तृतीय-पक्ष बाजारपेठांवर तुमची उत्पादने लिस्ट आणि संपादित करणे
तुम्ही Marketplace Connect अॅपवर तुमची उत्पादन लिस्टिंग्ज स्वतंत्रपणे किंवा बल्कमध्ये लिस्ट किंवा संपादित करू शकता. तसेच, तुम्ही तुमच्या Amazon ऑफर्स आणि लिस्टिंग्ज किंवा eBay लिस्टिंग्ज साठी अतिरिक्त उत्पादन लिस्टिंग सेटिंग्ज कॉनफिगर करू शकता आणि तुमच्या Amazon उत्पादन लिस्टिंग्जसाठी उत्पादन श्रेणी सेट करू शकता.
एकच उत्पादन लिस्ट किंवा संपादित करा
तुमच्या Shopify स्टोअरवरून बाजारपेठेमध्ये एकच उत्पादन लिस्टिंग प्रकाशित करण्यासाठी तुम्ही सिंगल एडिट मोड वापरू शकता. तुम्ही एकाधिक बाजारपेठांशी जोडलेले असल्यास, तुम्हाला ज्या प्रत्येक बाजारपेठेमध्ये उत्पादन जोडायचे किंवा संपादित करायचे आहे त्यासाठी या पायऱ्यांची पुनरावृत्ती करा.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिन मधून, अॅप्स > Marketplace Connect वर जा.
लिस्टिंग्ज वर क्लिक करा.
marketplaces ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला ज्यासाठी उत्पादने व्यवस्थापित करायची आहेत ती बाजारपेठ निवडा.
तुम्हाला जे उत्पादन संपादित करायचे आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर खालीलपैकी एक करा:
- बाजारपेठेवर उत्पादन लिस्ट करण्यासाठी, लिस्टिंग सक्षम केले विभागात, सक्षम केले निवडा आणि नंतर प्रत्येक उर्वरित विभागासाठी फील्ड्स पूर्ण करा.
- तुमच्या बाजारपेठेवर आधीपासूनच लिस्ट केलेले उत्पादन संपादित करण्यासाठी, तुम्हाला अपडेट करायचे असलेले फील्ड्स बदला आणि नंतर उत्पादनाच्या माहितीचे पुनरावलोकन करून गहाळ असलेले कोणतेही फील्ड भरा.
सेव्ह करा वर क्लिक करा.
उत्पादने बल्कमध्ये लिस्ट किंवा संपादित करा
एखाद्या बाजारपेठेसाठी एकाधिक उत्पादन लिस्टिंग्ज बल्कमध्ये व्यवस्थापित करण्यासाठी तुम्ही Marketplace Connect च्या लिस्टिंग्ज विभागामध्ये बल्क एडिटर वापरू शकता. संपूर्ण कॅटलॉग्स एखाद्या बाजारपेठेमध्ये पटकन लिस्ट करण्यात, तसेच उत्पादने आणि त्यांची संबंधित फील्ड मूल्ये या सर्वांचे एकाच ठिकाणी पुनरावलोकन करण्यासाठी आणि त्यांना संपादित करण्यासाठी बल्क एडिटिंग तुम्हाला मदत करू शकते.
तुम्ही एकाधिक बाजारपेठांशी जोडलेले असल्यास, तुम्हाला ज्या प्रत्येक बाजारपेठेसाठी उत्पादने जोडायची किंवा संपादित करायची आहेत त्याकरिता या पायऱ्यांची पुनरावृत्ती करा.
पायऱ्या:
तुमच्या Shopify ॲडमिन मधून, अॅप्स > Marketplace Connect वर जा.
लिस्टिंग्ज वर क्लिक करा.
marketplaces ड्रॉप-डाउन मेनूवर क्लिक करा आणि नंतर तुम्हाला ज्यासाठी उत्पादने व्यवस्थापित करायची आहेत ती बाजारपेठ निवडा.
बल्क एडिट वर क्लिक करा.
पर्यायी: स्टेटस, टॅग किंवा SKU यांसारखे फिल्टर्स जोडून उत्पादन गट तयार करण्यासाठी फिल्टर्स बटणावर क्लिक करा.
तुम्हाला बाजारपेठेमध्ये जी उत्पादने जोडायची आहेत ती निवडण्यासाठी चेकबॉक्सेसचा वापर करा.
खालीलपैकी एक करा:
- पहिल्यांदाच बाजारपेठेवर उत्पादन जोडण्यासाठी, सक्षम केले कॉलममध्ये, तुम्हाला बाजारपेठेवर प्रकाशित करायच्या असलेल्या प्रत्येक उत्पादनासाठी सक्षम केले निवडा आणि त्यानंतर उरलेल्या कॉलममधील माहिती भरा.
- तुमच्या बाजारपेठेवर आधीपासूनच लिस्ट केलेल्या उत्पादनामध्ये बदल करण्यासाठी, तुम्हाला जे उत्पादन अपडेट करायचे आहे त्याच्या कोणत्याही कॉलममध्ये बदल करा.
- पर्यायी: अतिरिक्त फील्ड्स जोडण्यासाठी, तुम्ही कॉलम बटणावर क्लिक करू शकता, तुम्हाला संपादित करायच्या असलेल्या उत्पादनाच्या माहितीचे कोणतेही अतिरिक्त फील्ड्स निवडू शकता आणि त्यानंतर पूर्ण झाले वर क्लिक करू शकता.
सेव्ह करा वर क्लिक करा.