ABC इन्व्हेंटरी विश्लेषण
सर्वसाधारणपणे, तुम्हाला असे आढळून येईल की तुमच्या बहुतांश नफ्यासाठी तुमची काही मोजकीच उत्पादने कारणीभूत आहेत. इतर उत्पादनांची क्वचितच ऑर्डर दिली जाते आणि त्यांच्यासाठी अनावश्यक वेअरहाऊसिंग, देखभाल किंवा जाहिरातीचा खर्च येऊ शकतो. यामुळे तुमची अशी रोख रक्कम अडकून राहू शकते, जी अन्यथा तुम्ही तुमच्या स्टोअरसाठी वापरू शकला असता. शेवटी, काही उत्पादनांची थोडी विक्री होते, ती टॉप सेलर बनतात किंवा काही वेळा त्यांची अजिबात विक्री होत नाही.
हे निरीक्षण अनेक क्षेत्रांमध्ये दिसून येते, जिथे सिस्टमचे बहुतांश आउटपुट अगदी थोड्याशा इनपुटमुळे मिळते. याला सामान्यतः 80/20 नियम किंवा पॅरेटो तत्त्व असे म्हटले जाते.
इन्व्हेंटरी व्यवस्थापनात, ABC विश्लेषण हे तत्त्व वापरते आणि तुमच्या उत्पादनांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करते, जे तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे प्रयत्न कुठे केंद्रित करावेत, याला प्राधान्य देण्यास मदत करतात. तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये उत्पादनानुसार ABC विश्लेषण रिपोर्ट ॲक्सेस करू शकता. तुमचे स्टोअर Basic किंवा Lite प्लॅनवर असल्यास, तुम्ही Shopify App Store वरून ABC विश्लेषणासह रिपोर्टिंग ॲप डाउनलोड करू शकता.
ABC इन्व्हेंटरी विश्लेषणाचे ग्रेड्स
ABC विश्लेषण तुमच्या उत्पादनांची खालील ग्रेड्समध्ये विभागणी करते:
- A-ग्रेड: ही तुमची सर्वाधिक विक्री होणारी उत्पादने आहेत, जी तुमच्या महसुलात जवळपास 80% वाटा उचलतात. A-ग्रेड उत्पादने ही तुमची सर्वात महत्त्वाची उत्पादने आहेत.
- B-ग्रेड: ही उत्पादने तुमच्या महसुलाच्या 15% आहेत. या श्रेणीतील उत्पादने काहीवेळा A स्तर किंवा C स्तरावर जातात.
- C-ग्रेड: ही उत्पादने तुमच्या महसुलाच्या 5% आहेत.
ABC इन्व्हेंटरी विश्लेषण लागू करणे
तुमच्या A-ग्रेड उत्पादनांकडे सर्वाधिक लक्ष द्या. ही अशी उत्पादने आहेत ज्यांचा तुमच्या बहुतांश महसुलात वाटा असतो, आणि या उत्पादनांसाठी इन्व्हेंटरीची कमतरता असल्यास तुमच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. याउलट, तुम्ही गरजेपेक्षा जास्त स्टॉक केल्यास किंवा ती नेहमी स्टॉकमध्ये ठेवण्यावर जास्त भर दिल्यास, तुमच्या C-ग्रेड उत्पादनांसाठी अनावश्यक खर्च होऊ शकतो.
A-ग्रेड उत्पादनांसाठी रणनीती
A ग्रेड असलेल्या उत्पादनांचा वाटा तुमच्या महसुलात 80% असतो आणि ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करणारी उत्पादने असतात. या उत्पादनांसाठी, खालील रणनीती वापरण्याचा विचार करा:
- नुकसान आणि चोरी टाळण्यासाठी A-ग्रेड इन्व्हेंटरीवर अधिक चांगले नियंत्रण आणि संरक्षण ठेवा.
- A-ग्रेड इन्व्हेंटरी नेहमी उपलब्ध ठेवा. A-ग्रेड इन्व्हेंटरीचा बॅकअप स्टॉक ठेवण्याचा विचार करा आणि इन्व्हेंटरी संपेल असा अंदाज येण्यापूर्वीच ही उत्पादने पुन्हा ऑर्डर करा.
- तुमच्या मार्केटिंग सामग्री आणि मोहिमांमध्ये A-ग्रेड उत्पादनांना अधिक दृश्यमानता द्या.
B-ग्रेड उत्पादनांसाठी रणनीती
B ग्रेड असलेली उत्पादने तुमच्या महसुलातील मध्यम टक्केवारी दर्शवतात. ही उत्पादने बऱ्याचदा A ग्रेड आणि C ग्रेड दरम्यान बदलत राहतात. ही उत्पादने तुमच्या A-ग्रेड उत्पादनांइतकी मौल्यवान नसतात, परंतु कोणती उत्पादने अधूनमधून A ग्रेडमध्ये बदलतात आणि कोणती C ग्रेडमध्ये बदलतात याकडे लक्ष द्या.
या उत्पादनांसाठी, खालील रणनीती वापरण्याचा विचार करा:
- B-ग्रेड इन्व्हेंटरी नेहमी उपलब्ध ठेवा. ही उत्पादने पुन्हा ऑर्डर करा जेणेकरून तुमचा अंदाज असलेला स्टॉक संपण्यापूर्वी नवीन स्टॉक लवकरच पोहोचेल.
- B-ग्रेड उत्पादनांची A-ग्रेड उत्पादनांसोबत बंडल किंवा अॅड-ऑन म्हणून जाहिरात करा.
- अधूनमधून A ग्रेडमध्ये बदलणाऱ्या उत्पादनांसाठी A-ग्रेड रणनीती वापरण्याचा विचार करा.
- अधूनमधून C ग्रेडमध्ये बदलणाऱ्या उत्पादनांसाठी C-ग्रेड रणनीती वापरण्याचा विचार करा.
C-ग्रेड उत्पादनांसाठी रणनीती
C ग्रेड असलेली उत्पादने तुमच्या महसुलाचा एक लहान भाग दर्शवतात. त्यांना सहसा निष्क्रिय किंवा संथ गतीने चालणारी इन्व्हेंटरी मानले जाते. तथापि, त्यांचा अद्याप काही विक्रीत वाटा असतो आणि ती संपल्यास वाईट ग्राहक अनुभव येऊ शकतो. स्टॉक विकून टाकणे आणि उत्पादन तुमच्या कॅटलॉगमधून काढून टाकणे बहुधा अधिक फायदेशीर असते.
या उत्पादनांसाठी, खालील रणनीती वापरण्याचा विचार करा:
- सवलतीमध्ये C-ग्रेड इन्व्हेंटरी विका आणि ती संपल्यानंतर उत्पादन तुमच्या कॅटलॉगमधून काढून टाका.
- विक्री वाढवण्यासाठी इतर खरेदीसोबत C-ग्रेड इन्व्हेंटरी मोफत द्या.
- C-ग्रेड इन्व्हेंटरी चॅरिटीसाठी दान करा.
- वेअरहाऊसचा खर्च कमी करण्यासाठी C-ग्रेड इन्व्हेंटरी कमी वेळा किंवा जस्ट-इन-टाईम आधारावर ऑर्डर करा.
- तुमच्या व्यवसायासाठी ती इतर कोणताही उद्देश पूर्ण करत नसल्यास, C-ग्रेड इन्व्हेंटरी ऑर्डर करणे थांबवा.