Shop वर उत्पादने दाखवण्यासाठी आणि विकण्यासाठीचे निकष

Shop साठी निकषांचे दोन वेगवेगळे गट आहेत. त्यावरून तुम्ही ग्राहकांना Shop वर फक्त तुमची उत्पादने दाखवू शकता की त्यांची थेट विक्रीही करू शकता, हे ठरते:

तुमचे स्टोअर Shop वर दाखवण्यासाठीचे निकष पूर्ण करत असेल, पण थेट विक्रीसाठीचे निकष पूर्ण करत नसेल, तरीही तुमची उत्पादने Shop वर दिसतात. मात्र, ग्राहकांना खरेदी पूर्ण करण्यासाठी तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर नेले जाते. तुमचे स्टोअर दोन्ही गटांतील निकष पूर्ण करत असेल, तर ग्राहक Shop मधून बाहेर न पडता तुमची उत्पादने खरेदी करू शकतात. Shop वर उत्पादने दाखवणे आणि विकणे याबद्दल अधिक जाणून घ्या.

पात्र स्टोअर आपोआप Shop वर जोडली जातात. पात्र ठरण्यासाठी Shop चॅनेल इन्स्टॉल केलेले असणे गरजेचे नाही. मात्र, चॅनेल इन्स्टॉल केल्यावर अतिरिक्त सुविधा आणि सेटिंग्ज उपलब्ध होतात. तुमचे स्टोअर Shop वर थेट विक्रीसाठी पात्र असल्यास, Shop चॅनेल इन्स्टॉल केलेले नसले तरीही तुम्हाला Shop मार्फत ऑर्डर मिळू शकतात.

हे निकष पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्टोअरमध्ये बदल केले, तर ते लागू होण्यासाठी आणि मंजुरीची स्थिती अपडेट होण्यासाठी 48 तासांपर्यंत वेळ लागू शकतो.

Shop वर तुमचे स्टोअर आणि उत्पादने दाखवण्यासाठीचे निकष

तुमचे स्टोअर खालील निकष पूर्ण करत असेल, तर ग्राहक Shop वर तुमची उत्पादने पाहू शकतात आणि खरेदी पूर्ण करण्यासाठी त्यांना तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर नेले जाते:

  • सेवेच्या अटी आणि स्वीकार्य वापर धोरण यांचे पालन: तुमचे स्टोअर Shopify च्या सेवेच्या अटींचे आणि स्वीकार्य वापर धोरणाचे पालन करते.
  • सक्रिय Shopify प्लॅन: तुमचे स्टोअर सक्रिय Shopify प्लॅनवर आहे. सध्याचा प्लॅन तपासणे किंवा अपग्रेड करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.
  • व्यवसाय तपशील: तुमच्या स्टोअरमध्ये व्यवसाय तपशील जोडले आहेत.
  • पूर्तता केलेल्या ऑर्डर: तुमच्या स्टोअरने किमान एका ऑर्डरची पूर्तता केली आहे.
  • ऑनलाइन स्टोअर विक्री चॅनेल: तुमच्या स्टोअरमध्ये ऑनलाइन स्टोअर विक्री चॅनेल आहे आणि स्टोअर खाजगी मोडमध्ये नाही. ऑनलाइन स्टोअरच्या खाजगी मोडबद्दल अधिक जाणून घ्या.
  • ग्राहकांचा प्रवेश: तुमचे ऑनलाइन स्टोअर केवळ B2B ग्राहकांपुरते मर्यादित नाही.
  • ॲपची सुसंगतता: तुम्ही Advanced Registration, B2B Login Access Management, Login to View Price आणि MagicPass Wholesale यांसारखे पासवर्ड नियंत्रण किंवा वयाची पडताळणी करणारे कोणतेही अ‍ॅप वापरत नाही.
    • पासवर्ड नियंत्रित करणारे Locksmith अ‍ॅप याला अपवाद आहे आणि ते Shop शी सुसंगत आहे. तुम्ही Locksmith वापरून काही उत्पादने लॉक केली, तरी तुमचे स्टोअर Shop वर दिसते आणि लॉक केलेली उत्पादने तुमच्या Shop Store मध्ये लपवलेली राहतात.

Shop वर थेट विक्रीसाठीचे निकष

तुमचे स्टोअर खालील अटी पूर्ण करत असल्यास, ग्राहकांना Shop मधून बाहेर न पडता तुमची उत्पादने पाहता आणि खरेदी करता येतात:

  • सेवेच्या अटी आणि स्वीकार्य वापर धोरण यांचे पालन: तुमचे स्टोअर Shopify च्या सेवेच्या अटींचे आणि स्वीकार्य वापर धोरणाचे पालन करते.
  • सक्रिय Shopify प्लॅन: तुमचे स्टोअर सक्रिय Shopify प्लॅनवर आहे. सध्याचा प्लॅन तपासणे किंवा अपग्रेड करणे याबद्दल अधिक जाणून घ्या.
  • Shopify Payments सक्रिय असणे: तुमच्या स्टोअरवर Shopify Payments सक्रिय आहे. Shopify Payments साठीच्या निकषांबद्दल अधिक जाणून घ्या.
  • चार्जबॅक दर: गेल्या 90 दिवसांत तुमच्या स्टोअरचा चार्जबॅक दर 5% पेक्षा कमी राहिला आहे. Shopify Payments वापरून प्रक्रिया केलेल्या व्यवहारांवरील सर्व चार्जबॅक्सचा या दरात समावेश होतो.
  • उत्पादन पात्रता: तुमच्या उत्पादनांपैकी किमान एक उत्पादन Shop चे उत्पादन पात्रतेचे निकष पूर्ण करते. तुम्ही प्रतिबंधित आणि मंजूर अशा दोन्ही प्रकारची उत्पादने विकत असाल, तर केवळ मंजूर उत्पादने Shop वर उपलब्ध असतात. उत्पादन पात्रतेसंबंधीच्या ट्रबलशूटिंगबद्दल अधिक जाणून घ्या.