चीनमधील मर्चंट्ससाठी क्रॉस-बॉर्डर पूर्तता मार्गदर्शक
क्रॉस-बॉर्डर पूर्ततेमध्ये चीनमधील उत्पादने जगभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा समावेश आहे. तुमच्या पूर्ततेच्या रणनीतीचा डिलिव्हरी गती, शिपिंग खर्च, ग्राहकांचा अनुभव आणि तुमच्या रोख प्रवाहावर परिणाम होतो. हे मार्गदर्शक तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या टप्प्यासाठी योग्य पूर्तता दृष्टिकोन निवडण्यासाठी आणि तुमचे शिपिंग कामकाज ऑप्टिमाइझ करण्यासाठी मदत करते.
या पेजवर
क्रॉस-बॉर्डर लॉजिस्टिकचे विहंगावलोकन
क्रॉस-बॉर्डर शिपिंगमध्ये खालील पाच मुख्य टप्प्यांचा समावेश असतो:
- फर्स्ट माईल पिकअप: तुमच्या ठिकाणाहून किंवा पुरवठादाराकडून उत्पादने संकलित करणे
- हेड हॉल ट्रान्सपोर्ट: उत्पादने आंतरराष्ट्रीय शिपिंग हबकडे हलवणे
- ट्रंक लाईन ट्रान्सपोर्ट: आंतरराष्ट्रीय हवाई किंवा सागरी मालवाहतूक
- कस्टम्स क्लिअरन्स: गंतव्यस्थान असलेल्या देशाच्या कस्टम्समधून उत्पादने क्लिअर करणे
- लास्ट माईल डिलिव्हरी: ग्राहकांच्या पत्त्यावर अंतिम डिलिव्हरी
प्रत्येक टप्प्यामुळे संभाव्य विलंब आणि खर्च वाढतो. ही साखळी समजून घेतल्याने तुम्हाला डिलिव्हरीच्या वास्तववादी अपेक्षा सेट करण्यात आणि ऑप्टिमायझेशनच्या संधी ओळखण्यात मदत मिळते.
शिपिंगचे टप्पे स्पष्ट केले आहेत
संपूर्ण शिपिंग साखळी सोपी वाटू शकते, परंतु बऱ्याचदा तपशिलांमध्ये समस्या उद्भवतात. संक्रमण वेळ वाहक आणि मार्गानुसार बदलतो, कस्टम्स प्रक्रिया देशानुसार भिन्न असतात, आणि ट्रॅकिंग सिस्टीम सर्व टप्प्यांवर सातत्याने अपडेट होत नाहीत.
सामान्य लॉजिस्टिक आव्हाने
चीनमधून शिपिंग करताना, या आव्हानांसाठी तयारी करा:
- अस्थिर संक्रमण वेळा: भिन्न वाहक आणि मार्गांची गती वेगवेगळी असते. पीक सीझनमध्ये डिलिव्हरीच्या वेळेत 10-15 दिवस वाढू शकतात.
- कस्टम्स जोखीम: अपूर्ण कागदपत्रे, चुकीचे डिक्लरेशन किंवा प्रतिबंधित उत्पादनांमुळे जप्ती किंवा रिटर्न होऊ शकते.
- ट्रॅकिंग अंतर: पॅकेजेस आंतरराष्ट्रीय संक्रमणामध्ये प्रवेश केल्यानंतर देशांतर्गत ट्रॅकिंग अपडेट होणे थांबू शकते, ज्यामुळे ग्राहकांच्या चिंता वाढू शकतात.
पूर्तता मॉडेल निवडणे
चीनमधील बहुतांश मर्चंट्स चारपैकी एक पूर्तता मॉडेल वापरतात. तुमची निवड तुमच्या व्यवसायाचा टप्पा, ऑर्डरचे प्रमाण, भांडवल आणि डिलिव्हरी गती आवश्यकता यांवर अवलंबून असते.
| मॉडेल | डिलिव्हरीची वेळ | आवश्यक भांडवल | याकरिता सर्वोत्तम |
|---|---|---|---|
| चीनमधून स्व-पूर्तता | 10-30 दिवस | कमी | उत्पादनांची चाचणी करणे, कमी ऑर्डर व्हॉल्यूम |
| ड्रॉपशिपिंग | 15-40 दिवस | अतिशय कमी | उत्पादन प्रमाणीकरण, मर्यादित बजेट |
| व्हर्च्युअल ओव्हरसीज वेअरहाऊस | 7-10 दिवस | मध्यम | वाढणारे विक्रेते (दररोज 5-10 ऑर्डर्स) |
| ओव्हरसीज वेअरहाऊस | 2-5 दिवस | जास्त | विस्तारणारे विक्रेते (दररोज 10-20+ ऑर्डर्स) |
चीनमधून स्व-पूर्तता
स्व-पूर्तता म्हणजे तुम्ही उत्पादने खरेदी करता, ती पॅकेज करता आणि ती फ्रेट फॉरवर्डरला पाठवता, जो ती तुमच्या ग्राहकांना पाठवतो. सुमारे 80% नवीन क्रॉस-बॉर्डर विक्रेते या मॉडेलने सुरुवात करतात.
हे कसे कार्य करते:
- तुम्हाला तुमच्या Shopify स्टोअरमध्ये ऑर्डर प्राप्त होते.
- तुम्ही उत्पादन खरेदी करता किंवा ते तुमच्या इन्व्हेंटरीमधून घेता.
- तुम्ही उत्पादनाचे पॅकेजिंग करता आणि शिपिंग लेबले तयार करता.
- तुम्ही तुमच्या फ्रेट फॉरवर्डरच्या देशांतर्गत वेअरहाऊसमध्ये पॅकेजेस पाठवता.
- फ्रेट फॉरवर्डर आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि लास्ट-माईल डिलिव्हरी हाताळतो.
हे मॉडेल कधी वापरावे:
- तुम्ही नवीन उत्पादनांची चाचणी करत आहात आणि तुम्हाला बल्क इन्व्हेंटरीची बांधिलकी नको आहे
- तुमचे ऑर्डरचे प्रमाण दररोज 5 ऑर्डर्सपेक्षा कमी आहे
- तुम्हाला पॅकेजिंग आणि गुणवत्तेवर पूर्ण नियंत्रण हवे आहे
ड्रॉपशिपिंग
ड्रॉपशिपिंगमुळे, तुम्ही इन्व्हेंटरी ठेवत नाही. जेव्हा ग्राहक ऑर्डर देतो, तेव्हा तुम्ही पुरवठादाराकडून उत्पादन खरेदी करता जो थेट ग्राहकाला शिप करतो.
फायदे:
- इन्व्हेंटरीसाठी गुंतवणुकीची आवश्यकता नाही
- सुरुवातीसाठी कमी अडथळे
- प्रॉडक्ट-मार्केट फिट तपासण्यासाठी योग्य
तोटे:
- जास्त डिलिव्हरीची वेळ (15-40 दिवस)
- मर्यादित गुणवत्ता नियंत्रण
- कोणतीही कस्टम ब्रँडिंग किंवा पॅकेजिंग नाही
- इन्व्हेंटरी सिंक समस्यांमुळे ओव्हरसेलिंग होऊ शकते
हे मॉडेल कधी वापरावे:
- तुम्ही इन्व्हेंटरीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी उत्पादनांच्या कल्पनांची पडताळणी करत आहात
- तुमच्याकडे मर्यादित भांडवल आहे
- तुम्ही अनिश्चित मागणी असलेली ट्रेंडिंग उत्पादने विकत आहात
तुम्ही ड्रॉपशिपिंग वापरत असल्यास, तुमच्या ड्रॉपशिपिंग ॲपचे फुलफिलमेंट लोकेशन तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये योग्यरित्या कॉन्फिगर केले असल्याची खात्री करा. शिपिंग दर दाखवण्यासाठी आणि ट्रॅकिंग योग्यरीत्या सिंक होण्यासाठी उत्पादने योग्य ठिकाणासाठी नियुक्त केलेली असणे आवश्यक आहे.
व्हर्च्युअल ओव्हरसीज वेअरहाऊस
व्हर्च्युअल ओव्हरसीज वेअरहाऊस हे एक हायब्रिड मॉडेल आहे जिथे तुम्ही लास्ट-माईल लेबल्स (जसे की, US मधील गंतव्यस्थानांसाठी USPS लेबल्स) प्री-प्रिंट करता, देशांतर्गत उत्पादनांचे पॅकेजिंग करता आणि त्यांना गंतव्यस्थान असलेल्या देशात एअर फ्रेटद्वारे पाठवता, जिथे स्थानिक वाहक डिलिव्हरी पूर्ण करतो.
हे कसे कार्य करते:
- तुम्ही गंतव्यस्थान असलेल्या देशातील वाहकासाठी लास्ट-माईल लेबल्स व्युत्पन्न करता.
- तुम्ही ही लेबल्स जोडून उत्पादनांचे देशांतर्गत पॅकेजिंग करता.
- फ्रेट फॉरवर्डर पॅकेजेस एकत्रित करतो आणि त्यांना एअर फ्रेट करतो.
- वेअरहाऊसमध्ये स्टोरेज न करता पॅकेजेस थेट स्थानिक वाहकाकडे (जसे की USPS) सोपवली जातात.
- ग्राहकांना ट्रॅकिंग प्राप्त होते जे "shipped from USA" किंवा यासारखेच दाखवते.
फायदे:
- शुद्ध देशांतर्गत पूर्ततेपेक्षा जलद डिलिव्हरी (7-10 दिवस)
- ओव्हरसीज वेअरहाऊसच्या तुलनेत कमी भांडवलाची आवश्यकता
- ग्राहकांच्या ट्रॅकिंगमध्ये स्थानिक मूळ दाखवले जाते
- कोणतेही स्टोरेज शुल्क नाही
हे मॉडेल कधी वापरावे:
- तुमच्याकडे ऑर्डरचे प्रमाण सुसंगत आहे (दररोज 5-10 ऑर्डर्स)
- तुम्हाला ओव्हरसीज वेअरहाऊसच्या भांडवली बांधिलकीशिवाय जलद डिलिव्हरी हवी आहे
- तुम्ही व्यवसाय विस्तारत आहात आणि तुम्हाला ब्रिज सोल्यूशनची आवश्यकता आहे
ओव्हरसीज वेअरहाऊस
ओव्हरसीज वेअरहाऊससह, तुम्ही तुमच्या लक्ष्य बाजारामधील वेअरहाऊसमध्ये समुद्र किंवा एअर फ्रेटद्वारे बल्क इन्व्हेंटरी शिप करता. या वेअरहाऊसमधून ऑर्डर्सची स्थानिक पातळीवर पूर्तता केली जाते.
फायदे:
- सर्वात जलद डिलिव्हरीची वेळ (2-5 दिवस)
- सर्वोत्कृष्ट ग्राहक अनुभव
- रिटर्न्स हाताळणी अधिक सोपी
- देशांतर्गत विक्रेत्यांसोबत स्पर्धात्मक
तोटे:
- बल्क इन्व्हेंटरीसाठी जास्त भांडवलाची आवश्यकता आहे
- स्टोरेज शुल्क मासिक जमा होते
- उत्पादने विकली न गेल्यास डेड स्टॉकचा धोका
- गुंतागुंतीचे इन्व्हेंटरीचे पूर्वानुमान
तुमच्या व्यवसायाच्या टप्प्याला अनुरूप फुलफिलमेंट
तुमचा व्यवसाय वाढेल तशी तुमची फुलफिलमेंट स्ट्रॅटेजी विकसित झाली पाहिजे. तुमच्या ऑर्डर्स वाढल्यामुळे, तुम्ही तुमच्या फुलफिलमेंटचा दृष्टिकोन बदलण्याचा विचार करू शकता.
चाचणीचा टप्पा (दररोज 0-5 ऑर्डर्स):
- ड्रॉपशिपिंग किंवा चीनमधून स्व-पूर्तता वापरा
- उत्पादनांची पडताळणी करण्यावर आणि विजयी आयटम्स शोधण्यावर लक्ष केंद्रित करा
- इन्व्हेंटरीमध्ये किंवा जलद शिपिंगमध्ये जास्त गुंतवणूक करू नका
वाढीचा टप्पा (दररोज 5-10 ऑर्डर्स):
- जलद डिलिव्हरीसाठी व्हर्च्युअल ओव्हरसीज वेअरहाऊसमध्ये बदला
- खात्रीशीर सेवेसाठी 2-3 फ्रेट फॉरवर्डर्ससोबत काम करा
- विश्वसनीय पुरवठादारांसोबत नाते निर्माण करण्यास सुरुवात करा
स्केलिंगचा टप्पा (प्रति दिन 10-20+ ऑर्डर्स):
- सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या उत्पादनांसाठी ओव्हरसीज वेअरहाऊसचा विचार करा
- कमी वेगाने विकल्या जाणाऱ्या आयटम्ससाठी स्वतः पूर्तता करणे (सेल्फ-फुलफिलमेंट) सुरू ठेवा
- इन्व्हेंटरीच्या अंदाजासाठी आणि व्यवस्थापनासाठी गुंतवणूक करा
- वेअरहाउसेसमधील इन्व्हेंटरी व्यवस्थापित करण्यासाठी एकाधिक फुलफिलमेंट लोकेशन्स सेट करा आणि ऑर्डर राउटिंग कॉन्फिगर करा
लॉजिस्टिक्स चॅनेल्स निवडणे
विविध लॉजिस्टिक्स चॅनेल्स वेगवेगळ्या उत्पादनांसाठी आणि गंतव्यस्थानांसाठी योग्य असतात. तुमच्या लक्ष्य बाजारांमध्ये विशेष प्राविण्य असलेल्या फ्रेट फॉरवर्डर्ससोबत काम करा.
गंतव्यस्थानानुसार चॅनेल्स
| गंतव्यस्थान | शिफारस केलेले चॅनेल्स | नेहमीची डिलिव्हरी |
|---|---|---|
| युनायटेड स्टेट्स आणि युरोप | विशेष क्रॉस-बॉर्डर वाहक | 7-12 दिवस |
| मध्य पूर्व आणि आग्नेय आशिया | प्रादेशिक वाहक | 10-15 दिवस |
| जड किंवा मोठी उत्पादने | सी-फ्रेट + स्थानिक वितरण | 30-45 दिवस |
| उच्च-मूल्याची उत्पादने | आंतरराष्ट्रीय एक्सप्रेस | 3-5 दिवस |
उत्पादन प्रकारानुसार चॅनेल्स
पुढील मॉडेल्सचा वापर करून तुमच्या उत्पादनांच्या वैशिष्ट्यांशी शिपिंग चॅनेलची सांगड घाला:
- उच्च-मूल्य आणि जास्त मार्जिन असलेली उत्पादने: 3-5 दिवसांच्या डिलिव्हरीसाठी आंतरराष्ट्रीय एक्सप्रेस (DHL, UPS) वापरा. जास्त शिपिंग खर्च हा मार्जिनमधून कव्हर होतो.
- मध्यम-मूल्याची उत्पादने: 10-15 दिवसांच्या डिलिव्हरीसाठी विशेष क्रॉस-बॉर्डर वाहक किंवा ईएमएस (EMS - Express Mail Service) वापरा.
- कमी-खर्चाची उत्पादने: 20-40 दिवसांच्या डिलिव्हरीसाठी इकॉनॉमी चॅनेल्स (जसे की चायना पोस्ट) वापरा. तुमच्या शिपिंग धोरणामध्ये स्पष्ट अपेक्षा सेट करा.
फ्रेट फॉरवर्डर्ससोबत काम करणे
नेहमी सर्वांत स्वस्त पर्याय निवडण्याऐवजी, 2-3 विश्वसनीय फ्रेट फॉरवर्डर्ससोबत नाते निर्माण करा. फ्रेट फॉरवर्डर्सचे मूल्यांकन करताना पुढील घटकांचा विचार करा:
- संवाद: जेव्हा समस्या उद्भवतात तेव्हा तुम्ही त्यांच्याशी लवकर संपर्क साधू शकता का?
- ट्रॅकिंगची गुणवत्ता: ते Shopify सह सिंक होणारे विश्वसनीय ट्रॅकिंग देतात का?
- समस्यांचे निराकरण: हरवलेली पॅकेजेस किंवा विलंबाच्या बाबतीत ते कशाप्रकारे हाताळतात?
- प्रतिबंधित आयटम्सबाबतचे कौशल्य: ते कोणती उत्पादने शिप करू शकतात आणि कोणती नाही हे त्यांना समजते का?
शिपिंग खर्च आणि ऑप्टिमायझेशन
साधारणतः प्रत्यक्ष वजन किंवा डायमेंशनल वजन यांपैकी जे जास्त असेल त्यानुसार फ्रेट फॉरवर्डर्स शुल्क आकारतात. वजनाच्या कॅल्क्युलेशनला समजून घेतल्याने तुम्हाला योग्य शिपिंग दर सेट करण्यास आणि खर्च कमी करण्यास मदत होते. वजनाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी पुढील गोष्टींचा वापर करा:
- प्रत्यक्ष वजन: वजनकाट्यावरील पॅकेज केलेल्या आयटमचे प्रत्यक्ष वजन
- डायमेंशनल वजन: लांबी × रुंदी × उंची ÷ 5000 (काही वाहक 6000 वापरतात) यानुसार कॅल्क्युलेट केले जाते
उदाहरणार्थ, 40×30×20cm आणि 2kg वजनाच्या पॅकेजचे डायमेंशनल वजन 4.8kg (40×30×20÷5000) असते. 4.8kg हे प्रत्यक्ष वजन 2kg पेक्षा जास्त असल्याने, तुम्ही 4.8kg साठी पैसे देता.
प्रारंभिक वजन आणि पुढील किंमत निश्चिती
अनेक फ्रेट फॉरवर्डर्स खालील घटकांसह किंमत निश्चितीची रचना वापरतात:
- प्रारंभिक वजन: पहिल्या युनिटसाठीचा मूळ दर (जसे की पहिले 500g)
- कंटिन्युएशन: प्रत्येक अतिरिक्त वजन युनिटसाठीचा कमी केलेला दर
ही रचना समजून घेतल्यास तुम्हाला खर्चाचे अचूक कॅल्क्युलेशन करण्यास आणि तुमच्या स्टोअरमध्ये योग्य शिपिंग दर सेट करण्यास मदत होते.
पॅकेजिंग ऑप्टिमाइझ करणे
बहुतांश वेळा फ्रेट फॉरवर्डर्स हे डायमेंशनल वजनानुसार शुल्क आकारत असल्याने, पॅकेजची परिमाणे कमी केल्याने थेट शिपिंग खर्च कमी होतो.
तुमची पॅकेजेस निवडण्यासाठी तुम्ही पुढील स्ट्रॅटेजीच्या सूचना वापरून पाहू शकता:
- सॉफ्ट गुड्स व्हॅक्यूमने संकुचित करा: कपडे, ब्लँकेट्स आणि प्लश आयटम्स यांचे आकारमान लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी त्यांना संकुचित केले जाऊ शकते.
- मोठ्या उत्पादनांसाठी मजबूत बॉक्सेस वापरा: शिपिंग दरम्यान होणारी मोडतोड टाळते आणि वाया जाणारी जागा कमी करते.
- जाड पॅडिंग बदलणे: जाड फोम पॅडिंगऐवजी हनीकॉम्ब पेपर किंवा बबल बॅग्स वापरा.
- तुमच्या बॉक्सेसला योग्य आकार देणे: उत्पादनाला सुरक्षितरीत्या बसणारा सर्वांत लहान बॉक्स वापरा. परिमाणांमधील प्रत्येक 5cm कपातीमुळे शिपिंग खर्च वाचतो.
शिपिंगमधील आव्हानांचे व्यवस्थापन करणे
क्रॉस-बॉर्डर शिपिंगमध्ये वेळ, कस्टम्स आणि हंगामी आकारमानाशी संबंधित अद्वितीय आव्हाने असतात. आगाऊ प्लॅनिंग केल्याने तुम्हाला महागडे व्यत्यय टाळण्यास मदत होते.
पीक सीझनचे प्लॅनिंग
पीक शॉपिंग सीझनचा क्रॉस-बॉर्डर शिपिंगवर लक्षणीय परिणाम होतो. ब्लॅक फ्रायडे, नाताळ आणि चायनीज न्यू इयर डिलिव्हरीच्या वेळा 7-12 दिवसांवरून 20+ दिवसांपर्यंत वाढवू शकतात.
पुढील अॅक्टिव्हिटीजसह आगाऊ प्लॅनिंग करून तुम्ही पीक सीझनची तयारी करू शकता:
- लवकर स्टॉक करा: पीक सीझन सुरू होण्यापूर्वी ओव्हरसीज वेअरहाउसेस किंवा फ्रेट फॉरवर्डर्सना इन्व्हेंटरी शिप करा
- विविध वाहक वापरा: जास्त प्रमाणाच्या कालावधीत एकाच फ्रेट फॉरवर्डरवर अवलंबून राहू नका
- शिपिंग अंदाजामध्ये अपडेट करा: तुमच्या शिपिंग धोरणामध्ये तुमच्या डिलिव्हरीच्या वेळेचे अंदाज अॅडजस्ट करा
- सक्रियपणे संवाद साधा: ग्राहकांनी ऑर्डर करण्यापूर्वी त्यांना संभाव्य विलंबाबाबत माहिती द्या
- कटऑफ तारखांचा विचार करा: सुट्टीच्या दिवशी खात्रीशीर डिलिव्हरी मिळवण्यासाठी ऑर्डरच्या डेडलाइन्स सेट करा
कस्टम्स आणि प्रतिबंधित आयटम्स
कोणतेही उत्पादन आंतरराष्ट्रीय स्तरावर शिप करण्यापूर्वी, ते तुमच्या गंतव्यस्थानावरील देशांमध्ये प्रतिबंधित नसल्याची खात्री करा. कस्टम्सशी संबंधित समस्यांमुळे जप्ती, रिटर्न्स आणि दंड होऊ शकतो.
पुढील आयटम्स शिप करण्यापूर्वी नेहमी तुमच्या फ्रेट फॉरवर्डरकडे खात्री करा:
- बॅटरीज आणि इलेक्ट्रॉनिक्स (पॉवर बँक्ससह)
- सौंदर्यप्रसाधने, परफ्यूम्स आणि एरोसोल्स
- अन्न आणि पेये
- जीवनसत्त्वे, सप्लिमेंट्स आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारी औषधे
- सीबीडी (कॅनॅबिडिओल) आणि कॅनॅबिस-संबंधित उत्पादने
- ई-सिगारेट्स आणि व्हेपिंग उत्पादने
- पावडर आणि द्रव
कस्टम्स दस्तऐवजीकरण
योग्य दस्तऐवजीकरणामुळे कस्टम्समधील विलंब कमी होतो. तुमच्या उत्पादनांसाठी तुमच्याकडे खालील माहिती असल्याची खात्री करा:
- HS (Harmonized System) कोड: सर्व आंतरराष्ट्रीय शिपमेंटसाठी आवश्यक आहे. Shopify मध्ये तुमच्या उत्पादनांना HS कोड जोडा.
- मूळ देश: जिथे उत्पादनाचे उत्पादन किंवा जुळवणी केली जाते
- अचूक उत्पादन वर्णने: प्रत्येक पॅकेजमध्ये काय आहे याचे स्पष्ट वर्णन
- घोषित मूल्ये: उत्पादनाच्या मूल्यांची प्रामाणिक घोषणा
कस्टम्स दस्तऐवजीकरणाबद्दल अधिक जाणून घ्या.
रिटर्न्स व्यवस्थापित करणे
आंतरराष्ट्रीय रिटर्न शिपिंग महाग असल्याने क्रॉस-बॉर्डर विक्रेत्यांसाठी रिटर्न्स आव्हानात्मक असतात. खालील धोरणांचा विचार करा:
- रिटर्न खर्च विश्लेषण: अनेक क्रॉस-बॉर्डर ऑर्डर्ससाठी, रिटर्न शिपिंगचा खर्च उत्पादनाच्या मूल्यापेक्षा जास्त असतो. प्रत्यक्ष रिटर्न्सची आवश्यकता कधी अर्थपूर्ण ठरते हे ठरवण्यासाठी तुमचा ब्रेक-इव्हन पॉइंट कॅल्क्युलेट करा.
- पर्यायी रिटर्न धोरणे, जसे की खालीलप्रमाणे:
- रिटर्नशिवाय आंशिक परतावा: कमी-मूल्याच्या आयटम्ससाठी, आंशिक परतावा ऑफर करा आणि ग्राहकाला उत्पादन ठेवू द्या. हे अनेकदा रिटर्न शिपिंगसाठी पैसे देण्यापेक्षा स्वस्त असते.
- सवलत कूपन: संपूर्ण परतावा देण्याऐवजी स्टोअर क्रेडिट तसेच सवलत कूपन ऑफर करा. हे ग्राहकाला कायम ठेवते आणि तुमचे नुकसान कमी करते.
- स्थानिक रिटर्न पत्ता: जर तुम्ही परदेशातील वेअरहाऊस वापरत असाल, तर त्या ठिकाणचे रिटर्न्स स्वीकारा.
- प्रत्यक्ष रिटर्न आवश्यक: फक्त उच्च-मूल्यांच्या आयटम्ससाठी ($100 USD किंवा अधिक) किंवा संशयास्पद फसवणुकीच्या प्रकरणांसाठी प्रत्यक्ष रिटर्न्स आवश्यक करा.
- रिटर्नच्या अपेक्षा सेट करणे: तुमच्या परतावा धोरणामध्ये, खालील तपशील स्पष्टपणे सांगा:
- कोणते आयटम्स रिटर्न्ससाठी पात्र आहेत
- रिटर्न शिपिंगसाठी कोण पैसे देणार
- परताव्यासाठी प्रक्रियेची वेळ
- कोणतेही रीस्टॉकिंग शुल्क