बॉट्सची शब्दावली
बॉट्सची विशिष्ट शब्दावली असते. या लेखामध्ये, तुम्हाला सामान्य बॉट्स आणि स्वयंचलित ट्रॅफिक शब्दावलीची संज्ञासूची मिळू शकते. Shopify वरील बॉट्स आणि स्वयंचलित ट्रॅफिकबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी खालील व्याख्या आणि संज्ञांच्या सूचीचे पुनरावलोकन करा.
| संज्ञा | व्याख्या |
|---|---|
| अॅडवेअर होस्टिंग | अॅडवेअर होस्ट करण्यासाठी Shopify च्या पायाभूत सुविधांचा वापर, ज्यामुळे अवांछित जाहिराती आणि संभाव्य सुरक्षा धोके निर्माण होऊ शकतात. |
| स्वयंचलित अधिकृत इंटिग्रेशन्स | तुमचे स्टोअर प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी डिझाइन केलेल्या ॲप्लिकेशन्सचा स्वयंचलित सेटअप. |
| स्वयंचलित ग्राहक साइनअप निर्मिती | ग्राहक खात्यांची स्वयंचलित निर्मिती, जी बऱ्याचदा ईमेलची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी किंवा फसवणुकीच्या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी वापरली जाते. |
| स्वयंचलित मर्चंट साइनअप निर्मिती | मर्चंट खाती तयार करणाऱ्या स्वयंचलित प्रक्रिया, ज्या बऱ्याचदा संसाधनांवर ताण टाकण्यासाठी किंवा प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या दुर्भावनापूर्ण हेतूने तयार केलेल्या असतात. |
| स्वयंचलित ट्रॅफिक | स्वयंचलित सिस्टिम्स किंवा बॉट्स, सॉफ्टवेअर प्रोग्राम्स किंवा विशिष्ट कार्ये करण्यासाठी डिझाइन केलेल्या स्क्रिप्ट्सद्वारे व्युत्पन्न केलेला डेटा आणि संवादांचा प्रवाह. ही कार्ये फायदेशीर ॲक्टिव्हिटींपासून (जसे की सर्च इंजिनसाठी साइट अनुक्रमित करणे) ते हानिकारक कृतींपर्यंत (जसे की फसवणुकीच्या ॲक्टिव्हिटींमध्ये गुंतणे) असू शकतात. स्वयंचलीकरणामागील हेतूवर अवलंबून, स्वयंचलित ट्रॅफिकचा कामगिरी, सुरक्षा आणि प्रतिष्ठेवर परिणाम होऊ शकतो. |
| अधिकृत लोड चाचण्या | Shopify बिझनेस ट्रॅफिक परिस्थिती हाताळू शकते याची खात्री करण्यासाठी पूर्वपरवानगीने घेतलेल्या लोड चाचण्या. |
| चेकआउट बॉट्स | उत्पादने त्वरित मिळवण्यासाठी चेकआउट प्रक्रियेतून नेव्हिगेट करणाऱ्या स्वयंचलित सिस्टिम्स, ज्या बऱ्याचदा जास्त मागणी असलेल्या उत्पादनांच्या रिलीझमध्ये वापरल्या जातात. |
| बनावट स्क्रॅपर्स | वेबसाइट सामग्रीचे क्लोन करणारे स्वयंचलित टूल्स, जे बऱ्याचदा बनावट साइट्स तयार करण्यासाठी किंवा नकारात्मक SEO हल्ले करण्यासाठी वापरले जातात. |
| ग्राहक (+ अॅक्सेसिबिलिटी) | खाते तयार करणे, ब्राउझ करणे आणि खरेदी करण्यासह ग्राहकांच्या ॲक्टिव्हिटीची नक्कल करणाऱ्या स्वयंचलित प्रक्रिया, ज्या बऱ्याचदा अपंग युझर्सच्या अॅक्सेसिबिलिटीवर लक्ष केंद्रित करून केलेल्या असतात. |
| डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस (DDoS) | दुर्भावनापूर्ण हल्ले जे वेबसाइटच्या पायाभूत सुविधांवर अति ट्रॅफिकचा भार टाकतात, ज्यामुळे सामान्य कामकाजात व्यत्यय येतो. |
| आर्थिक फसवणूक | फसवणुकीच्या व्यवहारांचा समावेश असलेल्या ॲक्टिव्हिटी, जसे की बनावट ऑर्डर्स तयार करणे किंवा चोरीला गेलेल्या क्रेडिट कार्डच्या माहितीची चाचणी करणे. |
| फॉर्म आणि ब्लॉग स्पॅम | फॉर्म आणि ब्लॉगवर स्वयंचलित सबमिशन्स, जे सामान्यतः SEO मध्ये फेरफार करण्यासाठी किंवा प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी आणि त्रास देण्यासाठी असतात. |
| अंतर्गत लोड चाचण्या | प्लॅटफॉर्म अपेक्षित ट्रॅफिकचे लोड हाताळू शकेल याची खात्री करण्यासाठी Shopify द्वारे घेतल्या जाणाऱ्या चाचण्या. |
| हेतू | स्वयंचलित ट्रॅफिक स्रोतांच्या वापरामागील मूळ उद्देश किंवा उद्दिष्ट्ये. Shopify च्या संदर्भात, हेतू हे विविध प्रकारच्या स्वयंचलित ॲक्टिव्हिटींमागील उद्देशांचे वर्गीकरण करण्यात आणि ते समजून घेण्यात मदत करतात, मग ते प्लॅटफॉर्म आणि त्याच्या युझर्ससाठी फायदेशीर, तटस्थ किंवा हानिकारक असोत. |
| मालवेअर होस्टिंग | वापरकर्ते आणि सिस्टीमला हानी पोहोचवू शकणारे हानीकारक सॉफ्टवेअर होस्ट करण्यासाठी Shopify च्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर. |
| नकारात्मक SEO हल्ला | प्रतिस्पर्ध्याच्या सर्च इंजिन रँकिंगला नुकसान पोहोचवण्याच्या उद्देशाने वापरलेले हानीकारक मार्ग. वेबसाइटची दृश्यमानता आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्यासाठी बॅकलिंक स्पॅम, सामग्री स्क्रॅपिंग आणि खोटे रिव्ह्यू यांसारख्या पद्धतींचा वापर करणे. स्वतःचे SEO सुधारण्याऐवजी प्रतिस्पर्ध्याची ऑनलाइन उपस्थिती कमकुवत करणे हे त्याचे ध्येय असते. |
| खाजगी डेटा अनधिकृतपणे बाहेर काढणे | Shopify किंवा त्याच्या मर्चंट्सकडून अनधिकृतपणे खाजगी डेटा ट्रान्सफर करणे, जे अनेकदा हानीकारक उद्देशांसाठी असते. |
| रीस्टॉक बॉट्स | इन्व्हेंटरी पातळीवर लक्ष ठेवणारे आणि उत्पादने पुन्हा स्टॉक केल्यावर लगेच खरेदी करणारे स्वयंचलित टूल्स, जे अनेकदा खरेदीचा अयोग्य फायदा मिळवण्यासाठी वापरले जातात. |
| SEO इंडेक्सर्स | हे सर्च इंजिन्सद्वारे योग्यरीत्या इंडेक्स आणि रँक केल्या गेल्या आहेत याची खात्री करण्यासाठी वेबसाइट्स क्रॉल करण्यासाठी वापरले जाणारे स्वयंचलित टूल्स आहेत. ते सर्च प्लॅटफॉर्म्सवर वेबसाइटची दृश्यमानता आणि ॲक्सेसिबिलिटी राखण्यात मदत करतात. |
| अज्ञात स्क्रॅपर्स् | यामध्ये वेबसाइट्सवरून डेटा गोळा करणाऱ्या स्वयंचलित टूल्सचा समावेश असू शकतो, जे अनेकदा परवानगीशिवाय डेटा संकलन आणि स्पर्धात्मक विश्लेषणासह विविध उद्देशांसाठी वापरले जातात. |