खरेदी बटण तयार करणे
तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये खरेदी बटण विक्री चॅनेल जोडल्यानंतर, तुम्ही एखाद्या उत्पादनासाठी किंवा एखाद्या संग्रहासाठी खरेदी बटण तयार करू शकता.
तुम्ही खरेदी बटण तयार केल्यानंतर, तुम्ही आपोआप व्युत्पन्न केलेला कोड कॉपी करता आणि नंतर तुम्हाला बटण जिथे प्रदर्शित करायचे आहे त्या वेबपेज किंवा ब्लॉग पोस्टवर जोडता. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमच्या Wordpress ब्लॉगवर किंवा Squarespace वेबसाइटवर खरेदी बटण जोडायचे असू शकते.
तुम्ही खरेदी बटण तुमच्या वेबसाइटवर एम्बेड केल्यानंतर त्याचे स्वरूप बदलले जाऊ शकत नाही. तुम्हाला ते बदलायचे असल्यास, तुम्ही चॅनेलमध्ये एक नवीन बटण तयार करणे आणि मूळ कोड नवीन कोडने बदलणे आवश्यक आहे.
खरेदी बटणे सानुकूलित करणे
तुम्ही खरेदी बटणाचे स्वरूप आणि ते कसे काम करते हे सानुकूलित करू शकता:
- त्याचा रंग
- त्याचा आकार
- त्याचा फॉन्ट
- बटणावर क्लिक केल्यावर घडणारी कृती
- चेकआउट नवीन ब्राउझर विंडोमध्ये उघडणार का
तुम्ही बटण सानुकूलित करत असताना, तुम्ही तुमच्या बदलांचे पूर्वावलोकन पाहू शकता. तुम्ही पूर्वावलोकनावर क्लिक करून खरेदी बटणाच्या कार्यपद्धतीची चाचणी घेऊ शकता.
लेआउट स्टाईल
तुम्ही खरेदी बटणाचा लेआउट निवडू शकता.
| Basic | कोणत्याही उत्पादन प्रतिमेशिवाय खरेदी बटण जोडण्यासाठी हा लेआउट निवडा. तुम्ही तुमची उत्पादने आधीपासूनच अन्यत्र ऑनलाइन प्रदर्शित करत असल्यास, पण खरेदी करण्यासाठी फक्त बटण जोडू इच्छित असल्यास तुम्हाला हे करायचे असू शकते. |
| Classic | खरेदी बटणाच्या बाजूला उत्पादन प्रतिमा आणि किंमत प्रदर्शित करण्यासाठी हा लेआउट निवडा. हा लेआउट त्वरित उत्पादन पूर्वावलोकनासाठी उपयुक्त आहे, जसे की ब्लॉग पोस्टमध्ये. |
| पूर्ण दृश्य | खरेदी बटणाच्या बाजूला उत्पादन प्रतिमा, किंमत आणि वर्णन प्रदर्शित करण्यासाठी हा लेआउट निवडा. हा लेआउट तुमच्या ऑनलाइन स्टोअरमधील उत्पादन तपशील पेजचे अनुकरण करतो. |
खरेदी बटण कृती
जेव्हा तुम्ही खरेदी बटण तयार करता, तेव्हा तुम्ही बटणावर क्लिक केल्यावर होणारी कृती निवडू शकता.
खरेदी बटण एखाद्या संग्रहासाठी असल्यास, ती कृती संग्रहातील प्रत्येक उत्पादनाला लागू होते.
- उत्पादन कार्टमध्ये जोडा हे उत्पादनाला शॉपिंग कार्टमध्ये जोडते. ग्राहक खरेदी करणे सुरू ठेवू शकतात आणि कार्टमध्ये अतिरिक्त उत्पादने जोडू शकतात.
- थेट चेकआउटवर जा ग्राहकाला थेट तुमच्या चेकआउटवर आणते, जिथे ते उत्पादन खरेदी करू शकतात. ग्राहक त्यांच्या ऑर्डरमध्ये अतिरिक्त उत्पादने जोडू शकणार नाहीत.
- उत्पादन तपशील उघडा हे एक उत्पादन पाहा बटण प्रदर्शित करते. जेव्हा ग्राहक बटणावर क्लिक करतात, तेव्हा ते उत्पादनाचे वर्णन पाहू शकतात, कोणतेही उपलब्ध उत्पादन व्हेरिएंट निवडू शकतात आणि उत्पादन कार्टमध्ये जोडू शकतात. एखाद्या उत्पादनाच्या एकाधिक उत्पादन प्रतिमा असल्यास, त्यादेखील प्रदर्शित होतात.
- जेव्हा तुम्ही पूर्ण दृश्य लेआउट निवडता तेव्हा हा पर्याय उपलब्ध नसतो कारण पूर्ण दृश्य लेआउट आधीपासूनच सर्व उत्पादन तपशील प्रदर्शित करतो.
चेकआउट नवीन ब्राउझर विंडोमध्ये उघडते की तुमच्या वेबसाइटसारख्याच टॅबमध्ये उघडते हेदेखील तुम्ही निवडू शकता. चेकआउट नवीन विंडोमध्ये उघडणे ही डिफॉल्ट कार्यपद्धती आहे.
खरेदी बटणाचे स्वरूप
- बटण स्टाईल मध्ये खरेदी बटणाच्या बटण भागासाठी आकार, रंग आणि टायपोग्राफी समाविष्ट आहे.
- लेआउट तुम्ही निवडलेल्या लेआउट स्टाईलवर अवलंबून, तुम्ही बटण अलाइनमेंट, प्रतिमेचा आकार, बटण मजकूर, फॉन्ट, रंग आणि आकार यांसारख्या सेटिंग्ज सानुकूलित करू शकता.
- शॉपिंग कार्ट मध्ये एम्बेडेड शॉपिंग कार्टसाठी मजकूर आणि रंगाचे पर्याय समाविष्ट आहेत. याशिवाय तुम्ही ऑर्डर नोंद फील्डसाठी लेबल एनेबल आणि सानुकूलितदेखील करू शकता. ऑर्डर कशी तयार आणि वितरित करावी याविषयी ग्राहकांकडून विशेष सूचना गोळा करण्यासाठी तुम्ही ऑर्डर नोंदी वापरू शकता. अतिरिक्त माहिती फील्डद्वारे तुम्ही तुमच्या ग्राहकांना मेसेज पाठवू शकता.
- जर तुम्ही बटणाची कृती म्हणून उत्पादन कार्टमध्ये जोडा किंवा उत्पादन तपशील उघडा निवडले असेल तरच तुम्ही शॉपिंग कार्टसाठी सेटिंग्ज संपादित करू शकता.
- तपशीलवार पॉप-अप मध्ये उत्पादन तपशील पॉप-अप विंडोसाठी सेटिंग्ज समाविष्ट आहेत. तुम्ही बटणाचा मजकूर, संख्या फील्ड समाविष्ट करायचे की नाही, बॅकग्राउंड आणि लेबल्ससाठी वापरलेले रंग, तसेच लेबल्सचे फॉन्ट आणि फॉन्टचा आकार सानुकूलित करू शकता. तुम्ही बटणाची कृती म्हणून उत्पादन तपशील उघडा निवडले असेल, तरच तुम्ही या सेटिंग्ज संपादित करू शकता.
एका उत्पादनासाठी खरेदी बटण तयार करा
तुम्ही एका उत्पादनासाठी खरेदी बटण तयार करू शकता. खरेदी बटणामध्ये उत्पादनाचा एक किंवा सर्व व्हेरिएंट्स समाविष्ट असू शकतात. जेव्हा तुम्ही खरेदी बटण तयार करता, तेव्हा तुम्ही लेआउट स्टाईल निवडता आणि बटणाचा रंग, मजकूर आणि रूप, तसेच ग्राहकाने त्यावर क्लिक केल्यावर होणारी कृती सानुकूलित करता. खरेदी बटणे सानुकूलित करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
एखाद्या उत्पादनासाठी खरेदी बटण तयार करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये उत्पादन जोडलेले असावे आणि ते खरेदी बटण विक्री चॅनेलसाठी उपलब्ध केलेले असावे.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, विक्री चॅनेल > खरेदी बटण वर जा.
खरेदी बटण तयार करा वर क्लिक करा.
उत्पादन खरेदी बटण वर क्लिक करा.
तुमच्या कॅटलॉगमधून उत्पादन निवडा किंवा एखादे उत्पादन शोधण्यासाठी शोधाचा वापर करा. निवडा वर क्लिक करा.
पर्यायी: खरेदी बटण सानुकूलित करा.
- तुमच्या उत्पादनामध्ये व्हेरिएंट्स असल्यास, सर्व व्हेरिएंट्स निवडा किंवा तुम्हाला समाविष्ट करायचा असलेला व्हेरिएंट निवडा.
- लेआउट स्टाईल आणि ग्राहकाने बटणावर क्लिक केल्यावर होणारी कृती निवडा. तुम्ही बटणाचे रूप सानुकूलित देखील करू शकता.
- बाय डीफॉल्ट चेकआउटची कृती नवीन विंडो उघडते परंतु तुम्ही तुमच्या वेबसाइटप्रमाणेच समान ब्राउझर टॅबमध्ये चेकआउट उघडण्याची निवड करू शकता. प्रगत सेटिंग्ज > समान टॅबमध्ये रीडायरेक्ट करा वर क्लिक करा.
पुढील वर क्लिक करा.
कोड कॉपी करा वर क्लिक करा.
ज्या वेबपेजवर तुम्हाला खरेदी बटण प्रदर्शित करायचे आहे त्यासाठी HTML संपादक उघडा. HTML मध्ये खरेदी बटणाचा कोड जोडणे पहा.
तुम्हाला खरेदी बटण जिथे दिसावे असे वाटते तिथे HTML मध्ये कोड पेस्ट करा आणि त्यानंतर तुमचे बदल सेव्ह करा.
मोबाईल
Shopify अॅप मधून,
आयकनवर टॅप करा.
विक्री चॅनेल विभागामध्ये, खरेदी बटण वर टॅप करा.
खरेदी बटण तयार करा वर टॅप करा.
उत्पादन खरेदी बटण वर टॅप करा.
तुमच्या कॅटलॉगमधून उत्पादन निवडा किंवा एखादे उत्पादन शोधण्यासाठी शोधाचा वापर करा आणि त्यानंतर निवडा वर टॅप करा.
पर्यायी: सानुकूलित करा वर टॅप करा.
- तुमच्या उत्पादनामध्ये अनेक व्हेरिएंट्स असल्यास, सर्व व्हेरिएंट्स निवडा किंवा ड्रॉप-डाउन सूचीमधून एखादा व्हेरिएंट निवडा.
- लेआउट स्टाईल आणि ग्राहकाने बटणावर क्लिक केल्यावर होणारी कृती निवडा. तुम्ही बटणाचे रूप सानुकूलित देखील करू शकता.
- बाय डीफॉल्ट चेकआउटची कृती नवीन विंडो उघडते परंतु तुम्ही तुमच्या वेबसाइटप्रमाणेच समान ब्राउझर टॅबमध्ये चेकआउट उघडण्याची निवड करू शकता. प्रगत सेटिंग्ज > समान टॅबमध्ये रीडायरेक्ट करा वर टॅप करा.
झाले वर टॅप करा.
कोड कॉपी करा वर टॅप करा.
ज्या वेबपेजवर तुम्हाला खरेदी बटण प्रदर्शित करायचे आहे त्यासाठी HTML संपादक उघडा. HTML मध्ये खरेदी बटणाचा कोड जोडणे पहा.
तुम्हाला खरेदी बटण जिथे दिसावे असे वाटते तिथे HTML मध्ये कोड पेस्ट करा आणि त्यानंतर तुमचे बदल सेव्ह करा.
संग्रहासाठी खरेदी बटण तयार करा
जेव्हा तुम्ही एखाद्या संग्रहासाठी खरेदी बटण तयार करता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात संग्रहातील प्रत्येक उत्पादनासाठी बटण तयार करत असता.
जेव्हा तुम्ही खरेदी बटण तयार करता, तेव्हा तुम्ही लेआउट स्टाईल निवडता आणि बटणाचा रंग, मजकूर आणि रूप, तसेच ग्राहकाने त्यावर क्लिक केल्यावर होणारी कृती सानुकूलित करता. खरेदी बटणे सानुकूलित करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
एखाद्या संग्रहासाठी खरेदी बटण तयार करण्यापूर्वी, तुमच्याकडे पुढील गोष्टी असणे आवश्यक आहे:
- तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये उत्पादने जोडलेली असावीत,
- खरेदी बटण विक्री चॅनेलसाठी उत्पादने उपलब्ध केलेली असावीत
- संग्रह तयार केलेला असावा.
पायऱ्या:
डेस्कटॉप
तुमच्या Shopify ॲडमिनमधून, विक्री चॅनेल > खरेदी बटण वर जा.
खरेदी बटण तयार करा वर क्लिक करा.
संग्रह खरेदी बटण वर क्लिक करा.
संग्रह निवडा किंवा, संग्रह शोधण्यासाठी शोधाचा वापर करा. निवडा वर क्लिक करा.
पर्यायी: खरेदी बटण सानुकूलित करा.
- ग्राहकाने बटणावर क्लिक केल्यावर होणारी कृती निवडा. तुम्ही बटणाचे रूप सानुकूलित देखील करू शकता.
- बाय डीफॉल्ट चेकआउटची कृती नवीन विंडो उघडते परंतु तुम्ही तुमच्या वेबसाइटप्रमाणेच समान ब्राउझर टॅबमध्ये चेकआउट उघडण्याची निवड करू शकता. प्रगत सेटिंग्ज > समान टॅबमध्ये रीडायरेक्ट करा वर क्लिक करा.
पुढील वर क्लिक करा.
कोड कॉपी करा वर क्लिक करा.
ज्या वेबपेजवर तुम्हाला खरेदी बटण प्रदर्शित करायचे आहे त्यासाठी HTML संपादक उघडा. HTML मध्ये खरेदी बटणाचा कोड जोडणे पहा.
तुम्हाला खरेदी बटण जिथे दिसावे असे वाटते तिथे HTML मध्ये कोड पेस्ट करा आणि त्यानंतर तुमचे बदल सेव्ह करा.
मोबाईल
Shopify अॅप मधून,
आयकनवर टॅप करा.
विक्री चॅनेल विभागामध्ये, खरेदी बटण वर टॅप करा.
खरेदी बटण तयार करा वर टॅप करा.
संग्रह खरेदी बटण वर टॅप करा.
संग्रह निवडा किंवा, संग्रह शोधण्यासाठी शोधाचा वापर करा आणि त्यानंतर निवडा वर टॅप करा.