सर्व योजनांवरील वैशिष्ट्ये
सर्व योजनांवरील वैशिष्ट्ये
किंमत आणि योजना पेजवर सूचीबद्ध केलेल्या सर्व Shopify योजनांमध्ये या वैशिष्ट्यांचा समावेश आहे:
| वैशिष्ट्य | वर्णन |
|---|---|
| अमर्यादित उत्पादने | तुम्ही तुमच्या Shopify स्टोअरमध्ये विकू शकणार्या उत्पादनांची संख्या प्रतिबंधित केलेली नाही. |
| अमर्यादित बँडविड्थ | किती ऑनलाइन व्हिजिटर्स तुमच्या स्टोअरला भेट देतात किंवा तुम्ही किती फाईल्स किंवा फोटो अपलोड करता यावर आधारित तुमच्याकडून शुल्क आकारले जात नाही. |
| ब्रँड मालमत्ता | तुम्ही तुमचे लोगो, ब्रँड रंग आणि घोषवाक्य यासारखी तुमची ब्रँड मालमत्ता जोडू शकता आणि व्यवस्थापित करू शकता. |
| फसवणूक विश्लेषण | जेव्हा तुम्ही Shopify Payments वापरता, तेव्हा तुम्हाला आपोआप अंगभूत फसवणूक विश्लेषण वैशिष्ट्य मिळते. हे वैशिष्ट्य संभाव्य फसव्या असलेल्या ऑर्डर्स फ्लॅग करते आणि तुम्हाला चार्जबॅक्स व नुकसान टाळण्यात मदत करण्यासाठी त्या तुमच्या निदर्शनास आणते. |
| मॅन्युअल ऑर्डर निर्मिती | तुम्ही थेट तुमच्या Shopify ॲडमिनमधून नवीन ऑर्डर्स तयार करू शकता आणि पेमेंट तपशील टाकू शकता. |
| सवलत कोड | तुमचा ग्राहक वर्ग वाढवण्यासाठी तुम्ही सवलत कोड आणि सवलती एकत्र करण्याचा पर्याय देऊ शकता. |
| मार्केटनुसार कस्टम किंमत निश्चिती | तुम्ही विशिष्ट देशांसाठी किंवा प्रदेशांसाठी उत्पादनाच्या किमती आणि टक्केवारीनुसार किंमत ॲडजस्टमेंट्स सेट करू शकता. स्थानिक चलनांमध्ये किमती दाखवणे आणि मॅन्युअल विनिमय दर सेट करणे हे Shopify Payments वापरणाऱ्या स्टोअर्ससाठी उपलब्ध आहे. |
| सोडून दिलेली कार्ट रिकव्हरी | सोडून दिलेली चेकआउट रिकव्हरी चेकआउट प्रक्रिया पूर्ण न करता तुमचे स्टोअर सोडणाऱ्या ग्राहकांना स्वयंचलित ईमेल्स पाठवते. तुमचे स्टोअर सोडणाऱ्या ग्राहकांना पाठवला जाणारा ईमेल तुम्ही सानुकूलित करू शकता. |
| अॅनालिटिक्स | सर्व योजना स्तर अॅनालिटिक्स पेज ऑफर करतात, जे विक्री, ऑर्डर्स आणि ऑनलाइन स्टोअर व्हिजिटरच्या डेटासह प्रमुख ॲनालिटिक्स हायलाइट करतात. |
| वित्त अहवाल | तुम्ही तुमचे वित्त अहवाल वापरून तुमच्या व्यवसायाबद्दलची प्रमुख आर्थिक माहिती पाहू शकता. तुमची विक्री, पेमेंट्स आणि प्रलंबित विक्री डेटाच्या ओव्हरव्ह्यूचे पुनरावलोकन करण्यासाठी तुम्ही वित्त सारांश वापरू शकता किंवा अधिक तपशील मिळवण्यासाठी संपूर्ण वित्त अहवाल पाहू शकता. |
ऑनलाइन विक्री चॅनेल्स
विविध प्रकारच्या विक्री चॅनेल्सचा वापर करून ऑनलाइन विक्री करण्यासाठी तुम्ही Shopify चा वापर करू शकता. प्रत्येक विक्री चॅनेल तुमच्या Shopify ॲडमिनशी कनेक्ट होते, जेणेकरून तुम्ही सर्व प्लॅटफॉर्मवर तुमची उत्पादने, ऑर्डर्स आणि ग्राहकांचा ट्रॅक ठेवू शकता.
प्रत्येक विक्री चॅनेलसाठी तुमची पात्रता तुमच्या योजनेवर तसेच इतर आवश्यकतांवर आधारित असेल.
Shopify POS
Shopify POS हे iOS आणि Android साठी एक अॅप आहे जे तुम्हाला ऑर्डर्स प्रोसेस करू देते आणि प्रत्यक्ष पेमेंट्स घेऊ देते. Shopify पॉइंट ऑफ सेल (POS) च्या मदतीने, तुम्ही एखाद्या प्रत्यक्ष स्टोअरमध्ये किंवा पॉप-अप सेटिंगमध्ये विक्री करू शकता. तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनवरून तुमच्या स्टोअरचे सर्व पैलू व्यवस्थापित करू शकता, ज्याचा ॲक्सेस तुम्ही कोणताही ब्राउझर वापरून मिळवू शकता.