ब्लॉग पोस्ट समजून घेणे
ब्लॉग पोस्ट तुम्हाला तुमच्या स्टोअर किंवा उत्पादनांबद्दल इनसाइट प्रदान करू देतात. उत्पादन लिस्टिंग किंवा ईमेलच्या तुलनेत ब्लॉग पोस्टचा टोन अधिक संवादात्मक असतो आणि सामग्री तयार करताना ते तुम्हाला अधिक लवचिकता देतात. तुम्हाला तुमच्या स्टोअरमागील गोष्ट शेअर करायला, तुमच्या उत्पादनांबद्दल काही संदर्भ द्यायला किंवा पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांची ओळख करून द्यायला आवडू शकते.
तुम्ही लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी, तुमच्या पोस्टसाठी योजना असणे ही चांगली कल्पना आहे. तुम्हाला कोणती माहिती शेअर करायची आहे? तुमच्या पोस्टचे मुख्य ध्येय काय आहे? जर तुम्ही ब्लॉगिंगसाठी नवीन असाल, तर तुम्ही तुमच्या पहिल्या ब्लॉग पोस्टला सुरुवात करण्यासाठी खालील ब्लॉग टेम्पलेट वापरू शकता.
या पेजवर
भेटवस्तू मार्गदर्शक ब्लॉग पोस्ट
सुट्ट्यांचा हंगाम जवळ येत असल्याची आणि तुमची उत्पादने उत्तम भेटवस्तू ठरू शकतात याची तुमच्या प्रेक्षकांना आठवण करून देण्यासाठी भेटवस्तू मार्गदर्शक ही एक चांगली पद्धत असू शकते. भेटवस्तू मार्गदर्शक ब्लॉग पोस्ट तुमच्या स्टोअरवर अनेक प्रकारे ट्रॅफिक आणू शकतात. भेटवस्तू मार्गदर्शक ही अशी शेअर करण्यायोग्य विशलिस्ट बनू शकते जी तुमचे प्रेक्षक मित्र आणि कुटुंबाला पाठवू शकतात आणि सुट्ट्यांमध्ये खरेदी करणार्या खरेदीदारांना ती सर्च इंजिनद्वारे सापडू शकते.
तुमच्या भेटवस्तू मार्गदर्शक पोस्टची रचना कशी करावी ते येथे दिले आहे.
शीर्षकाचे फॉर्म्युले
तुमच्या पोस्टला काही संदर्भ देणाऱ्या शीर्षकासह सुरुवात करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही आजीला आवश्यक असलेलीच गोष्ट विकत असाल, तर ती माहिती थेट तुमच्या शीर्षकात टाका. तुमच्या ब्लॉग पोस्टच्या शीर्षकात तुमच्या प्रेक्षकांचा समावेश केल्याने तुमची सामग्री ज्यांना हवी आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात मदत होईल. खालील ब्लॉग पोस्ट शीर्षकांच्या उदाहरणांचे पुनरावलोकन करा:
- विशिष्ट प्रेक्षकांसाठी सुट्ट्यांचे भेटवस्तू मार्गदर्शक. उदाहरणार्थ, आईसाठी व्हॅलेंटाईन डे भेटवस्तू मार्गदर्शक.
- एखाद्या वयोगटासाठी भेटवस्तूंच्या कल्पना. उदाहरणार्थ, नवीन पदवीधरांसाठी 10 उत्कृष्ट भेटवस्तू कल्पना.
- विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीसाठी भेटवस्तू मार्गदर्शक. उदाहरणार्थ, तुमच्या जिवलग मित्रांसाठी भेटवस्तू मार्गदर्शक.
परिचय
तुमच्या ब्लॉग पोस्टच्या पहिल्या परिच्छेदामध्ये तुमच्या ब्लॉग पोस्टचे कारण किंवा विषय स्पष्ट केलेला असावा. तुम्ही तो एखादा प्रश्न, कथा किंवा किस्सा किंवा तुमच्या प्रेक्षकांशी संबंधित असेल असे तुम्हाला वाटेल अशा कोणत्याही माहितीच्या रूपात मांडू शकता, जसे की:
- तुमच्या प्रेक्षकांसाठी खरेदी करणे कशामुळे कठीण होते?
- तुमचे प्रेक्षक भेटवस्तूमध्ये काय शोधतात?
- आजकाल तुमच्या प्रेक्षकांना कशामध्ये स्वारस्य आहे?
भेटवस्तू कल्पना
तुमच्या मार्गदर्शकातील प्रत्येक आयटमसाठी खालील पायऱ्या पुन्हा करा:
- उत्पादनाची इमेज
- उत्पादन तपशील
- उत्पादनाचे नाव
- उत्पादनाची किंमत
- तुमच्या स्टोअरमधील उत्पादनाची लिंक
- हे उत्पादन प्रेक्षकांसाठी एक उत्तम पर्याय का आहे याचे संक्षिप्त वर्णन.
राऊंडअप ब्लॉग पोस्ट
राऊंडअप पोस्ट हा तुमच्या समुदायाच्या स्वारस्याच्या एखाद्या विशिष्ट विषयावरील किंवा अॅक्टिव्हिटीवरील संसाधनांचा संग्रह असतो. स्वत:हून खूप नवीन सामग्री तयार न करता तुमच्या स्टोअरवरील ट्रॅफिक वाढवण्यासाठी तुम्ही राऊंडअप पोस्ट वापरू शकता.
राऊंडअप पोस्टच्या विषयांविषयी विचार करताना, तुमच्या आदर्श ग्राहकाचा विचार करा. अशी कोणतीही गोष्ट आहे का ज्यासाठी ते विशेषतः उत्सुक आहेत किंवा संघर्ष करत आहेत? तुम्ही अशी एखादी पोस्ट तयार करू शकता जी तुमच्या प्रेक्षकांना आवश्यक असणारी किंवा हवी असलेली सर्व संसाधने प्रदान करेल. या प्रकारच्या सामग्रीसाठी राऊंडअप पोस्ट योग्य आहे.
शीर्षकाचे फॉर्म्युले
तुमच्या राऊंडअप पोस्टच्या परिचयामध्ये संसाधनांच्या सूचीशी संबंधित वैयक्तिक कथा किंवा किस्से, तसेच ब्लॉग पोस्टचे ध्येय यांचा समावेश असू शकतो. तुमचा परिचय लिहिताना, खालील प्रश्नांची उत्तरे द्या:
- हे राऊंडअप कोणासाठी आहे?
- तुमचे प्रेक्षक काय शिकणार आहेत किंवा संसाधनांमधून त्यांना काय फायदा होणार आहे?
- तुम्ही शेअर करत असलेली माहिती तुमच्या प्रेक्षकांसाठी मौल्यवान का आहे?
शीर्षक फॉर्म्युल्यांची उदाहरणे:
- तुमच्या प्रेक्षकांना एखादी कृती करण्यास मदत करण्याचे अनेक मार्ग. उदाहरणार्थ, तुमच्या लहान मुलामध्ये सामाजिक कौशल्ये विकसित करण्यात मदत करण्याचे 10 मार्ग.
- तुमचे प्रेक्षक एखादी कृती करू शकण्याचे मार्ग. उदाहरणार्थ, तुमची पँट्री व्यवस्थापित करण्याचे 15 मार्ग.
संसाधन
तुमच्या पोस्टमधील प्रत्येक संसाधनासाठी खालील माहिती पुन्हा करा:
- प्रत्येक संसाधनासाठी इमेज
- प्रत्येक संसाधनाची लिंक
- प्रत्येक संसाधनाचे लहान वर्णन, जसे की ती सर्वोत्तम निवड का आहे
- प्रत्येक संसाधनाची किंमत, लागू असल्यास.
हाऊ-टू ब्लॉग पोस्ट
हाऊ-टू पोस्ट्स एखाद्या प्रोजेक्टसाठी किंवा अॅक्टिव्हिटीसाठी टप्प्याटप्प्याने सूचना देतात. काहीतरी नवीन शिकवून तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर व्हिजिटर्सना आकर्षित करण्यासाठी तुम्ही हाऊ-टू पोस्ट्स वापरू शकता. जर तुम्ही तुमच्या उत्पादनांचा पायऱ्यांमध्ये किंवा प्रोजेक्टसाठी आवश्यक असलेल्या सामग्रीच्या सूचीमध्ये समावेश केला, तर तुमची हाऊ-टू ब्लॉग पोस्ट विक्रीला प्रोत्साहन देखील देऊ शकते.
रेसिपीची राऊंडअप पोस्ट चांगली आहे, पण तुमच्या मूळ, चविष्ट रेसिपीपैकी एखादी हाऊ-टू पोस्ट त्याहूनही चांगली आहे - आणि ती फक्त अन्न विकणाऱ्या स्टोअरसाठीच नाही. तुमचे प्रेक्षक माहिती शोधत आहेत आणि तुमच्याकडे शेअर करण्यासाठी काही उत्तम कल्पना आहेत. तुम्ही जवळजवळ कशावरही हाऊ-टू पोस्ट तयार करू शकता, उदाहरणार्थ, हाऊ-टू पोस्ट कशी लिहावी. तुमच्या हाऊ-टू पोस्टसाठी तुम्हाला कशाची आवश्यकता असेल ते येथे दिले आहे:
शीर्षकाचे फॉर्म्युले
- अपेक्षित परिणामासाठी कमी वेळेत एखादे विशिष्ट कार्य कसे करावे ते शिका. उदाहरणार्थ, प्रॉममध्ये थक्क करण्यासाठी 10 मिनिटांत स्लो डान्स करायला शिका.
- विशिष्ट वेळेत कार्य कसे पूर्ण करावे. उदाहरणार्थ, 3 तासांत तुमचे फर्नेस कसे बदलावे.
- मर्यादित संसाधनांसह किंवा वेळेसह कार्य कसे पूर्ण करावे. उदाहरणार्थ, फक्त 4 घटकांसह एक उत्तम जेवण बनवा.
- एखाद्या विशिष्ट परिणामासाठी कार्य कसे पूर्ण करावे. उदाहरणार्थ, तुमच्या आवडत्या जीन्सची हेम (Hem) कशी रिस्टोअर करावी.
परिचय
तुमच्या हाऊ-टू पोस्टच्या परिचयामध्ये ब्लॉग पोस्टचे ध्येय स्पष्टपणे नमूद केलेले असावे. तुमचा परिचय लिहिताना, खालील प्रश्नांची उत्तरे द्या:
- तुमच्या प्रेक्षकांना या कौशल्याची इच्छा किंवा आवश्यकता का आहे?
- यामुळे त्यांना कोणती गोष्ट अधिक किंवा कमी प्रमाणात करण्यास मदत होईल?
- यामुळे किती वेळ किंवा मेहनत वाचेल?
- तुम्ही ते का शिकवत आहात? तुम्हाला उत्तम परिणाम मिळाले असतील, तर थोडे सादरीकरण करा!
पायऱ्यांची सूची
प्रक्रियेचे पायऱ्यांमध्ये विभाजन करून तुमचे मार्गदर्शक तयार करा:
- प्रक्रियेतील प्रत्येक पायरीची सूची करा.
- प्रत्येक पायरी सोपी आणि साध्य करण्यायोग्य ठेवण्यासाठी लहान सूचना जास्त संख्येत असाव्यात, हे ध्येय ठेवा.
टप्प्याटप्प्याने सूचना लिहिताना, तुमच्या प्रोजेक्टमध्ये काय समाविष्ट आहे याची तुमच्या प्रेक्षकांना पूर्वकल्पना आहे असे गृहीत धरू नका. कल्पना करा की तुम्ही हे अगदी पहिल्यांदाच करत आहात - ज्या पायऱ्या तुम्हाला आता अगदी सोप्या किंवा अंतर्ज्ञानी वाटतात, त्या तुमच्या प्रेक्षकांसाठी स्पष्टपणे मांडल्या पाहिजेत. तुमच्या पायऱ्या तयार केल्यानंतर, त्या अर्थपूर्ण आहेत आणि पुढील पायरी सुरू होण्यापूर्वी आवश्यक असलेल्या प्रत्येक कृतीचा त्यात समावेश आहे याची खात्री करण्यासाठी त्या एकामागून एक तपासा.
समाविष्ट करा
तुमच्या मार्गदर्शक ब्लॉग पोस्टमध्ये खालील माहिती जोडण्याचा विचार करा:
- या प्रोजेक्टसाठी आवश्यक बाबी लिहा. तुमच्या प्रेक्षकांना सर्व आवश्यक घटक प्रथम एकत्रित करण्यास सांगल्याने त्यांना वेळ वाचवण्यात आणि पुढील पायऱ्या फॉलो करण्यासाठी लोकांना तुमच्या पोस्टवर ठेवण्यास मदत होईल.
- प्रत्येक पायरी पूर्ण करण्यासाठी एक ओव्हरव्ह्यू किंवा मार्गदर्शक जोडा.
- आवश्यकतेनुसार इमेज समाविष्ट करा. पायरी किंवा ध्येय संवाद साधण्यासाठी प्रत्येक पायरीला चित्राची आवश्यकता नसते, परंतु योग्य ठिकाणी असलेल्या काही इमेज तुमच्या पोस्टमध्ये रंग भरू शकतात आणि मजकुराचा कंटाळवाणेपणा दूर करू शकतात.
मुलाखतीचे ब्लॉग पोस्ट
स्वतः सर्व काही विचारमंथन न करता ब्लॉग पोस्ट तयार करण्याचा मुलाखत पोस्ट हा एक उत्तम मार्ग आहे. तज्ञांना त्यांच्या आवडीच्या गोष्टींबद्दल बोलण्यास मिळवणे हे तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रेक्षकांसाठी मनोरंजक आणि उपयुक्त ठरू शकते. मुलाखत पोस्ट हे देखील हमी देतात की तुमची पोस्ट केवळ तुमच्या प्रेक्षकांच्या पलीकडे शेअर केली जाईल. तुम्ही ज्या व्यक्तीची मुलाखत घेता ती व्यक्ती ब्लॉग पोस्ट प्रकाशित झाल्यानंतर बहुधा ती पोस्ट त्यांच्या स्वतःच्या प्रेक्षकांसोबत शेअर करेल, ज्यामुळे तुमच्या ऑनलाइन स्टोअरवर नवीन व्हिजिटर येतील.
तुमची मुलाखत सेट करा
मुलाखत सेट करण्यासाठी, तुमच्या स्टोअर किंवा उत्पादनांशी संबंधित कम्युनिटी किंवा इंडस्ट्रीमधील कोणाशी तरी संपर्क साधा. जेव्हा तुम्ही मुलाखत घेऊ इच्छित असलेल्या व्यक्तीशी संपर्क साधता, तेव्हा तुम्ही खालील माहितीचा विचार केल्याची खात्री करा:
- व्यक्तीला त्यांच्या पहिल्या नावाने संबोधित करा
- तुमचे नाव आणि कंपनीची माहिती समाविष्ट करा
- तुम्हाला या व्यक्तीची मुलाखत का घ्यायची आहे?
- तुमच्या प्रोजेक्टच्या तपशीलाची रूपरेषा द्या आणि ते तुमच्या प्रेक्षकांशी कसे संबंधित आहे ते सांगा
- या व्यक्तीबद्दल असे काय आहे ज्यामुळे तुम्हाला त्यांची मुलाखत घ्यावीशी वाटते?
- या मुलाखतीला किती वेळ लागेल?
मुलाखतीची व्यवस्था झाल्यानंतर, तुम्हाला बोलण्यासाठी काही विषयांची आवश्यकता असेल.
मुलाखतीच्या प्रश्नांची सूची तयार करा
प्रतिसाद मिळवणारे मुक्त प्रश्न विचारा. प्रत्येकाची सुरुवात कोण, काय, कुठे, केव्हा, का आणि कसे यांनी करा, जसे की:
- तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये कसे सहभागी झालात?
- तुम्हाला तुमची प्रेरणा कुठून मिळते?
इमेज
इमेज तुमची मुलाखत पोस्ट अधिक आकर्षक बनवू शकतात. तुमच्या मुलाखतीशी किंवा तुमच्या चर्चेच्या विषयाशी थेट संबंधित असलेल्या इमेज वापरा. यामुळे मजकुराचा कंटाळवाणेपणा दूर होईल आणि तुमच्या मुलाखतीच्या ब्लॉग पोस्टमध्ये व्हिज्युअल स्वारस्य वाढेल.
संसाधने
हे ब्लॉग पोस्ट प्रकार तुम्ही तयार करू शकणाऱ्या पोस्टच्या प्रकारांची केवळ काही उदाहरणे आहेत. तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल लिहू शकता, परंतु जर तुम्ही तुमच्या स्टोअर किंवा व्यवसायाशी थेट संबंधित असलेल्या पोस्ट लिहिल्या तर तुम्हाला अधिक यश मिळेल. इतर लोक काय लिहित आहेत हे जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर इतर इंडस्ट्रीचे ब्लॉग शोधा. तुम्हाला सुरुवात करण्यासाठी येथे काही उत्तम संसाधने आहेत:
- Shopify ब्लॉग
- ई-कॉमर्स स्टोअर्सद्वारे चालवले जाणारे 8 उत्तम ब्लॉग
- Shopify पार्टनर्स ब्लॉग
- The Keyword, विविध विषयांवरील Google चा ब्लॉग