जलद चेकआउट बटणे सुसंगतता
काही प्रकरणांमध्ये जलद चेकआउट बटणे तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी योग्य नसतील. तुम्ही तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये जलद चेकआउट बटणे जोडण्यापूर्वी, खालील वैशिष्ट्यांसह त्यांच्या सुसंगततेचा विचार करा:
अॅप्स
जलद चेकआउट बटणे विशिष्ट अॅप्समध्ये अडथळा निर्माण करू शकतात.
तुम्ही खालीलपैकी कोणत्याही प्रकारची अॅप्स वापरत असल्यास, जलद चेकआउट बटणे तुमच्या ऑनलाइन स्टोअरशी सुसंगत नसतील:
- चलन रूपांतरके
- कार्टशी संवाद साधणारी अॅप्स
- ग्राहकांना बाह्य चेकआउटवर घेऊन जाणारी अॅप्स
कार्ट अॅट्रिब्युट
जलद चेकआउट बटणे कार्ट अॅट्रिब्युटला सपोर्ट करत नाहीत. कार्ट अॅट्रिब्युट हे सानुकूल फॉर्म फील्ड्स आहेत जे तुम्ही कार्ट पेजवर तुमच्या ग्राहकांकडून अतिरिक्त माहिती गोळा करण्यासाठी वापरू शकता.
कार्ट अॅट्रिब्युटच्या उदाहरणांमध्ये कार्ट पेजवरील खालील बाबींचा समावेश होतो:
- अटी आणि शर्तींचे चेकबॉक्सेस
- गिफ्ट-रॅपिंगचे पर्याय
- वितरणाची तारीख निवडक
तुम्ही कार्ट अॅट्रिब्युटवर अवलंबून असल्यास, जलद चेकआउट बटणे तुमच्या ऑनलाइन स्टोअरसाठी योग्य नाहीत.
उत्पादने
जलद चेकआउट बटणे उत्पादनाचे फक्त सिंगल व्हेरिएंट्स खरेदी करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. तथापि, तुम्ही उत्पादन पेजवर प्रमाण निवडक प्रदर्शित केल्यास, ग्राहक त्या व्हेरिएंटपैकी एकापेक्षा अधिक उत्पादने खरेदी करू शकतात. उदाहरणार्थ, ग्राहक दोन लाल टी-शर्ट खरेदी करण्यासाठी जलद चेकआउट बटण वापरू शकतो, परंतु एक लाल टी-शर्ट आणि एक निळा टी-शर्ट खरेदी करण्यासाठी नाही.
सक्रिय प्राप्तकर्ता फील्ड्स असणारी गिफ्ट कार्ड उत्पादने जलद चेकआउट बटणे प्रदर्शित करणार नाहीत. याचे कारण असे की चेकआउटकडे पुढे जाण्यापूर्वी प्राप्तकर्त्याची माहिती गोळा करणे आवश्यक असते.
पेमेंट सेटिंग्ज
तुम्ही तुमच्या पेमेंट सेटिंग्ज मध्ये तृतीय-पक्ष जलद चेकआउट पद्धत सुरू केली नसल्यास, जलद चेकआउट बटणाची फक्त अनब्रँडेड आवृत्ती प्रदर्शित होईल.
बटणाचा मजकूर
अनब्रँडेड जलद चेकआउट बटण आताच खरेदी करा हा मजकूर प्रदर्शित करते. तुमचे कार्टमध्ये जोडा बटणदेखील आताच खरेदी करा किंवा इतर सानुकूल मजकूर प्रदर्शित करत असल्यास, यामुळे ग्राहकांचा गोंधळ उडू शकतो.