Shopify Collective सह किरकोळ विक्रेत्यांकडून विक्री कर गोळा करणे
जेव्हा किरकोळ विक्रेते तुमची उत्पादने विकतात तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून विक्री कर गोळा करणे निवडू शकता. काही अधिकारक्षेत्रांमध्ये, तुम्ही एखाद्या किरकोळ विक्रेत्याला उत्पादन पुरवता तेव्हा होणाऱ्या B2B व्यवहारावर तुम्हाला व्हॅट (VAT) किंवा स्थानिक विक्री कर आकारणे आवश्यक असते. त्यानंतर तुम्ही ही कर रक्कम संबंधित कर प्राधिकरणाकडे पाठवता.
काही किरकोळ विक्रेत्यांकडे पुनर्विक्री प्रमाणपत्र असू शकते जे त्यांना तुम्हाला कर भरण्यापासून सूट देते. किरकोळ विक्रेत्याला तुम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची प्रत प्रदान करणे आवश्यक आहे.
तुमचे स्टोअर कॅनडा, युनायटेड किंगडम (UK) किंवा युरोपियन युनियन (EU) देशावर आधारित असल्यास, तुम्ही Shopify Collective विक्री चॅनेल वापरण्यापूर्वी तुम्हाला तुमची कर नोंदणी स्थिती पडताळणे आवश्यक आहे.
या पेजवर
किरकोळ विक्रेत्यांकडून विक्री कर गोळा करणे
तुम्ही किरकोळ विक्रेत्यांकडून वैयक्तिक स्तरावर विक्री कर गोळा करायचा की नाही हे निवडू शकता. लागू केलेली कराची रक्कम नंतर तुम्ही ज्या किरकोळ विक्रेत्यांकडून कर गोळा करत आहात, त्यांच्याकडून मिळणाऱ्या ऑर्डर्सवर आपोआप दिसते.
तुमच्या Shopify Collective विक्री चॅनेलमधील Retailers विभागातील टेबल Collect tax कॉलम प्रदर्शित करतो, जो तुम्ही प्रत्येक किरकोळ विक्रेत्याकडून कर गोळा करत आहात की नाही हे सूचित करतो.
तुमच्याकडे सर्व किरकोळ विक्रेत्यांसाठी डीफॉल्टनुसार असलेल्या कर संकलन सेटिंगच्या तपशिलांसाठी खालील टेबलचे पुनरावलोकन करा, जे तुमच्या ठिकाणावर आणि तुम्ही Shopify कडे सबमिट केलेल्या तुमच्या कर नोंदणी स्थितीवर अवलंबून असते.
| पुरवठादार/किरकोळ विक्रेता देश | डीफॉल्ट कर संकलन स्थिती |
|---|---|
| युनायटेड स्टेट्स | बंद |
| कॅनडा | सुरू |
| युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम |
|
| इतर सर्व देश जिथे Shopify Collective वापरले जाऊ शकते आणि जिथे पुरवठादार किरकोळ विक्रेत्यांकडून कर गोळा करू शकतात |
|
तुमचे किरकोळ विक्रेता कर संकलन सेटिंग बदला
तुमच्या Shopify अॅडमिनमधून, Sales channels > Collective: Supplier वर जा.
Retailers वर क्लिक करा.
ज्या किरकोळ विक्रेत्यासाठी तुम्हाला कर संकलन सेटिंग बदलायचे आहे, त्यावर क्लिक करा.
Payments and taxes विभागामध्ये, Collect tax पर्याय अॅक्टिव्हेट किंवा डीअॅक्टिव्हेट करा.
Shopify Collective व्यवहारांसाठी कराची गणना कशी केली जाते ते समजून घेणे
विक्री कर कुठे भरला जावा आणि कराच्या रकमेची गणना कोणत्या किमतीवर केली जाते, हे निर्धारित करण्यासाठी खालील टेबलचे पुनरावलोकन करा.
टेबल Collective मधील पुरवठादार-ते-किरकोळ विक्रेता व्यवहारांसाठी डीफॉल्ट कर सेटिंग्जची रूपरेषा देते, परंतु परिस्थिती तुमच्या विशिष्ट विक्री व्यवहारांसाठी योग्य आहे की नाही याची तुम्ही कर व्यावसायिकाशी पुष्टी केली पाहिजे.
जिब्राल्टर किंवा हाँगकाँग मध्ये असलेल्या पुरवठादार आणि किरकोळ विक्रेते यांच्यात कोणताही कर आकारला जात नाही.
| पुरवठादार/किरकोळ विक्रेता देश | ग्राहक देश | किंमत ज्यावर कराची गणना केली जाते | ठिकाण जिथे कर देय आहे |
|---|---|---|---|
| युनायटेड स्टेट्स (फक्त कॅलिफोर्निया आणि मॅसॅच्युसेट्स) | युनायटेड स्टेट्स | किरकोळ किंमत | ग्राहकाच्या शिपिंग पत्त्याचा देश, राज्य किंवा प्रांत |
| युनायटेड स्टेट्स (इतर सर्व राज्ये) | युनायटेड स्टेट्स | खर्च किंमत | ग्राहकाच्या शिपिंग पत्त्याचा देश, राज्य किंवा प्रांत |
| युनायटेड स्टेट्स (फक्त कॅलिफोर्निया आणि मॅसॅच्युसेट्स) | उर्वरित जग | किरकोळ किंमत | किरकोळ विक्रेत्याच्या पत्त्याचा देश, राज्य किंवा प्रांत |
| युनायटेड स्टेट्स (इतर सर्व राज्ये) | उर्वरित जग | खर्च किंमत | किरकोळ विक्रेत्याच्या पत्त्याचा देश, राज्य किंवा प्रांत |
| इतर सर्व देश जिथे Collective वापरले जाऊ शकते (जिब्राल्टर आणि हाँगकाँग वगळून) | कोणतेही उपलब्ध शिपिंग ठिकाण | खर्च किंमत | किरकोळ विक्रेत्याच्या पत्त्याचा देश, राज्य किंवा प्रांत |
Shopify Collective व्यवहारांसाठी कर आणि नफ्याच्या परिस्थितींची उदाहरणे
जेव्हा दोन्ही पक्षांनी त्यांच्या उत्पादनाच्या किमतींमधून कर वगळलेला किंवा त्यात कर समाविष्ट केलेला असतो, तेव्हा किरकोळ विक्रेते आणि पुरवठादारांसाठी नफ्याची गणना कशी केली जाते हे खालील व्यवहार परिस्थिती स्पष्ट करतात. तुम्ही तुमच्या Shopify अॅडमिनमध्ये Settings > Taxes and duties > Global settings > Include sales tax in product price and shipping rate वर जाऊन हे कॉनफिगर करू शकता. व्यवहाराची उदाहरणे विकल्या गेलेल्या उत्पादनावर लागू केल्या जाणाऱ्या 30% किरकोळ विक्रेता मार्जिन वर आधारित आहेत.
परिस्थिती 1: देशांतर्गत विक्री जिथे पुरवठादार आणि किरकोळ विक्रेता दोघेही उत्पादनांच्या किमतींमधून विक्री कर वगळतात
- US पुरवठादार > US किरकोळ विक्रेता > US ग्राहक
- किरकोळ विक्रेता आणि पुरवठादार दोघांनीही त्यांच्या उत्पादनांच्या किमतींमधून कर वगळलेला आहे.
- त्यामुळे, यामध्ये कर जोडला जातो:
- किरकोळ विक्रेत्याच्या चेकआउटवर ग्राहकाला प्रदर्शित होणाऱ्या उत्पादनाच्या किमतीमध्ये.
- किरकोळ विक्रेता पुरवठादाराला देत असलेल्या उत्पादनाच्या खर्च किमतीमध्ये.
- हे उदाहरण B2B आणि DTC अशा दोन्ही करांसाठी वापरल्या जाणाऱ्या 10% दरावर आधारित आहे.
| किंमत निश्चितीचा तपशील | गणना | रक्काम (USD) |
|---|---|---|
| पुरवठादाराच्या उत्पादनाची किरकोळ किंमत (कर वगळून) | लागू नाही | $100 |
| किरकोळ विक्रेत्याला येणारा उत्पादनाचा खर्च (कर वगळून) | (100%-मार्जिन%) x किरकोळ किंमत | (100% - 30%) x $100 = $70 |
| चेकआउटवर ग्राहकाला प्रदर्शित केलेली उत्पादनाची किंमत | लागू नाही | $100 |
| चेकआउटवर जोडलेला DTC कर | किरकोळ किंमत x DTC कर दर | $100 x 10% = $10 |
| चेकआउटवर ग्राहकाचे पेमेंट | किरकोळ किंमत + DTC कर | $100 + $10 = $110 |
| पुरवठादार/किरकोळ विक्रेता व्यवहारासाठी B2B कर | किरकोळ विक्रेत्यासाठी उत्पादनाचा खर्च x B2B कर दर | $70 x 10% = $7 |
| किरकोळ विक्रेत्याने पुरवठादाराला केलेले पेमेंट | किरकोळ विक्रेत्यासाठी उत्पादनाचा खर्च + B2B कर | $70 + $7 = $77 |
| किरकोळ विक्रेत्याचा महसूल | ग्राहकाचे पेमेंट - किरकोळ विक्रेत्याने पुरवठादाराला केलेले पेमेंट | $110 - $77 = $33 |
| किरकोळ विक्रेत्याचा निव्वळ नफा (30%) | किरकोळ विक्रेत्याचा महसूल - DTC कर + B2B कर क्रेडिट | $33 - $10 + $7 = $30 |
| पुरवठादाराचा निव्वळ नफा (70%) | किरकोळ विक्रेत्याने पुरवठादाराला केलेले पेमेंट - B2B कर | $77 - $7 = $70 |
परिदृश्य 2: देशांतर्गत विक्री जिथे पुरवठादार आणि किरकोळ विक्रेता दोघेही उत्पादनाच्या किंमतींमध्ये विक्री कर समाविष्ट करतात
- UK पुरवठादार > UK किरकोळ विक्रेता > UK ग्राहक
- किरकोळ विक्रेता आणि पुरवठादार दोघांच्याही उत्पादनाच्या किंमतींमध्ये कर समाविष्ट आहे.
- त्यामुळे, कर यामध्ये आधीपासूनच समाविष्ट आहे:
- किरकोळ विक्रेत्याच्या चेकआउटवर ग्राहक भरत असलेली रक्कम.
- उत्पादनासाठी किरकोळ विक्रेता पुरवठादाराला देत असलेली रक्कम.
- हे उदाहरण B2B आणि DTC या दोन्ही करांसाठी 20% दर वापरले जाण्यावर आधारित आहे.
| किंमत निश्चितीचा तपशील | गणना | रक्कम (GBP) |
|---|---|---|
| पुरवठादाराची उत्पादनाची किरकोळ किंमत (करासह) | लागू नाही | £120 |
| किरकोळ विक्रेत्यासाठी उत्पादनाचा खर्च (करासह) | (100%-मार्जिन%) x किरकोळ किंमत | (100% - 30%) x £120 = £84 |
| चेकआउटवर ग्राहकाचे पेमेंट | लागू नाही | £120 |
| चेकआउटच्या वेळी ग्राहकांच्या पेमेंटमध्ये समाविष्ट केलेला DTC कर | किरकोळ किंमत x [1 - 1÷(1 + DTC कर दर)] | £120 x (1-1/(1+20%)) = £20 |
| किरकोळ विक्रेत्याने पुरवठादाराला केलेले पेमेंट | लागू नाही | £84 |
| किरकोळ विक्रेत्याने पुरवठादाराला केलेल्या पेमेंटमध्ये समाविष्ट असलेला B2B कर | किरकोळ विक्रेत्यासाठी उत्पादनाचा खर्च x [1 - 1÷(1 + B2B कर दर)] | £84 x (1-1/(1+20%)) = £14 |
| किरकोळ विक्रेत्याचा महसूल | ग्राहकाचे पेमेंट - किरकोळ विक्रेत्याने पुरवठादाराला केलेले पेमेंट | £120 - £84 = £36 |
| किरकोळ विक्रेत्याचा निव्वळ नफा (30%) | किरकोळ विक्रेत्याचा महसूल - DTC कर + B2B कर क्रेडिट | £36 - £20 + £14 = £30 |
| पुरवठादाराचा निव्वळ नफा (70%) | किरकोळ विक्रेत्याने पुरवठादाराला केलेले पेमेंट - B2B कर | £84 - £14 = £70 |
तुमची कर नोंदणी स्थिती व्हेरिफाय करणे
तुमचे स्टोअर कॅनडा, युनायटेड किंगडम किंवा युरोपियन युनियन (EU) देशामध्ये असल्यास, Shopify Collective विक्री चॅनेल वापरण्यास सक्षम होण्यासाठी तुम्हाला तुमची कर नोंदणी स्थिती व्हेरिफाय करणे आवश्यक आहे.
कर नोंदणी व्हेरिफिकेशनसाठी प्रदर्शित होणारा कर आयडी आणि बिलिंग पत्ता तुमच्या Shopify ॲडमिनमधील खालील ठिकाणांशी कनेक्ट केलेला आहे:
UK पुरवठादारांसाठी, तुम्ही दिलेला VAT क्रमांक तुम्ही ज्यांच्याकडून विक्री कर गोळा करत आहात त्या किरकोळ विक्रेत्यांना प्रदर्शित केला जातो.
कॅनडामध्ये तुमची कर नोंदणी स्थिती व्हेरिफाय करा
तुमच्या Shopify अॅडमिनमधून, Sales channels > Collective: Supplier वर जा.
सेटिंग्ज वर क्लिक करा.
कर नोंदणी स्थिती विभागामध्ये:
- जर एखादा व्हेरिफाय न केलेले बॅज असेल, तर खालीलपैकी एक करा:
- जर GST/HST क्रमांक आधीच भरलेला असेल:
- पर्यायी: तुम्हाला आधीच भरलेले तपशील संपादित करण्याची आवश्यकता असल्यास,
आयकनवर क्लिक करा आणि नंतर तुमचे बदल करा.
- पर्यायी: बिलिंग पत्ता लिंकवर क्लिक करा आणि नंतर तुमचा बिलिंग पत्ता बरोबर असल्याची खात्री करा.
- माझा GST/HST क्रमांक आणि बिलिंग पत्ता बरोबर असल्याचे मी व्हेरिफाय करतो निवडा.
- व्हेरिफाय करा वर क्लिक करा.
- पर्यायी: तुम्हाला आधीच भरलेले तपशील संपादित करण्याची आवश्यकता असल्यास,
- जर GST/HST क्रमांक आधीच भरलेला नसेल:
- सुरू ठेवा वर क्लिक करा.
- GST/HST क्रमांक जोडा डायलॉगमध्ये, तुमचा GST/HST क्रमांक एंटर करा.
- सेव्ह करा वर क्लिक करा.
- पर्यायी: कर नोंदणी स्थिती विभागामध्ये, बिलिंग पत्ता लिंकवर क्लिक करा आणि नंतर तुमचा बिलिंग पत्ता बरोबर असल्याची खात्री करा.
- माझा GST/HST क्रमांक आणि बिलिंग पत्ता बरोबर असल्याचे मी व्हेरिफाय करतो निवडा.
- व्हेरिफाय करा वर क्लिक करा.
- जर GST/HST क्रमांक आधीच भरलेला असेल:
- जर Ineligible बॅज असेल आणि कर गोळा करण्यासाठी तुम्ही Shopify Tax किंवा तृतीय-पक्ष ॲप वापरणे आवश्यक आहे असा मेसेज प्रदर्शित होत असेल, तर सुरू ठेवा वर क्लिक करा आणि नंतर Shopify Tax, Basic Tax किंवा तृतीय-पक्ष कर ॲप यापैकी एक वापरण्यासाठी तुमचे स्टोअर सेट अप करण्याकरिता आवश्यक पावले उचला.
- जर एखादा व्हेरिफाय न केलेले बॅज असेल, तर खालीलपैकी एक करा:
UK/EU मध्ये तुमची कर नोंदणी स्थिती व्हेरिफाय करा
तुमच्या Shopify अॅडमिनमधून, Sales channels > Collective: Supplier वर जा.
सेटिंग्ज वर क्लिक करा.
कर नोंदणी स्थिती विभागामध्ये:
- जर एखादा व्हेरिफाय न केलेले बॅज असेल, तर खालीलपैकी कोणतेही एक करा:
- जर VAT क्रमांक आधीच भरलेला असेल:
- पर्यायी: तुम्हाला आधीच भरलेले तपशील संपादित करण्याची आवश्यकता असल्यास,
आयकनवर क्लिक करा आणि नंतर तुमचे बदल करा.
- पर्यायी: बिलिंग पत्ता लिंकवर क्लिक करा आणि नंतर तुमचा बिलिंग पत्ता बरोबर असल्याची खात्री करा.
- माझा VAT क्रमांक आणि बिलिंग पत्ता बरोबर असल्याचे मी व्हेरिफाय करतो चेकबॉक्स निवडलेला असल्याची खात्री करा.
- व्हेरिफाय करा वर क्लिक करा.
- पर्यायी: तुम्हाला आधीच भरलेले तपशील संपादित करण्याची आवश्यकता असल्यास,
- जर VAT क्रमांक आधीच भरलेला नसेल आणि तुमच्या स्टोअरची विक्री VAT नोंदणी थ्रेशहोल्डच्या वर असेल:
- सुरू ठेवा वर क्लिक करा.
- कर नोंदणी स्थिती व्हेरिफाय करा डायलॉगमध्ये, माझ्याकडे VAT क्रमांक आहे निवडा.
- तुमचा VAT क्रमांक एंटर करा.
- सेव्ह करा वर क्लिक करा.
- पर्यायी: कर नोंदणी स्थिती विभागामध्ये, बिलिंग पत्ता लिंकवर क्लिक करा आणि नंतर तुमचा बिलिंग पत्ता बरोबर असल्याची खात्री करा.
- माझा VAT क्रमांक आणि बिलिंग पत्ता बरोबर असल्याचे मी व्हेरिफाय करतो चेकबॉक्स निवडलेला असल्याची खात्री करा.
- व्हेरिफाय करा वर क्लिक करा.
- जर VAT क्रमांक आधीच भरलेला नसेल आणि तुमच्या स्टोअरची विक्री VAT नोंदणी थ्रेशहोल्डच्या खाली असेल:
- सुरू ठेवा वर क्लिक करा.
- कर नोंदणी स्थिती व्हेरिफाय करा डायलॉगमध्ये, मला नोंदणी करण्याची किंवा VAT गोळा करण्याची आवश्यकता नाही निवडा.
- सेव्ह करा वर क्लिक करा.
- पर्यायी: कर नोंदणी स्थिती विभागामध्ये, बिलिंग पत्ता लिंकवर क्लिक करा आणि नंतर तुमचा बिलिंग पत्ता बरोबर असल्याची खात्री करा.
- माझी कर नोंदणी स्थिती आणि बिलिंग पत्ता बरोबर असल्याचे मी व्हेरिफाय करतो चेकबॉक्स निवडलेला असल्याची खात्री करा.
- व्हेरिफाय करा वर क्लिक करा.
- जर कर नोंदणी स्थिती अशी प्रदर्शित होत असेल: मला नोंदणी करण्याची किंवा VAT गोळा करण्याची आवश्यकता नाही, आणि ही माहिती बरोबर आहे:
- पर्यायी: बिलिंग पत्ता लिंकवर क्लिक करा आणि नंतर तुमचा बिलिंग पत्ता बरोबर असल्याची खात्री करा.
- माझी कर नोंदणी स्थिती आणि बिलिंग पत्ता बरोबर असल्याचे मी व्हेरिफाय करतो चेकबॉक्स निवडलेला असल्याची खात्री करा.
- व्हेरिफाय करा वर क्लिक करा.
- जर कर नोंदणी स्थिती अशी प्रदर्शित होत असेल: मला नोंदणी करण्याची किंवा VAT गोळा करण्याची आवश्यकता नाही, आणि ही माहिती चुकीची आहे:
- कर नोंदणी स्थिती फील्डमध्ये,
आयकनवर क्लिक करा.