Managed Markets वरील FedEx ने शिपिंग

तुम्ही Managed Markets सह शिपिंग सेवा म्हणून FedEx International Connect Plus® वापरू शकता.

Managed Markets सह FedEx वापरताना विचारात घेण्याच्या बाबी

तुम्ही FedEx वापरून शिपिंग करण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार करा:

  • FedEx International Connect Plus® डिलिव्हर्ड ड्युटी पेड (DDP) शिपिंगला सपोर्ट करते. DDP सह, सर्व शुल्क, कर आणि कस्टम फी आगाऊ भरली जाते, ज्यामुळे तुमच्या ग्राहकांसाठी वितरण प्रक्रिया अधिक सुलभ होते.
  • FedEx पॅकेजेस USPS च्या ठिकाणांवर ड्रॉप ऑफ करता येत नाहीत. USPS ड्रॉप-ऑफच्या ठिकाणी केवळ DHL eCommerce पॅकेजेस हीच शिपमेंट्स वितरित केली जाऊ शकतात.
  • FedEx International Connect Plus® हे Managed Markets सह मूळ किंवा गंतव्य पत्त्यांसाठी पोस्ट ऑफिस (PO) बॉक्सेसला सपोर्ट करत नाही. तुम्हाला PO बॉक्समध्ये शिपिंग करायचे असल्यास, DHL eCommerce शिपिंग सेवा वापरा.
  • FedEx International Connect Plus® सह शिप केलेल्या पॅकेजचे कमाल मूल्य $2,500 USD इतके आहे.
  • गंतव्यस्थानानुसार, तुमच्या शिपमेंटला $7 USD चा रिमोट एरिया सरचार्ज लागू होऊ शकतो. देशावर अवलंबून, गंतव्यस्थानाचे शहर किंवा पोस्टल कोडच्या आधारावर FedEx द्वारे हे निश्चित केले जाते. एखाद्या शिपमेंटला ही फी लागू होईल की नाही याबद्दल तुम्हाला खात्री नसल्यास, Shopify सपोर्टशी संपर्क साधा.
  • ज्यामध्ये हार्मोनाइज्ड सिस्टीम (HS) कोड 64 (शूज) असलेले आयटम्स समाविष्ट आहेत अशा मेक्सिको गंतव्यस्थान असलेल्या ऑर्डर्ससाठी FedEx शिपिंग लेबल्स खरेदीसाठी उपलब्ध नाहीत. या ऑर्डर्ससाठी UPS लेबल्सदेखील उपलब्ध नाहीत. ग्राहक मेक्सिको गंतव्यस्थान आणि निवडलेली FedEx लेबल्स असलेल्या ऑर्डर्ससाठी अद्यापही चेकआउट करू शकतात, परंतु ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला DHL Express Worldwide लेबल खरेदी करावे लागेल. जर तुमचा व्यवसाय युनायटेड स्टेट्समध्ये असेल, तर त्याऐवजी तुम्ही DHL eCommerce लेबल वापरू शकता.

Managed Markets सह FedEx साठी पॅकेजच्या आवश्यकता

FedEx हे शिपमेंट्सच्या कमाल मापांवर आणि वजनावर निर्बंध घालते. तुमच्या ऑर्डर्स या निर्बंधांपेक्षा जास्त नाहीत याची खात्री करण्यासाठी खालील टेबल तपासा.

ओव्हरसाईझ पॅकेजेससाठी $30 USD चे अतिरिक्त शुल्क आकारले जाते. जास्त वजन असलेल्या पॅकेजेससाठी $38 USD चे अतिरिक्त शुल्क आकारले जाते.

FedEx साठी वजन आणि डायमेंशनच्या आवश्यकता
मापFedEx International Connect Plus®
लांबी48 इंच
रुंदी30 इंच
लांबी आणि घेर105 इंच
वजन55 lbs

एखाद्या शिपमेंटची लांबी आणि घेर निश्चित करण्यासाठी, पॅकेजची लांबी, उंचीच्या दुप्पट आणि रुंदीच्या दुप्पट यांची बेरीज करा. उदाहरणार्थ, 10 इंच लांब, 20 इंच उंच आणि 15 इंच रुंद असलेल्या पॅकेजची लांबी आणि घेर 80 इंच असतो: (10 + (20 X 2) + (15 X 2) = 80).

तुमची उत्पादने FedEx कडे पोहोचवणे

तुम्ही Managed Markets सह FedEx वापरत असल्यास, तुम्हाला तुमची शिपमेंट FedEx ड्रॉप-ऑफच्या ठिकाणी ड्रॉप ऑफ करावी लागेल किंवा पिकअप शेड्यूल करावे लागेल. तुम्ही टेलिफोनद्वारे किंवा FedEx व्हर्च्युअल असिस्टंट वापरून FedEx सह पिकअप शेड्यूल करू शकता.

तुमचे पिकअप शेड्यूल झाल्यानंतर त्यासंबंधित तुम्हाला प्रश्न असल्यास, तुम्ही मदतीसाठी FedEx शी संपर्क साधू शकता आणि तुमचा पिकअप नंबर देऊ शकता.

FedEx पिकअपविषयीच्या बाबी

तुम्ही तुमची शिपमेंट FedEx द्वारे पिकअप करत असल्यास, तुमचे पिकअप शेड्यूल करण्यापूर्वी खालील बाबी तपासा:

  • Express पिकअप्स केवळ 150 lbs पेक्षा कमी वजन असलेल्या शिपमेंट्ससाठीच उपलब्ध आहेत. 150 lbs पेक्षा जास्त वजनाच्या शिपमेंट्सचे वर्गीकरण फ्रेट पिकअप्स म्हणून केले जाते, ज्यांना अतिरिक्त शुल्क लागू होऊ शकते आणि विलंब होऊ शकतो.
  • FedEx International Connect Plus® शिपमेंट्ससाठीचे पिकअप्स एका Express ड्रायव्हरनेच पिकअप करणे आवश्यक आहे. तुम्ही पिकअप शेड्यूल केल्यास आणि तुम्हाला Express पिकअप हवे आहे असे नमूद न केल्यास, तुमची शिपमेंट नाकारली जाईल किंवा तिला विलंब होईल.
  • तुम्ही पिकअपसाठी वैध Managed Markets ट्रॅकिंग नंबर देणे आवश्यक आहे. तुम्ही तो न दिल्यास, किंवा तुमचा ट्रॅकिंग नंबर चुकीचा असल्यास, FedEx तुमच्याकडून पिकअपसाठी शुल्क आकारेल.
  • FedEx ड्रॉप-ऑफच्या ठिकाणी ड्रॉप ऑफ करण्याऐवजी पिकअप केल्या जाणाऱ्या शिपमेंट्ससाठी $4.00 USD ऑन-कॉल पिकअप फी लागू होते. ही फी प्रत्येक पिकअपसाठी आहे, प्रत्येक पॅकेजसाठी नाही. ज्या शिपर्सकडे आधीपासूनच नियमितपणे शेड्यूल केलेले पिकअप्स आहेत त्यांच्यासाठी ऑन-कॉल पिकअप फी माफ केली जाते.

FedEx सह पिकअप शेड्यूल करा

  1. 1-800-463-3339 वर टेलिफोनद्वारे किंवा fedex.com वरील Ask FedEx वर क्लिक करून FedEx शी संपर्क साधा.
  2. तुम्हाला Express पिकअप शेड्यूल करणे आवश्यक आहे हे नक्की नमूद करा. FedEx International Connect Plus® शिपमेंट्सचे पिकअप्स Express ड्रायव्हरने पिकअप करणे आवश्यक आहे.
  3. तुमच्या शिपमेंटसंबंधित कोणत्याही अतिरिक्त प्रश्नांची उत्तरे द्या आणि तुमचा ट्रॅकिंग नंबर द्या.
  4. रेफरन्ससाठी तुमचा पिकअप नंबर नोंदवून ठेवा.

Managed Markets सह FedEx साठी शिपिंग कव्हरेज

एखादी शिपमेंट गहाळ झाल्यास किंवा खराब झाल्यास, Shopify ॲडमिनमध्ये शिपिंगचा क्लेम सबमिट करा.

पॅकेज गहाळ झाल्याचे किंवा खराब झाल्याचे लक्षात येताच तुम्ही तुमचा क्लेम सबमिट करावा. FedEx ला शिपमेंटच्या तारखेपासून 9 महिन्यांच्या आत नुकसानभरपाईच्या क्लेमची सूचना मिळणे आवश्यक आहे. जर क्लेम लपलेल्या नुकसानीसाठी असेल, म्हणजेच जे नुकसान साबूत बॉक्स उघडल्यानंतरच आढळून येते, तर क्लेमची नोंद शिपिंगच्या तारखेपासून 21 दिवसांच्या आत केली जाणे आवश्यक आहे.

तुम्ही FedEx द्वारे शिपिंग लेबल खरेदी करता तेव्हा त्यात इन्शुरन्सचा समावेश असतो. ज्या शिपिंग सेवांमध्ये इन्शुरन्स कव्हरेज समाविष्ट असते त्या उत्पादनाचे एकत्रित मूल्य आणि शिपिंग लेबलच्या खर्चासाठी जास्तीत जास्त $100 USD चे कव्हर देतात.

तुमच्या क्लेममध्ये खालील माहिती समाविष्ट करा:

  • प्राप्तकर्त्याचा फोन नंबर
  • पॅकेज गहाळ किंवा खराब झाल्याची पुष्टी करणारे तुमच्या ग्राहकाचे मेसेजेस दर्शवणारा स्क्रीनशॉट

खराब झालेल्या पॅकेजेससाठी, तुम्ही खालील माहितीदेखील समाविष्ट करणे आवश्यक आहे:

  • नुकसानीचे वर्णन
  • खराब झालेले पॅकेज आणि उत्पादनांचे फोटो