीनिंग किट्स, लॉक, स्कोप्स, अटॅचमेंट्स आणि मॉडिफिकेशन्स)
एक्सपोर्ट कंट्रोल केलेले आयटम्स (निर्यात नियंत्रित आयटम्स)
एक्सपोर्ट ॲडमिनिस्ट्रेशन रेग्युलेशन्स (EAR) च्या अधीन असलेल्या आणि ड्युअल-युज (त्यांचे लष्करी आणि नागरी असे दोन्ही हेतू असतात) मानल्या जाणाऱ्या आयटम्सचे EAR अंतर्गत युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स (DOC) द्वारे नियमन केले जाऊ शकते. युनायटेड स्टेट्स DOC कडून निर्यात परवाना किंवा इतर मंजुरी आवश्यक असणाऱ्या आयटम्सच्या Managed Markets वर विक्रीस निर्बंध आहेत.
काही शस्त्रांना संरक्षण संबंधित लेख मानले जाते आणि इंटरनॅशनल ट्रॅफिक इन आर्म्स रेग्युलेशन्स (ITAR) अंतर्गत युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ स्टेटद्वारे त्यांचे नियमन केले जाते. EAR किंवा ITAR च्या अधीन असणाऱ्या आयटम्सवर Managed Markets मध्ये निर्बंध आहेत.
शेती
सर्व प्रदेशांमध्ये शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या आयटम्स किंवा मशिनरीवर निर्बंध आहेत.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- ट्रॅक्टरचे भाग आणि अॅक्सेसरीज
- ट्रॅक्टरचे टायर्स
- घोड्याचे खाद्य
- घोड्याचे वर्मर्स
- मासे पकडण्याचे जिवंत आमिष
- बहु-उद्देशीय साधने
ज्वलनशील आणि प्रेशराइज्ड वस्तू
Managed Markets वर अॅडेसिव्ह आणि एरोसोल्ससारख्या ज्वलनशील आणि प्रेशराइज्ड आयटम्सवर निर्बंध आहेत.
अन्न आणि पेये
अन्न आणि पेयांच्या बाबतीत आयात करणार्या देशाच्या आरोग्य मंत्रालयाच्या किंवा तत्सम मंत्रालयाच्या परवाने आणि चाचणीच्या आवश्यकता लागू असतात. ई-कॉमर्सच्या वेळेबाबत संवेदनशील स्वरूपामुळे, या उत्पादनांवर निर्बंध आहेत.
इनजेस्टिबल्स (गिळण्यायोग्य), वेलनेस आणि वैद्यकीय उपकरणे
इनजेस्टिबल (गिळण्यायोग्य) असणाऱ्या आयटम्सवर निर्बंध आहेत. युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनने (FDA) वैद्यकीय उपकरणे म्हणून वर्गीकृत केलेल्या आयटम्सवर निर्बंध आहेत (अधिक माहितीसाठी, FDA वेबसाइट पहा). FDA कडे नोंदणीकृत असणाऱ्या किंवा लेझर वापरणाऱ्या ब्युटी उपकरणांवर निर्बंध आहेत, जे FDA किंवा आरोग्य मंत्रालयाच्या समकक्ष परवान्यांच्या अधीन आहेत. कोणतेही आरोग्य, वैद्यकीय किंवा वेलनेस दावे करणार्या सर्व आयटम्सवर आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्बंध असतील.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- फक्त-प्रिस्क्रिप्शनवर मिळणारी औषधे
- ओव्हर-द-काउंटर (OTC) औषधे
- केवळ परवानाधारक फार्मासिस्टद्वारे विकली जाणे आवश्यक असणारी औषधे
- जीवनसत्त्वे, सप्लिमेंट्स आणि शेक्स यांसह इतर इनजेस्टिबल्स (गिळण्यायोग्य)
- हर्बल किंवा होमिओपॅथिक उत्पादने
- परवाना नसलेली औषधे आणि वैद्यकीय किंवा आरोग्याचे दावे करणारी उत्पादने
- HIV, ड्रग किंवा गर्भधारणा चाचण्यांसारख्या वैद्यकीय चाचण्या
- श्रवण यंत्रे
- वैद्यकीय अलार्म
- प्रथमोपचार किट
- अॅक्टिव्हिटी मॉनिटर्स
- गर्भनिरोधक
घर आणि बागेची उत्पादने
Managed Markets वर घर आणि बागेच्या काही आयटम्सवर निर्बंध आहेत.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- मेणबत्त्या
- इसेंशियल ऑइल आणि ऑइल वॉर्मर्स
- उदबत्ती
- चाकू (चाकूंसाठीच्या देश-स्तरीय निर्बंधांचे पुनरावलोकन करा)
- सेंद्रिय सामग्री, ज्यामध्ये वाळू, माती, खते आणि आच्छादनांचा (मल्च) समावेश आहे
- इनडोअर आणि आउटडोअर झाडे
मानवी केस
स्पेन, इटली आणि कोस्टा रिका सारख्या विशिष्ट प्रदेशांमध्ये खऱ्या मानवी केसांनी बनवलेले विग्स, एक्सटेंशन्स किंवा तत्सम उत्पादनांवर निर्बंध आहेत.
निष्क्रिय उत्पादने
जे आयटम्स तुमच्या Shopify स्टोअरफ्रंटवर संग्रहित, मसुदा किंवा निष्क्रिय असल्यामुळे विक्रीयोग्य नाहीत ते प्रत्येक प्रदेशात आपोआप प्रतिबंधित केले जातात. तुम्ही ही उत्पादने सक्रिय केल्यानंतर, त्यांचे पुनरावलोकन केले जाते.
उत्पादन स्थितीबद्दल अधिक जाणून घ्या.
दागिने आणि मौल्यवान रत्ने
सुटे खडे (कापलेले किंवा न कापलेले, पॉलिश केलेले किंवा पॉलिश न केलेले) आणि मदर ऑफ पर्ल, प्रवाळ आणि शिंपले असलेल्या अॅक्सेसरीज Managed Markets वर प्रतिबंधित आहेत. वाहक आवश्यकतांमुळे $10,000 USD पेक्षा जास्त मूल्य असलेले दागिने प्रतिबंधित आहेत.
इतर सर्व दागिने प्रदेशांच्या उपसंचामध्ये अंशतः प्रतिबंधित आहेत, ज्यामध्ये खालील देशांचा समावेश आहे:
- ब्राझील
- फ्रान्स
- भारत
- इंडोनेशिया
- कुवेत
- मलेशिया
- मेक्सिको
- पोर्तुगाल
- रशिया
- स्वित्झर्लंड
या कॅटेगरीतील आयटम्समध्ये खालील दागिन्यांच्या आयटम्सचा समावेश आहे, परंतु ते यापुरते मर्यादित नाहीत:
- ब्रेसलेट्स
- नेकलेस
- प्लेटेड दागिने
- लॅपेल आणि सजावटीच्या पिन्स
चाकू
कोणत्याही प्रकारचे चाकू (शिकारीसाठी, स्वयंपाकासाठी, कटलरी आणि युटिलिटी) सुरक्षित वाहतूक उपक्रमांमुळे वाहक आणि देशाच्या आयात मर्यादांवर आधारित भिन्न निर्बंध आहेत. खेळण्यांच्या चाकूंवरही निर्बंध असू शकतात. खालील देशांमधून आणि प्रदेशांमधून चाकूंवर निर्बंध आहेत:
- ऑस्ट्रेलिया
- बेलारूस
- चीन
- डेन्मार्क
- अल साल्वाडोर
- फेरो बेटे
- फिनलंड
- हंगेरी
- आइसलँड
- इस्त्राईल
- जपान
- कझाकस्तान
- केनिया
- लिश्टनस्टाइन
- लिथुआनिया
- मादागास्कर
- मलेशिया
- मॉरिशस
- मेक्सिको
- मोनॅको
- न्यूझीलंड
- सिंगापूर
- दक्षिण कोरिया
- तुर्कीये
- युक्रेन
- युनायटेड किंगडम
- व्हेनेझुएला
बेकायदेशीर कृत्ये दर्शवणारी सामग्री
तुम्ही ज्या देशात काम करता किंवा ज्या देशांमध्ये विक्री करता तिथे बेकायदेशीर क्रियाकलाप दर्शवणाऱ्या किंवा त्यांचे समर्थन करणाऱ्या उत्पादनांवर Managed Markets वर निर्बंध आहेत.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- बेकायदेशीर क्रियाकलाप दर्शवणारी किंवा त्यांचे समर्थन करणारी सामग्री, मग ती खरी असो किंवा काल्पनिक
- हिंसा किंवा गैरवर्तणूक दर्शवणारी किंवा त्याचे समर्थन करणारी सामग्री, मग ती खरी असो किंवा काल्पनिक
पेमेंट म्हणून वापरले जाणारे पैसे किंवा आर्थिक आयटम्स
पैसे किंवा पेमेंट म्हणून वापरल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही आयटम्सवर निर्बंध आहेत.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- चलन
- रोख रकमेसमतुल्य
- गिफ्ट कार्ड्स (तृतीय-पक्ष स्टोअर्ससाठी)
- सुटे मौल्यवान खडे
- लॉटरीची तिकिटे
मिस्टरी आयटम्स किंवा ज्यांचे खराब वर्णन केलेले आहे अशी उत्पादने
उत्पादनांचे शीर्षक आणि वर्णन असणे आवश्यक आहे जे ग्राहकांना ते काय खरेदी करत आहेत हे स्पष्ट करते. Managed Markets वर ज्या उत्पादनांचे स्पष्ट वर्णन केलेले नाही किंवा जी उत्पादने स्पष्टपणे ओळखता येत नाहीत त्यांच्यावर निर्बंध आहेत.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- मिस्टरी आयटम्स (अशी उत्पादने जी खरेदी केल्याशिवाय आणि डिलिव्हर केल्याशिवाय ग्राहकाला ती काय आहेत हे कळू शकत नाही)
- थीम असलेले 'सरप्राईज' बॉक्सेस
- अस्पष्ट वर्णने असलेली उत्पादने
गहाण ठेवणारी दुकाने
गहाण ठेवणाऱ्या दुकानांवर निर्बंध आहेत.
झाड, लाकूड आणि बियाण्याची उत्पादने
पूर्णपणे किंवा अंशतः नैसर्गिक/वनस्पतीच्या तंतूंनी (ज्यामध्ये पेंढा, वेत, राफिया आणि ताग यांचा समावेश आहे परंतु त्यापुरते मर्यादित नाही) बनवलेल्या आयटम्सवर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या विशिष्ट प्रदेशांमध्ये निर्बंध आहेत.
ऑस्ट्रेलिया, मेक्सिको आणि न्यूझीलंडमध्ये लाकूड, बांबू, कॉर्क किंवा त्यापासून बनवलेली उत्पादने यांपासून बनवलेल्या किंवा त्यामध्ये समाविष्ट असलेल्या आयटम्सवर निर्बंध आहेत. अपवादांमध्ये कागद, फॅब्रिक, पुठ्ठा, लॅमिनेटेड, मीडियम-डेन्सिटी फायबरबोर्ड (MDF), किंवा प्लायवुड यांचा समावेश असू शकतो.
भाड्याने देण्याची उत्पादने
Managed Markets वर भाड्याने किंवा भाडेतत्त्वावर (lease) देण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादनांवर निर्बंध आहेत. Managed Markets उत्पादनांच्या विक्रीला सपोर्ट करते, त्यामुळे जी उत्पादने फक्त भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहेत ती पात्र नाहीत आणि ती तुमच्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांना दाखवली जात नाहीत.
लैंगिक आणि कामुक उत्पादने
Managed Markets वर लैंगिकदृष्ट्या सूचक किंवा स्पष्ट सामग्री दर्शविणाऱ्या किंवा लैंगिक किंवा कामुक क्रियाकलापांशी संबंधित असलेल्या आयटम्सवर निर्बंध आहेत.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- पुस्तके, व्हिडीओ, व्हिडीओ गेम्स, किंवा इतर सामग्री (content) माध्यमे जी स्पष्टपणे कामुक किंवा लैंगिक स्वरूपाची आहेत, मग ती खरी असोत किंवा काल्पनिक
- कामुक किंवा लैंगिक आशय दर्शवणारे पोशाख, पोस्टर्स, लहान मूर्ती किंवा इतर साहित्य, मग ते फोटोग्राफिक असो वा चित्रमय
- हालचालीस अडथळा निर्माण करणारी किंवा वेदना देणारी उत्पादने
विशेष पोशाख
Convention on International Trade of Endangered Species (CITES) च्या अधीन असलेल्या लुप्तप्राय प्रजातींचे घटक समाविष्ट असलेले आयटम आणि इतर प्रतिबंधित आयटमचा प्रचार किंवा प्रदर्शन करणारे आयटम Managed Markets वर प्रतिबंधित आहेत.
आयात आणि निर्यात नियंत्रित यूएस प्रजातींचे घटक समाविष्ट असलेल्या आयटमवर देखील लक्ष ठेवले जाते आणि ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये प्रतिबंधित केले जाऊ शकतात.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- मदर ऑफ पर्ल बटणे
- मगरीचे चामडे (हँडबॅग आणि शूज)
- अजगराचे चामडे (बेल्ट)
- पिसे (बोआ आणि ट्रिम)
- अॅलिगेटरचे चामडे (शूज आणि हँडबॅग)
- शहामृग (लेदर उत्पादने)
- औषधे किंवा अंमली पदार्थांसारख्या इतर प्रतिबंधित आयटमशी संबंधित किंवा त्यांचा प्रचार करणारे पोशाख
- लष्करी आणि सुरक्षा गणवेश
- पेंटबॉल कपडे
सबस्क्रिप्शन उत्पादने
Managed Markets सबस्क्रिप्शन विक्री योजनेद्वारे विकल्या जाणाऱ्या उत्पादनांना सपोर्ट करत नाही.
तुमच्या स्टोअरवर उत्पादने सबस्क्रिप्शनसाठी सेट केलेली असल्यास, Managed Markets द्वारे व्यवस्थापित केलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय मार्केटसाठी सबस्क्रिप्शन विक्री योजना काढून टाकली जाते. तुमचे ग्राहक तरीही एकवेळची खरेदी म्हणून उत्पादने खरेदी करू शकतात.
तुम्ही केवळ सबस्क्रिप्शनद्वारे उपलब्ध असलेली उत्पादने विकत असल्यास, ती आपोआप प्रतिबंधित केली जातात आणि तुमच्या आंतरराष्ट्रीय ग्राहकांना दिसत नाहीत.
तंबाखू आणि तंबाखूशी संबंधित उत्पादने
Managed Markets वर तंबाखू आणि तंबाखूशी संबंधित उत्पादने प्रतिबंधित आहेत.
या श्रेणीतील आयटममध्ये खालील आयटमचा समावेश आहे परंतु ते केवळ यापुरतेच मर्यादित नाहीत:
- सिगारेट
- सिगार
- ई-सिगारेट
- निकोटीनयुक्त उत्पादने
- तंबाखूशी संबंधित इतर उत्पादने
वॉरंटी, सर्व्हिस प्लॅन्स, करार आणि गॅरंटी
Managed Markets वर अमूर्त वस्तू, जसे की वॉरंटी, सर्व्हिस प्लॅन्स, करार आणि गॅरंटी प्रतिबंधित आहेत.
घड्याळे
वाहक आवश्यकतांमुळे $10,000 USD पेक्षा जास्त मूल्य असलेली घड्याळे प्रतिबंधित आहेत. या मर्यादेखालील घड्याळे खालील देशांसह काही प्रदेशांमध्ये अंशतः प्रतिबंधित आहेत:
- कुवैत - सर्व घड्याळे आणि वॉच बँड
- स्वित्झर्लंड - मौल्यवान किंवा निम-मौल्यवान खडे किंवा धातू असलेली घड्याळे आणि वॉच बँड
प्रतिबंधित Managed Markets उत्पादनांचे पुनरावलोकन करा
तुम्ही Managed Markets अॅक्टिव्हेट करण्यापूर्वी प्रतिबंधित आयटमसाठी तुमच्या उत्पादन सूचीचे पुनरावलोकन केले जाते. तुम्ही Managed Markets सेट करता तेव्हा परिणाम दिसतात. बहुतांश उत्पादनांना काही सेकंदात परिणाम मिळतो, परंतु मोठ्या उत्पादन सूचीचे पुनरावलोकन करण्यासाठी काही तास लागू शकतात. उत्पादन पुनरावलोकन ही देखील एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. पुनरावलोकन प्रक्रिया तुम्ही तुमच्या स्टोअरमध्ये जोडत असलेल्या नवीन उत्पादनांवर, तुम्ही अपडेट किंवा संपादित करत असलेल्या उत्पादनांवर आणि ज्यांच्या प्रतिबंधित स्थितीमध्ये बदल झाला आहे अशा उत्पादनांवर लागू होते.
उत्पादनाचे पुनरावलोकन करण्यासाठी, तुमच्या उत्पादनामध्ये शीर्षक, वर्णन, 0 पेक्षा जास्त किंमत आणि उत्पादन श्रेणी असणे आवश्यक आहे. तुमच्या उत्पादनाचे अनेक व्हेरिएंट असल्यास, सुरुवातीच्या पुनरावलोकनात सर्वोच्च व्हेरिएंटची किंमत वापरली जाते, त्यामुळे तुमच्या सर्वात महागड्या व्हेरिएंटमुळे ट्रिगर झालेले मूल्य निर्बंध संपूर्ण उत्पादनाला लागू होतात. बहुतांश प्रकरणांमध्ये, तुमच्या उत्पादनाचे पुनरावलोकन काही सेकंदांत पूर्ण होते. काही उत्पादनांसाठी अधिक सविस्तर पुनरावलोकनाची आवश्यकता असते, ज्यासाठी जास्त वेळ लागतो.
तुमच्या उत्पादनाची स्थिती तुमच्या उत्पादन पेजच्या Managed Markets विभागामध्ये दिसते. तुमच्या उत्पादनाच्या पुनरावलोकन स्थितीबद्दल अधिक माहितीसाठी खालील टेबलचा संदर्भ घ्या.
| पुनरावलोकन स्थिती | वर्णन |
|---|---|
| (X) प्रदेशांमध्ये पुनरावलोकनाधीन |
तुमच्या उत्पादनाचे पुनरावलोकन केले जात आहे. साधारणपणे, पुनरावलोकन काही सेकंदात पूर्ण होते. काही उत्पादनांना अधिक तपशीलवार पुनरावलोकनाची आवश्यकता असते, ज्याला 24 तासांपर्यंत वेळ लागू शकतो.
पुनरावलोकन स्थितीत असलेली उत्पादने तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर प्रकाशित केली जाऊ शकत नाहीत. |
| उत्पादनाला सपोर्ट नाही |
तुमचे उत्पादन Managed Markets वर विकले जाऊ शकत नाही. तुमचे उत्पादन का सपोर्ट करत नाही याचे कारण पाहण्यासाठी उत्पादनाला सपोर्ट नाही वर क्लिक करा, जसे की युनायटेड स्टेट्स मधील ठिकाणाहून पूर्तता आवश्यक आहे.
सपोर्ट नसलेल्या स्थितीत असलेली उत्पादने तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर प्रकाशित केली जाऊ शकत नाहीत. |
| (X) प्रदेशांमध्ये सपोर्ट नाही |
तुमचे उत्पादन विशिष्ट प्रदेशांसाठी सपोर्ट करत नाही. तुमचे उत्पादन का सपोर्ट करत नाही याचे कारण पाहण्यासाठी (X) प्रदेशांमध्ये सपोर्ट नाही वर क्लिक करा, जसे की काही प्राणी किंवा वनस्पती सामग्री असलेली उत्पादने प्रतिबंधित आहेत. ज्या प्रदेशांमध्ये उत्पादन प्रतिबंधित आहे त्यांची सूची देखील दर्शविली जाते.
एखाद्या विशिष्ट मार्केटसाठी सपोर्ट नसलेल्या स्थितीत असलेली उत्पादने त्या मार्केटमधील ग्राहकांना दिसू शकत नाहीत. |
| (X) प्रदेशांमध्ये सपोर्ट आहे | तुमच्या उत्पादनाचे पुनरावलोकन केले गेले आहे आणि ते तुमच्या सध्याच्या सर्व मार्केटमध्ये विकले जाऊ शकते. |
प्रतिबंधित आयटम फिल्टर करा
विशिष्ट मार्केटमध्ये किंवा सर्व मार्केटमधील प्रतिबंधित आयटम दाखवण्यासाठी तुम्ही तुमची उत्पादन सूची फिल्टर करू शकता. तुमचे प्राथमिक मार्केट फिल्टरच्या परिणामांमध्ये समाविष्ट केलेले नाही.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, उत्पादने वर जा.
आयकनवर क्लिक करा.
फिल्टर जोडा वर क्लिक करा आणि त्यानंतर प्रकाशित करताना एरर वर क्लिक करा.
तुम्हाला ज्या मार्केटमध्ये प्रतिबंधित आयटमसाठी फिल्टर करायचे आहे ते निवडा. सर्व प्रतिबंधित आयटम फिल्टर करण्यासाठी, सर्व निवडा वर क्लिक करा.
प्रतिबंधित आयटमची क्रमवारी लावा
तुम्ही तुमच्या उत्पादन सूचीमधील प्रतिबंधित आयटमसाठी क्रमवारी देखील लावू शकता.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, उत्पादने वर जा.
क्रमवारी आयकनवर क्लिक करा.
प्रकाशित करताना एरर निवडा.
पर्यायी: प्रतिबंधित आयटमचा क्रम सर्वात जुन्याकडून सर्वात नवीनकडे दाखवायचा की सर्वात नवीनकडून सर्वात जुन्याकडे हे निवडा.
नोटिफिकेशन्स
जेव्हा एखादा नवीन प्रतिबंधित आयटम ओळखला जातो, मग ते नवीन उत्पादन असल्यामुळे किंवा त्या उत्पादनावर परिणाम करणारे नियम बदलल्यामुळे असो, तेव्हा तुम्हाला तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये एक नोटिफिकेशन मिळते. या नोटिफिकेशनमधून, तुम्ही सर्व मार्केटसाठी प्रतिबंधित उत्पादनांच्या फिल्टर केलेल्या सूचीमध्ये अॅक्सेस करू शकता. तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये अलर्ट्स अॅक्सेस करण्याविषयी अधिक जाणून घ्या.
तुम्ही Managed Markets ॲक्टिव्हेट करण्यापूर्वी तुमच्या उत्पादन सूचीचे पहिल्यांदा पुनरावलोकन केले जाते आणि त्यानंतर तुम्ही जोपर्यंत Managed Markets वापरता, तोपर्यंत उत्पादन पुनरावलोकन सुरू राहते. अधिक जाणून घेण्यासाठी, प्रतिबंधित Managed Markets उत्पादनांचे पुनरावलोकन करा पाहा.
प्रतिबंधित Managed Markets उत्पादने मेटाफील्ड्ससह अपडेट करा
तुमच्या उत्पादनाचे पुनरावलोकन केले असल्यास आणि तुमच्या मार्केट्ससाठी Unsupported स्टेटसवर सेट केले असल्यास, तुम्ही तुमच्या उत्पादनाचे अधिक अचूक वर्णन करण्यासाठी उत्पादनावरील कॅटेगरी मेटाफील्ड्स अपडेट करू शकता. तुमचे मेटाफील्ड्स अपडेट केल्यानंतर, तुमच्या उत्पादनाचे पुन्हा पुनरावलोकन केले जाते.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, उत्पादने वर जा.
अपडेट करण्यासाठी उत्पादनावर क्लिक करा.
Category metafields विभागामध्ये, प्रत्येक मेटाफील्डसाठी योग्य मूल्य निवडा.
सेव्ह करा वर क्लिक करा.
तुमचे उत्पादन अपडेट झाल्यानंतर, त्याचे पुन्हा पुनरावलोकन केले जाते. बऱ्याच प्रकरणांमध्ये पुनरावलोकने काही सेकंदात होतात, परंतु काही प्रकरणांमध्ये पुनरावलोकनांसाठी 24 तासांपर्यंतचा वेळ लागू शकतो.