Managed Markets वर UPS सह शिपिंग
तुम्ही Managed Markets सह शिपिंग सेवा म्हणून UPS® Standard आणि UPS Worldwide Expedited® वापरू शकता.
या पेजवर
Managed Markets सोबत UPS वापरताना विचारात घेण्याच्या गोष्टी
UPS चा वापर करून तुमच्या Managed Markets च्या ऑर्डर्स शिप करण्यापूर्वी खालील गोष्टींचा आढावा घ्या:
- UPS Standard आणि UPS Worldwide Expedited दोन्ही डिलिव्हर्ड ड्युटी पेड (DDP) शिपिंगला सपोर्ट करतात. DDP च्या मदतीने सर्व शुल्क, कर आणि सीमाशुल्क (कस्टम्स) शुल्क आधीच भरले जाते, ज्यामुळे तुमच्या ग्राहकांसाठी वितरणाची प्रक्रिया अधिक सुरळीत होते.
- USPS च्या ठिकाणांवर UPS चे पॅकेजेस ड्रॉप-ऑफ करता येत नाहीत. USPS ड्रॉप-ऑफच्या ठिकाणांवर वितरित केल्या जाऊ शकणाऱ्या एकमेव शिपमेंट्स म्हणजे DHL eCommerce पॅकेजेस.
- पिकअप्ससाठी UPS $4 USD शुल्क आकारते. हे शुल्क प्रत्येक पिकअपसाठी लागू होते, प्रति पार्सल नाही. Managed Markets सह शिप न केली जाणारी पॅकेजेस पिकअपमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात.
- Managed Markets सह मूळ किंवा गंतव्य पत्त्यांसाठी UPS पोस्ट ऑफिस (PO) बॉक्सेसना सपोर्ट करत नाही. तुम्हाला PO बॉक्सवर शिप करण्याची आवश्यकता असल्यास, DHL eCommerce शिपिंग सेवा वापरा.
- मेक्सिकोमधील बाजा कॅलिफोर्नियामधील पोस्टल कोड असलेल्या गंतव्यस्थानांवर वितरणासाठी UPS उपलब्ध नाही.
- हार्मोनाइज्ड सिस्टीम (HS) कोड 64 (शूज) असलेल्या आयटम्सचा समावेश असणाऱ्या मेक्सिकोच्या गंतव्यस्थानासह ऑर्डर्ससाठी UPS शिपिंग लेबल्स खरेदीसाठी उपलब्ध नाहीत. या ऑर्डर्ससाठी FedEx लेबल्सदेखील उपलब्ध नाहीत. तरीही ग्राहक मेक्सिकोचे गंतव्यस्थान आणि निवडलेल्या UPS लेबल्ससह चेकआउट करू शकतात, परंतु ऑर्डर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला DHL Express Worldwide लेबल खरेदी करावे लागेल. तुमचा व्यवसाय युनायटेड स्टेट्समध्ये असल्यास, तुम्ही त्याऐवजी DHL eCommerce लेबल वापरू शकता.
UPS साठी सध्याच्या Managed Markets स्टोअर्समधील बदल
आधीपासूनच Managed Markets वापरणाऱ्या स्टोअर्ससाठी, UPS शिपिंग वाहक म्हणून उपलब्ध झाल्यावर खालीलप्रमाणे होते:
- बाय डीफॉल्ट, जर तुमचे शिपिंग झोन सध्या वाहक दर वापरत असतील, तर FedEx International Connect Plus® दर तुमच्या चेकआउटमध्ये जोडले जातील. त्याऐवजी UPS दर वापरण्यासाठी, तुमच्या चेकआउटमध्ये UPS ला वाहक दर म्हणून जोडा.
- जर तुमचे शिपिंग झोन सध्या संक्रमण वेळेसह फ्लॅट दर वापरत असतील, तर UPS शिपिंग दर स्वयंचलितपणे तयार केले जात नाहीत. UPS फ्लॅट दर वापरण्यासाठी, ग्राहकांना ते उपलब्ध करून देण्याकरिता तुम्हाला तुमच्या सेटिंग्जमध्ये Standard International Shipping मॅन्युअली कॉनफिगर करणे आवश्यक आहे.
- अर्ली अॅक्सेस कालावधीदरम्यान शिपिंग लेबलच्या खरेदी शुल्कावर शिपिंग लेबलच्या किमतीचे समायोजन लागू केले गेले नव्हते. जर तुम्हाला अर्ली अॅक्सेस कालावधीमध्ये UPS चा अॅक्सेस मिळाला असेल, तर अर्ली अॅक्सेस कालावधी संपल्यावर तुम्हाला लागणारे कोणतेही शिपिंग लेबलच्या किमतीचे समायोजन केले जाते.
Managed Markets वरील UPS साठी पॅकेजच्या आवश्यकता
UPS शिपमेंटच्या कमाल मापांवर आणि वजनावर निर्बंध घालते. तुमच्या ऑर्डर्स या निर्बंधांचे उल्लंघन करत नाहीत याची खात्री करण्यासाठी खालील टेबलचे पुनरावलोकन करा.
| मोजमाप | UPS® Standard | UPS Worldwide Expedited® |
|---|---|---|
| लांबी | 108 इंच | 108 इंच |
| रुंदी | UPS® Standard साठी आकार (लांबी + घेर) वापरून मोजला जातो. एकूण आकाराची मर्यादा 165 इंच आहे. | UPS Worldwide Expedited® साठी आकार (लांबी + घेर) वापरून मोजला जातो. एकूण आकाराची मर्यादा 165 इंच आहे. |
| उंची | ||
| वजन | 150 lbs | 150 lbs |
Managed Markets वरील UPS साठी मूल्याचे निर्बंध
UPS सह शिपिंगसाठी कमाल ऑर्डरचे मूल्य $25,000 USD आहे, परंतु विशिष्ट उत्पादन कॅटेगरींसाठी मूल्याचे निर्बंध गंतव्यस्थान असलेल्या देशानुसार बदलू शकतात.
दागिने किंवा घड्याळे यांसारख्या ठराविक उत्पादन कॅटेगरींचे मूल्य प्रति वैयक्तिक आयटम $10,000 USD पेक्षा जास्त असू शकत नाही. उदाहरणार्थ, तुम्ही दागिने विकत असल्यास, तुम्ही तरीही $25,000 USD मूल्यापर्यंत शिपिंग लेबल खरेदी करू शकता, परंतु वैयक्तिक दागिन्यांच्या आयटमचे मूल्य $10,000 USD पेक्षा जास्त नाही याची तुम्हाला खात्री करावी लागेल.
तुमची उत्पादने UPS पर्यंत पोहोचवणे
जर तुम्ही Managed Markets वर UPS वापरत असाल, तर तुम्ही तुमची उत्पादने एखाद्या UPS ड्रॉप-ऑफच्या ठिकाणी सोडू शकता किंवा पिकअप शेड्युल करू शकता.
UPS पिकअप शेड्युल करा
तुम्ही 1 ते 7 दिवस आधी एकच पिकअप शेड्युल करू शकता. पिकअपच्या वेळा अंदाजित असतात आणि त्या ट्रॅफिक, हवामान आणि पिकअपच्या पत्त्यावर अवलंबून असतात. तुम्हाला एकापेक्षा जास्त पिकअप्स शेड्युल करायचे असल्यास, तुम्हाला किमान एक UPS लेबल खरेदी करणे आवश्यक आहे.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ऑर्डर्स वर जा.
पिकअप शेड्युल करण्यासाठी, खालीलपैकी एक करा:
- शिपिंग लेबल खरेदी केल्यानंतर लगेच पिकअप शेड्युल करण्यासाठी, पिकअपचे पर्याय वर क्लिक करा आणि त्यानंतर UPS पिकअप शेड्युल करा वर क्लिक करा.
- UPS च्या साहाय्याने पूर्तता केलेल्या ऑर्डरसाठी पिकअप शेड्युल करण्याकरिता, ऑर्डर उघडा,
आयकनवर क्लिक करा आणि त्यानंतर UPS पिकअप शेड्युल करा वर क्लिक करा.
- पिकअपचा पत्ता विभागामध्ये, पिकअपचा पत्ता निवडा किंवा कस्टम पत्ता एंटर करा. कस्टम पत्ते भविष्यातील पिकअप्ससाठी सेव्ह केले जात नाहीत.
- पिकअपचा तपशील विभागामध्ये, खालील तपशील द्या:
- संपर्काचे नाव आणि फोन नंबर
- पिकअपची तारीख आणि अंदाजित पिकअपची वेळ
- पॅकेजचे ठिकाण, जसे की रिसेप्शन किंवा मुख्य दरवाजा
- कुरिअरसाठी कोणत्याही विशेष सूचना, जसे की अपार्टमेंटचा नंबर किंवा बझ कोड.
- पिकअपच्या सारांशाचे पुनरावलोकन करा आणि त्यानंतर पिकअप शेड्युल करा वर क्लिक करा.
तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमधील ऑर्डर्स पेजवरून तुमचे नियोजित पिकअप्स पाहू शकता.
तुम्हाला तुमच्या नियोजित पिकअपबाबत अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास, तुमचा पिकअप पुष्टीकरण नंबर आणि ट्रॅकिंग नंबरसह 1-800-PICK-UPS (1-800-742-5877) वर UPS ला कॉल करा. तुम्हाला तुमचा पिकअप पुष्टीकरण नंबर ऑर्डरच्या टाइमलाइनमध्ये सापडेल.
UPS पिकअप रद्द करा
तुम्ही नियोजित पिकअप रद्द करू शकता. तुम्ही नियोजित वेळेच्या अगदी जवळ असताना पिकअप रद्द करण्याचा प्रयत्न केल्यास, ड्रायव्हरला नियोजित वेळेवर पोहोचण्यापासून थांबवण्यासाठी खूप उशीर झालेला असू शकतो. तुम्ही UPS पिकअप यशस्वीरीत्या रद्द केल्यास, तुमच्या खात्यात पिकअपचा खर्च जमा केला जातो, जो तुम्ही नंतर शिपिंग लेबल्स खरेदी करण्यासाठी किंवा इतर पिकअप्स शेड्युल करण्यासाठी वापरू शकता.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ऑर्डर्स वर जा.
पिकअप्स पहा वर क्लिक करा.
पिकअप रद्द करा वर क्लिक करा.
पुष्टी करण्यासाठी पुन्हा पिकअप रद्द करा वर क्लिक करा.
Managed Markets वरील UPS साठी शिपिंग कव्हरेज
जर शिपमेंट हरवले असेल किंवा त्याचे नुकसान झाले असेल, तर Shopify ॲडमिनमध्ये शिपिंग क्लेम सबमिट करा.
तुम्हाला एखादे पॅकेज हरवल्याचे किंवा त्याचे नुकसान झाल्याचे समजताच तुम्ही तुमचा क्लेम सबमिट केला पाहिजे. पॅकेज वितरित झाल्यापासून 60 दिवसांच्या आत किंवा पॅकेज हरवल्यास, नियोजित वितरणाच्या तारखेपासून 60 दिवसांच्या आत UPS ला क्लेमची सूचना प्राप्त होणे आवश्यक आहे.
तुम्ही UPS कडून शिपिंग लेबल खरेदी करता तेव्हा विम्याचा समावेश केलेला असतो. विमा कव्हरेज समाविष्ट असलेल्या शिपिंग सेवा शिपिंग लेबलच्या खर्चाव्यतिरिक्त उत्पादनाच्या मूल्याच्या जास्तीत जास्त $100 USD कव्हर करतात.
तुमच्या क्लेममध्ये खालील माहितीचा समावेश करा:
- प्राप्तकर्त्याचा फोन नंबर
- पॅकेज हरवल्याची किंवा नुकसान झाल्याची पुष्टी करणाऱ्या तुमच्या ग्राहकाकडील मेसेजेस दर्शवणारा स्क्रीनशॉट
नुकसान झालेल्या पॅकेजेससाठी, तुम्हाला खालील माहितीचा देखील समावेश करणे आवश्यक आहे:
- नुकसानीचे वर्णन
- नुकसान झालेले पॅकेज आणि उत्पादनांचे फोटो