तुमच्या Marketplace Connect ऑर्डर्स व्यवस्थापित करा
Marketplace Connect चा वापर करून, तुमच्या Shopify ॲडमिनवरून थेट त्यांची पूर्तता करण्यासाठी तुम्ही तुमच्या बाजारपेठांमधून ऑर्डर्स आपोआप इंपोर्ट करू शकता.
ऑर्डर इंपोर्ट केल्यानंतर, ती तुमच्या Shopify ॲडमिनच्या ऑर्डर्स विभागात दाखवली जाते जसे की ती तुमच्या ऑनलाइन स्टोअरमधून दिली गेली आहे. Marketplace Connect वरून तुमच्या Shopify ॲडमिनवर ऑर्डर सिंक झाल्यानंतर, तुमच्या ऑर्डर्स पेजवरील चॅनेल फील्डमध्ये बाजारपेठेचे नाव दाखवले जाते. तुमच्या ऑर्डर्सची पूर्तता करण्याबद्दल अधिक जाणून घ्या.
ऑर्डर्सची पूर्तता झाल्यानंतर, Marketplace Connect आपोआप शिपिंगची स्थिती आणि ट्रॅकिंगचे अपडेट्स ज्या बाजारपेठेमधून ऑर्डर दिली गेली होती त्या बाजारापेठेशी सिंक करते.
Marketplace Connect ऑर्डर्स व्यवस्थापित करण्याच्या अतिरिक्त सपोर्टसाठी, तुम्ही अॅपमधील चॅट वैशिष्ट्य वापरू शकता.