तुमच्या स्टोअरसाठी व्यवसाय सेटिंग्ज जोडणे

तुमचे Shopify स्टोअर सेट करणे सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला Shopify खाते तयार करणे आणि तुमच्या स्टोअरसाठी व्यवसाय माहिती जोडणे आवश्यक आहे. तुम्हाला लगेच प्रत्येक तपशील समाविष्ट करण्याची आवश्यकता नाही, परंतु खालील गोष्टी जोडल्याची खात्री करा:

  • स्टोअरचे नाव
  • कायदेशीर व्यवसायाचे नाव आणि पत्ता
  • स्टोअरचा टाइम झोन
  • स्टोअरचे डीफॉल्ट चलन
  • डीफॉल्ट वजनाचे एकक
  • तुमच्या ऑनलाइन स्टोअरचे संरक्षण करण्यासाठी पासवर्ड

myshopify.com डोमेन नावाचा आढावा

खाते तयार करताना तुम्हाला आपोआप तयार झालेले myshopify.com डोमेन नाव दिले जाते, जसे की 1a2b3c4-5.myshopify.com. तुमचे myshopify.com डोमेन फक्त तुमच्या स्टोअरसाठी असते. Shopify ॲडमिनमध्ये लॉग इन करण्यासाठी आणि तुमचे खाते ओळखण्यासाठी ते वापरले जाते. Shopify ॲडमिनच्या URL मध्येही myshopify.com ID असतो, जसे की admin.shopify.com/store/1a2b3c4-5.

तुमच्या myshopify.com डोमेन नावाची नोंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवा, कारण ते तुमच्या Shopify स्टोअरचा महत्त्वाचा आयडेंटिफायर आहे. उदाहरणार्थ, तुमचे खाते कनेक्ट करण्यासाठी तृतीय-पक्ष ॲप किंवा सेवा Shopify खाते ID किंवा खाते क्रमांक म्हणून तुमचे myshopify.com डोमेन मागू शकतात. Shopify सपोर्टशी संपर्क साधताना तुमचे खाते ओळखण्यासाठीही त्याची गरज असते.

डीफॉल्टनुसार, तुमचे myshopify.com डोमेन हेच स्टोअरचे प्राथमिक डोमेन असते, म्हणजेच ग्राहक स्टोअरला भेट देण्यासाठी हा वेब पत्ता वापरतात. त्याऐवजी प्राथमिक डोमेन म्हणून वापरण्यासाठी तुम्ही कस्टम डोमेन जोडू शकता. कस्टम डोमेन प्राथमिक डोमेन म्हणून वापरल्यावर ग्राहकांना तुमचे myshopify.com डोमेन दिसत नाही. तुम्ही आणि तुमचे कर्मचारी मात्र Shopify ॲडमिनमध्ये लॉग इन करण्यासाठी तेच वापरता.

नवीन myshopify.com डोमेन नाव निवडा

तुमच्या स्टोअरच्या ब्रँडशी myshopify.com डोमेन जुळवण्यासाठी, तुम्ही नवीन myshopify.com डोमेन नाव मोफत निवडू शकता. बहुतेक स्टोअरना नवीन myshopify.com डोमेन नाव फक्त 1 वेळ निवडता येते. तुमचे स्टोअर डेव्ह स्टोअर असल्यास, तुम्हाला नवीन myshopify.com डोमेन नाव निवडता येत नाही. डेव्ह स्टोअरसाठी लक्षात घेण्याच्या गोष्टींबद्दल अधिक जाणून घ्या. तुम्ही साइन अप करताना दिलेल्या स्टोअरच्या नावावरून तुमचे myshopify.com डोमेन तयार झाले असेल, तर तुम्हाला अजूनही 1 वेळ नवीन नाव निवडता येते.

सध्या तुमचे myshopify.com डोमेन प्राथमिक डोमेन असल्यास, नवीन myshopify.com डोमेन प्राथमिक डोमेन बनते आणि आधीचे myshopify.com डोमेन आपोआप नवीन डोमेनवर रीडायरेक्ट होते. तुम्हाला कोणतेही अतिरिक्त URL रीडायरेक्ट तयार करण्याची गरज नाही. तुम्ही कस्टम डोमेन प्राथमिक डोमेन म्हणून वापरत असल्यास, प्राथमिक डोमेन बदलत नाही. दोन्ही बाबतींत Shopify ॲडमिनचा URL त्याच वेळी अपडेट होतो. उदाहरणार्थ, तुम्ही myshopify.com डोमेन बदलून johns-apparel.myshopify.com केल्यास, Shopify ॲडमिनचा URL admin.shopify.com/store/johns-apparel होतो.

पायऱ्या:

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > डोमेन वर जा.

  2. डोमेन पेजवर, तुमच्या myshopify.com डोमेनवर होव्हर करा आणि नंतर ते बदलण्यासाठी पेन्सिल आयकनवर क्लिक करा.

  3. नवीन नाव टाका आणि नंतर डोमेन जोडा वर क्लिक करा.

मोबाईल
  1. Shopify अ‍ॅप मधून, मेनू वर टॅप करा आणि नंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.

  2. स्टोअर सेटिंग्ज विभागात, डोमेन वर टॅप करा.

  3. डोमेन पेजवर, तुमच्या myshopify.com डोमेनसाठी कृती वर टॅप करा आणि नंतर myshopify.com डोमेन बदला वर टॅप करा.

  4. नवीन नाव टाका आणि नंतर डोमेन जोडा वर टॅप करा.

तुमचे स्टोअरचे नाव हे असे नाव आहे, जे तुमच्या वेबसाइटच्या प्रत्येक पेजवर प्रदर्शित होते. डीफॉल्टनुसार, तुमच्या स्टोअरचे नाव “माझे स्टोअर” असते. Shopify खाते उघडण्यासाठी, तुम्ही तुमचे पूर्ण कायदेशीर नाव, तुमचा व्यवसायाचा पत्ता, एक सक्रिय फोन नंबर आणि वैध ईमेल अ‍ॅड्रेस प्रदान करणे आवश्यक आहे. विनंती केल्यावर तुम्हाला आणखी माहिती देण्यास सांगितले जाऊ शकते. ही माहिती Shopify खात्यासाठी नोंदणी करताना तुमची ओळख सत्यापित करण्यासाठी वापरली जाते आणि तुमच्या ग्राहकांसोबत शेअर केली जात नाही. तुम्हाला आणखी माहिती देण्यास सांगितले जाऊ शकते. Shopify च्या सेवेच्या अटींबद्दल अधिक जाणून घ्या.

स्टोअरची संपर्क माहिती सार्वजनिक असते. ग्राहक ही माहिती तुमच्या स्टोअरवर आणि धोरण पेजेसवर पाहू शकतात. ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी तुम्ही ग्राहकांसोबत तुमचा फोन नंबर यांसारखी माहिती शेअर करणे निवडू शकता.

जर तुमचे स्टोअर Shopify Payments वापरत असेल, तर तुम्हाला तुमच्या Shopify Payments खात्यावरील व्यवसायाचे नाव बदलण्यासाठी Shopify सपोर्टशी संपर्क साधणे देखील आवश्यक आहे. अन्यथा, तुमच्या स्टोअरचे नाव आणि संपर्क माहिती बदलण्यावर कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही ते तुम्हाला पाहिजे तितक्या वेळा कधीही बदलू शकता.

पायऱ्या:

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > सामान्य वर जा.

  2. स्टोअरचे संपर्क तपशील विभागात, तुमच्या स्टोअरच्या नावावर क्लिक करा किंवा तुमच्या स्टोअरच्या नावासाठी > वर क्लिक करा.

  3. स्टोअरचे संपर्क तपशील पेजवर, स्टोअरचे नाव फील्डमध्ये, तुमच्या स्टोअरचे नाव संपादित करा.

  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

मोबाईल
  1. Shopify अ‍ॅप मधून, मेनू वर टॅप करा आणि नंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.

  2. स्टोअर सेटिंग्ज विभागात, सामान्य वर टॅप करा.

  3. स्टोअरचे संपर्क तपशील विभागात, तुमच्या स्टोअरच्या नावावर टॅप करा.

  4. स्टोअरचे संपर्क तपशील पेजवर, स्टोअरचे नाव फील्डमध्ये, तुमच्या स्टोअरचे नाव संपादित करा.

  5. सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.

तुमचा स्टोअरचा पत्ता सेट करा किंवा बदला

तुमचा स्टोअरचा पत्ता हा तुमच्या व्यवसायाचा भौतिक किंवा ग्राहकाभिमुख पत्ता असतो. ग्राहक हा पत्ता तुमच्या स्टोअर आणि धोरण पेजेसवर पाहू शकतात. तुम्ही सेटिंग्ज > सामान्य मधील स्टोअरचे संपर्क तपशील विभागात तो सेट करू शकता.

तुमच्या Shopify बिलांवरील कंपनीचे नाव आणि पत्ता तुमच्या बिलिंग पत्त्यावरून येतात, जे एक वेगळे सेटिंग आहे. तुमचा स्टोअरचा पत्ता बदलल्याने तुमचा बिलिंग पत्ता बदलत नाही. तुमचा Shopify बिलिंग पत्ता व्यवस्थापित करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

पायऱ्या:

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > सामान्य वर जा.

  2. स्टोअरचे संपर्क तपशील विभागात, स्टोअरचा पत्ता वर क्लिक करा.

  3. तुमच्या कंपनीचे नाव आणि स्टोअरचा पत्ता टाका.

  4. सेव्ह करा वर क्लिक करा.

मोबाईल
  1. Shopify अ‍ॅप मधून, मेनू वर टॅप करा आणि नंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.

  2. स्टोअर सेटिंग्ज विभागात, सामान्य वर टॅप करा.

  3. स्टोअरचे संपर्क तपशील विभागात, स्टोअरचा पत्ता वर टॅप करा.

  4. तुमच्या कंपनीचे नाव आणि स्टोअरचा पत्ता टाका.

  5. सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.

जर तुमचे स्टोअर Shopify Payments, Shopify Balance, Shopify Capital किंवा Shopify Credit यांसारख्या आर्थिक सेवा वापरत असेल, तर तुम्हाला तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये तुमच्या स्टोअरचा देश बदलण्यापूर्वी सर्व आर्थिक सेवा बंद करणे आवश्यक आहे.

तुमच्या स्टोअरचा टाइम झोन सेट करा किंवा बदला

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > सामान्य वर जा.

  2. स्टोअर डीफॉल्ट विभागात, टाइम झोन लिस्टमधून, नवीन टाइम झोन निवडा.

  3. सेव्ह करा वर क्लिक करा.

मोबाईल
  1. Shopify अ‍ॅप मधून, मेनू वर टॅप करा आणि नंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.

  2. स्टोअर सेटिंग्ज विभागात, सामान्य वर टॅप करा.

  3. स्टोअर डीफॉल्ट विभागात, टाइम झोन लिस्टमधून, नवीन टाइम झोन निवडा.

  4. सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.

स्टोअरचे चलन निवडा

तुमच्या Shopify ॲडमिनच्या सामान्य सेटिंग्ज पेजमध्ये, तुमचे स्टोअर कोणते चलन वापरते (उदाहरणार्थ, USD, EUR, CAD, AUD, JPY) हे तुम्ही निवडू शकता.

तुम्ही तुमचा क्रेडिट कार्ड पेमेंट गेटवे म्हणून Shopify Payments वापरत असल्यास, तुम्ही Shopify Payments द्वारे वापरले जाणारे बँक खाते आणि चलन सेटिंग्ज संपादित करून तुमचे चलन बदलले पाहिजे.

पायऱ्या:

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > सामान्य वर जा.

  2. स्टोअरचे डीफॉल्ट विभागात, Horizontal menu > स्टोअरचे चलन बदला वर क्लिक करा.

  3. ड्रॉप-डाउन मेनूमधून नवीन चलन युनिट निवडा.

  4. तुम्ही तुमच्या पहिल्या ऑर्डरीनंतर चलन बदलत असल्यास, तुम्हाला मला स्टोअरचे चलन बदलण्याचा धोका समजला आहे यावर देखील खूण करणे आवश्यक आहे. तुम्ही चलन बदलण्याचे कारण देखील ऐच्छिकरीत्या निवडू शकता. सेव्ह करा वर क्लिक करा.

  5. ऐच्छिक: चलनाच्या रकमा प्रदर्शित करण्याची पद्धत बदलण्यासाठी, पुढील पायऱ्या पूर्ण करा:

    1. Horizontal menu > चलनाचे फॉरमॅटिंग बदला वर क्लिक करा.
    2. तुमच्या चलनाच्या फॉरमॅटिंगमध्ये बदल करा.
    3. सेव्ह करा वर क्लिक करा.
मोबाईल
  1. Shopify अ‍ॅप मधून, मेनू वर टॅप करा आणि नंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.

  2. स्टोअर सेटिंग्ज विभागात, सामान्य वर टॅप करा.

  3. स्टोअरचे डीफॉल्ट विभागात, Horizontal menu किंवा Vertical menu > स्टोअरचे चलन बदला वर टॅप करा.

  4. ड्रॉप-डाउन मेनूमधून नवीन चलन युनिट निवडा.

  5. तुम्ही तुमच्या पहिल्या ऑर्डरीनंतर चलन बदलत असल्यास, तुम्हाला मला स्टोअरचे चलन बदलण्याचा धोका समजला आहे यावर देखील खूण करणे आवश्यक आहे. तुम्ही चलन बदलण्याचे कारण ऐच्छिकरीत्या निवडू शकता. सेव्ह करा वर टॅप करा.

  6. ऐच्छिक: चलनाच्या रकमा प्रदर्शित करण्याची पद्धत बदलण्यासाठी, पुढील पायऱ्या पूर्ण करा:

    1. Horizontal menu किंवा Vertical menu > चलनाचे फॉरमॅटिंग बदला वर टॅप करा.
    2. तुमच्या चलनाच्या फॉरमॅटिंगमध्ये बदल करा.
    3. सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.

अनेक चलने प्रदर्शित करा

तुम्ही Shopify Payments वापरत असल्यास, तुम्ही तुमचे स्टोअर अनेक चलनांमध्ये विक्री करण्यासाठी सेट करू शकता. ग्राहक तुमचे ऑनलाइन स्टोअर ब्राउझ करू शकतात आणि त्यांच्या पसंतीच्या स्थानिक चलनामध्ये चेकआउट करू शकतात.

तुम्ही Shopify Payments वापरत नसल्यास, तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर फक्त प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने अनेक चलने समाविष्ट करण्यासाठी तुम्ही थीम सानुकूलित करू शकता. तुमचे ग्राहक केवळ तुम्ही स्टोअरचे डीफॉल्ट विभागातील तुमच्या सामान्य सेटिंग्ज पेजवर सेट केलेल्या चलनामध्ये चेकआउट करू शकतात.

तुमच्या थीममध्ये अनेक चलनांना सपोर्ट कसे करावे याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमच्या स्टोअरचे डीफॉल्ट वजन युनिट सेट करा किंवा बदला

तुम्ही वजनाच्या पुढील डीफॉल्ट युनिट्समधून निवड करू शकता:

  • पाउंड्स (lb) - इम्पीरियल प्रणाली
  • औंस (oz) - इम्पीरियल प्रणाली
  • किलोग्राम (kg) - मेट्रिक प्रणाली
  • ग्रॅम (g) - मेट्रिक प्रणाली

तुमच्या व्यवसायासाठी सर्वात योग्य असलेले वजन युनिट निवडा. हे फक्त डीफॉल्ट मूल्य आहे आणि नंतर प्रत्येक उत्पादनानुसार संपादित केले जाऊ शकते.

तुमचे डीफॉल्ट वजन युनिट निवडण्यापूर्वी, तुम्ही त्याच स्क्रीनवरून तुमची युनिट प्रणाली निवडायला हवी.

पायऱ्या:

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > सामान्य वर जा.

  2. स्टोअरचे डीफॉल्ट विभागात, तुमच्या आवडीचे वजन युनिट निवडण्यासाठी युनिट प्रणाली आणि डीफॉल्ट वजन युनिट ड्रॉप-डाउन मेनू वापरा.

  3. सेव्ह करा वर क्लिक करा.

मोबाईल
  1. Shopify अ‍ॅप मधून, मेनू वर टॅप करा आणि नंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.

  2. स्टोअर सेटिंग्ज विभागात, सामान्य वर टॅप करा.

  3. स्टोअरचे डीफॉल्ट विभागात, तुमच्या आवडीचे वजन युनिट निवडण्यासाठी युनिट प्रणाली आणि डीफॉल्ट वजन युनिट ड्रॉप-डाउन मेनू वापरा.

  4. सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.

तुमचा होम पेज मेटाडेटा सेट करा किंवा अपडेट करा

मेटाडेटा, जसे की एखाद्या पेजचे शीर्षक आणि मेटा वर्णन, सर्च इंजिन निकालांमध्ये प्रदर्शित केला जातो. सर्च इंजिनद्वारे सूचीबद्ध होण्याच्या तुमच्या शक्यतांवर याचा प्रभाव पडत नाही, परंतु चांगले मेटा वर्णन व्हिजिटर्सद्वारे तुमच्या स्टोअरवर क्लिक करण्याची शक्यता वाढवू शकते. अधिक ट्रॅफिक आकर्षित करण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे.

शीर्षक आणि मेटा वर्णन प्रत्येक पेजसाठी अद्वितीय असले पाहिजे आणि त्यामध्ये त्या पेजच्या सामग्रीचे वर्णन केलेले असावे. तुमच्या Shopify ॲडमिनमधील प्रत्येक उत्पादन, पेज किंवा ब्लॉगसाठी एक सर्च इंजिन विभाग आहे, जिथे तुम्हाला सर्च इंजिन निकाल पेजेसवर जशी माहिती प्रदर्शित करायची आहे तशी माहिती तुम्ही प्रविष्ट करू शकता.

शीर्षकांसाठी 70 वर्णांची मर्यादा आहे. वर्णांची मर्यादा गाठल्यानंतर सर्वच सर्च इंजिन्स मजकूर ट्रंकेट करत नाहीत, परंतु बहुतांश इंजिन्स वाचनक्षमता सुधारण्यासाठी शब्दाच्या मध्यभागी न करता शब्द पूर्ण झाल्यावर मजकूर ट्रंकेट करतात. सर्च इंजिन्स तुमच्या शीर्षक टॅगच्या खाली तुमच्या मेटा वर्णनातील केवळ सुमारे 140 वर्ण सूचीबद्ध करतात, त्यामुळे ते छोटे ठेवा.

Google निकाल पेजवर तुमचे पेज सर्च निकाल म्हणून कसे प्रदर्शित होईल याचे तुम्ही पूर्वावलोकन पाहू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, ऑनलाइन स्टोअर > प्राधान्ये वर जा.

  2. सोशल शेअरिंग इमेज आणि SEO विभागात, होम पेज शीर्षक आणि मेटा वर्णन फील्ड्समध्ये तुमचा होम पेज मेटाडेटा प्रविष्ट करा.

  3. सेव्ह करा वर क्लिक करा.

तुमच्या Shopify स्टोअरमध्ये SEO साठी कीवर्ड्स जोडण्याबद्दल अधिक जाणून घ्या.

तुमचे ऑर्डर ID फॉरमॅट करा

डीफॉल्टनुसार, तुमच्या पहिल्या ऑर्डर ID ला #1001 हे फॉरमॅट दिले जाते. त्यानंतरच्या ऑर्डर्स प्रत्येक नवीन ऑर्डरसाठी 1 ने वाढवल्या जातात. तुमच्या ऑर्डर्स ज्या नंबरने सुरू होतात (1001) तो नंबर तुम्ही बदलू शकत नाही, परंतु तुम्ही ऑर्डर ID उपसर्ग किंवा प्रत्यय जोडून किंवा संपादित करून तुमच्या ऑर्डर ID चे फॉरमॅट सानुकूलित करू शकता.

ऑर्डर ID उपसर्ग जोडा किंवा संपादित करा

तुम्ही उपसर्ग फील्डमधील # हटवू शकता किंवा त्याऐवजी A-Z, 0-9 मधील कोणतेही वर्ण किंवा चिन्हे वापरू शकता. तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्याऐवजी एकाधिक वर्ण वापरू शकता.

पायऱ्या:

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > सामान्य वर जा.

  2. ऑर्डर ID फॉरमॅट विभागात, उपसर्ग फील्डवर क्लिक करा आणि नंतर तुमच्या ऑर्डर फॉरमॅटसाठी उपसर्ग प्रविष्ट करा.

  3. सेव्ह करा वर क्लिक करा.

मोबाईल
  1. Shopify अ‍ॅप मधून, मेनू वर टॅप करा आणि नंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.

  2. स्टोअर सेटिंग्ज विभागात, सामान्य वर टॅप करा.

  3. ऑर्डर ID फॉरमॅट विभागात, उपसर्ग फील्डवर टॅप करा आणि नंतर तुमच्या ऑर्डर फॉरमॅटसाठी उपसर्ग प्रविष्ट करा.

  4. सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.

ऑर्डर ID प्रत्यय जोडा किंवा संपादित करा

तुम्ही प्रत्यय फील्डमधील # हटवू शकता किंवा त्याऐवजी A-Z, 0-9 मधील कोणतेही वर्ण किंवा चिन्हे वापरू शकता. तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्याऐवजी एकाधिक वर्ण वापरू शकता.

पायऱ्या:

डेस्कटॉप
  1. तुमच्या Shopify ॲडमिनमधून, सेटिंग्ज > सामान्य वर जा.

  2. ऑर्डर ID फॉरमॅट विभागात, प्रत्यय फील्डवर क्लिक करा आणि नंतर तुमच्या ऑर्डर फॉरमॅटसाठी प्रत्यय प्रविष्ट करा.

  3. सेव्ह करा वर क्लिक करा.

मोबाईल
  1. Shopify अ‍ॅप मधून, मेनू वर टॅप करा आणि नंतर सेटिंग्ज सेटिंग्ज वर टॅप करा.

  2. स्टोअर सेटिंग्ज विभागात, सामान्य वर टॅप करा.

  3. ऑर्डर ID फॉरमॅट विभागात, प्रत्यय फील्डवर टॅप करा आणि नंतर तुमच्या ऑर्डर फॉरमॅटसाठी प्रत्यय प्रविष्ट करा.

  4. सेव्ह करा किंवा ✓ वर टॅप करा.

पुढील पायऱ्या

तुमच्या व्यवसायाची माहिती सेट केल्यानंतर, तुमचे स्टोअर तयार करण्यास सुरुवात करण्याची वेळ आली आहे.