Whatnot विक्री चॅनेल सेट करणे

या पेजवर, तुम्ही Shopify सह Whatnot वर विक्री करण्यासाठीच्या आवश्यकता आणि विचारार्थ बाबींबद्दल, Whatnot विक्री चॅनेल कसे इंस्टॉल करावे आणि तुमचे Whatnot खाते Shopify शी कसे कनेक्ट करावे याबद्दल जाणून घेऊ शकता.

जर तुमच्याकडे अद्याप Whatnot प्रोफाईल नसेल, तर तुम्हाला Whatnot खाते तयार करणे आणि प्लॅटफॉर्मवर विक्री करण्यासाठी ॲक्सेसची विनंती करणे आवश्यक आहे. बहुतांश विक्रेत्यांना लगेच मंजुरी दिली जाते, परंतु काही विशिष्ट परिस्थितींमध्ये तुमचे Whatnot विक्रेता खाते मंजूर होण्यासाठी 2 आठवड्यांपर्यंतचा वेळ लागू शकतो.

Shopify सह Whatnot वर विक्री करण्यासाठीच्या आवश्यकता

Shopify वर Whatnot विक्री चॅनेल वापरण्यासाठी पुढील आवश्यकतांचे पुनरावलोकन करा:

  • तुमचे स्टोअर युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रिया, बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स किंवा ऑस्ट्रेलिया येथे स्थित असणे आवश्यक आहे.
  • तुमच्याकडे खाते मालक किंवा ॲडमिन-स्तरीय ॲक्सेस असलेले Whatnot खाते असणे आणि Whatnot वर मंजूर विक्रेता असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही तुमच्या Shopify आणि Whatnot खात्यांसाठी सेट केलेले मुख्य स्टोअरचे चलन समान असणे आवश्यक आहे.
  • तुमची उत्पादने Whatnot मध्ये जोडली जाण्यासाठी, त्यांच्याकडे Shopify मध्ये पुढील उत्पादन तपशील असणे आवश्यक आहे:
    • उत्पादन शीर्षक
    • किमान एक उत्पादन प्रतिमा
    • उत्पादनाची किंमत
    • इन्व्हेंटरीचे प्रमाण, ज्यामध्ये इन्व्हेंटरी ट्रॅकिंग ॲक्टिव्हेट केलेले असेल
    • वजन
  • तुमचे उत्पादन व्हेरिएंट्स Whatnot मध्ये जोडले जाण्यासाठी, प्रत्येक व्हेरिएंटमध्ये Shopify मध्ये पुढील तपशील असल्याची खात्री करा:

Shopify सह Whatnot वर विक्री करण्यासाठी विचारात घेण्याच्या बाबी

Whatnot विक्री चॅनेल सेट अप करण्यापूर्वी, Whatnot सेवेच्या अटी आणि Whatnot गोपनीयता धोरण पहा आणि Shopify सह Whatnot वर विक्री करण्यासाठी खालील बाबींचेदेखील पुनरावलोकन करा:

  • Whatnot तुमच्या विक्रीवर 8% कमिशन आकारते, तरीही तुमच्या प्रदेश आणि विकल्या जाणार्‍या उत्पादनाच्या श्रेणीनुसार हे शुल्क कमी असू शकते. तुमच्याकडून 2.9% + $0.30 USD इतके पेमेंट प्रक्रिया शुल्कदेखील आकारले जाते, जे तुमच्या प्रदेशानुसार बदलू शकते. पेमेंट प्रक्रिया शुल्क तुमच्या ग्राहकाने भरलेली ऑर्डरची उप-एकूण, कर आणि शिपिंग किंमत यावर लागू केले जाते. पेमेंट प्रक्रिया शुल्क कोणत्याही आंतरराष्ट्रीय शिपिंग खर्चावर किंवा करांवर लागू होत नाही. अधिक माहितीसाठी, Whatnot मदत केंद्रामधील Whatnot seller fees पहा.
  • जर एखाद्या ग्राहकाने Whatnot लाइव्ह शो दरम्यान एखादा आयटम खरेदी केला, तर त्यांची खरेदी तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमध्ये ड्राफ्ट ऑर्डर म्हणून तयार केली जाते. जेव्हा लाइव्ह शो संपतो, तेव्हा सर्व ड्राफ्ट ऑर्डर्स आपोआप पूर्ण ऑर्डर्स बनतात. ड्राफ्ट ऑर्डरला मॅन्युअली पूर्ण ऑर्डरमध्ये रूपांतरित करण्यासाठी, तुम्ही Whatnot विक्री चॅनेलच्या ऑर्डर्स विभागातील Complete All Draft Orders वर क्लिक करू शकता.
  • Whatnot पूर्ण-चलन रकमा वापरते. बाय डीफॉल्ट, तुमच्या किमती राऊंड डाऊन (rounded down) केल्या जातात, उदाहरणार्थ, तुम्ही Whatnot शी $2.53 USD किमतीत सिंक केलेले एखादे उत्पादन $2 USD च्या किमतीसह प्रदर्शित केले जाते. तुम्ही तुमच्या Whatnot मधील किमती राऊंड अप (rounded up) करणे निवडू शकता, ज्यामुळे $2.53 USD चे उत्पादन Whatnot वर $3 च्या किमतीसह प्रदर्शित केले जाईल.
  • बहुतेक प्रकरणांमध्ये, तुम्हाला Whatnot शिपिंग लेबल जनरेट आणि प्रिंट करणे आवश्यक असते, जोपर्यंत तुम्हाला Bring Your Own Label वैशिष्ट्य वापरण्यासाठी मंजुरी दिली जात नाही.

Whatnot विक्री चॅनेल इंस्टॉल करा

  1. Shopify App Store वरील Whatnot अ‍ॅप पेज वर जा.
  2. जर तुम्ही तुमच्या Shopify खात्यात आधीपासूनच लॉग इन केलेले असेल, तर Install वर क्लिक करा. अन्यथा, Log in to install वर क्लिक करा आणि तुमच्या Shopify खात्यामध्ये लॉग इन करण्यासाठी प्रॉम्प्ट्सचे अनुसरण करा.
  3. Install app पेजवर, Install वर क्लिक करा.

तुमचे Whatnot खाते Shopify शी कनेक्ट करा

  1. तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमधून, विक्री चॅनेल > Whatnot वर जा.

  2. Connect to Whatnot वर क्लिक करा.

  3. तुमचे Whatnot खाते Shopify शी कनेक्ट करण्यासाठी, तुमच्या Whatnot खात्याच्या तपशीलांसह साइन इन करा आणि नंतर Authorize वर क्लिक करा.

तुमचे Whatnot खाते Shopify मधून डिस्कनेक्ट करा

तुम्ही Shopify मधील Whatnot विक्री चॅनेलमधून तुमचे Whatnot खाते कोणत्याही वेळी डिस्कनेक्ट करू शकता.

पायऱ्या:

  1. तुमच्या Shopify अ‍ॅडमिनमधून, विक्री चॅनेल > Whatnot वर जा.

  2. Whatnot Account विभागामध्ये, Disconnect Account वर क्लिक करा.

Shopify सह Whatnot वर विक्री करण्यासाठी सपोर्ट मिळवणे

जर तुम्हाला Shopify मधील Whatnot विक्री चॅनेल, तुमचे Whatnot खाते किंवा तुमचे Whatnot स्टोअर आणि लाइव्ह शो बद्दल मदत हवी असल्यास, Whatnot सपोर्टशी संपर्क साधा.