कोडशिवाय 3D व्ह्यूअर कॉन्फिगरेशन

कोणताही कोड संपादित न करता तुम्ही तुमच्या Shopify ॲडमिनमध्ये तुमचे 3D मॉडेल्स कॉन्फिगर करू शकता. तुमच्या उत्पादने पेजवरून तुमच्या मॉडेलची लायटिंग, पार्श्वभूमीचा रंग, एक्सपोजर स्तर, झूम आणि सुरुवातीचा कॅमेरा व्ह्यू ॲडजस्ट करा.

3D मॉडेल संपादित करा

तुम्ही तुमच्या 3D मॉडेलचे लायटिंग किंवा कॅमेरा व्ह्यू अ‍ॅडजस्ट करू शकता. 3D मॉडेल एडिटर अ‍ॅक्सेस करण्यासाठी, 3D मॉडेल असलेले उत्पादन उघडा. उत्पादन पेजवरील मीडिया विभागावर खाली स्क्रोल करा आणि इमेजमधील 3D आयकनवर क्लिक करा.

हायलाइट केलेल्या 3D मॉडेल व्ह्यूअर बटणासह उत्पादन मीडिया

मॉडेल लायटिंग संपादित करा

  1. तुमचे उत्पादने पेज उघडा आणि 3D मॉडेल असलेले उत्पादन निवडा.
  2. उत्पादनातील मीडिया वर खाली स्क्रोल करा. 3D मॉडेल शोधा आणि इमेजमधील 3D आयकनवर क्लिक करा.
  3. फाईल संपादित करा वर क्लिक करा. बाय डीफॉल्ट, लायटिंग संपादन पर्याय प्रथम लोड केले जातात. तुम्हाला करायचा असलेला संपादनाचा प्रकार निवडा:
  • पर्यावरण मध्ये पूर्व-सेट केलेले फिल्टर्स असतात जे तुमच्या इमेजवर दिसणार्‍या सावल्या आणि रिफ्लेक्शन्स बदलतात. याचा तुमच्या इमेजवर कसा परिणाम होतो हे पाहण्यासाठी कोणत्याही फिल्टरवर क्लिक करा.
  • लायटिंग तुम्हाला तुमच्या 3D इमेजचे एक्सपोजर बदलण्याची अनुमती देते. इमेज एक्सपोजर अ‍ॅडजस्ट करण्यासाठी स्लाइडर वापरा.
  • पार्श्वभूमी तुमच्या 3D इमेजचा पार्श्वभूमी रंग बदलते. तुम्ही पारदर्शक पार्श्वभूमी वापरा बॉक्स निवडून इमेजची पार्श्वभूमी पारदर्शक म्हणून सेट करू शकता. रंग निवडक वापरून तुमच्या इमेजसाठी पार्श्वभूमीचा रंग निवडा किंवा रंग निवडकच्या खालील फील्डमध्ये रंगासाठी हेक्स कोड टाका.
  1. तुमची फाईल संपादित केल्यानंतर, तुमचे बदल सेव्ह करण्यासाठी पूर्ण झाले वर क्लिक करा किंवा इमेज तिच्या मूळ स्थितीत परत आणण्यासाठी रीसेट करा वर क्लिक करा.

मॉडेल कॅमेरा व्ह्यू संपादित करा

  1. तुमचे उत्पादने पेज उघडा आणि 3D मॉडेल असलेले उत्पादन निवडा.
  2. उत्पादनातील मीडिया वर खाली स्क्रोल करा. 3D मॉडेल शोधा आणि इमेजमधील 3D आयकनवर क्लिक करा.
  3. फाईल संपादित करा वर क्लिक करा. मॉडेलचे व्ह्यू पर्याय लोड करण्यासाठी कॅमेरा आयकनवर क्लिक करा.
  4. तुम्हाला करायचा असलेला संपादनाचा प्रकार निवडा:
  • X रोटेशन अँगल वाढवून किंवा कमी करून इमेजचे X रोटेशन बदला.
  • Y रोटेशन अँगल वाढवून किंवा कमी करून इमेजचे Y रोटेशन बदला.
  • झूम टक्केवारी स्लाइडरसह तुमच्या इमेजवर झूम इन करा.
  1. तुमची फाईल संपादित केल्यानंतर, तुमचे बदल सेव्ह करण्यासाठी पूर्ण झाले वर क्लिक करा किंवा इमेज तिच्या मूळ स्थितीत परत आणण्यासाठी रीसेट करा वर क्लिक करा.