चलन रूपांतरणे आणि विनिमय दर
चलन रूपांतरण व्यवहाराच्या वेळी होते, जसे की जेव्हा तुम्ही पेमेंट कॅप्चर करता, तुम्ही परतावा जारी करता किंवा जेव्हा एखादा चार्जबॅक असतो. वापरलेला परदेशी विनिमय दर हा नेहमी व्यवहाराच्या वेळेचा दर असतो.
तुम्ही व्यवहाराचे ब्रेकडाउन ऑर्डरच्या टाइमलाइनमध्ये पाहू शकता.
प्रत्येक मार्केटसाठी प्रत्येक उत्पादनाची किंमत कशी कॅल्क्युलेट केली जाते याचे ब्रेकडाउन तुम्ही पाहू शकता.
या पेजवर
चलनाच्या व्याख्या आणि रूपांतरणे
तुमच्या स्टोअरमध्ये चलनांचे तीन प्रकार आहेत:
- स्टोअरचे चलन - तुमच्या Shopify ॲडमिनचे चलन. हे असे चलन आहे जे तुम्ही तुमच्या प्राथमिक मार्केटमधील उत्पादने आणि उत्पादन व्हेरिएंट्सच्या किमती सेट करण्यासाठी वापरता, आणि हे तेच चलन आहे जे तुमच्या रिपोर्ट्समध्ये दिसते.
- स्थानिक चलन (ज्याला ग्राहक किंवा प्रेझेंटमेंट चलन देखील म्हटले जाते) - असे चलन जे तुमच्या स्टोअरमधील ग्राहकांना दिसते आणि जे चलन ग्राहक चेकआउटच्या वेळी त्यांच्या ऑर्डर्ससाठी पैसे भरण्यासाठी वापरतात.
- पेआउट चलन - तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करताना Shopify वापरत असलेले चलन.
चलन रूपांतरण जोखीम
चलनाचे दर नेहमी बदलत असतात. पेमेंट्स किंवा परताव्यावर प्रक्रिया करण्यास विलंब होतो, तेव्हा चलन रूपांतरणामुळे तुमचे आर्थिक नुकसान होण्याची किंवा तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता असते.
खालील परिस्थितींमध्ये तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा तुम्हाला फायदा मिळू शकतो:
ऑटोमॅटिक विनिमय दर रूपांतरणे
जेव्हा तुम्ही स्थानिक चलनांसह मार्केटमध्ये विक्री करता, तेव्हा तुमच्या ऑनलाइन स्टोअरमधील किंमती तुमच्या ग्राहकाच्या चलनात रूपांतरित केल्या जातात. मार्केट विनिमय दरांनुसार तुमच्या स्टोअरमधील किंमती ऑटोमॅटिकरित्या बदलतात.
उत्पादनाच्या किंमतीला चलन रूपांतरण दराने गुणून, रूपांतरण शुल्क जोडून आणि लागू असल्यास त्या चलनासाठी राउंडिंग नियम लागू करून तुमच्या किंमती रूपांतरित केल्या जातात. तुमच्या रूपांतरित किंमतींमध्ये तुमच्या चलन रूपांतरण खर्चाचा समावेश असतो. उदाहरणार्थ, जेव्हा $10.00 USD उत्पादनाचे युरोमध्ये रूपांतर केले जाते, तेव्हा €8.81 च्या रूपांतरित किंमतीमध्ये चलन रूपांतरण दर आणि रूपांतरण शुल्काचा समावेश असतो.
(**Product price** x **currency conversion rate**) x (**1** + **currency conversion fee**)</br>
<br>($10.00 USD x 0.867519) x (1 + .015) = €8.81</br>जर तुमचे राउंडिंग नियम अॅक्टिव्ह असतील, तर रूपांतरित किंमत €8.85 पर्यंत राउंड अप केली जाते.
मॅन्युअल विनिमय दर रूपांतरणे
Managed Markets सह, तुम्ही तुमच्या प्रत्येक मार्केटसाठी मॅन्युअली चलन विनिमय दर सेट करू शकता. हे तुम्हाला ऑटोमॅटिक विनिमय दरांमुळे चढ-उतार होणाऱ्या किंमतींच्या विरूद्ध प्रति मार्केट तुमच्या किंमती स्थिर करण्याची अनुमती देते.
मॅन्युअल विनिमय दर रूपांतरणे वापरताना, तुमचा मॅन्युअल विनिमय दर आणि सध्याचा मार्केट विनिमय दर यामधील फरकावर अवलंबून तुमचा आर्थिक फायदा होऊ शकतो किंवा नुकसान होऊ शकते.
तुमच्या चलन रूपांतरणाला रूपांतरण शुल्क लागू होते. जर तुम्हाला हे शुल्क तुमच्या मॅन्युअल दरामध्ये समाविष्ट करायचे असेल, तर तुमच्या दराला तुमच्या स्टोअरच्या देशाच्या रूपांतरण शुल्काने गुणा. उदाहरणार्थ, 1.5% रूपांतरण शुल्कासह USD ते EUR विनिमय दर असा दिसू शकतो: 0.90867 x 1.015 = 0.9223.
तुमचे प्राथमिक मार्केट नसलेल्या मार्केट्ससाठी तुम्ही मॅन्युअल रूपांतरण दर सेट करू शकता. हे दर सेटिंग्ज > सामान्य मधील तुमच्या स्टोअरच्या मूळ चलनावर आधारित असतात, अगदी तुम्ही ज्या मार्केट्ससाठी तुमच्या स्टोअरच्या चलनापेक्षा वेगळे मूळ चलन सेट केले आहे, त्यांच्यासाठीदेखील हे लागू होते.
तुम्ही मॅन्युअल विनिमय दरांसह किंमत अॅडजस्टमेंट्स वापरू शकता. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे USD या तुमच्या स्टोअरच्या चलनात 20.00 किंमतीचे उत्पादन असेल आणि सर्व मार्केट्ससाठी किंमत राउंडिंग जवळच्या 1.00 वर सुरू असेल, तर तुम्ही तुमच्या कॅनडा मार्केटची किंमत निश्चिती खालीलपैकी कोणत्याही प्रकारे नियंत्रित करू शकता:
- CAD किंमत स्थिर करण्यासाठी तुम्ही 1.3 चा मॅन्युअल विनिमय दर सेट करू शकता आणि नंतर 20% ची किंमत अॅडजस्टमेंट लागू करू शकता. किंमतीची गणना 20.00 x 1.3 x 1.2 = 32.00 CAD अशी केली जाते.
- तुम्ही 1 चा मॅन्युअल विनिमय दर सेट करू शकता आणि नंतर फक्त किंमत अॅडजस्टमेंट वापरून CAD किंमत नियंत्रित करण्यासाठी 50% ची अॅडजस्टमेंट लागू करू शकता. किंमतीची गणना 20.00 x 1 x 1.5 = 30.00 CAD अशी केली जाते.
- तुम्ही ऑटोमॅटिक विनिमय दर निवडू शकता आणि CAD किंमतींवर 50% ची किंमत अॅडजस्टमेंट लागू करू शकता. किंमतीची गणना 20.00 x [सध्याचा विनिमय दर] x 1.5 अशी केली जाते. किंमत सध्याच्या विनिमय दरांवर आधारित असते आणि त्यात 50% किंमत अॅडजस्टमेंटची भर पडते, यामुळे किंमतीत चढ-उतार होतात.
जर मार्केटचे मूळ चलन बदलले, किंवा मॅन्युअल रूपांतरण दर ऑटोमॅटिकवर स्विच केले, तर मॅन्युअल दर डीअॅक्टिव्हेट केला जातो पण हटवला जात नाही. याचा अर्थ असा की मूळ मार्केट चलन रिस्टोअर केल्यास, किंवा मॅन्युअल रूपांतरण दर पुन्हा सुरू केल्यास, मॅन्युअल रूपांतरण दर पुन्हा अॅक्टिव्ह होतो.
मॅन्युअल विनिमय दर अॅक्टिव्हेट करा
तुमच्या मार्केट्स पेजवरून, तुम्ही सिंगल-कंट्री मार्केट्ससाठी किंवा स्थानिक चलने बंद असलेल्या मल्टी-कंट्री मार्केट्ससाठी मॅन्युअल रूपांतरण दर सेट करू शकता. ज्या प्रत्येक देश किंवा प्रदेशासाठी तुम्हाला मॅन्युअल रूपांतरण दर वापरायचा असेल, त्यांच्यासाठी तुम्ही सिंगल-कंट्री मार्केट्स तयार करावीत.
मॅन्युअल रूपांतरण दर तुमच्या प्राथमिक मार्केटला लागू केले जाऊ शकत नाहीत.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिन मधून, मार्केट्स वर जा.
ज्या मार्केटसाठी तुम्हाला मॅन्युअल विनिमय दर जोडायचा आहे, त्यावर क्लिक करा.
चलन निवडकमध्ये, चलनाचे पर्याय पाहण्यासाठी मार्केटच्या चलनावर क्लिक करा.
विनिमय दर (FX) विभागामध्ये, मॅन्युअल निवडा.
विनिमय दर एंटर करा.
पूर्ण झाले वर क्लिक करा.
मॅन्युअली कॅप्चर केलेली पेमेंट्स
जेव्हा तुम्ही स्थानिक चलनांमध्ये विक्री करता, तेव्हा तुम्हाला पेमेंट म्हणून मिळणारी रक्कम तुम्ही ग्राहकाच्या क्रेडिट कार्डवर शुल्क आकारता त्या वेळच्या चलन दरावर आधारित असते. जर तुम्ही पेमेंट्स मॅन्युअली कॅप्चर करत असाल, तर जेव्हा तुम्ही त्यांच्या ऑर्डरवर प्रक्रिया करता तेव्हा तुमच्या ग्राहकाच्या क्रेडिट कार्डवर शुल्क आकारले जाते, ग्राहक ऑर्डर सबमिट करतो तेव्हा नाही. अधिकृतीकरण (ऑथरायझेशन) आणि तुम्ही मॅन्युअली तुमचे फंड्स कॅप्चर करण्याची वेळ या दरम्यान चलन विनिमय दरात बदल होऊ शकतो, ज्यामुळे छोटी तफावत येऊ शकते.
तुमच्या Shopify ॲडमिन मध्ये, तुम्हाला तुमच्या विक्रीचा अहवाल देणे सोपे जावे, म्हणून वेगवेगळ्या चलनांमधील ऑर्डर्स तुमच्या स्टोअरच्या चलनात रूपांतरित केल्या जातात. जोपर्यंत तुम्ही ग्राहकाकडून त्यांच्या ऑर्डरसाठी शुल्क आकारत नाही, तोपर्यंत रूपांतरित मूल्ये अंदाजित असतात.
उदाहरणार्थ, तुमच्या स्टोअरचे चलन USD आहे आणि तुम्ही USD व EUR मध्ये विक्री करता. तुमचा ग्राहक €90 च्या बुकशेल्फसाठी ऑर्डर तयार करतो. जेव्हा ते त्यांची ऑर्डर सबमिट करतात, तेव्हा $1 USD हे €0.90 EUR च्या बरोबरीचे असते.
| स्टोअरच्या चलनातील किंमत | ग्राहकाच्या चलनातील किंमत | अंदाजित ऑर्डर रक्कम |
|---|---|---|
| $100 USD | €90 EUR | $100 USD |
काही दिवसांनंतर चलनाचा दर बदलतो आणि $1 USD आता €0.85 EUR च्या बरोबरीचे आहे. तुम्ही तुमच्या ग्राहकाच्या क्रेडिट कार्डवर €90 EUR शुल्क आकारता. चलन रूपांतरण दर बदलल्यामुळे आणि $1 USD = €0.85 EURO झाल्यामुळे, €90 चे रूपांतर $98 USD मध्ये होते. तुम्हाला $98 USD मिळतात.
| स्टोअरच्या चलनातील किंमत | ग्राहकाच्या चलनातील किंमत | स्टोअरच्या चलनात रूपांतरित केलेली कॅप्चर केलेली रक्कम |
|---|---|---|
| $100 USD | €90 EUR | $98 USD |
परतावे
ग्राहक ऑर्डर तयार करतो आणि रिटर्न करतो या दरम्यान बऱ्याचदा वेळेचे अंतर असते. त्यामुळे, तुम्हाला ऑर्डरसाठी मिळणारी रूपांतरित रक्कम सहसा तुम्ही परताव्यात देणाऱ्या रूपांतरित रक्कमेइतकी नसते. आम्ही शिफारस करतो की ग्राहकाने त्यांच्या स्थानिक चलनात भरलेली संपूर्ण रक्कम तुम्ही परत करा. याचा अर्थ चलन रूपांतरणांमुळे तुमचे पैसे बुडू शकतात किंवा तुम्हाला नफा मिळू शकतो. स्थानिक चलनांमध्ये विक्री करताना ऑर्डर्सच्या परताव्याविषयी जाणून घ्या.
चार्जबॅक्स
जेव्हा कार्डधारक चार्जबॅक सुरू करतो, तेव्हा ऑर्डरच्या वेळच्या कन्व्हर्जन दराऐवजी निधी ट्रान्सफर करण्याच्या वेळचा कन्व्हर्जन दर वापरून चलन रूपांतरणे लागू केली जातात.
Shopify परतावा केली जाणारी रक्कम रूपांतरित करते, कार्डधारकाला विवादित रक्कम क्रेडिट करते आणि नंतर परतावा केली जाणारी रक्कम तुमच्या पुढील पेआउटमधून वजा करून तुमच्या वतीने कार्डधारकाच्या बँकेला शुल्क भरते. या चलन रूपांतरणासाठी तुमच्याकडून कोणतेही कन्व्हर्जन शुल्क आकारले जात नाही.
तुम्ही चार्जबॅकबाबत विवाद केल्यास आणि तो तुमच्या बाजूने सोडवला गेल्यास, चार्जबॅकमधील विवादित रक्कम तुम्हाला परत केली जाते आणि सध्याच्या कन्व्हर्जन दरावर आधारित तुम्हाला चार्जबॅक शुल्क परत केले जाते.
चार्जबॅक्स वर कशी प्रक्रिया केली जाते याबद्दल अधिक जाणून घ्या.
वेगवेगळ्या चलनांमध्ये विक्री करणे व सेटल करणे आणि स्थानिक चलनांमध्ये विक्री करणे
बहुतेक चलन रूपांतरणे तुमच्या ग्राहकाचे स्थानिक चलन आणि तुमच्या स्टोअरचे चलन या दरम्यान होतात. तुमच्या स्टोअरचे चलन तुमच्या पेआउट चलनापेक्षा वेगळे असल्यास, ग्राहकाचे स्थानिक चलन आणि तुमचे पेआउट चलन या दरम्यान चलन रूपांतरणे होतात.