Meta चे Facebook आणि Instagram
Facebook Shop आणि Instagram Shopping वर विक्री करण्यासाठी, तुम्ही तुमची उत्पादने Facebook आणि Instagram वरील कॅटलॉगवर सिंक करण्यासाठी Meta चे Facebook आणि Instagram वापरू शकता. स्टोअर पात्रतेच्या अधीन राहून, सर्व Shopify प्लॅन्ससह Meta चे Facebook आणि Instagram विक्री चॅनेल वापरण्यासाठी मोफत आहे.
Facebook जाहिरातींसह Facebook वरील मार्केटिंगबद्दल जाणून घेण्यासाठी, Facebook वरील मार्केटिंग पहा.
तुम्ही Campaign Autopilot वापरत असल्यास, Autopilot अशा Advantage+ मोहिमांची शिफारस करू शकतो, ज्या तुम्ही Meta च्या Facebook आणि Instagram द्वारे तयार केलेल्या जाहिरातींपेक्षा वेगळ्या आहेत. कॅटलॉग सिंक, बिलिंग आणि मंजुरी या गोष्टी Autopilot सह Meta जाहिरातीं मध्ये कशा काम करतात ते जाणून घ्या.
तुमचे Shopify स्टोअर Meta सह एकत्रित करण्याबद्दल अधिक माहितीसाठी, Meta Business मदत केंद्रामधील खालील स्रोत पहा:
Meta च्या Facebook आणि Instagram विक्री चॅनेलसह तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही खालील तीन वैशिष्ट्यांचा वापर करू शकता:
- तुमच्या व्यवसायाच्या Facebook पेजवर विक्री करण्यासाठी Facebook Shop वापरा.
- तुमच्या व्यवसायाच्या Instagram प्रोफाइलवर विक्री करण्यासाठी Instagram Shopping वापरा.
- खालील कार्यांसाठी Meta Marketing वापरा: