रेस्टॉरंट ऑनलाइन हलवणे

ऑनलाइन विक्री केल्याने तुमच्या ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये जेवण्याव्यतिरिक्त किंवा त्याऐवजी, त्यांचे जेवण स्वतः घेऊन जाण्याचा (पिकअप), जेवण वितरीत करून मिळवण्याचा किंवा इतरांना देण्यासाठी गिफ्ट कार्ड्स खरेदी करण्याचा पर्याय मिळतो. ऑनलाइन उपस्थिती असल्यामुळे तुम्ही ग्राहकांना तुमच्या व्यवसायाबद्दल अधिक माहिती देऊ शकता, त्यांना रिव्ह्यू देण्यासाठी एक जागा उपलब्ध करून देऊ शकता आणि तुमच्या व्यवसायाचे ईमेल मिळवण्यासाठी त्यांना साइन अप करण्याचा मार्गदेखील देऊ शकता.

तुमचे ऑनलाइन स्टोअर सुरू करा

तुमचे रेस्टॉरंट ऑनलाइन हलवण्यासाठी, shopify.com ला भेट द्या आणि विनामूल्य चाचणीसह तुमचे ऑनलाइन स्टोअर सुरू करा. तुमचा ईमेल, पासवर्ड आणि व्यवसायाचे नाव टाका. तुमच्या व्यवसायाचे नाव तुमच्या स्टोअरच्या डीफॉल्ट URL मध्ये वापरले जाईल. तुमची चाचणी सुरू केल्यानंतर, तुम्ही तुमच्या डीफॉल्ट URL साठी विद्यमान URL खरेदी करू शकता किंवा कनेक्ट करू शकता.

ऑनलाइन मेनू तयार करा

तुमच्या रेस्टॉरंटचा मेनू ऑनलाइन तयार करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये उत्पादने आणि किमती जोडणे आवश्यक आहे. तुमच्या मेनू आयटम्सना वर्णनात्मक शीर्षके आणि अचूक वर्णनांची आवश्यकता आहे.

तुम्हाला किती उत्पादने जोडायची आहेत आणि तुमच्याकडे त्यांच्याबद्दल आधीपासूनच ऑनलाइन काही माहिती आहे की नाही यावर अवलंबून, तुमची उत्पादने तुमच्या Shopify खात्यात मिळवण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत:

तुमची उत्पादने जोडल्यानंतर, तुम्ही त्यांना संग्रहांमध्ये व्यवस्थापित करू शकता. संग्रह तुम्हाला तुमच्या वेबसाइटच्या वेगवेगळ्या पेजेसवर विशिष्ट उत्पादने हायलाइट करू देतात, उत्पादनांच्या विशिष्ट गटांवर सवलत कोड लागू करू देतात किंवा तुमच्या होमपेजवर विशिष्ट उत्पादने वैशिष्ट्यीकृत करू देतात. अधिक माहितीसाठी, संग्रह चा संदर्भ घ्या.

गिफ्ट कार्ड्स जोडा

तुमच्या उत्पादनांसोबतच, तुम्ही गिफ्ट कार्ड्सदेखील विकू शकता. गिफ्ट कार्ड्स हा तुमच्या व्यवसायासाठी ऑनलाइन विक्री करण्याचा एक जलद मार्ग आहे. तुमचे ग्राहक गिफ्ट कार्ड्स खरेदी करू शकतात, जे ईमेलद्वारे वितरीत केले जातात. डीफॉल्टनुसार, तुम्ही तयार केलेली गिफ्ट कार्ड्स कधीही कालबाह्य होत नाहीत.

तुम्ही ऑनलाइन खरेदी करता येणारी नवीन उत्पादने लॉन्च करता किंवा तुमची उत्पादने स्थानिक वितरण किंवा पिकअपसाठी उपलब्ध करून देता, तेव्हा ग्राहक चेकआउटवर गिफ्ट कार्ड रिडीम करू शकतात. अधिक माहितीसाठी, गिफ्ट कार्ड विकणे पाहा.

थीम निवडा

तुमचे ऑनलाइन स्टोअर तुमच्या ग्राहकांसोबत शेअर करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या रेस्टॉरंटचा ब्रँड दर्शवणारी थीम निवडली पाहिजे. तुम्ही तुमचे स्टोअर तयार करताना तुमच्या उद्योगासाठी Restaurants निवडल्यास, Crave थीम आपोआप जोडली जाते.

Crave ही Shopify ची मोफत थीम आहे. तुमच्याकडे मर्यादित उत्पादन फोटोग्राफी किंवा कमी इन्व्हेंटरी असली, तरीही तुम्हाला लवकर ऑनलाइन आणण्यासाठी Crave डिझाइन केली आहे.

तुमच्या रेस्टॉरंटसाठी Crave चे खालील फायदे आहेत:

  • मोबाइल-ऑप्टिमाइझ केलेले लेआउट आणि जलद चेकआउट पर्यायांचा वापर करून ग्राहकांना जाता-जाता विक्री करा. हे पर्याय ग्राहकांना टॅब्लेट आणि स्मार्टफोन तसेच डेस्कटॉपवर खरेदी पूर्ण करण्यासाठी आकर्षित करतात.
  • गर्दीतून वेगळे दिसण्यासाठी व्हिज्युअल स्टोरीटेलिंग तयार करण्याकरिता नवीन विभाग आणि ब्लॉक्स वापरा.
  • तुमच्या उत्पादनांसाठी सामग्री, सूचना आणि पौष्टिक माहितीचा समावेश करा.

तुम्हाला दुसरी थीम निवडायची असल्यास, तुम्ही Shopify थीम स्टोअर मधून ती निवडू शकता.

तुम्ही थीम एडिटर वापरून तुमच्या थीमचे ब्रँडिंग, लेआउट आणि इतर सेटिंग्ज सानुकूलित करू शकता.

तुमचे होम पेज सानुकूलित करा आणि पृष्ठे तयार करा

तुम्ही तयार करत असलेल्या प्रत्येक उत्पादन आणि संग्रहाला तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर आपोआप एक पृष्ठ दिले जाते, परंतु तुमचे होम पेज आणि इतर कोणतीही अतिरिक्त पृष्ठे मॅन्युअली सेट करणे आवश्यक असते. तुम्ही तुमची थीम संपादित करून आणि पृष्ठे तयार करून ही पृष्ठे सेट करू शकता.

होम पेज

लोकांना तुमचा व्यवसाय ऑनलाइन सापडतो, तेव्हा तुमचे होम पेज हे सहसा त्यांनी अ‍ॅक्सेस केलेले पहिले पृष्ठ असते. या पृष्ठामध्ये तुमचे ब्रँडिंग, कामकाजाच्या वेळा, वितरण पर्याय, विशेष ऑफर्स आणि तुमच्या ग्राहकांना माहीत असणे आवश्यक असलेली कोणतीही महत्त्वाची माहिती समाविष्ट असू शकते.

तुम्ही तुमच्या होम पेजवर उत्पादने आणि संग्रह देखील वैशिष्ट्यीकृत करू शकता. तुम्ही एक-पृष्ठ स्टोअरसाठी ऑप्टिमाइझ केलेली थीम वापरत असल्यास, तुमच्या स्टोअरमध्ये वापरण्यासाठी तुम्ही ठरवलेले हे एकमेव पृष्ठ असू शकते.

तुम्ही थीम एडिटर वापरून तुमच्या स्टोअरचे होम पेज संपादित करू शकता.

कस्टम पृष्ठे

तुमच्या ग्राहकांना स्वारस्य असू शकेल अशा इतर माहितीसाठी तुम्ही कस्टम पृष्ठे तयार करू शकता. बऱ्याच व्यवसायांकडे खालील कस्टम पृष्ठे असतात:

  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा
  • आमच्या मेनूबद्दल
  • कामकाजाच्या वेळा

कस्टम पृष्ठे कशी तयार करावीत यावरील माहितीसाठी, पृष्ठे पाहा.

धोरणाची पृष्ठे

धोरणाची पृष्ठे ग्राहकांना तुमचा व्यवसाय कसा चालतो हे समजण्यास मदत करतात आणि तुम्ही वितरण, परतावे व गोपनीयता कशी हाताळता हे स्पष्ट करतात. ही धोरणे बाय डीफॉल्ट तुमच्या चेकआउटमध्ये दाखवली जातात, परंतु तुम्ही तुमच्या वेबसाइटच्या मेनूमध्ये त्यांची थेट लिंक्स तयार करू शकता.

बऱ्याच धोरणांसाठीची टेम्पलेट्स Shopify द्वारे पुरवली जातात, जी तुम्ही तुमच्या व्यवसायाला अनुकूल करण्यासाठी ॲडजस्ट करू शकता. धोरण तयार करणे आणि संपादित करणे यावरील अधिक माहितीसाठी, स्टोअरची धोरणे जोडणे पाहा.

पेमेंट्स आणि टिप्स

तुमच्या ऑनलाइन स्टोअरवरील कोणत्याही ऑर्डर्स स्वीकारण्यापूर्वी, तुम्हाला पेमेंट प्रदाता सेट करणे आवश्यक आहे. तुमचा पेमेंट प्रदाता सेट झाल्यानंतर, तुमचे ग्राहक ऑर्डर्स देतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून टिप्सदेखील स्वीकारू शकता.

पेमेंट प्रदाते

तुम्ही Shopify Payments पेमेंट गेटवेसाठी पात्र असलेल्या एखाद्या देशामध्ये Shopify खात्यासाठी साइन अप केल्यास, तुमचा व्यवसाय आपोआप Shopify Payments सह सेट केला जातो आणि तुम्ही लगेचच पेमेंट्स स्वीकारू शकता. तुम्ही तुमची पहिली ऑर्डर स्वीकारण्यापूर्वी, तुमच्या उत्पादनांना Shopify Payments च्या सेवेच्या अटींमध्ये अनुमती असल्याची खात्री करा.

तुम्ही Shopify Payments साठी पात्र नसल्यास, क्रेडिट कार्ड पेमेंट्स ऑनलाइन स्वीकारण्यासाठी तुम्हाला तृतीय-पक्ष पेमेंट गेटवेसाठी साइन अप करणे आवश्यक आहे. पेमेंट गेटवे ठरवताना, क्रेडिट कार्ड आणि तृतीय-पक्ष व्यवहार शुल्काचा खर्च, सेवेच्या अटी, पेआउट शेड्यूल्स आणि उपलब्ध चलनांबद्दल संशोधन करा. तुमच्या देशासाठी कोणते गेटवेज उपलब्ध आहेत ते तपासा, तुम्हाला हवे असलेल्या गेटवेसह खात्यासाठी साइन अप करा आणि नंतर ते तुमच्या Shopify खात्याशी कनेक्ट करा.

तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट्स स्वीकारत नसल्यास, ग्राहकांना चेकआउटवर निवडण्यासाठी काही अतिरिक्त पेमेंट पद्धती किंवा मॅन्युअल पेमेंट पद्धती अ‍ॅक्टिव्हेट करा.

टिप्स

ग्राहकांनी ऑर्डर दिल्यावर त्यांना टिप्स देण्याचा पर्याय तुम्ही अ‍ॅक्टिव्हेट करू शकता. तुम्ही तुमच्या चेकआउट सेटिंग्जमध्ये टिप्स अ‍ॅक्टिव्हेट करू शकता.

तुमच्या ऑनलाइन चेकआउटमध्ये टिप्स स्वीकारण्यावरील अधिक माहितीसाठी, टिप देण्याचे पर्याय सेट करणे पाहा.

पिकअप आणि वितरण सेट करा

तुम्ही किंवा तुमचे कर्मचारी प्रवास करून तुमच्या ग्राहकाच्या दारापर्यंत पोहोचवू शकत असल्यास, तुम्ही स्थानिक वितरण ऑफर करू शकता. तुम्ही तुमच्या ग्राहकांच्या ऑर्डर्ससाठी पिकअप देखील देऊ शकता, जेणेकरून त्यांची ऑर्डर तयार झाल्यावर ते येऊन ती पिकअप करू शकतील.

तुमच्याकडे एकापेक्षा जास्त ठिकाणे असल्यास आणि तुम्हाला त्या सर्वांसाठी वितरण पर्याय ऑफर करायचे असल्यास, तुमचे ग्राहक त्यांच्या सर्वात जवळ असलेल्या ठिकाणाहून ऑर्डर करू शकतील याची खात्री करण्यासाठी तुम्हाला ठिकाणे सेट करणे आवश्यक आहे.

'स्टोअरमध्ये पिकअप करा' सेट करा

तुम्ही ग्राहकांना त्यांच्या ऑनलाइन ऑर्डर्स तुमच्या रिटेल स्टोअर, कर्बसाइड किंवा तुम्ही निवडलेल्या कोणत्याही ठिकाणाहून पिकअप करण्याचा पर्याय सेट करू शकता.

असे करण्यासाठी, ग्राहक जिथे जाऊन त्यांच्या ऑर्डर्स घेऊ शकतात अशा प्रत्येक ठिकाणासाठी तुम्हाला 'स्टोअरमध्ये पिकअप करा' अ‍ॅक्टिव्हेट करणे आवश्यक आहे.

'स्टोअरमध्ये पिकअप करा'साठीचा शिपिंग दर मोफत (Free) वर सेट केलेला आहे आणि तो बदलता येत नाही.

प्रत्येक पिकअप ऑर्डरसाठी प्रत्येक आयटम स्टॉकमध्ये असल्याची तुम्ही किंवा तुमच्या कर्मचाऱ्यांनी खातरजमा करणे आवश्यक आहे. तुम्ही प्रत्येक आयटमची खातरजमा केल्यानंतर, ऑर्डर तयार आहे असे नोटिफिकेशन तुम्ही ग्राहकाला पाठवू शकता. ऑर्डरसोबत जोडण्यासाठी तुम्ही पिकअप स्लिपदेखील प्रिंट करू शकता.

जेव्हा एखादा ग्राहक त्याची ऑर्डर घेण्यासाठी येतो, तेव्हा तुम्हाला तुमचे Shopify ॲडमिन किंवा Shopify अ‍ॅप वापरून ऑर्डर स्थिती पूर्ण न झालेले वरून पूर्तता केली वर बदलणे आवश्यक आहे. हे तुम्हाला आणि तुमच्या कर्मचाऱ्यांना सूचित करते की ऑर्डर पिकअप केली गेली आहे आणि पुढे कोणत्याही कृतीची आवश्यकता नाही.

'स्टोअरमध्ये पिकअप करा' सेट करण्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, ऑनलाइन ऑर्डर्ससाठी स्टोअरमध्ये पिकअप करा पाहा.

स्थानिक वितरण सेट करा

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > शिपिंग आणि वितरण वर जा.

  2. स्थानिक वितरण विभागामध्ये, सेट करा वर क्लिक करा.

  3. तुम्हाला अपडेट करायचे असलेल्या ठिकाणावर क्लिक करा आणि हे ठिकाण स्थानिक वितरण ऑफर करते निवडा.

  4. वितरण क्षेत्र विभागामध्ये, तुम्हाला जिथे वितरण ऑफर करायचे आहे ते क्षेत्र निर्दिष्ट करा.

  5. वितरण क्षेत्र विभागामध्ये, क्षेत्राचे नाव आणि वितरण त्रिज्या, स्थानिक वितरणासाठी ऑर्डरची किमान किंमत आणि वितरण शुल्क तसेच तुम्हाला चेकआउट दरम्यान दाखवायची असलेली कोणतीही माहिती सेट करा, जसे की स्थानिक वितरण कोणत्या वेळी आणि आठवड्याच्या कोणत्या दिवशी उपलब्ध आहे.

  6. सेव्ह करा वर क्लिक करा.

ग्राहकांना तुमचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती द्या

तुम्ही ऑनलाइन व्यवसाय सुरू करता तेव्हा खात्रीशीर फूट ट्रॅफिक मिळत नाही; तुम्ही कुठे आहात हे ग्राहकांना सांगावे लागते. व्यवसायांचे ऑनलाइन मार्केटिंग करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुमच्या व्यवसायासाठी सर्वोत्तम ठरतील असे पर्याय शोधण्यापूर्वी तुम्हाला काही वेगवेगळ्या पर्यायांचा प्रयोग करून पाहावा लागू शकतो.

सोशल मीडिया

सोशल मीडियाच्या वापरामुळे तुम्हाला तुमच्या रेस्टॉरंटशी आधीपासून परिचित असलेल्या तुमच्या स्थानिक ग्राहकांशी थेट संपर्क साधण्यात मदत मिळू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही आता ऑनलाइन आहात आणि त्यांच्या ऑर्डर्स घेण्यासाठी तयार आहात हे ग्राहकांना सांगण्यासाठी तुम्ही Instagram पोस्ट आणि Facebook अपडेट्स वापरू शकता.

बाह्य लिंक्स

साधारणपणे, इंटरनेटवर तुमच्या ऑनलाइन स्टोअरकडे घेऊन जाणाऱ्या जितक्या जास्त लिंक्स असतील तितके चांगले. तुमच्या नवीन ऑनलाइन स्टोअरबद्दल एक ब्लॉग लेख लिहिण्याचा आणि तो विविध स्थानिक ब्लॉग्सवर पाठवण्याचा विचार करा. त्यांना तुमच्याबद्दल एखादा लेख प्रकाशित करण्याची विनंती करणे, आणि त्या बदल्यात कदाचित तुमच्या स्टोअरवर त्यांच्या ब्लॉगची लिंक जोडणे, हा तुमच्या नवीन वेबसाइटवर ट्रॅफिक आणण्याचा एक उत्तम मार्ग असू शकतो.

अधिक लिंक्स मिळवण्याच्या इतर पद्धतींमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सोबत संपर्क साधणे, स्पर्धा आयोजित करणे आणि तुमची स्वतःची ब्लॉग सामग्री पोस्ट करणे यांचा समावेश होतो.

मार्केटिंग अ‍ॅप्स

मार्केटिंग ऑटोमेशन टूल्स तुम्हाला उद्दिष्ट्ये सेट करण्यात आणि तुमचे मार्केटिंग व्यवस्थापित करण्यात मदत करू शकतात. मार्केटिंग अ‍ॅप्ससाठी Shopify App Store तपासा.

तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा

ज्या लोकांना तुमची उत्पादने ऑर्डर करण्याची सर्वाधिक शक्यता आहे अशा लोकांपर्यंत पोहोचण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे जाहिरातींचा वापर करणे होय. तुमच्या स्थानिक क्षेत्रात तुमच्या व्यवसायाची जाहिरात केल्याने ग्राहकांना कळते की तुम्ही व्यवसाय सुरू केला आहे आणि ऑर्डर्स घेत आहात. उदाहरणार्थ, तुम्ही वितरण सुविधा देत आहात याची जाहिरात करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्थानिक रेडिओ स्टेशनसोबत भागीदारी करू शकता.

तुम्ही तुमच्या रेस्टॉरंटची जाहिरात करण्यासाठी सर्च इंजिन आणि सोशल मीडिया साइट्सवर लक्ष्यित जाहिराती देखील वापरू शकता. तुम्ही तुमच्या जाहिरातींसाठी विशिष्ट प्रेक्षक निवडू शकता जेणेकरून जाहिरात प्रदाता फक्त तुम्ही निवडलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या लोकांनाच तुमच्या जाहिराती दाखवेल. उदाहरणार्थ, एक स्थानिक रेस्टॉरंट म्हणून, तुम्ही तुमच्या जाहिराती फक्त तुमचे रेस्टॉरंट ज्या शहरात किंवा गावात आहे तेथे असलेल्या लोकांना दाखवण्यासाठी सेट करू शकता.